लो कॅलरी चिकन बिर्याणी...
साहीत्यः
चिकनः
२ पाऊंड चिकन- स्वच्छ करून धुवून मोठाले तुकडे करुन
३ मोठे चमचे दही
मसाले:
२ चमचे गरम मसाला
१ चमचा हळद
३ चमचे तिखट
२ तेजपत्ते
८-१० मिरे
४-५ लवंगा
३ चमचे आले-लसूण पेस्ट
१ चमचा धणे पावडर
अर्धा चमचा शाहीजीरे
३-४ वेलची
१-२ मोठ्या वेलच्या
२-३ काड्या दालचीनी
खडे मसाले नसतील तर ३-४ चमचे आयता बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल...
३-४ काड्या पुदीना - बिर्याणीसाठी अगदी मस्ट...
भातः
२ वाट्या बासमती तांदूळ - (मी सोनामसूरी वापरला होता) अर्धा तास आधी नुसतेच धुवून निथळत ठेवावेत.
४ वाट्या पाणी
अर्धे लिंबू
१ टेस्पून तेल/तूप
२ चिमूट शहाजीरे, नसल्यास साधे जीरे
३-४ काळीमिरी
२ लवंगा
१ काडी दालचीनी
२ हिरव्या वेलच्या
१ तेजपत्ता
मीठ
सजावटीसाठी:
२ कांदे बारिक चिरुन १ चमचा तेलात कुरकुरीत भाजून...
३-३ चमचे प्रत्येकी हीरव्या मनूका आणि काजू तुकडा, तव्यावर खरपूस भाजून घ्यावेत.
४-५ पुदीना पाने
१-२ चिमट्या केसर(ऐच्छीक) असल्यास उत्तम
१ वाटी दूध - दूध नको असल्यास पाणी वापरले तरी चालेल.
कृती:
१) एका वाडग्यात चिकन + दही + सगळे मसाले + तिखट + मीठ मिक्स करून २-३ तास चांगले मुरत ठेवावे.
२) तेव्हाच दुधात केसर भिजत घालावे.
३) एका मोठ्या भांड्यात ४ वाट्या पाणी घेउन त्यात तांदूळ, लिंबाचा रस, मीठ आणि मसाले घालून मध्यम आंचेवर शिजत ठेवावे. अंदाजे १५ मिनीटे लागतात.
४) भात शिजत असताना उगाचच ढवळू नये, नाहीतर भात चिकट आणि तुटका बनतो.
५) एका कढईत मुरत ठेवलेले चिकन टाकून मध्यम आंचेवर शिजवावे. अंदाजे २०-२५ मिनीटे लागतात. चिकन अगदी कोरडे करू नये, लागल्यास थोडे पाणी टाकावे.
६) आता शिजलेले चिकन आणि भात थोडे थंड करून घ्यावे. भात परातीत किंवा मोठ्या ताटात उपसून थंड करावा आणि तेव्हाच थोडेसे तेल घालावे म्हणजे चिकट होणार नाही. भाताचे ४ भाग तर चिकनचे २ भाग करावे
७) आता एका खोल भांड्याला किंवा कढईला २-३ थेंब लावून घ्यावे, त्याऐवजी ऑइल-स्प्रे वापरला तरी चालेल.
८) सगळ्यात खाली भाताचा थर घालून घ्यावा. त्यावर चिकनचा थर घालावा.
९) परत भाताचा १-१.५ इंचाचा थर घालावा, त्यावर पुदीना आणि अर्धे काजू-मनूका घालाव्यात.
१०) परत भाताचा हलका थर घालून त्यावर चिकनचा शेवटचा थर घालावा.
११) आता भाताचा शेवटचा थर घालून त्यावर कांदा, बारिक कापलेला पुदीना आणि काजू-मनूका घालाव्यात.
१२) आता रवी किंवा सांडशीच्या टोकाने ५-६ ठिकाणी भांड्याच्या बुडापर्यंत खड्डे करून त्यात केसर घातलेले दूध टाकावे.
१३) सगळ्यात शेवटी घट्ट झाकण लावून १० मिनीटे मंद आंचेवर ठेवून द्यावे.
१४) कांदा-टोमॅटोच्या रायत्यासोबत सर्व्ह करावे.
वाचने
8290
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
आईशपथ......एक नंबर फोटू
मला आत्ताच्या आत्ता पाज्जे....
मस्त
तेच तर...संपादन करता येत
In reply to मस्त by सहज
+१
In reply to तेच तर...संपादन करता येत by दिपाली पाटिल
+१
In reply to +१ by सहज
वावा..
खल्लास!!!!!!!!!!! एकदम
पाकृ सुरेख आणि फोटू तर मस्तच!
सहमत !
In reply to पाकृ सुरेख आणि फोटू तर मस्तच! by यशोधरा
मस्त! मस्त! मस्त!
*****अप्रतिम *****
मस्त.......!
लो कॅलरी चिकन बिर्याणी.
आपण
खल्लास ...
जबरा
शाकाहारी..
सगळ्यांना धन्यवाद
व्हेज
In reply to सगळ्यांना धन्यवाद by दिपाली पाटिल
व्हेज बिर्याणी बनवली की
In reply to व्हेज by नितिन थत्ते
व्हेज बिर्याणीसाठी... उभा
त्या पाकृ साठी नकोय हो
In reply to व्हेज बिर्याणीसाठी... उभा by दिपाली पाटिल
अप्रतिम ..
मस्त
लो कॅलरी ???
हाय कॅलरी बिर्याणीत...तळलेला
In reply to लो कॅलरी ??? by मिसळभोक्ता
>> मी जेव्हा पाकृ लिहीली
In reply to हाय कॅलरी बिर्याणीत...तळलेला by दिपाली पाटिल
जाउ देत रे गणपा...
In reply to >> मी जेव्हा पाकृ लिहीली by गणपा
अगा बाबो !
In reply to हाय कॅलरी बिर्याणीत...तळलेला by दिपाली पाटिल
मधल्या कॅलरीज कशा मोजलीस
बिर्याणी