✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

IT WIFE आणि स्वयंपाक

स
सुजय कुलकर्णी यांनी
Sat, 07/31/2010 - 16:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36511 वाचन

💬 प्रतिसाद (158)

प्रतिक्रिया

मूळ लेखक मीच .....!! :-)

सुजय कुलकर्णी
Sat, 07/31/2010 - 18:41 नवीन
नमस्कार , वरील लेखन हे माझेच आहे. हे लेखन मी सर्वाना email च्या माध्यमातून आधीच पाठवले आहे....!! "मिसळपाव" वर माझे खाते आजच कार्यान्वित झाल्याने इथे article post करायला उशीर झाला..... मिसळपाव वर हे माझे पहिलेच लेखन धन्यवाद, सुजय कुलकर्णी , कोल्हापूर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपादक मंडळ

कोल्हापूर का, मग तुमचा काहीएक

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 08/01/2010 - 11:42 नवीन
कोल्हापूर का, मग तुमचा काहीएक दोष नाही, चालू द्या! या निमित्ताने "पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली शिकल्या सवरल्या तरीही नवरा त्यांना पायपुसण्यासारखे वागवतो" अशा टाईपची एका पश्चिम महाराष्ट्रातल्या आंतरजालीय स्नेह्याशी झालेली चर्चा आठवली. तसंही मिपावर कोल्हापूर म्हणा ... प्रसिद्धच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजय कुलकर्णी

आदितीतै... पश्चीम

अर्धवट
Sun, 08/01/2010 - 12:22 नवीन
आदितीतै... पश्चीम महराष्ट्रावर जायचं काम नाय... तो लेख लिवनारा काय पश्चीम महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे काय... त्याचे वैयक्तीक विचार आहेत.. त्याची जबाबदारी त्याच्यावर.. असो.. आदितीतै मुद्दा काय.. तुम्ही प्रांतवादात कशाला घुसताय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

छे छे, माझा कुठल्याच भागावर

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 08/01/2010 - 17:18 नवीन
छे छे, माझा कुठल्याच भागावर जास्त राग अथवा लोभ नाही. पण सदर आंजा स्नेही पश्चिम महाराष्ट्रातले असल्याने तिथल्या तरूणांना, पुरूषांना नावं ठेवत होते. पण तरीही जालावर कोल्हापूर भलत्याच कारणांनी प्रसिद्ध आहे; विश्वास नसेल तर पर्‍याला विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

अरे सुजय !!

सुहास..
Sun, 08/01/2010 - 11:58 नवीन
कसला पेटलायस रे स्वयंपाकाच्या मुद्द्यावर ??? का ?? अरे जरा किचनमध्ये बायकोबरोबर स्वयंपाक करुन बघ ..तिने फोडणी द्यावी ..आपण टमाटे चिरावेत...तिने चपाती लाटुन तव्यावर टाकावी..आपण भाजुन घ्यावी ....तिने दाल-वडे हातात चेपुन कढईत सोडावेत....आपण हातात झारा घेऊन तळुन घ्यावेत ...पळीतुन गरम रस्सा हातात घ्यावा...आणी तिला चव बघायला द्यावा.... छे !! ह्या आय.टी. वाल्यांना रोमान्समध्ये प्रोफेशिनलिझम पाहिजे... आयटीतल्या पाचव्या एमएनसीत काम करणारा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजय कुलकर्णी

अगदी!

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 08/01/2010 - 12:00 नवीन
तुमचा प्रतिसाद आवडला.
छे !! ह्या आय.टी. वाल्यांना रोमान्समध्ये प्रोफेशिनलिझम पाहिजे...
सगळेच नाही, पण लेखाचे प्रवर्तक एकदम हेडमास्तर आयटीवाले दिसताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

सुहाशा तू म्हणतोस ते खरे आहे.

llपुण्याचे पेशवेll
Sun, 08/01/2010 - 15:25 नवीन
सुहाशा तू म्हणतोस ते खरे आहे. पण त्यासाठी दोघांनाही चांगला स्वैपाक यायला हवा किंवा दोघांचाही स्वैपाकाच्या बाबतीत आनंदी आनंद असावा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मजेशीर धागा. काही काही

अवलिया
Sat, 07/31/2010 - 18:23 नवीन
मजेशीर धागा. :) काही काही प्रतिसाद वाचुन भलतीच करमणुक होणार यात शंका नाही.
  • Log in or register to post comments

मूळ लेखक मीच .....!! :-)

सुजय कुलकर्णी
Sat, 07/31/2010 - 18:24 नवीन
नमस्कार , वरील लेखन हे माझेच आहे. हे लेखन मी सर्वाना email च्या माध्यमातून आधीच पाठवले आहे....!! "मिसळपाव" वर माझे खाते आजच कार्यान्वित झाल्याने इथे article post करायला उशीर झाला..... मिसळपाव वर हे माझे पहिलेच लेखन :-) धन्यवाद, सुजय कुलकर्णी.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म्म

नितिन थत्ते
Sat, 07/31/2010 - 18:39 नवीन
१. का हो कुलकर्णी साहेब, तुम्ही पण स्वयंपाकात मदत करावी अशी अपेक्षा केली तर तुम्हाला त्यात आक्षेपार्ह काय वाटले? स्वयंपाक हे बायकोचेच काम आहे अशी (सध्याच्या काळात अ‍ॅबनॉर्मल असलेली) कल्पना तुम्ही लग्नापूर्वी बायकोला स्पष्टपणे दिली होती का? २. तुम्हाला येणारी बहुतेक कामे तिला येत असणारच. पण तिला येणारी सगळी कामे तुम्हाला करता येतात का? उदाहरणार्थ अर्धाकच्चा का होईना (हे तुमच्या लेखावरून म्हणत आहे) तिला स्वयंपाक येतो तुम्हाला बहुधा तेवढाही येत नाही. तुम्ही का नाही लग्नापूर्वी स्वैपाक शिकून घेतला? (जुन्या काळच्या वाईट भाषेत- तुम्हाला तुमच्या वडिलांनी स्वयंपाक करण्याचे वळण का नाही लावले?) ३. आयटी मधल्या बायका जशा मॉल मध्ये ओळखू येतात तसे आयटी पुरुषही ओळखू येतात. सांगू लक्षणे? तुमची बायको तुम्हाला वठणीवर आणण्यात यशस्वी व्हावी यासाठी तिला सदिच्छा आणि तुम्हाला 'सुधारा' असा सल्ला.
  • Log in or register to post comments

नितीन साहेब , सर्वप्रथम सांगू

सुजय कुलकर्णी
Sat, 07/31/2010 - 19:36 नवीन
नितीन साहेब , सर्वप्रथम सांगू इच्छितो , माझे लग्न झालेले नाही ....आजच्या IT काळात लग्न झालेली मुले ही स्वयंपाकात मदत करतातच....! पण IT मुलीना देखील "स्वत:ला किमान स्वयंपाक यायला हवा हा उद्देश ह्या मागचा आहे तसेच मुलींकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका असे मला सांगायचे आहे...!! माझ्या बाबतीत म्हणाल तर मला उत्तम स्वयंपाक येत नसला तरी बर्‍यापैकी येतो ( अर्धाकच्चा नाही). आणि हा स्वयंपाक मी लग्नापूर्वीच शिकलो आहे. मुलानाही किमान स्वयंपाक यायला हवा ह्या विचारसरणीचा मी आहे. माझ्या मोठ्या भावाला उत्तम स्वयंपाक येतो. ( वहिनीलाही येतो :-) ) आणि वडिलांचं म्हणाल तर माझ्या वडिलांना अतिउत्तम स्वयंपाक येतो. "तुम्ही कधीतरी घरी या" म्हणजे शंका दूर होईल...!! इथे मला वडिलांनी सांगितलेलं नमूद कराव वाटत...."ज्याचे हात राड , त्याचे तोंड राड....." म्हणजेच ज्याला स्वत:ला बनवता येत तो उपाशी कधी मरत नाही...! तुम्हाला फक्त बोलताच येत का स्वयंपाकही येतो हे मला माहित नाही....! btw , तुमच्या वडिलांनी तुम्हाला माझ्या वडिलांसारखेच वळण लावले असावे हि अपेक्षा करतो. तुम्ही चांगले वळण शिकला नसाल असेच वाटते....! आयटी पुरुषही कसे ओळखू येतात हे मला जास्त माहित नाही.तुमच्या एवढ्या बारीक नजरेने मी पुरुषांकडे बघत नाही.....:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

तुमचं स्वतःचंच लिखाण आहे तर मग प्रतिक्रियांची नोंद घ्यालच...

