विसरून पार गेलो, मीही असे लिहीत
आकाश अक्षरांचे दिनरात रंगवीत
शब्दातल्या कळ्यांना नव्हते फुलायचेच
पण आतच वसंता बसलोच आळवीत
केव्हातरी यशाची येई झुळूक मंद
स्वच्छंद लेखनाचे तारू तरंगवीत
शाली नकोत आता ना पुषगुच्छ हार
घेई लपेटुनी मी मधुचांदणे पुनीत
झेपावतो कळेना कोठे शकुंत आता
अश्वत्थ शांत मौनी पाने थरारतात
त्या अनुभवामृताला सीमा असीमतेची
मी नादरूप वेडा सगुणी सणासुदीत
बिलगून अक्षरांना फुटती झरे अनंत
मग धुंद रान गाई वेडे विहंगगीत
--अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9280
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
गजल गायलेली ऐकायला आवडेल
चांगले काव्य.
झेपावतो
आभार.
सुंदर..
गोड्बोले साहेब ,
प्रतिसादात
In reply to गोड्बोले साहेब , by अप्पासाहेब
छान!
तुला काय
In reply to छान! by क्रेमर
काहीच नाही
In reply to तुला काय by ३_१४ विक्षिप्त अदिती
फोन करून
In reply to काहीच नाही by क्रेमर
धन्यवाद
In reply to फोन करून by ३_१४ विक्षिप्त अदिती
नक्कीच! (अश
In reply to धन्यवाद by क्रेमर