Skip to main content

लो कॅलरी चिकन बिर्याणी...

लेखक दिपाली पाटिल यांनी सोमवार, 26/07/2010 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
लो कॅलरी चिकन बिर्याणी... साहीत्यः चिकनः २ पाऊंड चिकन- स्वच्छ करून धुवून मोठाले तुकडे करुन ३ मोठे चमचे दही मसाले: २ चमचे गरम मसाला १ चमचा हळद ३ चमचे तिखट २ तेजपत्ते ८-१० मिरे ४-५ लवंगा ३ चमचे आले-लसूण पेस्ट १ चमचा धणे पावडर अर्धा चमचा शाहीजीरे ३-४ वेलची १-२ मोठ्या वेलच्या २-३ काड्या दालचीनी खडे मसाले नसतील तर ३-४ चमचे आयता बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल... ३-४ काड्या पुदीना - बिर्याणीसाठी अगदी मस्ट... भातः २ वाट्या बासमती तांदूळ - (मी सोनामसूरी वापरला होता) अर्धा तास आधी नुसतेच धुवून निथळत ठेवावेत. ४ वाट्या पाणी अर्धे लिंबू १ टेस्पून तेल/तूप २ चिमूट शहाजीरे, नसल्यास साधे जीरे ३-४ काळीमिरी २ लवंगा १ काडी दालचीनी २ हिरव्या वेलच्या १ तेजपत्ता मीठ सजावटीसाठी: २ कांदे बारिक चिरुन १ चमचा तेलात कुरकुरीत भाजून... ३-३ चमचे प्रत्येकी हीरव्या मनूका आणि काजू तुकडा, तव्यावर खरपूस भाजून घ्यावेत. ४-५ पुदीना पाने १-२ चिमट्या केसर(ऐच्छीक) असल्यास उत्तम १ वाटी दूध - दूध नको असल्यास पाणी वापरले तरी चालेल. कृती: १) एका वाडग्यात चिकन + दही + सगळे मसाले + तिखट + मीठ मिक्स करून २-३ तास चांगले मुरत ठेवावे. २) तेव्हाच दुधात केसर भिजत घालावे. ३) एका मोठ्या भांड्यात ४ वाट्या पाणी घेउन त्यात तांदूळ, लिंबाचा रस, मीठ आणि मसाले घालून मध्यम आंचेवर शिजत ठेवावे. अंदाजे १५ मिनीटे लागतात. ४) भात शिजत असताना उगाचच ढवळू नये, नाहीतर भात चिकट आणि तुटका बनतो. ५) एका कढईत मुरत ठेवलेले चिकन टाकून मध्यम आंचेवर शिजवावे. अंदाजे २०-२५ मिनीटे लागतात. चिकन अगदी कोरडे करू नये, लागल्यास थोडे पाणी टाकावे. ६) आता शिजलेले चिकन आणि भात थोडे थंड करून घ्यावे. भात परातीत किंवा मोठ्या ताटात उपसून थंड करावा आणि तेव्हाच थोडेसे तेल घालावे म्हणजे चिकट होणार नाही. भाताचे ४ भाग तर चिकनचे २ भाग करावे ७) आता एका खोल भांड्याला किंवा कढईला २-३ थेंब लावून घ्यावे, त्याऐवजी ऑइल-स्प्रे वापरला तरी चालेल. ८) सगळ्यात खाली भाताचा थर घालून घ्यावा. त्यावर चिकनचा थर घालावा. ९) परत भाताचा १-१.५ इंचाचा थर घालावा, त्यावर पुदीना आणि अर्धे काजू-मनूका घालाव्यात. १०) परत भाताचा हलका थर घालून त्यावर चिकनचा शेवटचा थर घालावा. ११) आता भाताचा शेवटचा थर घालून त्यावर कांदा, बारिक कापलेला पुदीना आणि काजू-मनूका घालाव्यात. १२) आता रवी किंवा सांडशीच्या टोकाने ५-६ ठिकाणी भांड्याच्या बुडापर्यंत खड्डे करून त्यात केसर घातलेले दूध टाकावे. १३) सगळ्यात शेवटी घट्ट झाकण लावून १० मिनीटे मंद आंचेवर ठेवून द्यावे. १४) कांदा-टोमॅटोच्या रायत्यासोबत सर्व्ह करावे.

वाचने 8290
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

भूक खवळली. बाकी फोटो उजव्या रकान्यात घुसत आहेत त्याकरता बहुतेक ६५० विड्थ असलेले फोटो धाग्यात टाकावे लागणार.

In reply to by दिपाली पाटिल

संपादनाची सोय हवीच! साधी साधी गोष्ट चुकल्यामुळे दुरुस्त होईस्तोवर किती रुखरुख लागते याची कल्पना आहे. सिंपल टायपो, सेटींग इ करता संपादकाकडून काम करवून घेणे नको वाटते.