बहुगुणी
Sat, 07/31/2010 - 18:49 नवीन
विनोदी लिखाण म्हणून लेख टाकला होता का? - 'हो' असं उत्तर असेल तर वाचलात!! (इथे 'झुंजी' पहायला मिळणार नाहीत म्हणून काही जण खंतावतील ती बात अलाहिदा:-)) की स्वानुभवावरून इतरांना 'शहाणं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न' होता? - तसं असेल तर (धागा सुरूच केला आहेत तेंव्हा) काही प्रतिक्रियांची तरी उत्तरं तुमच्याकडून मिळायला हरकत नाही. ती उत्तरंही लेखाइतक्याच खुसखुशीत भाषेत येउ द्या. वाचायला आवडतील. निदान, आज एकविसाव्या शतकातही असा विचार करणारी तरूण मंडळी का असू शकतात, याचं कुतुहल आहे ते सुटेल.
  • Log in or register to post comments

सुजय, हे घ्या ताजं ताजं 'IT' पुरुषाचं 'सक्रिय' उत्तर!

बहुगुणी
Sat, 07/31/2010 - 19:08 नवीन
आताच आलेला आय टी मधल्या केशवसुमारांचा लेख.....
  • Log in or register to post comments

अगदी खुसखुशीत लेखण !! फक्त

अनिल हटेला
Sat, 07/31/2010 - 19:14 नवीन
अगदी खुसखुशीत लेखण !! फक्त विनोदी लेख म्हणुन वाचल्यास चार घटका छान करमणुक होइल !! बाकी वाद होणार असतील तर आधीच आपली कलटी !! ;) --हटेला....
  • Log in or register to post comments

तुमचा स्वतःचा व्यवसाय काय हो ?

मस्तानी
Sat, 07/31/2010 - 19:32 नवीन
पहिल्या परीच्छेदात : "माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले." शेवटच्या परीच्छेदात: "लग्न झालेल्या मित्रांनो , काळ बदलला आहे. मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्ही केंव्हा शिकणार?? अजून वेळ गेलेली नाही." काय हो सुजय साहेब ... काय कांदा बिंदा चिरायला लावला काय बायकोने ... इतकी जळजळ झाली कशाने म्हणायची तुमची ... असो, तुमची केवळ बायकोच नव्हे तर तुमची आई - काकू - मावशी - आत्या - आजी - मुलगी - होणारी सून आणि तुमच्याशी संबंध येणाऱ्या प्रत्येक स्त्री ची दया येतेय ... देव त्यांना तुम्हाला सहान करण्याची शक्ती देवो ... जाता जाता ... मिसळपाव वर नवीन आहात म्हणताय ? पाककृती सदर बघा जरा एकदा जाऊन ... "इथले" पुरुष कसे आहेत ते कळेलच तुम्हाला :)
  • Log in or register to post comments

अडाणीपणा

ऋषिकेश
Sat, 07/31/2010 - 19:45 नवीन
काय अडाणीपणा लावलाय.. मिपावर स्वागत.. मात्र क्षमस्व.. हे उत्तर देण्याच्या / टिप्पणी करण्याच्या लायकीचेही विचार नाहित.. हा प्रतिसाद केवळ पोच
  • Log in or register to post comments

लेखक महाशयांनी लग्न उगाच

मनुराणी
Sat, 07/31/2010 - 19:55 नवीन
लेखक महाशयांनी लग्न उगाच केले. स्वयंपाकाला बाई ठेवली असती तर त्यांची गरज भागली असती आणि त्यांचा खूप मनस्ताप वाचला असता. -एक IT wife
  • Log in or register to post comments

लेखाच्या पहिल्या परिच्छेदात

हेम
Sat, 07/31/2010 - 19:59 नवीन
लेखाच्या पहिल्या परिच्छेदात सुजयभाउ म्हंतात.... माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले. नंतर नितिनभाउंना पाठवलेल्या प्रेमपत्रांत म्हन्ले. नितीन साहेब , सर्वप्रथम सांगू इच्छितो , माझे लग्न झालेले नाही .... कांय कळ्नांहा नाय या भुरग्याचा... जन्माचार्य मोदकांला इंद्रायणी वापरलाय की कोळपी यांवर काथ्याकूट करण्यापेक्षा २ मोदक जास्त खाईन म्हणतो..
  • Log in or register to post comments

अगदी हेच लिहिणार

पुष्करिणी
Sat, 07/31/2010 - 23:47 नवीन
अगदी हेच लिहिणार होते... एकंदरीत हा लेख बराच काल्पनिक आहे. लेखकाला मुलींना स्वयंपाक न येणं, मुलींनी सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी करणं, ब्रँडेड कपडे घालणं, भाजीवाल्याशी घासाघीस करणं , नवर्‍याकडून घरकामात मदतीची अपेक्षा करणं, गुगलवरून पाकृ. वाचून स्वयंपाक करणं, कुणीही काकू म्हटलेलं न आवडणं इ.इ. असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत...वाचून गंमत वाटली. सुजय काकांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेम

प्रतिसाद दिल्याबद्दल

सुजय कुलकर्णी
Sun, 08/01/2010 - 10:45 नवीन
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद...! तुम्ही वरती लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीला माझा प्रोब्लेम नाही....( except "स्वयंपाक न येणं" ) . मी software engineer असून ( software engineer व्हायला कष्ट पडले नाहीत हि गोष्ट वेगळी ;-) ) मला स्वयंपाक येतो....त्यामुळे software मध्ये काम करते , कष्ट घेऊन engineer झाले त्यामुळे स्वयंपाक शिकायला वेळ मिळाला नाही हे स्वयंपाक न येण्याचे कारण होऊ शकत नाही....!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

आयला

अडगळ
Sat, 07/31/2010 - 20:50 नवीन
आयला , आमच्या गावची माण्सं सुधरायची न्हाईत. लै कष्ट असतात मालक स्वयपाक म्हणजे . चेष्टा नव्हे. आता बायको दिवसभर काम करुन आली आणि तुमी तांबडा पांढरा मागाय लागला तर काय रडायचं तिनं ? कोंबडी आणा , दही , कांदा , हळद , तंबाटं , कोथ्मीर, आलं, लसून ,तीळ , खोबरं , खस्खस्, जमवा. बोंबलत मंगळ्वारात जाऊन ओला मसाला आणा. कोंबडी शिजवून , सुक्कं बाजूला काढून , तांबड्याची तयारी , पांढर्‍याचं वाटण वाटायला घ्या.. नायगावकर काका हुशार आहेत. आयला आमी बहिणाबाईंचा सत्कार पण निर्लेप चा तवा देऊनच करणार. (म्हादेव प्रसाद , दौलत मध्ये पडिक आणि रस्सामंडळाच्या ष्टो चा मेस्त्री , राजारामपुरीतला ) अडगळ. बाकी जाता जाता " तु तर फक्कड मासिक हुंडा" ही नायगावकर काकांची कवितापण आठवली.
  • Log in or register to post comments

ए अगं सीरीयल घेउन ये गं, इथे

Nile
Sat, 07/31/2010 - 20:54 नवीन
ए अगं सीरीयल घेउन ये गं, इथे मस्त मॅच सुरु आहे.
  • Log in or register to post comments

हाण्ण तिच्यायला ...

छोटा डॉन
Sat, 07/31/2010 - 21:03 नवीन
आता बायको दिवसभर काम करुन आली आणि तुमी तांबडा पांढरा मागाय लागला तर काय रडायचं तिनं ? कोंबडी आणा , दही , कांदा , हळद , तंबाटं , कोथ्मीर, आलं, लसून ,तीळ , खोबरं , खस्खस्, जमवा. बोंबलत मंगळ्वारात जाऊन ओला मसाला आणा. कोंबडी शिजवून , सुक्कं बाजूला काढून , तांबड्याची तयारी , पांढर्‍याचं वाटण वाटायला घ्या..
=)) =)) =)) हे मात्र १००% पटले बरं का !
  • Log in or register to post comments

ह्म्म्म लेखकाने आपले विचार

गणपा
Sat, 07/31/2010 - 21:39 नवीन
ह्म्म्म लेखकाने आपले विचार खुप वादग्रस्त रीतीने मांडलेत. पहिल्याच लिखाणात १०० ओलांडणार बहुतेक. आगावु अभिनंदन. २+ वर्ष झाली पण आम्ही अजुन ६० नाही ओलांडली. :( असो. मी पण आयटीतलाच, फार चांगला नाही पण उपाशी मरणार नाही इतपत स्वयंपाक जमतो. घरुन मुलगा / मुलगी हा भेद न करता आईबाबांनी मला आणि बहिणीला सगळी काम शिकवली. अगदी कपडे धुणे / वाळत घालणे ते स्वयंपाक. मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला. जेव्हा बायको(लग्नाआधी) मला पहायला आली (हो बरोबर लिहिलय. भेटण्याचा कार्यक्रम मुद्दाम मीच घरी ठरवला होता.) तेव्हा गप्पा मरताना जेव्हा एक-मेकांच्या छंदा विषयी विषय निघाल्यावर मी कुकिंग म्हटल्यावर ती फक्त गोड हसली. लग्न झाल्या वर त्या हसण्या मागचं गुपीत कळलं. बाईसाहेबांना फक्त चहा येत होता. पण ती १-२ महिन्यात सगळं शिकली. आणि हो माझी बायको नॉन आयटी वाली आहे :)
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

चतुरंग
Sat, 07/31/2010 - 21:53 नवीन
>>>>फार चांगला नाही पण उपाशी मरणार नाही इतपत स्वयंपाक जमतो. गण्या, गण्या अरे विनय तरी किती असावा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

चतुरंग, हे कसं आहे माहित्ये?...

मिसळपाव
Sat, 07/31/2010 - 22:58 नवीन
'असा मी असामी' मधे एके ठिकाणी पुलनी लिहिलंय - " तिचं वय अनेक वर्षे सोळावर येउन थांबलं आहे. या हिशोबाने धाकट्या भावंडांच्या वयाचा विचार केला तर काही भावंडाना वयच रहात नाही. कींवा बीजगणितातल्यासारखं मायनस एक, मायनह दोन असं रहातं!!". तसं, गणपा जर 'उपाशी मरणार नाही इतपत स्वयंपाक जमतो.' म्हणणार असेल तर माझी अवस्था म्हणजे .... !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अप्रतीम प्रतिसाद !

सोम्यागोम्या
Mon, 08/02/2010 - 01:11 नवीन
पु.ल. म्हणजे ग्रेटच हो ! धाकट्याभावंडांच गणित वाचून खूप हसलो ! मनमुराद ! तुम्हि दाखला पण छान दिला आहे. जबरी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

हाण्ण तिच्या !!! गणपाभौ , एक

सुहास..
Sat, 07/31/2010 - 23:30 नवीन
हाण्ण तिच्या !!! गणपाभौ , एक नंबर रे !! कधीच ऊपाशी न मरण्याईतपत स्वयंपाक येणारा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मुळात जीभेचे चोचले फार

पांथस्थ
Wed, 08/04/2010 - 00:16 नवीन
मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला.
हमारा भी ऐसाईच हुव्या! बाय द वे, स्वयंपाक हि गोष्ट कर्तव्य म्हणुन हद्दपार होउन एक छंद्/आवड/Passion च्या रुपात वर येत आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. असो. १. नवरा बायको दोघेही IT/Non-IT पण नोकरी करणारे असतील तर स्वयंपाक हि दोघांची जबाबदारी हवी २. तसे नसल्यास ज्याने घर सांभाळायची जबाबदारी घेतली असेल (स्त्री/पुरुष) त्याने स्वयंपाक करावा पण महत्वाचे म्हणजे संसारात असे कोणतेही नियम लागु होत नाहित. परस्पर-सामंजस्य आणी आपापल्या कर्तव्याची जाणीव ह्यावर गाडा चालत असतो. तेव्हा स्वयंपाक कोणी करायचा हा मुद्दा जरा गौण ठरतो. मी IT मधे आहे (काय करता!) आणी बायको घर सांभाळते. पण अनेकदा ऑफीसमधुन आल्यावर मी स्वंयपाक करतो. कारण हात फार वळवळ करतात. घरात सगळ्यांनाच स्वयंपाक येतो. स्वयंपाक करण्यात गम्मत आहे हे कळले तर तो शिकवायची अथवा शिक म्हणुन मागे लागायची गरज पडत नाहि. माझ्या मुली मी कु़कींग (हा शब्द मला स्वयंपाक करण्या पेक्षा बरा वाटतो) करत असतांना कधी कधी observe करत असतात. त्यातुन त्या शिकतीलहि. आणी त्यांनी शिकलेच पाहिजे कारण ते स्वावलंबी बनण्यासाठि गरजेचे आहे (just for the sake of it मला मुलं असती तरीही मी त्यांना cooking शिकवले असते!). तेव्हा अधिक सांगणे नको! असो, फारच अवांतर झाला वाटतं प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सहमत आहे

बेसनलाडू
Wed, 08/04/2010 - 03:00 नवीन
मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला. हमारा भी ऐसाईच हुव्या! आमचेही अगदी असेच झाले. (स्वयंपाकी)बेसनलाडू बाय द वे, स्वयंपाक हि गोष्ट कर्तव्य म्हणुन हद्दपार होउन एक छंद्/आवड/Passion च्या रुपात वर येत आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. आणी शिकलेच पाहिजे कारण ते स्वावलंबी बनण्यासाठि गरजेचे आहे. १००% सहमत आहे. (सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ

यडे बनवायचे धंदे..

उपास
Sat, 07/31/2010 - 22:02 नवीन
साहेब, लोकांना यडे बनवायचे आ़णि उचकवायचे धंदे सोडा.. लेखात म्हणताय लग्न झालंय, बायको अमुक अमुक म्हणाली आणि प्रतिसादात म्हणताय लग्न झालेलं नाही. . स्वयंपाक जाउंदे पण लग्न होणं म्हणजे काय हे तरी कळतय का? तुमचा राग नक्की कशावर आहे, आयटीवाल्या बायकांवर, त्यांच्या जिन्सवर (फीट ठेवलेली तब्येत), त्यांच्या महागड्या मोबाईलवर (म्हणजे श्रीमंतीवर?) कि स्वयंपाक ऑऊटसोर्स करण्याच्या (तुमच्या भाषेत आळशी) वृत्तीवर.. जरा इनो घ्या.. ती मुलगी आयटी मधे आहे म्हणजे तिने चार भिंतीतून आणि स्वयंपाकघरातून बाहेर येऊन (अथवा तिथे न घुसमटता) मान मोडेस्तोवर अभ्यास केलाय, इंजिनिअरींग वगैरे केलय आणि स्पर्धात्मक जगात पाऊल ठेवून ती पैसे कमवतेय.. त्याच्यावर तुमचा राग का? उलट तिचं, तिच्या वडिलांच (ज्यांनी तिला असं चाकोरीबाहेर यायला प्रोत्साहन दिलय) त्यांच कौतुक करायलाच हवं.. तुम्हाला पोळ्या लाटून हव्या असतील तर आयटीची मुलगी लागतेच कशाला.. तुमच्या सारख्यांना पैसा हवा आयटीतल्या मुलीचा आणि तिने गाढवासारख्म घरात राबायलाही हवं.. तुम्ही स्वयंपाक करण, धुणी भांडी आउटसोर्स करु शकता पण पैसे कमवणारी बायको कशी आउटसोर्स करणार? तेव्हा ती तुम्हाला चार घास घालतेय खायला त्याचे आभार माना.. (बायको असेल तर) सुखाने मिळून मिसळून संसार करा.. आणि कांदा चिरणे, कोथिंबीर निवडणे ह्यापलिकडे तुमचा रिझुमे जातो का ह्यावर विचार आणि प्रयत्न करा.. लागली तर गणपाशेठ, पेठकर काकांची मदत घ्या.. आणि अशा स्वतच्या वैचारिक मर्यादांची बुंदी पाडणार्या लेखांना पसरवणे शक्य झालं तर थांबवाच.. - (हितचिंतक) उपास
  • Log in or register to post comments

जबरा प्रतिसाद

नेत्रेश
Sat, 07/31/2010 - 22:08 नवीन
लेख वाचुन हैराण्/परेशान झालो होतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

गाय छाप, चुना पुडि

नावातकायआहे
Sat, 07/31/2010 - 22:08 नवीन
गाय छाप, चुना पुडि घ्यावि आन पाराव जाउन निवांत धुळवड बघत बसावि....
  • Log in or register to post comments

अर्र

अडगळ
Sat, 07/31/2010 - 22:35 नवीन
गाय छापच्या आठवणीनं काळजात किक बसली राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

छान. (गोसेवेतला) पेशवे.

llपुण्याचे पेशवेll
Sun, 08/01/2010 - 15:58 नवीन
छान. (गोसेवेतला) पेशवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ

मस्त लेख

चावटमेला
Sat, 07/31/2010 - 22:51 नवीन
सर्वप्रथम, सुजयचे अभिनन्दन, खरोखर, पहिल्याच लेखात सेन्च्यरी मारणार तुम्ही राव. बाकि , योग्य वयात हा लेख वाचायला मिळाला, वेळीच सावध केल्याबद्दल धन्यवाद :) इतक्या तिखट प्रतिक्रिया पाहून खरेतर हसूच आले, हा लेख एक fiction + real experinces चा ब्लेन्ड असू शकतो, म्हणूनच माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले. या प्रकारचे लेखन आलेले असावे, केवळ अश्या क्षुल्लक गोष्टीला पकडून वैयक्तिक चिखलफेक करणे योग्य नाही. काही मंडळींनी हा लेख फारच वैयक्तिक घेतलेला दिसतो :) तर लोकहो, just chill, लेखाच मूळ उद्देश हा केवळ स्रियांनीच स्वयंपाक करावा आणि उत्तमच करावा असा मूळीच वाटत नाही, उलट पुरुषांनीही स्व्यंपाक शिकावा आणि आजच्या IT युगात बायकोकडून अवाजवी अपेक्षा ठेवू नयेत असाच दिसतो. शेवटी, सुजय भाऊ, लेख कम्प्लीट नादखुळा, अगदी, कोल्हापूरी, रश्श्यसारखा झणझणीत :)
  • Log in or register to post comments

लेख म्हणूनही भिकार. विषय तर

नीधप
Sat, 07/31/2010 - 23:43 नवीन
लेख म्हणूनही भिकार. विषय तर त्याहून बाद!! विनोदी म्हणावं या लेखाला तर क्षणोक्षणी तिडीक जाणारी गृहितकं...
  • Log in or register to post comments

+१०००००००

अर्धवट
Sun, 08/01/2010 - 12:32 नवीन
+१०००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

+५००

Dhananjay Borgaonkar
Tue, 08/03/2010 - 00:12 नवीन
+५००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

हाहाहाहाहा.. शिर्षक वाचुनच आत

मराठमोळा
Sun, 08/01/2010 - 00:28 नवीन
हाहाहाहाहा.. शिर्षक वाचुनच आत काय असेल याची कल्पना आली होती... अपेक्षेला खरा उतरला लेख आणी प्रतिसाद्स. :) आयटी असो वा नॉन आयटी, घरातील सर्व कामे पहाणार्‍या स्त्रियांची संख्या जास्तच आहे.. पुरुष मोजकेच. नोकरी करणार्‍या, पण तरी स्वयंपाक घरात नवर्‍याला पाऊल न ठेवु देणार्‍या बायका सुद्धा मी पाहिल्यात. पण स्वयंपाकासारख्या क्षुल्लक गोष्टीवरुन जर तुम्ही चांगल्या जीवनसंगिनीला मुकणार असाल तर त्याहुन वाईट काहीही नाही.. एक प्रामाणिक सल्ला: जर तुम्हाला परफेक्ट गृहिणी बायको म्हणुन हवी असेल तर मग शिक्षण्/नोकरी अशी अपेक्षा ठेवु नका. लग्नाच्या बाजारात हवे तसे पॅकेजेस उपलब्ध आहेत.. ;) नशिब थोर असेल तर तुम्हाला हवे असलेले सर्व गुण एकाच मुलीत सुद्धा मिळतील कदाचित, बी ऑप्टीमिस्टीक. :) शेवटी लग्न हा एक जुगारच असावा/ लव असो वा अरेंज. ज्याचे त्याचे नशिब आणी ज्याचा त्याचा अनुभव. :) (लग्नासाठी फक्त विचार जुळण्याला महत्व देणारा )
  • Log in or register to post comments

हो उठाच!

प्रियाली
Sun, 08/01/2010 - 03:11 नवीन
चला , उठा....आतातरी स्वयंपाक करायला शिका.
अगदी!!!! इथल्या बायकांचे टक्के टोणपे ऐकण्यापेक्षा आणि असले लेख लिहिण्यात आपला वेळ घालवण्यापेक्षा नवनवीन पाककृती करा आणि इथल्या पाककृती विभागात लावा. पुढील पाककृतीकरता शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

+१

असुर
Sun, 08/01/2010 - 03:45 नवीन
वा वा! अजून एक बल्ल्वाचार्य मिपावर येणार काय? आम्ही मिपावरच्या पा़कृ वाचूनच स्वयंपाक शिकलो आहोत! -- असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

नोकरी, पैसा, सौंदर्य, छंद,

माया
Sun, 08/01/2010 - 07:43 नवीन
नोकरी, पैसा, सौंदर्य, छंद, शिक्षण, स्वभाव इ.इ. गोष्टींचा प्राधान्यक्रम लावुन/प्राधान्यता ठरवुन मगच जोडीदाराची निवड करावी म्हणजे असे लेख लिहायची गरज नाही भासणार. बादवे: हा लेख काल्पनिक आहे हे लेखकाच्या? सद्य वैवाहीक स्थितीवरुन उमजले.
  • Log in or register to post comments

>> सद्य वैवाहीक स्थितीवरुन

मेघवेडा
Sun, 08/01/2010 - 15:15 नवीन
>> सद्य वैवाहीक स्थितीवरुन उमजले. मला तर त्यांची सद्य वैवाहिक स्थिती काय आहे हेच समजले नाहीये अजून! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माया

मेव्या, तुला रे कशाला नसत्या

विंजिनेर
Sun, 08/01/2010 - 16:17 नवीन
मेव्या, तुला रे कशाला नसत्या चौकशा? त्या नायल्या सांभाळ जा पाहू - तो स्वप्नांनी त्रस्त आहे तिकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

अरेच्चा! तुम्हा लोकांच्या

Nile
Sun, 08/01/2010 - 19:18 नवीन
अरेच्चा! तुम्हा लोकांच्या विंग्लड-आशियात भलतेच उपाय दिसतात!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

ज्याच त्याच स्वातंत्र्य

प्रकाश घाटपांडे
Sun, 08/01/2010 - 09:25 नवीन
लेख मजेशीर वाटला. शेवटी ज्याच त्याच स्वातंत्र्य
लग्न झालेल्या मित्रांनो , काळ बदलला आहे. मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्ही केंव्हा शिकणार?? अजून वेळ गेलेली नाही. चला , उठा....आतातरी स्वयंपाक करायला शिका.
लग्न न झालेल्या मित्रांनो अस म्हणायचय का? असो (इकडची काडी तिकडे न करणारा आळशी नवरा) ( हे कोणरे तिकडे म्हणतय रे तिकडे वा! काय पण प्रौढीने सांगतोय)
  • Log in or register to post comments

दोघानाही स्वयंपाक यायलाच हवा....!!

सुजय कुलकर्णी
Sun, 08/01/2010 - 10:23 नवीन
प्रकाश काका, प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद...! खरतर लग्न झालेल्या किंवा लग्न न झालेल्या दोघानाही स्वयंपाक यायलाच हवा....! एकटे असताना कधीही स्वयंपाक करायला लागू शकतो....!! आणि आळशी नवरा मी म्हणत नाहीय हो..... :-) आजकालच्या काही IT मुलींच्या( पुन्हा वाद नकोत ;-) ) डोक्यातले विचार आहेत हे....!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

मज्जा आली. काय टीआरपी आहे.

अप्पा जोगळेकर
Sun, 08/01/2010 - 10:22 नवीन
मज्जा आली. काय टीआरपी आहे. आणि हाणामारी तर सॉलिड. च्यामारी आमचे वातुळ धागे २५ च्या वर जात नाहीत. ह्यांची आल्या आल्याच फटकेबाजी सुरु. इथे खूप सूज्ञ पुरुष आणि महिला आहेत. बरेच विवाहितसुद्धा असतील. प्रत्येक लग्नाऊ व्यक्तीस स्वयंपाक येणे अनिवार्य आहे. असा रिप्लाय एकानेही टाकला नाही की याचं आश्चर्य वाटतंय. वर कोणीतरी ( मला वाटतं ३_१४ वाल्या ताईंनी. चूकभूल देणेघेणे ) जेवण बाहेरुनही आणता येतं, विचार आणता येतं नाहीत, जेवणासाठी माणूस ठेवता येतो असला काहीतरी विनोदी रिप्लाय टाकला आहे. जेवणासाठी किंवा आणखी कशाकशासाठीसुद्धा पुरुष / बाई ठेवता येते आणि विचारमंथन की काय म्हणताय त्यासाठी पुस्तकं असतात किंवा उपक्रम सारख्या वेबसाईट असतात आणि पोरं सांभाळायला बेबीशीटरपण असतात . हे सगळं एकाच जागी सहकार आणि सहभाग तत्वावर व्हावं म्हणून पब्लिक लग्न करतं असा माझा अंदाज आहे. प्रत्येकाला जेवण बनवता आलं पाहिजे. त्या तुलनेत विचार्मंथन ही तुच्छ गोष्ट आहे. - एक अविवाहित
  • Log in or register to post comments

>> एक अविवाहित << योग्य वयात

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 08/01/2010 - 11:48 नवीन
>> एक अविवाहित << योग्य वयात लग्नं केलं असतात ना अप्पा आजोबा तर असा बोळा तुंबला नसता! असो. तुम्हाला बोळा निघण्यासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा