मला वाटते की कंपॅरिझन नेहमी 'अॅपल टू अॅपल' असावी. इथे तसे दिसत नाही. पण एक रूपक म्हणून ठीकच आहे (आणि म्हणूनच सत्याच्या जवळ येणारी नावे आणि घटना असल्या तरी त्याचा सत्याशी संबंध न लावता वाचले). एका टोकाच्या वर्तनावर भाष्य केले आहे हे उघड आहेच. पण दुसर्या टोकाच्या वर्तनावरही कधी तरी काही तरी यावे.
अर्थात, एकाचा फ्रीडम फायटर दुसर्याचा टेररिस्ट असतोच. पण मग खरा फ्रीडम फायटर कोण आणि टेररिस्ट कोण हे कळण्या इतकी नीरक्षीरविवेकबुद्धी असते तोच खरा शहाणा भले मग तो टेररिस्ट आपला असो. जो केवळ पूर्वग्रहांवर अवलंबून असतो तो चूकच.
अवांतरः जरा कुठे शांत होतंय तर तेवढ्यात काहीही कारण नसताना संपादक वगैरे विषय उकरून काढायचे या बद्दल वाईट वाटले. थत्त्यांकडून ही अपेक्षा नव्हती आणि नाही.
>>>>मला वाटते की कंपॅरिझन नेहमी 'अॅपल टू अॅपल' असावी. इथे तसे दिसत नाही.
कसं बोललात...
>>> पण एक रूपक म्हणून ठीकच आहे.
रुपक ठिक? अहो शिवाजीमहाराजांना जग ओळखतं ते कल्याणच्या सुभेदाराची सुन परत मानाने पाठवणारा, रांझ्याच्या पाटलाचे दुर्वर्तन केले म्हणुन हातपाय तोडणारा... माझे काही फार वाचन नाही पण कट्टर शिवाजीच्या विरोधकांनी सुद्धा शिवाने बायाबापड्या लुटल्या असे विधान केल्याचे मी वाचले नाही. संदर्भ असेल तर द्या जरुर खात्री करुन घेईन. हां.. शिवाजीने लुट केली, तह मोडला असे अनेक किस्से आहेत पण ...
म्हणजेच ही रुपकाच्या माध्यमातुन वैयक्तिक खाज भागवुन घेणेच झाले ना? वर विचारवंती आव आणायचा...
टाळ्या पिटायला इतर विचारवंत आहेच... जास्त बोलत नाही.. मराठी अस्मिता जागी होवुन अनेकांचे पोट दुखायचे.
>>एका टोकाच्या वर्तनावर भाष्य केले आहे हे उघड आहेच. पण दुसर्या टोकाच्या वर्तनावरही कधी तरी काही तरी यावे.
नाही येणार ... येणारच नाही
>>>अर्थात, एकाचा फ्रीडम फायटर दुसर्याचा टेररिस्ट असतोच. पण मग खरा फ्रीडम फायटर कोण आणि टेररिस्ट कोण हे कळण्या इतकी नीरक्षीरविवेकबुद्धी असते तोच खरा शहाणा. जो केवळ पूर्वग्रहांवर अवलंबून असतो तो चूकच.
+१
>>>अवांतरः जरा कुठे शांत होतंय तर तेवढ्यात काहीही कारण नसताना संपादक वगैरे विषय उकरून काढायचे या बद्दल वाईट वाटले. थत्त्यांकडून ही अपेक्षा नव्हती आणि नाही.
सहमत.
कैच्या कैच. उगा भलते संदर्भ जोडले जाणार या धाग्याला. त्यात पुन्हा सिवा आणि बायाबापड्यांची विटंबना वगैरे विडंबनातही येऊ शकत नसते हे व्यवहारातील परिस्थिती पाहता पक्के. मी संपादक नाही याचा, आणि होणारही नाही या निर्णयाचाही याचा पुन्हा आनंद झाला. कारण असतो तर हा धागा केवळ या एका कारणासाठी अप्रकाशित केला असता.
हा धागा अप्रकाशित केला नाही, अॅट लीस्ट तूर्तास, त्याचे एकच कारण की काय लिहिले गेले आहे हे खुले आम थोडा वेळ तरी दिसावे. नाही तर नेहमी प्रमाणे लोकांसमोर एक बाजू आलीच नसती आणि संपादकांविरूद्ध रान उठले असते.
प्रतिक्रिया
बकवास!
आपण आणि ते अशा द्वैत
+
बरोबर औरंगजेब संत होते असं
:-)
पटण्यासारखे नाही
बिनडोकपणाचा कहर.
मला वाटते की कंपॅरिझन नेहमी
>>>>मला वाटते की कंपॅरिझन
धन्यवाद नाना. तुम्ही प्रतिसाद
हंम्म!
कैच्या कैच
अप्रकाशित? मी तर म्हणतो या
हा धागा अप्रकाशित केला नाही,