सुकटची चटणी
जिन्नस
सुकट २ वाटि
टोमेटो-१
कान्दा-१
लसुण-४ पाकळ्या
हिरवि मिर्चि-१
कोथिम्बिर चिरुन
तिखट-१ चमचा
हळ्द-१ लहान चमचा
मिठ- चविनुसार
तेल- १ पळि
जिरे- १ लहान चमचा
मार्गदर्शन
१.एका पातेल्यात पाणी घ्यावे. मग त्यात सुकट टाकावी. सुकट पाण्यात अलगद तरंगेल. ति पाण्यातून काढून घ्यावी.
२.एका कढईत तेल घ्यावे.त्यात जिरे,ठेचलेला लसूण व कांदा सोनेरी होई पर्यंत परतावा. त्यात चिरलेला टोमेटो टाकावा .त्यात हळद, तिखट व मीठ टाकावे.
३.नंतर धुऊन घेतलेली सुकट टाकावी. व वाफ येईपर्यंत शिजवावी. ही चटणी सुकी बनते. वरुन कोथिंबीर टाकून सर्व करावी. हि सुकटिची चटणी तांदुळाच्या भाकरीबरोबर खुप मस्त लागते.
टीपा
सुकट पाण्यात टाकण्याचे कारण - त्यात कधी कधी माती असते
वाचने
5501
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
एक शंका
बेस्ट !! पिताना हा एक "जबरा"
>>पिताना हा एक "जबरा" ह्या
सुकटाचि चटनि आसल तर दारुचा
In reply to सुकटाचि चटनि आसल तर दारुचा by सुहास..
विमान डोक्यावरनं गेल !! अबे
जाशुश छान रेसिपी. मी मागे
जवळा काय, सुकट काय,... अर्रे
पराभाउ