In reply to by सहज

उत्तम पाककृती.
संपादनाची सोय हवीच!
ही सोय असायलाच हवी. ०.००१% धाग्यांकरता ९९.९९९% धाग्यांवर स्वसंपादनास बंदी घालणे अयोग्य आहे.

मस्त दिसते आहे बिर्याणी.. एकदम माउथवॉटरिंग! स्वाती

केवळ जब्रा........! -दिलीप बिरुटे

आपण कुठं असता? नाही, काय आहे की, अशा पाकृची शिक्षा म्हणजे पदार्थ करून लगेच वाढायला लावणं. ते करण्यासाठी यावं म्हणत होतो. :)

फोटो केवळ जिवघेणा आहे !!! अस्साच म्हणजे अगदी अगदी अस्साच्चऽऽऽऽ फोटो असणार्‍या "व्हेज बिर्याणी"ची पाकृ लिहावी ही विनंती. मस्त आहे च्यायला ...

जबरा पाककृती आणि फोटो. तेजपत्ता साठी तमालपत्र आणि शाही जिरे साठी शहाजिरे असे मराठी शब्द आहेत.

सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुट्लेलं बघुन माझ्या डोळ्यात पाणी आलं हो..! शाकाहार्‍यांनी काय घोडं मारलय? आता 'शुद्ध शाकाहारी लो कॅलरी बिर्‍याणी 'येऊ द्या

In reply to by दिपाली पाटिल

धन्यवाद काय? व्हेज बिर्याणीची कृती कोण लिहिणार? अवांतरः लो कॅलरी आणि रेड्यूस्ड कॅलरी मध्ये काय फरक असावा? (ह. घ्या)

In reply to by नितिन थत्ते

व्हेज बिर्याणी बनवली की लग्गेच पाकृ पण टाकेन... अवांतरः लो कॅलरी आणि रेड्यूस्ड कॅलरी मध्ये काय फरक असावा? (ह. घ्या) -- लो-कॅलरी आणि रेड्यस्ड फॅट मध्ये तसा काही ग्रेट फरक नाहीये...

व्हेज बिर्याणीसाठी... उभा चिरलेला कांदा, पातळ कापलेला फ्लॉवर् ,मटार् ,फरसबी, गाजर...थोड्याश्या तेलात/तुपात नुसतेच थोडे तपकीरी होइपर्यंत भाजून घ्यायचे, मग वरिलप्रमाणे दही+मसाला, हवा असल्यास एखाद चमचा मसाला वाढवावा... बाकी कृती सारखीच...बाकी गणपाने तर दिलीच आहे व्हेज बिर्याणी....

In reply to by दिपाली पाटिल

त्या पाकृ साठी नकोय हो त्यांना, त्या जळ-जळ-जळवणार्‍या खल्लास फोटूंसाठी हवीये.. ;) गणपाशेठची पाकृही मस्तच आहे.. त्यात कसला वाद! तुम्ही दोघंही खास खवय्ये आहात. खाऊ घालण्यात लय आनंद मिळतो तुम्हाला.. फोटू बघूनच किती हौसेनं केलंय ते दिसतंय!! :) राघव

मलातर वास पण आला!

चिकन, दही, तांदूळ, दूध... हे लो कॅलरी कसे बॉ ? मग, हाय कॅलरी बिर्याणीत काय टाकतात ? ग्लूकोज ?

In reply to by मिसळभोक्ता

हाय कॅलरी बिर्याणीत...तळलेला कांदा, तळलेले काजू-बदाम-मनूका, बासमती, साजूक तूप,भरपूर तेल, फुल फॅट दही वापरतात.. मी जेव्हा पाकृ लिहीली तेव्हा स्व-संपादन नव्हते ना म्हणून हे लिहीता नाही आलं...

In reply to by दिपाली पाटिल

>> मी जेव्हा पाकृ लिहीली तेव्हा स्व-संपादन नव्हते ना म्हणून हे लिहीता नाही आलं... हे हे हे, अस काय करता दिपाली तै १६ का १८ संपादक आहेत ना त्यांना विनंती करा की :) ते मदत करतील ना हव ते बदल करायला.

In reply to by गणपा

जाउ देत रे गणपा... एवढ्या-एवढ्याश्या चुका सुधारायला कुठे संपादकांना सांगत बसायचं? त्यापेक्षा स्व-संपादनच दिल्यास बरं होइल...

In reply to by दिपाली पाटिल

हाय कॅलरी बिर्याणीत...तळलेला कांदा, तळलेले काजू-बदाम-मनूका, बासमती, साजूक तूप,भरपूर तेल, फुल फॅट दही वापरतात.. अगा बाबो ! आणि हे सगळे खाऊन लोक जीवंत राहतात ?

दिपाली, तू चिकन बिर्याणी मधल्या कॅलरीज कशा मोजलीस, ते सांगशील का? कोणते यंत्र वापरले कॅलरी मोजण्यासाठी? ते कुठे मिळते?