१ ऑगस्ट २०१०
आज १ ऑगस्ट २०१०. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी. दररोज सकाळी इंटरनेटवर वृत्तपत्र वाचणे हा माझा क्रम ठरलेला आहे. त्याप्रमाणेच आज मी सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, आणि लोकसत्ता ही नेहमीची वृत्तपत्रे उघडली. अर्थात टिळकांचा स्मृतीदिन आणि रविवार असा योग असल्या कारणाने माझ्या या आवडत्या व्यक्तिमत्वाबद्दल भरभरून वाचायला मिळणार अशी माझी खात्री होती. पण मी एक गोष्ट विसरलो होतो किंवा दुर्लक्षित केली होती म्हणणे योग्य होईल, कि या महान नायकाच्या पुण्यतिथीपेक्षाही महत्त्वाची तिथी आज होती. ती म्हणजे आपल्या मायबाप अमेरिकेची आपल्याला मिळालेली आणखी एक भेट, ‘Friendship Day’, अर्थात मैत्री दिन.
तीनही वृत्तपत्रांमध्ये मैत्री दिनाला दिलेले महत्त्व ठळकपणे जाणवत होते. नाही म्हणायला महाराष्ट्र टाइम्समध्ये टिळकांवर लिहिलेले दोनच पण चांगले आणि माहितीपूर्ण लेख आणि कुमार केतकर यांचा लोकसत्तामधील टिळक आणि जीना यांवरील लेख वाचून थोडे समाधान झाले. पण हे लेखही शोधून काढावे लागतील अशा ठिकाणी दिलेले होते. सकाळने तर टिळकांच्या पुण्यतिथीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. यापेक्षा त्यांना कोल्हापुर सकाळचा वर्धापन दिन किंवा सिनेतारकांच्या मैत्री दिनामध्ये जास्त रस दिसत होता. ‘Valentines Day’ वर वेगळी पुरवणी काढणाऱ्या या वृत्तपत्रांना टिळकांच्यासारख्या व्यक्तिमत्वाबद्दल एखादे पान काढण्याचे भानही राहू नये ही लज्जास्पद गोष्ट आहे.
खरेतर टिळक, आगरकर, सावरकर, महात्मा गांधी, विनोबा भावे, यांच्यासारख्या महानायकांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे औचित्य साधून, या थोर लोकांबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आणि विचारांबद्दल आजच्या तरुण पिढीला अवगत करून देण्याचे कार्य या वृत्तपत्रांकडून अपेक्षित आहे. जेणेकरून आम्ही किती थोर विचारवंतांचे वंशज आहोत आणि पुरोगामी विचार म्हणजे काय आणि ते बाहेरून आंदण घेण्याची गरज नाही याची जाणीव समाजाला होईल. पण यात दोष वृत्तपत्रांचा नाही असेच म्हणावे लागेल. कारण जे विकले जाइल तेच छापले जाते. नैतिकता, समाजसुधारणा अशा जुनाट संकल्पना आपल्या पुढारलेल्या वृत्तपत्रांनी केंव्हाच टाकून दिलेल्या आहेत. तीही आता भारतापेक्षा India चीच मुखपत्रे आहेत हेच खरे.
प्रतिक्रिया
तुमचे विचार चांगले आहेत,
+१
आत्ताच्या जमान्यात.....
लोकांना फालतू गोष्टीतच जास्त
सहमत
>>खरेतर टिळक, आगरकर, सावरकर,
खरंच!
..
प्र.का.टा.आ.
तुम्हाला जे लेख सापडले, आवडले
>>आणि कुमार केतकर यांचा
एक ऑगष्ट ला सगळा शहरी मेट्रो
टिळक आणि महाराष्ट्र टाईम्स
याच विषयावर धागा काढायच्या
हायपोथेसिस