Skip to main content

तों.पा.सु का ?

लेखक जागु
Published on बुधवार, 04/08/2010
आठवले का शाळेचे दिवस ?

वाचन संख्या 4937
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

शाळेतले दिवस खरेच आठवले. आणि अशी आवळ्यांनी लगडलेली आवळी पण खूप दिवसांनी पाहिली.. वालचंदला असताना संगणक विभागासमोरच चिंचांचे झाड होते, त्यामुळे चारही वर्षे कोवळ्या चिंचा, गाभुळलेल्या चिंचा, पिकून लाल-चॉकलेटी झालेल्या चिंचांचा लुल्फ उठवला. पहिल्या वर्षाला बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंगची प्रॅक्टीकल्स करताना ग्राउंड भोवतालच्या चिंचा आणि सिव्हिल ड्रॉईंग हॉलच्या मागचे मोरावळे खाताना खाल्लेला सरांचा ओरडाही अजून आठवतोय. मन एकदम भूतकाळात गेलं!!!

पुण्यात लक्ष्मी रोडला आवळ्याच्या सिझनमधे तिखट मीठ लावलेले आवळ्याचे काप मिळतात १०रुपयाला १०० ग्रॅ. छान लागतात. >>आठवले का शाळेचे दिवस ? हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म बाकी कुणाला कोणते दिवस आठवतील हे सांगणे अवघडच. ;)

मस्त कलन्दर......... आवळे काही कमी होते ज्यात तुम्ही अजुन ह्या कोवळ्या चिंचा, गाभुळलेल्या चिंचा, पिकून लाल-चॉकलेटी झालेल्या चिंचां सगळ्या गोष्टीन्ची भर टाकली....

In reply to by गौरीदिल्ली

+१ मस्त कलंदर तैचा निषेध निषेध निषेध!

>>आठवले का शाळेचे दिवस ? आवळा/चिंचेचे डोहाळे लागतात. त्यामुळे स्त्री वर्गाला शाळेचेच काय पण गेलेले दिवसही आठवत असतील :)

वॉव्. खरच् तोंडाला पाणी सुटले. चटणीही करतात ह्याची कैरीच्या चटणी सारखी. चटणीचीपण रेसिपी येऊ दे.

सुप्रिया ओल खोबर, हिरवी मिरची, आवळ्याचा गर सुरीने कापुन, मिठ मिक्सरमधुन काढायच. झाली चटणी.

अपर्णा अग भरपुर रेसिपी आहेत पण इथे फोटो लोड करायचा कंटाळा येतो. आधी फ्लिकर मध्ये टाकायचा मग इथे लोड करायचा. लवकर डायरेक्ट लोड झाला पाहीजे फोटो.