✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

IT WIFE आणि स्वयंपाक

स
सुजय कुलकर्णी यांनी
Sat, 07/31/2010 - 16:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36511 वाचन

💬 प्रतिसाद (158)

प्रतिक्रिया

छान लेख आहे. खूपच तिखट

अप्पा जोगळेकर
Sat, 07/31/2010 - 16:56 नवीन
छान लेख आहे. खूपच तिखट प्रतिक्रियांच्या अपेक्षेत.
  • Log in or register to post comments

आणखी एक

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/02/2010 - 13:01 नवीन
श्री. सुजय कुलकर्णी, केकता कपूर-टाईप हिंदी-मराठी सिरीयल लिहायचा विचार केला आहेत का? चांगलं नाव कमवाल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

प्रतिसाद

सोम्यागोम्या
Tue, 08/03/2010 - 05:49 नवीन
खल पात्र रंगवण्यास सुजय भाऊंना प्रतिक्रियांची मदत होईल असे एक उगाच वाटून गेले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

छान लेख

पद्माक्षी
Mon, 08/02/2010 - 23:38 नवीन
छान लेख आणि निरीक्षण. दुर्दैवाने बहुतांशी मुद्दे बरोबर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

सुजयभौ!

चतुरंग
Sat, 07/31/2010 - 17:02 नवीन
देव तुमचं रक्षण करो! :) (जाता जाता - सांगली मिरज भागातले काय हो तुम्ही? नाही, तुमच्या काही शब्दांवरुन तशी शंका आली बाकी काही नाही.)
  • Log in or register to post comments

+१

अमोल खरे
Sat, 07/31/2010 - 17:18 नवीन
देवाला पण कठीण आहे बॉस तुम्हाला वाचवणं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

साला जबरी !

मिसळभोक्ता
Mon, 08/02/2010 - 11:11 नवीन
सुजय भाऊंना मानले पाहिजे. पदार्पणातच सेंचुरी, आणि तीही इकडे (हिरव्या नोटांच्या देशात) वीकांत असताना ! जबरा.. आयटी, बायका, स्वयंपाक, युयुत्सुची विचारशैली, असे सगळे प्वाईंट आलेत. मुक्य म्हणजे, कोल्हापूरच्या निबंधलेखकांची आठवण करून देणारे लेखन. साला,झाडावर चढून बसायची संधीच दिली नाही. पण समजा "अमेरिकेतील आयटीतील बायका" असे आले असते, तर ऑल टाईम हाय धागा झाला असता, हे नक्की. पुढील लेखनास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

तरी...

राजेश घासकडवी
Mon, 08/02/2010 - 11:17 नवीन
त्यांनी हे गांधीहत्या, लेन प्रकरण, पुणेरी दुकानदार, शिवाजी, स्वयंसंपादन, एकंदरीतच संपादन... असे हॉट वायर विषय टाळून सेंचुरी मारली हे महत्त्वाचं. म्हणजे साहेबांनी कव्हर ड्राइव्ह न मारता सेंचुरी केल्यासारखं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

१९ व्या शतकातली गिरण

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 07/31/2010 - 17:07 नवीन
तुमचं लग्नं झालं असेल तर तुमच्या बायकोबद्दल फार वाईट वाटलं. आणि झालं नसेल तर ठरेल, होईल त्याआधी त्या दुर्दैवी मुलीला तुमचे हे २०० वर्ष पुराणे विचार जरूर वाचून दाखवा. मला माझ्या नवर्‍याने एकदा विचारलं, "माझी आई मोदक खूप छान बनवते, तुला येतात का?" मी त्याला उत्तरादाखल प्रश्नच विचारला, "माझे बाबा खूप छान नानकटाई बनवतात, तुला येते का?" हा संवाद/वाद तिथेच संपला. आता लग्नं होऊन अडीच वर्ष झालं आहे आणि स्वयंपाकाचीच आवड असलेली बायको असण्यापेक्षा जिच्याशी आवडीच्या विषयांवर चर्चा करता येते तिच्याशी लग्नं करणं हा योग्य निर्णय होता असं तो जाहीरपणे स्वतःच्या मित्रांनादेखील सांगतो. काय आहे ना, जेवण बाहेरून मागवता येतं आणि/किंवा जेवण बनवण्यासाठी माणूस ठेवता येतो. पण विचार शेअर करण्यासाठी बायको (किंवा नवरा) पैसे देऊन ठेवून घेता येत नाही ना!! हे झाले माझे दोन पैसे, नॉन-आयटी वाईफचे!! बाकी चालू द्यात तुमची १९ व्या शतकातली विचारगिरण! अदिती
  • Log in or register to post comments

२००% सहमत

निस्का
Sat, 07/31/2010 - 18:19 नवीन
आजही असा विचार करणारी माणसं आहेत हे बघुन वाईट वाटलं. (नॉन्-आयटी)नेहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वयंपाक शिकायला हवा हे कधी वाटणार ??

सुजय कुलकर्णी
Sat, 07/31/2010 - 19:51 नवीन
नुसते वाईट वाटले ? अरेरे....!! स्वयंपाक शिकायला हवा हे कधी वाटणार...?? तुम्ही (नॉन्-आयटी) लिहिलात फार उत्तम केलत.....तुम्हाला बहुतेक स्वयंपाक येत असावा.....! :-) येत नसला तर थोडातरी शिका हि विनंती ....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निस्का

तुमच्या आचरट

निस्का
Sat, 07/31/2010 - 20:19 नवीन
तुमच्या आचरट विनंती/टोमण्यांना उत्तर देऊन मला त्याची पत वाढवायची नाही. या थिल्लर धाग्यावारचा हा माझा शेवटचा प्रतिसाद. आणि हो, तुम्हाला शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजय कुलकर्णी

अदितीशी बाडिस!!!

मस्त कलंदर
Sat, 07/31/2010 - 19:41 नवीन
तुमच्या बायकोबद्दल(असलेल्या/होणार्‍या) खूपच सहानुभूती वाटते... माझ्या मते स्वयंपाक फक्त मुलींनाच यायला पाहिजे असे नाही. जर तुम्ही स्वतः आयटी मध्ये असाल आणि ऑनसाईट जाण्याची स्वप्ने बघत असाल, तर तुमची बायको करू शकते तसा अर्धकच्चा स्वयंपाक तरी येतो का हो तुम्हांला???? आणि जे काम तुम्ही करता, तेच बायकोही तिच्या ऑफिसात करते. मग घरी आल्यावर म्हटले की मदत कर, तर त्यात तुमचा पुरूषी अहंगंड इतका का दुखावतो?? आणि तुम्हाला बायको चांगली शिकलेली हवी, चांगली नोकरी करणारी(पक्षी: चारलोकांत तुमचे स्टेटस सांभाळणारी) हवी, दिसायला चांगली हवी, तिच्याशी काव्यशास्त्रविनोद चर्चा करता येणारी हवी(अशी तुमची अपेक्षा असल्याचे तुमच्या लेखावरून जरी दिसत नसले तरी इतरांची अशी अपेक्षा असू शकते), हापिसात ९-१० तास काम करूनही घरी आल्यावर न थकता एकटीने आठवडाभर चारी ठाव स्वयंपाक करणारी हवी..... अपेक्षा जरा जास्तच होत नाहीत का हो???? जरा बायकोशी तिला टोमणे मारणॅ सोडून इतर विषयांबद्दल बोलत असाल, तर तिच्याही तिच्या नवर्‍याकडून काय अपेक्षा आहेत हे विचारून घ्या... अर्थात ती सूज्ञ असेल, आणि त्यामुळे भांडण होईल असे वाटत असेल तर ती उत्तर देणार नाही.... आणि पंचविशीतल्या मुलींनी स्वत:ला काकू म्हणवून नाही घेतले, म्हणून व्हॉट युवर अंकल गोझ... हे कोडे काही उलगडले नाही..... अवांतर: स्वतःची जाहिरात नाही, पण मी स्वतः आईकडून (तुमच्या भाषेत शिकायच्या वयात) शिकले नाही... स्वयंपाकाला सुरूवात करून साधारण वर्षभर झाले असेल. कुणाला फोन करण्यापेक्षा गुगलून पदार्थ बनवते आणि ते नक्कीच माणसाने खावे असे चांगले(माझ्या मते ) बनवते. (पुराव्यासाठी विचारा किंवा लिहा: बिका, मोडक, निदे, डॉन, सुबक ठेंगणी) त्यामुळे सरसकटीकरण करताना थोडा विचार करून करा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

णम्र विणंटी

सविता
Wed, 08/04/2010 - 11:51 नवीन
णम्र विणंटी - हे बाडिस म्हणजे काय हे मला कुणी सांगेल का? व्यनी, ख्ररड केले तर बरे होईल... १०० च्या वर प्रतिसाद गेलेल्या लेखात माझा प्रश्न असलेला प्रतिसाद... त्यावर आलेले उपप्रतिसाद.. शेधणे अंमळ अवघड आहे.... -सविता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

