Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रेमाची गोष्ट

ह
हेरंब यांनी
Sat, 05/03/2008 - 14:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5836 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव Sun, 05/04/2008 - 05:47 नवीन
मीनाचे नाव 'प्रेमा' असायला हवे होते. म्हणजे कदाचित 'प्रेमाची गोष्ट' हे नाव समर्पक ठरले असते. :)) बाकी नावात काय आहे म्हणा? असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी दासबोधात लिहून ठेवलंय.. हे लक्षात घ्या आणि द्या सोडून. 8} तीन तासात तुमच्या डोक्याचा पार भुगा केला ना? त्याची किंमत म्हणून तिकिटे होती असे समजा. :T मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत Sun, 05/04/2008 - 06:15 नवीन
खरंच नाटक असंच होतं की खिल्ली उडवताय? ३ तास कसे काढलेत हो? (१० पाने वाचून कोसला सोडून दिलेला) अनिकेत
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 05/05/2008 - 10:45 नवीन
प्रेषक हेरंब ( शनी, 05/03/2008 - 17:34) . | नाट्य | विनोद| अनुभव | समीक्षा
हेरंबराव, एकूणातच तुम्हाला आलेल्या विनोदी नाट्याची....नाही...नाही...नाट्याच्या विनोदी अनुभवाची समिक्षा चोख केलेली आहे :) बाकी हे नाटक, त्याचं कथानक, त्याचं शिर्षकाशी दुरान्वयानेही नसलेला संबंध ह्या सगळ्या गोष्टी पाहता, हे नाटक समांतर वाल्यांचं होतं की ऍब्सर्ड वाल्यांचं? नाटकातल्या प्रकरणांचा एकमेकांशी संदर्भ काहीच लागला नाही म्हणून विचारलं :)) पण एक मात्र खरं, असं पैसे खर्चून एखादं 'अप्रतिम' नाटक पाहिलं की ती आयुष्यभराची आठवण राहते.:) बाकी, संदर्भ लागले की प्लीज मलाही सांगाल का?
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Mon, 05/05/2008 - 11:30 नवीन
मग केबी ज्ञान म्हणजे कॉय ? असा मूलभूत प्रश्र्न "लागवी" =)) आवाजांत विचारतो =)) =)) एक हात छातीवर आडवा धरुन दुसरा हात गालाला लाउन मान थोडी खाली झुकलेली लागूमुर्ती डोळ्यासमोर उभी राहिली...... लागवी आवाज हा तर छप्परफाड शेरा..... लै आवडला.... बाकी नाटकाचे परीक्षण (पोस्ट्मार्टेम) खुपच भन्नाट झालय.... हेरंबराव असेच लिहित रहा..... अवांतरः तुमच्यात मला टीकाकाराची बिजे दिसतात.... तेवढे भडकमकरांकडे जाउन ब्रशअप करुन घ्या. महाराष्ट्रातील अघाडीचे टीकाकार व्हाल.... (गुणवेचक)आंबोळी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 05/05/2008 - 12:18 नवीन
आपण अनुक्रमें ७०, ५०, ४० व २५ रुपयांना बुडल्याचे कमीअधिक दुःख होते!!! हे सर्वात मस्त! :)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 05/05/2008 - 21:07 नवीन
त्याचे स्वगत संपवून तो जातो....//////त्यावर "म्हणजे काय?" असे लिहिलेले असते../////तिलाही तोच चिटोरा दिसतो. ...////.या सर्वांची स्वगतें नीट कान देऊन ऐकावी लागतात..../////इतक्या गहन् प्रश्नावर विचारमंथन केल्यामुळे दोघांना हार्ट ऍटॅक येतो आणि ज्ञानाच्या शोधांत दोघेही परलोकी जातात../////..त्याचक्षणी नाटक संपल्यामुळे प्रेक्षकांनाही(कांही सन्मानननीय अपवाद वगळतां) आपण अनुक्रमें ७०, ५०, ४० व २५ रुपयांना बुडल्याचे कमीअधिक दुःख होते!!! =)) =)) =)) वरील वाक्ये विशेष दर्जेदार.... चिठोर्‍यावर म्हणजे काय? काय हा ऍब्सर्डपणा=)) =)) ........... कधी कधी मोठ्या लोकांनी अभिनय केलेला असला की नाटक बाय डिफॉल्ट बेष्ट असणार असला गैरसमज सगळे बाळगतात...मग त्या नाटकावर योग्य टीका करणेही मुष्किल होऊन बसते, हेरंबराव, आपण असली भीड बाळगली नाहीत ते योग्यच केलेत्...छान... ( आपले प्रेम कधीही फ्रीजमध्ये न ठेवणारा ) भडकमकर
  • Log in or register to post comments
ए
एक Tue, 05/06/2008 - 00:08 नवीन
"..शेवटी एकदाचे केबी आणि मीना भैरोबाच्या माळावर भेटतात. देऊळ व कबरीच्या जवळ बसतात, गप्पा मारतात, नाचतात सुद्धा"....." हे बघण्यासाठी मी एकदा २५ रू द्यायला तयार आहे. =))
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 05/06/2008 - 18:32 नवीन
हेनाटक पाहिले नाही , पण त्याचे पुस्तक आणि त्याचे लेखक शाम मनोहर यांच्या "कळ" आणि आणखी एक अशा २ कादंबर्‍या वाचण्याचा प्रयत्न केला. पुलंच्या भाषेत , "ए-क-अ-क्ष-र-क-ळ-लं-त-र-श-प-थ".
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 05/06/2008 - 21:25 नवीन
समिक्षा वाचुनच झीट आली.. तुम्ही कस काय बॉ सहन केलत? तुमच्या सहनशक्तिला सलाम. पण "..शेवटी एकदाचे केबी आणि मीना भैरोबाच्या माळावर भेटतात. देऊळ व कबरीच्या जवळ बसतात, गप्पा मारतात, नाचतात सुद्धा"....." या एकाच्या म्हणण्या प्रमाणे केबींना नाचताना पहायला आपण पण बी २५ दमड्या मोजायला तैय्यार..
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 05/07/2008 - 10:01 नवीन
कसलं हे नाटक !!! आणि नाव काय तर प्रेमाची गोष्ट ? त्या पेक्षा डोक्याच्या भुग्याची गोष्ट हे नाव द्या.(तुम्ही नव्हे..नाटककाराला म्हणतोय मी). एखाद्यावर सूड उगवायचा असेल तर सरळ २५ रू चे ति़कीट काढून द्या धाडून त्याला ह्या नाटकाला. तुमच्या सहनशक्तिला आपलाही सलाम. --"..शेवटी एकदाचे केबी आणि मीना भैरोबाच्या माळावर भेटतात. देऊळ व कबरीच्या जवळ बसतात, गप्पा मारतात, नाचतात सुद्धा"....." हे बघण्यासाठी मी एकदा २५ रू द्यायला तयार आहे छ्या ..त्यापेक्षा पोतराजा ला नाचताना पाहू..त्याची तरी कमाई होईल. -- पक्या
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा