Skip to main content

रावण पिठल्यावर उतारा...मलाई मिंट स्मूदी (लस्सी ची इं.आवृत्ती)

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी बुधवार, 04/08/2010 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ कप गोड घट्ट दही २-३ चमचे साखर पुदिन्याची पाने -७-८ बर्फ ३-४ क्यूब्ज घरगुती साय २-३ चमचे किंवा whipping cream किंवा व्हिप्ड क्रीम स्प्रे कृती : अगदी बारीक चिरुन घ्या. दही + साखर + चिरलेला पुदीना मिक्सर मध्ये घ्या. साखर विरघळेपर्यंत ब्लेंड करा. बर्फ घालुन थोडा वेळ फिरवा. ग्लास मध्ये घ्या. त्यावर आपली मस्त घरगुती दाट साय घाला. किंवा क्रीम घाला. एखाद्या पुदीन्याच्या पानाने मस्त गार्निश करा. आपल्या आवडत्या जागी जा जिथे कोणी त्रास देणार नाही. आणि निवांत पणे स्मूदी चा / लस्सी चा आस्वाद घ्या... आणि माझी पण आठवण न चुकता काढा.

वाचने 3243
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

अपलोड करायचा प्रयत्न करते आहे.. होतच नाहिये हो. धीर धरा... मदतही केली तर चालेल.

आवडत्या जागी ठीक पण आवडत्या स्त्री/पुरुषासोबत बसुन आस्वाद घ्यावा की एकटं बसुन ते सांगितलं नाहीत...

In reply to by टिउ

...आवडत्या खाउ बद्दल विचारशील तर ..... काही काही खाउ असे असतात ना ते आपले आपण आणि तो खाउ येवढ्यातच एन्जॉय करायचे असतात. उदा.चॉकलेट आणि असा कोणताही पदार्थ कि ज्यात डार्क चॉकलेट आहे(चॉकलेट मूस, क्रोझंट्स इ.).माझ्या घरातला एक कोपरा मी निव्वळ तेवढ्यासाठी राखुन ठेवला आहे.कोणी व्यत्यय आणत नाही असा कोपरा. फक्त मी आणि चॉकलेट क्रोझंट..... wallah! या अर्थानी आवडती जागा आणि कोपरा सांगितला होता. काय बाई... कोणाचा जीव कशात तर कोणाचा कशात! :)

आता रावण पिठल्यावर उतारा असे लिहल्याने व आपल्या आवडत्या जागी जा जिथे कोणी त्रास देणार नाही असल्याने ही स्मुदी नक्की अ‍ॅज ए ओरल मेडीकेशन की.... ??????????????????? (उर्मट) सहज

In reply to by पर्नल नेने मराठे

अगं...ते घरगुती सायीचे सुख मायदेशी राहणार्‍या नशिबवंतांसाठी होते. आपल्या सारख्या वाळवंटात राहणार्‍यांसाठी whiippimg cream किंवा whipped cream spray हा option दिला आहे.

गोकुल वापरत असेल

अहो हल्ली चितळे पण दुबईला येउन दुध टाकुन जातात म्हणे....

In reply to by स्वछंदी-पाखरु

अशी जिवघेणी थट्टा ? माझ्या सायवेड्या मनाला असंख्य यातना झाल्या ना. २ सेकंदासाठी मन असे शहारले.अंगावर रोमांच उभे राहिले के व्वा! खरंच की काय? आणि मग नावाकडे लक्ष गेले. अस्ला दुष्ट नाठाळपणा तुच करु शकतोस.