जुलै महिन्याच्या सुरवातीला कात्रज ते सिंहगड असा ट्रेक करण्याचा योग आला होता. शनिवारचा दिवस होता. सकाळी ७ लाच जुन्या कात्रज बोगद्याच्या वरुन चढायला सुरवात केली. सकाळी सकाळी स्वारगेटवरून टमटम पकडुन आम्ही ८ लोक इथे पोहचलो होतो. आधिच ट्रेक खुप अवघड आहे असे सांगण्यात आले होते , पण उस्ताहाच्या भरात त्याचा सिरिअसनेस आम्हाला कळला नव्हता. पण पहिलाच डोंगर चढतानाच पुढच्या ट्रेक ची कल्पना आली. वरुतुन कात्रज घाट असा दिसत होता.
 |
| वरुन दिसणारा कात्रज घाट. |
चालता चालता सुंदर निसर्ग निहाळत होतो. तेव्हा ते क्षण कॅमेरयात टिपले.
 |
| हिरवे हिरवे गार गालीचे हरीत
तृणांच्या मखमालीचे. |
 |
| धुक्यात हरवलेली वाट. |
पुढे चालत राहिलो. मग एक एक असे ४-५ दोंगर चढलो आणि उतरलो.मग एका ठिकानी थोडी विश्रांती घेतली आणि एकाने आणलेल्या गुळ पोळ्या खाल्ल्या.जरा बरे वाटले. मग थोडे फ़ार ऑर्कुट पोस देत फोटो काढले व परत चालायला लागलो. एकामागुन एक असे डोंगर चढत होतो आणि उतरत होतो. पण सिंहगड काही दिसत नव्हता.तो तिकडे लांब ढगांच्या आड लपला होता. मधे आजुबाजुला दिसनारा निसर्ग मात्र टिपत होतो,डोळ्यांत आणु कॅमेरयातही.
 |
| एक कॅमेरयात टिपलेले द्रुश्य. |
 |
| असेच अजुन एक कॅमेरयात टिपलेले द्रुश्य. |
सुरवातीला थोडास रिमझिम पाउस झाला तो तेव्हडाच. नंतर काही पाउस झाला नाही. काही चढ काठीण तर काही सोप्पे होते. आम्ही पुरते थकलो होतो पन आता मधेच अडकलो होतो. परत जायचा कोणी विचार केला असता तरी तो काहि शक्य नव्हता.
मधे काही गावकरी महिला डोक्यावर लाकडांचे ओझे घेवुन चालताना दिसल्या. त्यांची कमाल वाटली.
 |
| ऒझे वाहणारया कष्टकरी महिला. |
तेव्हड्यात ढगांनी क्रुपा केली व सिंहगडाने दर्शन दिले. जरासे बरे वाटले. मग परत जोमाने पुढचा डोगर चढुन गेलो. पण ज्यावेळेस आम्ही त्या डोंगरावर आलो तेव्हा पुढचा मोठा डोंगर बघुन धस्स झाले. पन काही पर्याय नव्हता परत चालायला लागलो.
 |
| आम्ही ह्या रस्त्याने आलो ! |
 |
| पुढील दिसनारा रस्ता. |
रस्त्यामधे काही रानफ़ुलांनी लक्ष वेधुन घेतले. मग परत कॅमेरा काढला आणि फ़ोटोसेशन चालु केले.
असे जवळ जवळ ११ डोगर चढलो आणि उतरलो तेव्हा सिंहगडावर जाण्यारया रस्त्याला लागलो.
तो रस्ता असा दिसत होता.
प्रचंड भुक लागली होती , म्हणुन तिथेच झोपडीत चहा, भजी वर ताव मारला. मग परत त्याच रस्त्याने सिंहगडावर चालत गेलो. गडावर पोहचताच नेहमीप्रमाने गर्दी दिसली. इतक्या वेळची शांतता भंग झाल्यासारखी वाटली. मग मस्त विंड पॉइंट ला जावुन हवा खाली. मग नंतर परत पिठलं भाकरी वर ताव मारला. आणि मग घडावरुन खाली आलो व बस पकडुन परत स्वारगेटला. घरी जायला अंधार झाला होता. पण हा ट्रेक आम्ही खुप इंजॉय केला.
या ट्रेक ला जाताना बॅगमधे पाणी आणि खायला घेणे आवश्यक आहे. कारण मधे कुठेही पाणी नाही आहे. स्टॅमिन्याची कसोटी बघनारा असा हा ट्रेक आहे. तसा लोक रात्री करतात हा ट्रेक, पण जर तुम्हाला आजुबाजुच्या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर दिवसा पण करण्यासारखा आहे. पण उन्हाळ्यात दिवसा प्रयत्न करु नये कारण अंतर खुप आहे त्यामुळे उन्हाचा त्रास होवु शकतो.
प्रतिक्रिया
व्वा संदीप
जिप्सी
In reply to व्वा संदीप by जिप्सी
सुंदर फोटो
In reply to जिप्सी by Pain
विंड पॉइंट
छान ....
मस्त रे!!
सुंदर !!!!!
अनुपम! ते धवल पुष्प तर
धन्यवाद
In reply to अनुपम! ते धवल पुष्प तर by शुचि
फोटो अतिशय सुंदर आले
टॉनिक
In reply to फोटो अतिशय सुंदर आले by मराठमोळा
मस्तच..
सुरेख