स्तुत्य प्रयत्न. माझे २ पैसे खालीलप्रमाणे
म आणि न ने सगोत्र विवाहच केला पाहिजे असे मला वाटते. मराठीत (आणि बहुतांश भारतीय भाषांमध्ये) २ नव्हेत तर ५ अनुनासिके आहेत. आपण जेव्हा हेच शब्द इंग्लिश मध्ये लिहितो तेव्हा तिथे केवळ या दोनच अक्षरांना "counterpart" असल्यामुळे आपण सरसकट तेच वापरतो. हतोळकरांनी दिलेला धागा पाहिला. तो जास्त बरोबर वाटला. त्यांनी बरेचसे कव्हर होते आहे. तरीही माझी लेखनकंड शमवायला शाळेत शिकलेले जितके मला आठवते आहे ते लिहिण्याच्या प्रयत्न करतो.
व्यंजनांचे खालील प्रमाणे गट आहेत.
क ख ग घ ङ कंठ्य :- यांचा उच्चार कंठातून होतो.
च छ ज झ ञ मूर्धन्य :- मुर्धा म्हणजे टाळू आणि दातामधील भाग. हे उच्चार करताना जीभ जिथे लागते तो भाग
ट ठ ड ढ ण तालव्य :- यांचा उच्चार करताना जीभ टाळ्याला लागते
त थ द ध न दन्त्य :- यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते
प फ ब भ म ओष्ठ्य :- यांचा उच्चार करताना ओठांचा वापर होतो (तो इतरही काही सुंदर कामात होतो म्हणा :-) (हे आपले अवांतर) )
य र ल व स श ष ह ळ
पहिल्या पाच गटांना स्वतःचे अनुनासिक आहे. गटातील शेवटचे अक्षर हे अनुनासिक. शब्दात जेव्हा अनुस्वार येतो तेव्हा अनुस्वार ज्या अक्षरावर आहे, त्यातील पुढचे अक्षर ज्या गटाचे आहे त्या गटाच्या अनुनासिकाचा उच्चार होतो. उदा अंगठी मध्ये अनुस्वार अ वर आहे पण पुढे ग असल्याने ङ चा उच्चार होतो. तसेच अंजीर मध्ये ञ चा, अंडी मध्ये ण चा, अंत न चा आणि अंबर मध्ये म चा होतो. हेच शब्द अनुस्वार न वापरता लिहायचे असल्यास खालील प्रमाणे लिहावे लागतात. अङगठी, अञजीर (इथे ङआणि ञ चे पाय मोडावेत, खूप प्रयत्न करूनही लिहिता नाही आले तसे), अण्डी, अन्त, अम्बर. याला बहुधा परसवर्ण म्हणतात.
शेवटच्या गटाला स्वतःचे अनुनासिक नाही यातील काही अक्षरांच्या (व स श ष ह) आधी अनुस्वार आला असता उच्चारात व चा उद्भव होतो. उदा संविधान, सिंह, हंस, अंश वगैरे. यांना परसवर्ण नाही. य र ल ळ च्या बाबतीत काय होते माहित नाही. पटकन उदाहरण नाही सापडत आहे.
२ पैसे संपले :-)
काही चुकले असेल तर चू भू द्या घ्या. भाषेतील जाणकारांनी अजून प्रकाश टाकावा.
प्रतिक्रिया
छान माहिती
छान माहीती
ह्म्म्म
लेख अजुन वाचला नाही.. पण
स्तुत्य प्रयत्न. माझे २ पैसे
आयला, मनोगतावरील प्रतिसाद
हरकत नाही.