Skip to main content

नका जावू अशा पावसात

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/07/2010 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
नका जावू अशा पावसात
सिच्यूऐशन: रातीचा पाउस पडूं र्‍हायलाय आन हिरो पहारा करायच्या डुटीला जावूं र्‍हायलाय......
भर रातीचं आभाळ फाटलं मनी काहूर काळजीचं दाटलं येळीअवेळी बाहेर पडता जीवा घोर लागं कारभारी....नका जावू अशा पावसात ||धृ|| उगा काळजी लागं दिसभर पडं संततधार रातीलाही नाही उतार घरातच र्‍हावा तुमी माझ्यासंगती घ्यावं मला उबार्‍यात कारभारी नका जावू पावसात ||१|| रातीला तुमी डुटीला* जाता उलटी सारी कामं करता एकलीचा माझा येळ जाईना कशी काढू मी रात कारभारी नका जावू पावसात ||२|| बाईलमानूस मी घरात बसते तुमच्या प्रितीची आटवन येते दोघं र्‍हावू सोबतीला येवूद्या तिसरं कुनी पाळण्यात कारभारी नका जावू पावसात ||३|| *डुटी च्या ऐवजी 'पहार्‍याला' असाही शब्द टाकता येतो जेणे करून हिरवीन चा नवरा 'सैन्यात पहारेकरी' आहे अशी सिच्यूयेशन करत येईल. - पाषाणभेद (दगडफोड्या) २२/०७/२००८
काव्यरस

वाचने 1768
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आला रे आला..पाभे आला. बाईलमानूस मी घरात बसते तुमच्या प्रितीची आटवन येते दोघं र्‍हावू सोबतीला येवूद्या तिसरं कुनी पाळण्यात कारभारी नका जावू पावसात येक नंबर.. --------------- धनंजय बोरगांवकर

मी स्वःताला वॉचमनचा गणवेष चढवला व एक चित्र डोळ्यासमोर उभ केल पण................
घ्यावं मला उबार्‍यात
रातीला तुमी डुटीला* जाता उलटी सारी कामं करता
येवूद्या तिसरं कुनी पाळण्यात
हे वाचल व घरीच बसलो. :D :D :D :D :D :D :D पाष्या अस काय त लिह की...गुड्या काय उभारुन राहीला! _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे http://www.fl

आताच तुझा ब्लॉग नीट बघितला,तुझ्या ब्लॉगला सलाम रे पाष्या!! आजपासुन माझी श्वाक्षरी(????????) तुझ्या ब्लॉगला अर्पण. ब्लॉग असावा तर असा!!!..............सम्रुध्द(??) व परीपुर्ण. इतरांनी शिका पाष्याकडुन काहीतरी!! _________________________________________________ ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

In reply to by शानबा५१२

शानबा तुम्ही वर लिहीलेले वाचून मला लाजल्यासारखे झाले. आपणास धन्यवाद. बाकी दुसरे कडव्यात आताचे आयटी अन बीपीओ मधे कामे करणार्‍यांसाठी असा बदल केला जावा: रातीला तुमी डुटीला* जाता आय.टी. ची सारी कामं करता एकलीचा माझा येळ जाईना कशी काढू मी रात The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही