✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझा ताटवा...

प
प्राजु यांनी
Fri, 04/25/2008 - 11:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12553 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव गुरुवार, 05/01/2008 - 13:27 नवीन

खूपच छान!

लेख उत्तम उतरलाय. छायाचित्रांमुळे त्याला अजूनच जास्त सौंदर्य प्राप्त झालंय. स्वस्तिकाच्या फुलांना आम्ही 'तगरीची फुले' म्हणतो. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/01/2008 - 13:28 नवीन

धन्यवाद..

धन्यवाद काका... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
व
विजुभाऊ गुरुवार, 05/01/2008 - 13:31 नवीन

तगर गुलाबी रंगाची असते स्वस्तिकाची फुले पांढरी असतात

तगर वेगळी स्वस्तिकाची फुले वेगळी. तगर गुलाबी रंगाची असते स्वस्तिकाची फुले पांढरी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्रमोद देव गुरुवार, 05/01/2008 - 13:37 नवीन

कुणी सांगितलं हे?

तगर पांढरीच असते. माझे बालपण सगळे तगरीच्या बनात गेलंय. हो. कारण आमची वाडी म्हणजे एक तगरीचं बनच होते. अर्थात ह्याला स्वस्तिक म्हणायला माझी हरकत नाही. कारण आकार तसा दिसतोय . मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ गुरुवार, 05/01/2008 - 18:22 नवीन

अरे हो.

अरे हो. माझा तगर आणि कण्हेरी मधे गोंधळ झाला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्राजु गुरुवार, 05/01/2008 - 13:27 नवीन

खूप दिवसांपासून..

हे प्रकाशित करायचे होते. मात्र आज जमले... त्याबद्दल मी दिलगीर आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 05/01/2008 - 13:35 नवीन

"आणिकॅशिया भरारला" आठवले.

आणी आज मात्र ते चांगलं ३-४ फूट उंच जाणवलं... हे माझं झाड. मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !" अनन्त काणेकरांचे "आणिकॅशिया भरारला" आठवले. सरळ साधे एकदम भिडणारे वर्णन: प्राजु ची खासियत. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 05/01/2008 - 13:36 नवीन

ताटवा हा फुलांचा.....

कदंबाच फुल मी कधीच पाहील नव्हत!!!!! खुपच सुंदर आहे ते.....(अगदी गोंडस ) :) ताई तुमचे हे जीवलग मित्र आणि मैत्रिणी अगदीच सुंदर आहेत..... (सुमनांचा प्रेमी) मदनबाण
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 05/01/2008 - 13:44 नवीन

प्राजु..

प्राजु,सुंदर वर्णन आणि चित्रे! तगरीला स्वस्तिकाची फुले हे नाव छान वाटले. कदंबाचे बहरलेलं झाड मलाही माझ्या माहेरी घेऊन गेलं.आमच्याकडेही कदंबाची २,३ झाडे होती.आणि कदंब फुलला की पानापानातून ती डोकवायची आणि वार्‍याच्या झुळुकेबरोबर मंद सुवास यायचा. स्वाती
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 05/01/2008 - 13:51 नवीन

ताटवा आवडला

आणी आज मात्र ते चांगलं ३-४ फूट उंच जाणवलं... हे माझं झाड. मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !" खरंच, ते झाड बोलत असतं तर हेच म्हणालं असतं. फोटो खूपच छान आले आहेत.कदंबाचं फूल पहील्यांदाच पाहीलं. सहजसोपी शब्दरचना. लेख आवडला हे.सां.न.ल. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
प
प्रगती गुरुवार, 05/01/2008 - 13:57 नवीन

फारच सुरेख...

ताटव्या बद्द्ल फार सुंदर लेख लिहिला आहे. " मनामध्ये दाटून आलेली ही हूरहूर मोकळी व्हावी म्हणून कॅमेरा घेऊन आले आणि त्या फुलांचे हसू टिपू लागले". सुरेख वाक्यरचना फोटो पण अगदी हुबेहूब आलेत.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 05/01/2008 - 22:31 नवीन

असेच म्हणतो

सुंदर लेख प्राजु !! आवडला, सकाळी सकाळी घरी पोचल्यावर असेच होते, मनाची अवस्था नेमकी टिपली आहेस. बाकी कणेर ला आम्ही कन्हेर म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रगती
म
मन गुरुवार, 05/01/2008 - 13:59 नवीन

मस्त लेख......

वाचुन सकाळ अगदि प्रसन्न झाली बघ.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 05/01/2008 - 14:31 नवीन

प्राजु,

तुझ्या लेखनावरून तुझ्या बागेत खुपच रमली आहेस असे दिसते.:) मस्तच!!!!!!!! फोटो पण छान आले आहेत. असं वाटत होतं, की हि सगळी फुलं मला म्हणताहेत," कशी आहेस गं? बघ, किती दिवसांनी भेटलीस. त्या तुझ्या दुनियेत अनेक रंगिबेरंगी फुलं पहात असशिल.. पण आमची आठवण येते का गं तुला? " मी लावलेल्या, जोपासलेल्या, त्या झाडांना इतक्या देखण्या रूपात पाहून काय करावं आणि काय नको असं झालं होतं. मनामध्ये दाटून आलेली ही हूरहूर मोकळी व्हावी म्हणून कॅमेरा घेऊन आले आणि त्या फुलांचे हसू टिपू लागले. फोटो काढताना तुझी काय मनस्थिती असेल? हे तुझ्या लेखनातून दिसत आहे. मस्त लेख.....
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 05/01/2008 - 16:06 नवीन

वा प्राजू, क्या बात है! प्रसन्न सकाळ!!

किती दिवसांनी फोटोत का होईना पण तगर बघायला मिळाली! :) फुलांसारखेच साधे, सरळ, सुगंधी लेखन! अभिनंदन!! बहरलेला कदंब बघून तर क्षणात मनाने ओळीच गुणगुणल्या कदंब-तरूला बांधुनि दोला, उंच-खालती झोले परस्परांनी दिले-घेतले, गेले ! ते दिन गेले चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ गुरुवार, 05/01/2008 - 16:29 नवीन

सुरेख.

प्राजुताई, सुंदर लेखन. ब-याच दिवसांनि आपले नवीन लेखन वाचायला मिळाले. ... हे माझं झाड. मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !" हे तर छानच. अबब.
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 05/01/2008 - 17:56 नवीन

प्राजु खूपच छान लिहिलयस

सॉरी गं मी उशीरा वाचलं...तू मला माझ्या बागेची आठवण करुन दिलीस्..माझ्या तर आईबाबांनी पण ते जुनं घर सोडलं आता त्यामुळे मला ती बाग परत नाही पहायला मिळणार....:( सहज आणि मनापासून लिहीलयस..थेट आत जाऊन भिडलं...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/01/2008 - 17:57 नवीन

जियो!

प्राजू, सुरेख लेख आणि चित्रे! जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 05/01/2008 - 18:06 नवीन

मस्त.

फुला॑चे फोटोही छान आणि तुझा लेख ही छान झाला आहे. प्रत्येक माहेरवाशीणीला आपल्या माहेरच्या घराची आठवण आठवण करुन देणारा.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/01/2008 - 18:13 नवीन

सुंदर....

सुंदर, सुबक, ठेंगणे लेखन. मुद्देसुद, उगीच फापटपसारा नाही तरीही मनीच्या (मनातल्या हो!) भावना व्यवस्थित पोहोचविणारे. दुसरा फोटो हा तगरीचाच आहे. कदाचित त्याला 'पांढरी तगर' म्हणत असावेत. (फोतो किंचित आउट ऑफ फोकस वाटतो आहे.) कदंबाची फुले प्रथमच पाहिली. मस्तच आहेत. नारळाच्या झाडाची जगण्याची धडपड आणि प्रगती कौतुकास्पद. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
म
मानस गुरुवार, 05/01/2008 - 20:05 नवीन

फारच छान

फारच छान वर्णन केलं आहे. बर्‍याच आठवणी ताज्या झाल्या. आणी आज मात्र ते चांगलं ३-४ फूट उंच जाणवलं त्या ३-४ फूटी नारळाचे फोटो पहायला मजा येईल. धन्यवाद मानस
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 05/01/2008 - 20:22 नवीन

छान एकदम

छान एकदम :) कणेरीची फुले बहुधा मी नाही कधी बघितली. अरेच्च्या ही स्वस्तिकाची फुले आहेत का? मला नाव नव्हते माहित. लहानपणी घराच्यासमोर झाड होते. दररोज तोडून देवासमोर वाहण्यास घरी नेत होतो. जास्वंद मस्त आहे एकदम. एवढ्या जर्द रंगाची फुले फार कमी बघितली मी. कदंबाच्या फुलांचे झाड आमच्या शाळेत होते, त्याची आठवण झाली. फुले मस्त मऊ चेंडूप्रमाणे असतात.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 05/01/2008 - 21:36 नवीन

छान लेख, आवडला!

नारळाच्या रोपाची उपकथा जास्त आवडली. कदंबाच्या झाडाचे फोटोही आवडले. विजुभाऊ, इथे माझ्या आवारात आहे कॅशियाचं झाड! नंतर फोटो पाठवीन... -डांबिसकाका
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/01/2008 - 22:09 नवीन

आपल्या

सर्वांचे मनापासून धन्यवाद... माझा ताटवा आपल्याला आवडला यातच सगळं आलं.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 05/01/2008 - 22:20 नवीन

छान लेख, आवडला!

जास्वंदी अन् कदंबाच्या फुलाचे फोटो मस्तच! मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !" सही रे!
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 05/01/2008 - 23:45 नवीन

छान

लेख आणि फोटोज दोन्ही आवडले. खासकरून कदंबाच्या फुलांचा. तीन-चार फुटी नारळाच्या झाडाचा फोटोही पहायला आवडेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Fri, 05/02/2008 - 10:51 नवीन

कदंब

कदंबाचे झाड काय मस्त दिसत आहे. छानच फोटो
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 05/02/2008 - 14:20 नवीन

अरे वा!

चांगल लिहिलय. सोबत फोटोंमुळे लेख प्रेक्षणीय देखील झालाय. :) अवांतर : मग करवीरनिवासिनीच्या दर्शनाचा लाभ घेतला की नाही अजुन?? टॉमॅटो नावाच एक नवीन एफ एम सुरु झालय. त्यात मला दुपारी २ च्या पुढे "ह्या फुलांच्या गंधकोषी" ह्या कार्यक्रमात खुप छान अशी नवी जुनी मराठी गाणी ऐकायला मिळाली होती. हे एफ एम ऐकल का??? (कोल्हापुरि झकास)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 14:47 नवीन

पुन्हा

पुन्हा एकदा प्राजुताई स्पेशल लेख.... साधा...सरळ...सुटसुटीत तरीही भावना जशाच्या तशा पोहोचवण्यात यशस्वी होणारी शब्दसंरचना.... (आयला, मलाच वाटायला लागलंय कोणीतरी दुसरंच माझा आयडी वापरुन प्रतिक्रिया लिहितोय!) छान गं!!!! मजा आली वाचायला. आ व ड लं.... नारळाची गोष्टही मस्त. कण्हेरीची आणि जास्वंदाची फुलं मला आवडतात...:) छान वाटलं फोटोत पाहून. शाळेत असताना कदंबाची फुलं तोडून (किंवा खाली पडलेली उचलून) एकमेकांना मारायचो त्याची आठवण करुन दिलीस :) अवांतरः गोकर्णाच्या फुलांचा फोटो कोणि देऊ शकेल काय? मला खूप आवडतं गोकर्ण.
  • Log in or register to post comments
क
काळा_पहाड Fri, 05/02/2008 - 15:32 नवीन

सुंदर लेख

सुंदर लेख आणि फोटो त्याहुनही सुंदर. कदंब फक्त वाचुन माहित होता. प्रथमच फोटो बघायला मिळाला. धन्यवाद प्राजू. मिलिंद
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/04/2008 - 07:48 नवीन

मस्त रे !!!

मनातील ताटवा मस्तच उतरला, चित्रही सुंदर !!! स्वस्तीकाची फुलांना आम्ही चांदीपाटाची फुले म्हणतो.
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Sun, 05/04/2008 - 11:10 नवीन

मस्त!

उत्तम लेख, उत्कृष्ट छायाचित्रे! प्राजुताई, लेख आवडला. वाचून एकदम छान वाटलं. वार्‍याची एखादी प्रसन्न झुळूक आल्यासारखं वाटलं. (तुम्हाला बागकामाची आणि फुलांमध्ये रमण्याची आवड आहे असं दिसतंय.) आणि फोटोंमधली फुलं तर "क्लासिक!!" जर हे फोटो तुम्हीच काढलेले असतील, तर तुम्ही ग्रेट आहात! फोटोंमुळे लेखाचं सौंदर्य आणखीनच वाढलंय. Well Done - अजिंक्य.
  • Log in or register to post comments
प
प्रशांतकवळे Sun, 05/04/2008 - 18:06 नवीन

सुंदर लेख

सुंदर, सरळ, साधा लेख, फोटोही सुंदर.. जास्वंदीचे फूल खूपच सुंदर, आणि जास्वंदची पानेही पहा, जर्द हिरवीगार.... माझ्याकडे जास्वंदीचे १६ प्रकार होते.. ज्यावेळेला गावात रहायचो.. आता ४/५च उरलेत. कोणाकडे जास्वंदीचे प्रकार (फांद्या) मिळतील का? प्रशांत
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 05/05/2008 - 09:06 नवीन

धन्यवाद..

सगळ्या ताटवा प्रेमींना मनापासून धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा