सहमत आहे.
जबरदस्त ट्रेक आणि जबरदस्त लोकेशन !
च्यायला त्या सुळ्क्यावरुन काय व्ह्युव्ह दिसतो आहे समोरचा, खल्लासच एकदम. म्हणजे एवढे चढौन वर गेल्यावर तो नजरा पाहुनच माणुन तृप्त होऊन जाईल...
अप्रतिम केसुशेठ ...
>>बाकी अनवाणी चढाई करण्याची तुमची सवय आठवलीच, डोंगराचा सुळका असो वा बर्फ!
हा हा हा, सहमत आहे एकदम :)
>> एवढे चढौन वर गेल्यावर तो नजरा पाहुनच माणुन तृप्त होऊन जाईल... <<
डान्राव, नजरा का नजारा? कोणत्या नजरा पाहून केसुगुर्जी तृप्त झाले म्हणे??
(पळा आता, दोन संपादकांमधे लावालाव्या लावून देण्याचे परिणाम बरे नाही होणार!)
ह्यावेळेस आमच्या बर्फात वापरलेल्या पादूका नव्हत्या.. आधीच्या दिवशी पडलेल्या पावसाने दगड उन्हात ही जास्त गरम झाला नव्हता म्हणून वाचलो.. नाही तर रोप लावूनच चढाई करावी लागली असती.. व्यवसायिक वाटाड्या बरोबर होता त्यामुळे रोप वगैरे सर्व तयारीने गेलो होतो.. उतरताना नेहमीच्या वाटेवर उतरणारे काही जण अडकले होते आणि आम्हाला लवकर खाली जायचे होते त्यामुळे उतरताना रोप लावून नेहमीच्या वाटे शेजारच्या कातळावरून उतरलो त्याचा व्हिडिओ केला आहे.. फाइल साईज मोठ्ठा असल्यामुळे जालावर अपलोड केला नाही..भेटल्यावर दाखवेन.. बट इट वॉज थ्रिलिंग एक्स्पिरिन्स..
नव्या मिपाच्या स्वरुपात मेनकंटेंट साठीची जागा कमी आहे, लिहीलेले साहित्य उपलब्ध जागेत आपोआप बसवले जात असल्यामुळे कदाचित चित्रे वेडीवाकडी मजकुरात मिसळलेली दिसत असावीत.. क्षमस्व..
(दिलगिर)केशवसुमार
थोडे रचने मध्ये फेरफार केले आहेत आता नीट दिसते का बघा..
(प्रयत्नशील)केशवसुमार
इथे पुरुषांचे हे बर्या पैकी कॅमन नाव आहे. Michael अस स्पेलिंग आहे.. आणि म्ह्णताना मिशेल.. (प्रोजेक्ट मधली काही अमेरीकन लोक माईकल असेही बोलवतात का माहिती नाही..)
चा ब्राझीलीयन भाषेतला शब्दशः अर्थ स्टार मंकी आहे..macaco Estrela मांजराच्या लहान पिल्ला येव्हडीच असतात..खूपच क्यूट दिसतात हे मात्र खर.. मी कधी त्यांना आक्रमक झालेले बघितले नाही.. इथे शुगरलोफ मॉउंटनस आहेत तिथल्या बागेत तर ती लोकांच्या खांद्यावर पण येऊन बसलेली बघितली आहेत..
अविश्वसनिय्,अप्रतिम,.....वगैरे वगैरे.
तुम्ही अनवानी होउन चढताना कढलेला तिसरा फोटो ज्यात तुम्हे खाली पहात आहात तो तर पाहुन मी 'अॅ' करुन बघत होतो.
तुम्ही तुमच्या हौसेसाठी हे सर्व करता,पण सीरीयसली मला कोणी पैसे देउन पाठ्वल तरी मी जाणार नाही!
एकदम अप्रतिम वर्णन आणि फोटूज!
सुळक्यावर चढाई करुन सर्वात वरुन टाकलेले फोटो हे केवळ अन केवळ अचाट आहेत. लग्गेच तो ट्रेक करायला यावे असे वाटते आहे.
(खुद के साथ बातां : रंगा, काही दिवस ह्या माणसाचे पद्य लिहिण्याचे अधिकार काढून घ्यावेत का, म्हणजे हा सुंदर गद्यसाहित्य निर्मिती करेल? :?)
का कुणास ठाऊक, पण ही अभद्र म्हण आठवली.
काही फोटो दिसत नाहीत, पण जे दिसतात त्यांवरुन केवळ 'वंदन' असे म्हणावेसे वाटते. आमच्यातर्फे तुम्हाला एक लिंबू सरबत लागू.
रिओचा "Christ the Redeemer Statue" पाहिला का नाही? फोटोमधेसुद्धा कुठही दिसत नाही?
बाकी तुझा छंद चांगलाच आहे. निसर्गात रममाण होण्यासारखं दुसरं सुख नाय...
"निसर्ग भारतातील असो वा ब्राझील मधील त्याची किमया अगाद आहे आणि मनुष्यप्राणी त्याच्या पुढे कस्पटासमान आहे ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली.." १०० टकेकी बात कही बॉस...
वाटाड्याशेठ,
फ्लिकरवर महिन्याचे अपलोड लिमीट संपले म्हणून इतर फोटो जालावर चढवू शकलो नाही..
क्रिस्तो दोन वेळा बघितला एकदा गाडीने जाऊन आणि एकदा हेलिकॉप्टरने..
इथे मे-जून मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जंगलातून जायच्या पायवाटेवर बरीच पडझड झाली होती.. अन्यथा तिजूका पिक ते क्रिस्तो असा १३-१५ कि.मी. चा डोंगर दर्यातून जाणारा एक अप्रतिम ट्रेक आहे,
ह्याच ट्रेक मधला तिजूका पिक ते पिको दि पापागाओ ( PICO DA PAPAGAIO)९८७ मीटर उंच, हा ७ कि.मी.चा ट्रेक मागच्या महिन्यात केला होता. पण संपूर्ण क्रिस्तो पर्यंतचा बेत राहूनच गेला..
केशवसुमार
फोटो खुपच सुंदर आले आहेत. :)
ट्रेकची मजाच वेगळी असते, आणी ट्रेक असा असेल तर मग विचारायलाच नको. परदेशात राहुन ट्रेक करायची तुमची हिंम्मत दाद देण्यासारखी आहे.
पायाचे फोटो दिलेत हे बरे झाले. रोज वंदन करण्याजोगे आहेत ना चरण. ;-) समस्त विडंबकांची सोय झाली.
तुम्हाला इतके गद्य लिहिता येते हे माहितच नव्हते. ;-)
असो. फोटो आणि वर्णने दोन्ही मस्त.
आम्ही सदस्य नसतानाचे हे लेख वर काढून मॅन महो दयांनी अनंत उपकार केलेले आहेत.
केशवसुमार मस्तच..... थ्रिल्लींग.
ट्रेकचे शेवटाकडचे फटु बघून पोटात गोळा आला माझ्या.
>>साओ कॉन्राडो किनारा
-- उंचच उंच कातळाची कडा आणि थेट खालचा समुद्रकिनारा दिसल्याने,
व
कातळावरून पाय खाली सोडून बसलेला फोटो पाहून
पात्तळ झाली !
अवांतर: ती झोपडपट्टी 'फास्ट फाइव्ह' मध्ये दाखवली आहे काय?
प्रतिक्रिया
ग्रेट..!
मस्तच!
जबरदस्त..
जबरदस्त..
फोटो दिसत नाहीत. तुर्त एवढेच.
' पेट्रो दि गावा ' सुळका
मस्त...
अप्रतिम! आयुष्यात एकदातरी
+१
>> एवढे चढौन वर गेल्यावर तो
हां, तेच ते ...
हो..
उतरताना रॅपलिंग केलंत तिकडे?
संपूर्ण..
'पेद्रो दि गावा'
'पेद्रो दि गावा'
अप्रतिम!
मस्त. बरीच चित्रे मला
ह्म्म
फिलहाल हापिसमेसे चित्रे दिसत
शाबास आहे तुमची. वरून काढलेले
फोटो जबर आहेत केसु.. आणि
निव्वळ अप्रतिम.. बाकी बोलायला
शप्पथ
हो..
सुपर्बो!
Mico Estrela
अविश्वसनिय्,अप्रतिम,.....वगैर
जबर्या केसुशेठ!!
फोटो मस्त आलेत. खास करून
छान फोटो
मस्त!
अशक्य ट्रेक होता एकुण. फोटो
मस्तच हो केसुशेठ..
जित्याची खोड
मेक दॅट टू, सर, मेक दॅट टू!!!
केसुशेठ...
हो..
अप्रतिम ट्रेक आणि फोटोही खूप
फोटो खुपच सुंदर आले आहेत.
धन्यवाद
थरारक - हाइक, प्रकाशचित्रे आणि वर्णन - तिन्ही
पायाचे फोटो दिलेत
एकच शब्द...
आयला!!!! बघता बघता कळायचं बंद
धागा वर काढल्याबद्दल आभार.
होय होय...
भन्नाट .... काही बोलूच शकत
आम्ही सदस्य नसतानाचे हे लेख
भयंकरऽऽ!! अफाटऽऽ! अचाटऽऽ ! हर हर महादेवऽऽ!