देवा एक माझे | पुरवावे कोड |
तुझे माझे आड | नको काही ||
नको कर्म कांड | नको ब्रह्म माया |
येर झार वाया | संसाराची ||
नको बडिवार | सोवळे ओवळे |
तेणे ना आकळे | सत्य तत्त्व ||
देवा ऐसे द्यावे | मज वरदान |
नामानुसंधान | राहो सदा ||
तुझी श्याम मूर्ती | सदा राहो चित्ती |
आणि सर्व वृत्ती | तुझे पाशी ||
सदाचा सन्नीध | माझ्या देव आहे |
प्रेमे मज पाहे | ऐसे व्हावे ||
अलोट ते सुख | तुज मी स्मरावे |
अंतरी राखावे | समचरण ||
प्रेम सागराचा | पूर तुझे दारी |
सर्वत्र श्री-हरी | बाकी काय ||
-- सागर लहरी २२.७.२०१०
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1490
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान ! ! !
छान अभन्ग ! ! ! पहाट हरी वाचनाने झाली प्रसन्न वाटले !
धन्यवाद
निरंजनजी , आभारी आहे
खूप शब्ददेखणी आणि नितळ रचना
खूप शब्ददेखणी आणि नितळ रचना आहे.
+१
In reply to खूप शब्ददेखणी आणि नितळ रचना by यशोधरा
अगदी हेच म्हणातोय.
करेक्ट... अग्गदी अस्सच
In reply to खूप शब्ददेखणी आणि नितळ रचना by यशोधरा
करेक्ट... अग्गदी अस्सच म्हनताव आमी पन :-)
मस्तच!
साधी सरळ रचना.