हहपुवा

मधुशाला
Sun, 08/01/2010 - 23:33 नवीन
मला माझ्या नवर्‍याने एकदा विचारलं, "माझी आई मोदक खूप छान बनवते, तुला येतात का?" मी त्याला उत्तरादाखल प्रश्नच विचारला, "माझे बाबा खूप छान नानकटाई बनवतात, तुला येते का?" हा संवाद/वाद तिथेच संपला. प्रश्नाला प्रश्न हे यावरचं उत्तर नाही. आपण दोघे मिळून हे शिकू/करू हे योग्य वाटते. काय आहे ना, जेवण बाहेरून मागवता येतं आणि/किंवा जेवण बनवण्यासाठी माणूस ठेवता येतो पण त्याला घरच्या जेवणाची गोडी नसते. स्वतः एखादा पदार्थ करणे आणि तो आपल्या जवळच्या माणसांना खाऊ घालणे यात काय आनंद असतो तो अनुभवूनच बघायला हवा. ती मजा बाहेरच्या माणसाने बनवलेल्या जेवणात नसते. पण विचार शेअर करण्यासाठी बायको (किंवा नवरा) पैसे देऊन ठेवून घेता येत नाही ना!! विचार शेअर करण्यासाठी बायको/नवराच कशाला हवा/हवी? जालावर किंवा मित्रांबरोबर सुद्धा विचार शेअर करता येतातच की. लग्न व्हायच्या अगोदर आपण काय करत असतो? आणि लग्न झाल्यावर समान विषय विचार शेअर करण्यासाठी शोधता येतातच की... सगळ्याना स्वयंपाक यावा ही जर १९ व्या शतकातली विचारगिरण असेल तर १९ वे शतकच पुढारलेले होते असे म्हणावे लागेल. बायकांनी स्वयंपाक करूच नये हीच नवीन विचारसरणी असेल तर धन्यच आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

विचार शेअर करणे व जेवण तयार करणे - एक अदलाबदल

राजेश घासकडवी
Mon, 08/02/2010 - 11:07 नवीन
तुमच्या प्रतिसादात मी अदलाबदल केली आहे. कशी वाटते सांगा... >प्रश्नाला प्रश्न हे यावरचं उत्तर नाही. आपण दोघे मिळून हे शिकू/करू हे योग्य वाटते. काय आहे ना, विचार बाहेरून मिळवता येतात आणि/किंवा विचार शेअर करण्यासाठी माणूस शोधता येतो पण त्याला घरच्या विचारांची गोडी नसते. स्वतः एखादा विचार करणे आणि तो आपल्या जवळच्या माणसांना सांगणे यात काय आनंद असतो तो अनुभवूनच बघायला हवा. ती मजा बाहेरच्या माणसाने सांगितलेल्या विचारांत नसते. >पण जेवण करण्यासाठी बायको वर जबरदस्ती करता येत नाही ना!! जेवण करण्यासाठी बायकोच कशाला हवी? हॉटेलात किंवा स्वयंपाक्याकडून सुद्धा जेवण करून घेता येतंच की. लग्न व्हायच्या अगोदर आपण काय करत असतो? आणि लग्न झाल्यावर जेवण करण्यासाठी शोधता येतातच की... सगळ्याना विचार करता यायला यावा ही जर २१ व्या शतकातली विचारगिरण असेल तर १९ वे शतक मागासलेले होते असे म्हणावे लागेल. बायकांनी विचार करूच नये हीच जुनी विचारसरणी असेल तर धन्यच आहे... वा: छान जुळतंय की. अदितीचे विचार तयार झाले. मी काय म्हणतो, तुम्ही जेवण तयार करा, अदितीला विचार शेअर करू देत. काय? एव्हरीबडी विन्स. हेच एक पाऊल पुढे नेऊन मी म्हणेन, की मिपावर तरी विचार का शेअर करता, त्यापेक्षा आमच्या सगळ्यांसाठी जेवण बनवा की. आम्ही आनंदाने येऊ. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुशाला

१९ वे शतक खुपच चांगले ...

चावटमेला
Mon, 08/02/2010 - 12:02 नवीन
काय आहे ना, जेवण बाहेरून मागवता येतं आणि/किंवा जेवण बनवण्यासाठी माणूस ठेवता येतो असे उर्मटपणाचे विचार पाहता, १९ वे शतकच खूप बरे असावे असे दिसते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुशाला

आम्ही (मी आणि माझा नवरा)

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/02/2010 - 12:38 नवीन
आम्ही (मी आणि माझा नवरा) आमच्या (दोघांच्या) उर्मटपणात खूष आहोत, तुम्ही तुमचा सोज्ज्वळ, १९ व्या शतकातला जोडीडार (शोधला नसल्यास) शोधा. १९ आणि २१ व्या शतकांनी एकत्र राहिलं पाहिजे असं थोडीच आहे? पण मुद्दामच दुसर्‍याला डिवचायला जायचा १९ व्या शतकातला सोज्ज्वळ आगाऊपणा कशासाठी? बाकी मधुशालाभौ (किंवा तै) बाहेरच्या माणसाने बनवलेल्या जेवणाला घरची गोडी कुठून येणार हा प्रश्न मला पडला नाही. आमच्या यादवकाकूंनी अगदी आईच्या मायेने गेली आठ वर्ष घरी जेवण बनवलं आहे आणि त्यांना होतंय तिथपर्यंत त्या नक्कीच करतील. शोधली चांगली माणसं आणि त्यांनाही माया लावली तर असे प्रश्न कधीही पडत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

अदिती काकूनी फारच मनाला लावून घेतलय...!

सुजय कुलकर्णी
Mon, 08/02/2010 - 14:10 नवीन
ह्म्म्म......!! अदिती काकू , तुम्ही फारच मनाला लावून घेतलात अदिती काकू.....! पण तुम्ही इतके प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद...! नवर्‍याने प्रेमळपणाने विचारलेल्या प्रश्नाला उर्मट व खोचकपणे उलटप्रश्न केलात त्यावरून तुम्हालाच वाद घालायचा होता हे स्पष्ट होते....! तुमचा बिचारा नवरा....!! :-( ८ वर्षे तुमच्यासाठी जेवण बनवून सुद्धा तुम्ही यादवकाकूना "बाहेरची माणसे" समजता ह्याचे सर्वप्रथम आश्चर्य वाटले....! ह्यावरूनच तुम्ही कोणती माया लावली हे आमच्यापर्यंत पोहचले...! आणि हो , स्वयंपाकाची आवड असणे आणि स्वयंपाक येणे ह्या २ वेगवेगळ्या गोष्टी आहेत........स्वयंपाक येतो पण आवड नाही असे असू शकते.....! पण स्वयंपाक येत नाही आणि स्वयंपाकाची आवड ही नाही अश्या मुली,काकू non -IT मध्येही आहेत हे तुमच्या प्रतिसादावरून कळाले....! बाकी तुमच्या विचारांवर ( जे अवैचारिक आहेत असे लोक समजत आहेत ) 2-3 लोकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत....त्या वाचाव्यात....! " त्यांना होतंय तिथपर्यंत त्या नक्कीच करतील".... हे तुमचे घटकाभर मान्य....पण चुकून त्या कधी आजारी पडल्या ( देव करो असं कधी न होवो.. ) तर तुम्हाला स्वयंपाक करून त्यांना खायला घातला येईल किमान तेवढा तरी स्वयंपाक करायला शिका.....!! तात्पर्य... :- एवढा वेळ उर्मट उत्तरे देऊन घालवण्यापेक्षा एखाद दुसरा पदार्थ शिकून झाला असता तुमचा....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

जाऊ द्या हो, तुम्ही माझ्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/02/2010 - 14:36 नवीन
जाऊ द्या हो, तुम्ही माझ्या खाण्याची आणि कौशल्याची काळजी करू नका. यादव काकू आजारी पडल्या तर आजूबाजूला खाण्याची आणि खिलवण्याची आवड असणार्‍या चार मित्र-मैत्रिणी, काका-काकू जमा करून ठेवले आहेत. जाताजाता: मी वयाच्या आठ-दहाव्या वर्षापासून "मला खायला आवडतं ते बनवता आलं पाहिजे" या विचारांमुळे मोठ्या भावाच्या हाताखाली स्वयंपाकघरात खुडबूड करायला लागले. तेव्हा तुमची गाडी चुकली आहे "स्वयंपाक शिका" असा सल्ला देण्यात. तात्पर्यः बाळ सुजय, मिपावर, एका मोठ्या व्यासपीठावर, आता आलाच आहात तर, व्यक्तीगत विरोध करण्यापेक्षा विचारांना विरोध करण्याएवढे 'मोठे व्हा'*. *कॉपीराईटः श्रावण मोडक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजय कुलकर्णी

विचारांना विचारानेच विरोध

चावटमेला
Mon, 08/02/2010 - 14:57 नवीन
आदिती ताई, विचारांना विचारांनीच विरोध करायचा हे तुम्हाला पटले तर, मग इतका आक्रस्ताळेपणा कशासाठी, प्रस्तुत लेखातील विचारांशी तुम्ही सहमत नसालही, माग त्याला विचारांनीच उत्तर द्यावे, असे भांडून आणि, एखाद्या व्यक्तिच्या प्रांतावरुन/गावावरोन खोचक विधाने करणे हे केविलाणे आणि निंदनीय आहे.. संपादक महाशय, असे प्रांतवादाचे विष पसरविणारे प्रतिसाद आक्षेपार्ह नाहीत का? असो, सुरुवातीला हा लेख मला हलका फुलका आणि थोडेफारच तथ्य असलेला वाटला होता, पण ताईंचे असले आततायी प्रतिसाद पाहून लेख हा पूर्णपणे वास्तववादी असावा असे वाटत आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्रर्र, तुम्ही सांख्यिकी

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/02/2010 - 15:12 नवीन
अर्रर्र, तुम्ही सांख्यिकी विषयाचा अभ्यास कमी पडताना दिसतो आहे. केला असतात तर एका उदाहरणावरून अर्ध्या जगाची परीक्षा केली नसतीत! बादवे, माझं नाव आदिती नसून अदिती आहे. होते चूक अशी माणसाची, पण १९ व्या शतकातल्या सोज्ज्वळ वातावरणात अशा अपेक्षा नव्हत्या, म्हणून एकदा सांगितलं!
हा लेख मला हलका फुलका आणि थोडेफारच तथ्य असलेला वाटला होता
मला मात्र केकता कपूरच्या मालिकांएवढा विषारी वाटला! बाकी तुम्हाला आंजावरची कोल्हापूरची महती माहित नसेल तर तुमचा अभ्यास कमी पडतो आहे. आमच्या पर्‍याला विचारा हे प्रश्न, लगेच उत्तरं मिळतील. प्रांतवादाचे विष का काय तुम्ही म्हणत आहात तो तुमचा चष्मा असेल. असल्या लेखांवरून स्त्रियांना दुय्यम मानव समजण्याबद्दल खंत व्यक्त करणारा एखाद्या प्रांतात रहाणारा आंजा स्नेही आठवला तर ते विष वाटत असेल तर खरंच चष्मा बदलाच ... (हा, जमलं एकदम मुसुटाईपचं वाक्य!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

अरे वा!!!

मधुशाला
Mon, 08/02/2010 - 21:32 नवीन
तुमचा सांख्यिकी विषयाचा अभ्यास दांडगा दिसतो... "पर्‍या " या एकाच आंजा मित्राच्या बोलण्यावरून कोल्हापूरविषयी काहिही बरळत सुटला आहात. हाच का तुमचा सांख्यिकी विषयाचा अभ्यास? कोल्हापूरची महती आम्हाला तुमच्याकडून ऐकायची गरज नाही आणि त्याचा अभ्यास करायचीही गरज नाही. कुठलाही आंडूपांडू उठून कोल्हापूरबद्दल काहीही भकला म्हणून कोल्हापूरची महती कमी होत नाही तर बोलणार्‍याची बुद्धीची भोकं दिसतात. "प्रांतवादाचे विष" असं 'चावटमेला' जे म्हणत आहेत त्यासाठी तुमचाच खालचा प्रतिसाद वाचा. तुमच्या सोयीसाठी इथेही तो चिकटवतो. कोल्हापूर का, मग तुमचा काहीएक दोष नाही, चालू द्या! या निमित्ताने "पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली शिकल्या सवरल्या तरीही नवरा त्यांना पायपुसण्यासारखे वागवतो" अशा टाईपची एका पश्चिम महाराष्ट्रातल्या आंतरजालीय स्नेह्याशी झालेली चर्चा आठवली. तसंही मिपावर कोल्हापूर म्हणा ... प्रसिद्धच! फक्त एका आंजा स्नेह्याच्या म्हणण्यावरून तुम्ही हे ठरवून टाकलं कि "पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली शिकल्या सवरल्या तरीही नवरा त्यांना पायपुसण्यासारखे वागवतो". आणि तरीही हा प्रांतवाद नाही आणि सांख्यिकी तुम्हाला जास्त कळते. (जळजळ होत असेल तर सोडा घ्या. अर्थात कोल्हापूरचा गोटी सोडा काय तुम्हाला झेपणार नाय. इनो नाय तर पुदीन हरा बेष्ट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

चष्मा नाही

चावटमेला
Mon, 08/02/2010 - 21:52 नवीन
ओ अदितीताई, हा आमचा चष्मा नाही, तुमचाच जहरी प्रतिसाद बोलत आहे. अरे वा, आणि आपला सांख्यिकिचा अभ्यास भलताच दांडगा दिसतो आहे, म्हणूनच कुठ्ल्याशा लेखाचा आधार घेवून आपल्याच मनातील पश्चिम महाष्ट्राबद्दलची जळजळ निघते आहे. तुम्हाला विचारांना विचाराने उत्तर देता येत नसेल तर उगाच त्रागा करु नका आणि तुमचा वैयक्तिक द्वेष असा चव्हाट्यावर आणू नका.. स्वगत :-> भगवन्ता, काय हेय घोर कलियुग दाखवितोस २१ व्या शतकात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सुजय कुलकर्णीच्या बायकोचं जाउ

जिन्क्स
Tue, 08/03/2010 - 12:41 नवीन
सुजय कुलकर्णीच्या बायकोचं जाउ ध्या , पण मला माझ्या नवर्‍याने एकदा विचारलं, "माझी आई मोदक खूप छान बनवते, तुला येतात का?" मी त्याला उत्तरादाखल प्रश्नच विचारला, "माझे बाबा खूप छान नानकटाई बनवतात, तुला येते का?" हा संवाद/वाद तिथेच संपला. हे वाचल्यावर तुमच्या नवर्याचं फार वाईट वाटलं.... बाकी चालू द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/03/2010 - 12:45 नवीन
हे वाचल्यावरच का हो, मला पदोपदी त्याच्याबद्दल वाईट वाटतं. असो तुमच्या सद्भावना पोहोचवते मी त्याला! तो काही मिपा वाचणं शक्य नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स

हा हा

चिरोटा
Sat, 07/31/2010 - 17:17 नवीन
मजेशीर लेख.आय टी मधला 'ट्फ' जॉब करुन घरी जावून जेवण बनवणार्‍या काही स्त्रियाही असतात. वीकांताला त्यांच्या पतिराजांना काय काय भोगावे लागत असेल याची कल्पना केलेली बरी.!! ------------
  • Log in or register to post comments

वीकांताला त्यांच्या पतिराजांना काय काय भोगावे लागत असेल याची

रामदास
Sat, 07/31/2010 - 17:36 नवीन
कल्पना करू नये असा अगाऊ सल्ला देतो आहे.(ज्याचा त्याचा विकांत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

ठ्यॉ..... )

दिपाली पाटिल
Tue, 08/03/2010 - 03:16 नवीन
ठ्यॉ..... :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

हा हा हा

वाहीदा
Wed, 08/04/2010 - 13:23 नवीन
खास रामदासकाका स्टाईल प्रतिसाद ! अवांतर : अरेच्या एवढया हुच्च(?) धाग्यावर, हे कसे काय वाचायचे राहून गेले ? :-?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

आदिती यांच्याशी सहमत. मात्र

इंटरनेटस्नेही
Sat, 07/31/2010 - 17:21 नवीन
आदिती यांच्याशी सहमत. मात्र स्त्रियांना किमान पाककला यायलाच हवी!
  • Log in or register to post comments

अगदी सहमत

चित्रा
Sat, 07/31/2010 - 17:45 नवीन
स्त्रियांना किमान पाककला यायलाच हवी! अगदी सहमत. पण यात फक्त पुरूषांनाही असे आता लिहायला लागू या, कसे?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

+१

विंजिनेर
Sat, 07/31/2010 - 18:43 नवीन
अगदी. मुलांनासुद्धा जरूरी पुरता स्वयंपाक यायलाच पाहिजे. पण खरी कसोटी स्वयंपाक येण्या-न येण्यात नसतेच मुळी. खरी कसोटी आठवड्याचे ६-७ दिवस चारी-ठाव स्वयंपाक न थकता/कंटाळता करण्यात असते. (वीकेंड स्वयंपाकी)विंजिनेर बाकी प्रक्षोभक लेख लि हून कोणीत्सूला कांपिटिशन आली म्हणायची ;-) (वाचक राजा)विंजिनेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

बाकी प्रक्षोभक लेख लि हून

कानडाऊ योगेशु
Sun, 08/01/2010 - 15:41 नवीन
बाकी प्रक्षोभक लेख लि हून कोणीत्सूला कांपिटिशन आली म्हणायची
कोणीत्सु आवडले. (हूहूत्सु (whowhotsu)) योगेशु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

+१

मधुशाला
Sun, 08/01/2010 - 23:35 नवीन
स्त्रियांना आणि पुरूषांनाही किमान पाककला यायलाच हवी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

अहो

प्रचेतस
Sat, 07/31/2010 - 17:24 नवीन
हाच लेख मला अगदी ७/८ दिवसांपुर्विच इमेल ने आला होता. त्याचे मूळ लेखक तुम्हीच काय? का साहित्यचौर्याचा हा एक नमुनाच. लेख मूळ तुमचाच असेल तर सुरेखच........मग माझे शब्द मागे घेतोच.
  • Log in or register to post comments

+१

असुर
Sun, 08/01/2010 - 03:03 नवीन
+१ असेच म्हणतो. मलाही हा लेख काही दिवसांपूर्वी इ-मेल मधून वाचायला मिळाला होता. जर हा लेख तुमचाच असेल तर तुम्हाला 'ऑल द बेस्ट' कारण आपण मिपा वर प्रसिद्ध करायच्या आधीच त्याची चोरी झालीये. आणि तुमचा नसेल तर... बाकी माझ्या सर्व आय.टी. मित्रांकडे अशीच 'विन विन सिच्युएशन' आहे की "बायको आय.टी. मध्ये आहे, आणि तरी ती टकाटक स्वयंपाक बनवते आणि तिला कंटाळा येतो तेव्हा नवरा जब्बर जेवण बनवतो. दोघानाही कंटाळा येतो तेव्हा दोघांपैकी कुणाची एकाची सासू A1 J1 बनवते!" आता इतके सगळे फक्त 'नशीबवान' च आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे मला वाटतंय की विदा कुठेतरी कमी पडतोय की काय? म्हणजे सुवर्णमध्याच्या पलीकडचा विदा मिळवायचा राहून गेलाय की काय अशी एक शंका आली! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मजेशीर लेख ...

छोटा डॉन
Sat, 07/31/2010 - 17:25 नवीन
लेख मजेशीर आहे, आता मिपावरच्या त्याहुन मजेशीर प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे. बरेच मुद्दे अंमळ 'रोचक' वाटले. अवांतर : सोमवारी हाच लेख मी आमच्या नॉन-मराठी मैत्रिणींना ट्रान्सलेट करुन वाचुन दाखवेन व त्यांच्या प्रतिक्रिया पुन्हा ट्रान्सलेट करुन मिपावर लिहेन. त्यांची आठवड्यातुन २-३ दिवस तरी हीच तक्रार असते ( नाही, आयटीवाला नवरा जेवण चांगले बनवत नाही ;) अशी नाही, नवरा मदत करत नाही ही तक्रार ). तोवर बाकी प्रतिक्रिया वाचतो आहे. :) अतिअवांतर : अहो आयटीवाल्या बायकोचे काय पण आयटीवाल्या मैत्रिणीही तसल्याच असे आम्हाला वैयक्तिकरित्या वाटते ;) (सदर घटना संपुर्ण काल्पनिक आहे, त्याचा वास्तवाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करु नये )
  • Log in or register to post comments

प्रतिक्रियांचा खच पाडू शकणारा धागा!!

बहुगुणी
Sat, 07/31/2010 - 17:25 नवीन
(मी हे टायपायच्या आत अदितीची प्रतिक्रिया आलीच, अशा अनेक येणार हे गॅरंटीड!!) सुजयः तुमचं हे (निदान इथे तरी) पहिलंच लिखाण असावं असं तुमच्या 'वाटचाली'वरून दिसतं, सुरूवात तरी 'पदार्पणातच शतक' अशी होऊ शकेल! लिखाणाची स्टाईल विनोदाची असावी असं धरून चाललं तर ठीक आहे, पण 'पाककृती' 'सल्ला' या सदरात लिहितांना "दोघे खातो ना?? मग दोघे मिळून स्वयंपाक करू" असा विचार 'professionalism' घरात आणणं आहे हे तुम्हाला लिहितांना जाणवलं ना, मग तुम्ही स्वतः लग्नाआधी (किंवा झालं असेल तर आता नंतरही) कितीसा स्वयंपाक करता हो? सल्ला देताय तर आधिकार असेलच असं म्हणूयात, तर मग शिकवा की आय टी तल्या पत्नीला, एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ! (बाय द वे, इथे मिसळपावावर गणपा आणि प्रभाकर पेठकरांसारखे बल्लवाचार्य आहेत, त्यांनी तुमच्या सारखा विचार केला असता तर आम्ही किती उत्तमोत्तम पाककृतींना मुकलो असतो अशी भीती वाटून गेली!)
  • Log in or register to post comments

अहो

मधुशाला
Sun, 08/01/2010 - 23:38 नवीन
अहो ते मुलींनापण म्हणत आहेत... असो.. जगातले उत्तमोत्तम शेफ हे पुरुषच आहेत. आयर्न शेफ मधे तर एकच बाई आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मनाला आवर घातलाय. नाहीतर वाद

रेवती
Sat, 07/31/2010 - 17:41 नवीन
मनाला आवर घातलाय.;) नाहीतर वाद सुरु! माझ्यामते प्रत्येकाला/किला आपली तब्येत ठणठणीत राहील इतपत स्वयंपाक यायलाच हवा.
  • Log in or register to post comments

>>माझ्यामते प्रत्येकाला/किला

स्वप्निल..
Sat, 07/31/2010 - 23:56 नवीन
>>माझ्यामते प्रत्येकाला/किला आपली तब्येत ठणठणीत राहील इतपत स्वयंपाक यायलाच हवा. असच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अगदी बरोबर....!!

सुजय कुलकर्णी
Sun, 08/01/2010 - 10:09 नवीन
अगदी बरोबर....!! :-) लेख वाचून एका ओळीत तात्पर्य सांगितल्याबद्दल आभारी....!! तुमचा प्रतिसाद मुले आणि मुली ( शक्यतो IT )मनापासून वाचतील आणि आचरणात आणतील अशी अपेक्षा करतो....! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

IT IT काय लावलय सारखं... काय

अर्धवट
Sun, 08/01/2010 - 12:18 नवीन
IT IT काय लावलय सारखं... काय जगावेगळे समजता का काय स्वतःला... आणि आयटी म्हणजे नक्की काय हो.. डेवलप्मेंट हमाली.. छिद्रान्वेषीन् टेस्टर का ऊंटावरचे म्यानेजर.. बाहेर या आयटी मधुन.. च्यायला प्रतिक्रिया देणार नव्हतो.. मलाही हेच ढकलपत्र काही दिवसांपुर्वी आलेल आहे.. तेव्हाच रागराग झाला होता.. उत्तरही देणार होतो पण कशाला उगाच शेणात दगड मारा म्हणुन गप्प बसलो.. तर मिपा वर पुन्हा तेच.. केवळ आयटी मधे असल्यामुळे सारख्या टिर्र्या बडवणार्‍यांचा मोठा प्रॉब्लेम आहे बाबा हा.. आपल्या समस्या जगावेगळ्या आहेत आणि जगानं त्या सोडवायला हव्यात हाच अट्टाहास सारखा.. सोमवार ते शुक्रवार कामाचा आभास करायचा, कुचाळक्या करायच्या, आपण मनमोहनचे बाप असल्यासारखे कळत नसलेल्या विशयावर अकलेचे तारे तोडायचे.. आणि शनिवार रविवार ढुंगण वर करुन बायकोला आदेष सोडायचे... असो.. जास्त बोललो.. जाउद्या स्वयपाकाबद्दल सांगायच तर मला फक्त मॅगी आणि चहा करता येतो आणि त्याची मला लाज वाटते... खुप वेळा खुप त्रास सहन करावा लागतो अनोळखी ठिकाणी.. प्रत्येकाला स्वयपाक आला पाहिजे की नाही हे मला माहित नाही... केवळ तुमची बायको स्त्री आहे म्हणुन तिला स्वयपाक आलाच पाहिजे हे म्हणणं म्हणजे मुर्खपणाचं आहे... बाकी आदितीशी बाडीस.. तिच्या प्रतिक्रियेवर उत्तर नाही दिले तुम्ही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजय कुलकर्णी

प्रत्येकाला स्वयपाक आलाच पाहिजे....!!

सुजय कुलकर्णी
Sun, 08/01/2010 - 23:38 नवीन
अर्धवटराव, आम्ही IT लोक अभिमानाने स्वत:हून कुठेही IT IT म्हणून मिरवत नाही......त्याची गरजही नाही....पण तुम्हाला IT वाल्यांबद्दल एवढा का संताप आहे ते मला कळले नाही...! बाकी ...सोमवार ते शुक्रवार कामाचा आभास करायचा हे माझ्या बाबतीत तरी अगदी खरे आहे...! :-) केवळ तुमची बायको स्त्री आहे म्हणुन तिला स्वयपाक आलाच पाहिजे हे म्हणणं तुमचच आहे त्यामुळेच ते मुर्खपणाचं असाव...!! मी लेखात असे कुठेही म्हटलेलं नाही....! तुम्हाला स्वयंपाक काहीही येत नाही हे तुम्ही निर्लज्जपणे सांगितलेले आहेच.....आता थोडातरी स्वयंपाक शिका ....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

माझ्यामते प्रत्येकाला/किला

कानडाऊ योगेशु
Sun, 08/01/2010 - 15:48 नवीन
माझ्यामते प्रत्येकाला/किला आपली तब्येत ठणठणीत राहील इतपत स्वयंपाक यायलाच हवा.
सहमत. माझ्या काकाला कुणी विचारले कि तुला पोहता येते का तर तो उत्तर द्यायचा मला तरंगता येते.त्याच्या उत्तराची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अरे बाबा लग्न हे काय

रामदास
Sat, 07/31/2010 - 17:46 नवीन
पण ह्याचा फायदा IT मधल्या मुली घेणार नाहीत ना हे तपासून पहा एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी असतं काय ? नसेल येत रांधप .चलता है . हळूहळू सगळं येतं . योग्य वयात स्वयंपाक शिकली असतीस तर हि वेळ आली नसती" असंही म्हणू नये.त्या योग्य वयात ती बिचारी तुझ्यासारखीच आय.टी. किंवा इतर काहीतरी शिकत असणार. मग सैपाक वगैरे शिकेलच. संसार करंजीसारखा असतो असे वपुंचे म्हणणे होते ते मात्र या लेखामुळे आठवले. असो. लेखाचा आशय कदाचीत वादग्रस्त ठरेल तरी लेखाची मांडणी चांगली आहे.आणखी अनुभव लिहायला काही हरकत नाही वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

लग्न करताना मुलींना थोडातरी स्वयंपाक येणे आवश्यक आहे...!!

सुजय कुलकर्णी
Sun, 08/01/2010 - 10:56 नवीन
रामदास भाऊ , योग्य वयात स्वयंपाक शिकली असतीस तर हि वेळ आली नसती" असं कधीही म्हणू नये हे मी लिहिलेलंच आहे.... :-) स्वयंपाक वगैरे नंतर शिकेलच ह्याची रिस्क कुणी किती घ्यायची ते ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे....!! माझा मुद्दा एकच.....लग्न करताना मुलींना थोडातरी स्वयंपाक येणे आवश्यक आहे....!! पण "ह्याचा फायदा IT मधल्या मुली घेणार नाहीत ना हे तपासून पहा".....हे विधान थोडे वादग्रस्त.....मान्य... :-) लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

संसार करंजीसारखा असतो असे

पांथस्थ
Tue, 08/03/2010 - 23:48 नवीन
संसार करंजीसारखा असतो असे वपुंचे म्हणणे होते ते मात्र या लेखामुळे आठवले.
देवा आता करंजी कुणी करायची असा वाद व्हायचा :) झिंदगी है खेल कोई पास कोई फेल खिलाडी है कोई अनाडी है कोई ओ बाबू समझे क्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

लेखन स्वतःचे आहे का?

संपादक मंडळ
Sat, 07/31/2010 - 18:02 नवीन
हे लेखन ढकलपत्रातून आले असल्याची नोंद घेतली गेली आहे. मिसळपावावरील लेखन लेखकाचे स्वतःचे असले पाहिजे अशी अट आहे. यासंबंधीचे धोरण येथे पहावे : http://www.misalpav.com/node/13199 वरील लेखन लेखकाचे स्वतःचे आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर येत्या १२ तासांमध्ये येथे द्यावे अशी अपेक्षा आहे. ह्या मुदतीपर्यंत लेखकाचे समाधानकारक उत्तर न आल्यास हा लेख संपादक मंडळ अप्रकाशित करेल याची नोंद घ्यावी. धन्यवाद. संपादक मंडळ
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा