Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आम्हाघरीधन on Wed, 07/21/2010 - 17:55
या चर्चेतील मुद्दे वाचले मुलतः कोणत्याही थोर व्यक्तीच्या बद्दल कुणाही सोम्यागोम्याने काहीही माहीती द्यावी कुणाही लंपट लेखकाने काहीही लिहावे अन शासनाने अशा लिखानावर बंदी आणली असता कुणाही येरागबाळ्याने न्यायालयात याचिका दाखल करावी की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे? हे कितपत योग्य आहे? आपल्या पैकी कितीतरी जण न्याय व्यवस्थेच्या या अन्यायी निर्णयाचे समर्थन करतांना दिसतात तेंव्हा न्यायाची चाड आपणाला आहे काय? हा प्रश्न निर्माण होतो. सावरकरांचे वाक्य अंदमान तुरुंगातुन हटविले तेंव्हा आक्रोश करनारे आपण आज शिवरायांच्या विरोधातील निकालाचे समर्थन करतांना आपले मन बुद्धी संस्कार गहाण टाकुन तर बोलत नाही आहोत ना........? कुणा स्त्रीच्या चारित्र्यावर चिखलफेक करणार्‍याला कसले आले अभिव्यक्ती स्वातंत्र्य? निषेध त्या न्याय व्यवस्थेचा अन त्या अन्यायी व्यवस्थेचे समर्थन करणारांचा.... प्रतिक्रिया दैनिक Daily Navnagar Mumbai 18-7-10
  • Log in or register to post comments
  • 14756 views

प्रतिक्रिया

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 07/22/2010 - 17:58

In reply to धागा by पुष्करिणी

Permalink

पण ह्याच

पण ह्याच न्यायानं , ज्या लिखाणावरून ही रणधुमाळी माजली आहे त्यामुळं एका पुरूषाच्या ( दादोजी कोंडदेव )चारित्र्यावरही चिखलफेक झाली आहे हे कसं विसरायचं? या तथाकथित विनोदामुळं ( जर दादोजी कोंडदेवांना शिवाजी राजांचे शिक्षक मानत असाल तर ) एका पुरूषाची स्वामीनिष्ठा, एका शिक्षकाची तळमळ इ. इ. यांवर शिंतोडेच उडाले ... ही गोष्ट देखील माझ्या ध्यान्यात आली नव्हती. धन्यवाद पुष्करीणी. पुण्याचे पेशवे येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on गुरुवार, 07/22/2010 - 18:02

In reply to धागा by पुष्करिणी

Permalink

अगदी बरोबर

पण ह्याच न्यायानं , ज्या लिखाणावरून ही रणधुमाळी माजली आहे त्यामुळं एका पुरूषाच्या ( दादोजी कोंडदेव )चारित्र्यावरही चिखलफेक झाली आहे हे कसं विसरायचं? या तथाकथित विनोदामुळं ( जर दादोजी कोंडदेवांना शिवाजी राजांचे शिक्षक मानत असाल तर ) एका पुरूषाची स्वामीनिष्ठा, एका शिक्षकाची तळमळ इ. इ. यांवर शिंतोडेच उडाले ... पुष्करिणी, अत्यंत योग्य मुद्दा मांडल्याबद्दल अभिनंदन.... हिच भुमिका खर म्हणजे इथल्या लोकांची असायला पाहिजे... पण तसे न होता उलट लेनला वापरून आपला जातीय कंड शमवला जातोय.... असो... चालूद्या. आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by आम्हाघरीधन on गुरुवार, 07/22/2010 - 20:50

In reply to अगदी बरोबर by आंबोळी

Permalink

जर दादोजी

जर दादोजी कोंडदेवांना शिवाजी राजांचे शिक्षक मानत असाल तर http://2.bp.blogspot.com/_45ebM7EfwDs/SVyb8yEUZhI/AAAAAAAAARU/ZtQSdKco1VE/s400/dadoji+konddev-jaysing+pawar.jpg http://2.bp.blogspot.com/_45ebM7EfwDs/SVyaiUbmcdI/AAAAAAAAARM/YznRTCKiTQM/s400/dadoji+konddev.jpg जरा हे वाचा!!! अन काही पुरावे असतील तर मला नाही थेट राज्य सरकारला द्या.. खरा इतिहास लिहिण्यास मदत होईल....
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 07/28/2010 - 22:19

In reply to जर दादोजी by आम्हाघरीधन

Permalink

अग्गोबाई!!! म्हणजे त्या

अग्गोबाई!!! म्हणजे त्या संभाजी ब्रिगेडने पेपरात काय ते छापून आणले त्याला पुरावा म्हणायचा का? आणि कशाच्या आधारावर हि ब्रिगेड एवढा मूर्खपणा करतेय? कोणी काहीही म्हणो...दहशतीने पुस्तक छापून, सरकारला नमवून इतिहास लिहिणार्यांना माझा मनाचा मुजरा....हो ... इतिहास घडविण्यापेक्षा "असा " इतिहास लिहिणे अगदी सोप्पे... बाकी तुमच्या पुराव्याच्या प्रतीक्षेत ... आणि ज्ञानेश्वरी हि ज्ञानेश्वरांनी लिहिलीच नव्हती तर त्या रेड्याने लिहिली होती....त्या मेल्या ब्राह्मणांनी रेड्याचे क्रेडीट मात्र घेतले हो...काय तरी लोक असतात...तुम्ही म्हणून खराखरा इतिहास लिहिताय नाहीतर आम्हाला कोण एवढा ज्ञान देणार?
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on गुरुवार, 07/22/2010 - 19:21

Permalink

गृहीतच चुकीचे

असल्या सर्व धाग्यांच्या व त्यावरील चर्चा, प्रतिसाद यातील गृहीतच चुकीचे आहे. कुठल्याही थोर ऐतिहासिक व्यक्तिंवर त्यांच्यापेक्षा कैक पटींनी सामान्य व्यक्तिंनी टीका केली वा त्यांच्याविषयी अभद्र लिहिले तरी त्यांचे कर्तृत्व जराही कमी होत नाही. उलट अशा व्यक्तिंच्या अकलेचे दिवाळे दिसून येते. त्या थोर व्यक्ति जिवंत असत्या तरी त्यांनी असल्या क्षुद्र किड्यांकडे दुर्लक्ष केले असते. खरा धोका आहे तो त्यांच्या नांवाने धंदा करणार्‍यांचा. त्यांचे मात्र याबाबतीत अनायसे फावते आहे. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

Submitted by आम्हाघरीधन on गुरुवार, 07/22/2010 - 21:01

In reply to गृहीतच चुकीचे by तिमा

Permalink

खरा धोका

खरा धोका आहे तो त्यांच्या नांवाने धंदा करणार्‍यांचा. त्यांचे मात्र याबाबतीत अनायसे फावते आहे. प्रभु रामचंद्र अन भगवान श्रीकॄष्ण यांचा पण रा.स्व.संघाबाबत असाच वापर केला असे आपणाला म्हणायचे आहे काय? की मंदिर वही बनायेंगे म्हणायचे अन कोर्टात डोळे मिटत म्हणायचे, " बाबरी मस्जिद गिराना एक दुखःदायी घटना थी|" . मंदिर मात्र बनले नाही, भावनेच्या जोरावर संघाने सत्ता मात्र मिळविली.... वरुन जय श्रीराम.... चालु द्यात भावनेचे खेळ... असाच शिवरायांचा वापर महाराष्ट्रात शिवसेनेने केला.... मात्र काही प्रमाणात का होईना त्यांनी शिवरायांची जाण ठेवली, लेन प्रकरणी मात्र शेपुट घातले होते हे सर्वश्रुत आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by Dipankar on गुरुवार, 07/22/2010 - 21:06

In reply to खरा धोका by आम्हाघरीधन

Permalink

म्हणजे

म्हणजे तुमचेही शिवप्रेम हे उद्दिष्ट नसुन सत्ता हेच आहे तर
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Fri, 07/23/2010 - 08:57

In reply to खरा धोका by आम्हाघरीधन

Permalink

आम्हा घरी

आम्हा घरी धन, तुमचे सगळे प्रतिसाद वाचले. इथल्या अनेक लोकांनी तुमचा यशस्वी प्रतिवाद केला आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा चीत करावे असेही वाटत नाहीये. तुम्ही प्रच्छन्न जातीयवादी आहात. निदान संभाजी ब्रिगेडचे लोकं उघड उघड जातीच्या नावाने शिव्या देतात.(वळवळणारे भ... किडे असं काय काय त्यांच्या लिखाणामध्ये असतं.) पण तुमच्या ठायी ते धाडसही दिसत नाही. माझी खात्री आहे की माझा प्रतिसाद नीट वाचण्याआधीच आडनावावरुन मी 'कोणत्या जातीचा' हे अनुमान बांधून तुम्ही आधीच एका विशिष्ट दृष्टिकोनातून निष्कर्ष काढून मोकळे झाले असाल. हीन भावनेचे अशा प्रकारे जागोजाग विसर्जन करणे थांबवावे अशी विनंती करतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Fri, 07/23/2010 - 10:05

In reply to आम्हा घरी by अप्पा जोगळेकर

Permalink

हीन

हीन भावनेचे अशा प्रकारे जागोजाग विसर्जन करणे थांबवावे अशी विनंती करतो आहे. @जोगळेकर महाराज, इथे काही माकडे पृथ्वी निक्षत्रिय करण्याची भाषा करतात, त्यांनाही तुमचे मौलिक अमृताचे बोल ऐकवा ना. :) ---------------------------------------- @आम्हा घरी धन. तुम्ही चुकीच्या 'पेठेत' आला आहात. =)) निदान नाका पाहुन तरी जकात फाडायची राव. :)
  • Log in or register to post comments

Submitted by Dipankar on Fri, 07/23/2010 - 10:29

In reply to हीन by मितभाषी

Permalink

इथे काही

इथे काही माकडे पृथ्वी निक्षत्रिय करण्याची भाषा करतात, त्यांनाही तुमचे मौलिक अमृताचे बोल ऐकवा ना आम्ही पाहीली तर त्याला नक्की विरोध करु. पण आम्हा घरी धन हा वाद उकरुन फक्त एका जातीवर गरळ ओकणे हेच साध्य करु पहात आहेत रामदास दादोजी ज्ञानेश्वर गुरु होते वा नाही हे पुराव्याने सिद्ध करणॅ हा अभ्यास झाला रामदासांचे दादोजींचे ते एका जातीचे आहेत म्हणुन चारीत्र्यहनन करणे हा द्वेष झाला. ब्रिगेडवाले हे फक्त चारीत्र्यहननचा धंदा करतात
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Fri, 07/23/2010 - 10:50

In reply to खरा धोका by आम्हाघरीधन

Permalink

ब्रिगेडही त्याच रांगेत

राम मंदिर हा वेगळा मुद्दा आहे. पण त्याचा वापर झाला हे उघड सत्य आहे. मग हे सौ. खेडेकरांना आणि त्यांना भाजप मध्ये जाऊ देणार्‍या तुमच्या नेत्यांना माहीत नव्हतं का? आणि हो शिवसेना झाली ५० - ६० वर्ष जुनी. आणि तेव्हाचे संदर्भ फार वेगळे होते. तेव्हापासून ती शिवरायांच्या नावाचा वापर करते आहे म्हणणे जरा पटायला अवघड आहे. पण त्याच पद्धतीने मुद्दामून संभाजी महाराजांचे नाव घेऊन शिवरायांबद्दल असलेली भक्ती / आदर याला बाजूला ठेवून संभाजीराजांच्या आयुष्यात नंतर घडलेल्या काही घटनांचे भांडवल करून त्याचा एका जातीवर रोख धरून, फक्त हातातून निसटत चाललेल्या सत्तेला पुन्हा काबीज करणे हाच शुद्ध राजकीय हेतू नाही का? जर यामागे सत्ताकारण नाही तर मग फक्त संभाजी राजांच्या / जिजाऊंच्या आदराने निघालेल्या संघटनेला फक्त एका आणि एका जातीचा आधार का लागतो? तीनशे वर्षानंतर फक्त त्या एका जातीत जन्मले म्हणून काही लोकच जर योद्धा संभाजीराजांबद्दल आदर बाळगू शकतात तर तुम्ही स्वतःच त्या जुनाट जाती परंपरेतून बाहेर येत नाही आहात! कारण त्याच जातीत विचार बांधून ठेवले आहेत तुमचे. मुळात धर्मावर विश्वास नाही, जातीवर असायलाच नको तर पूर्ण महासंघ फक्त एका जातीचा का? महाराष्ट्राचा का नाही? हे अतिशय उघड राजकारण नाही का? ते अष्टप्रधान मंडळाचे तुम्ही पुन्हा पुन्हा लिहिता. मग मोरे, शिर्के, घोरपडे, मोहिते, खोपडे वगैरे सर्वांना ते त्या कुळात आहेत म्हणून आज तीनशे वर्षांनी ९६ कुळातून किंवा तुमच्या संघटनेतून बाहेर काढून का टाकत नाही? माझा मुद्दा जातीचे राजकारण हा आहे. मूळ गोष्ट ही आहे की काही व्यक्तींनी काही केले म्हणून त्या जाती तल्या किंवा lineage मधल्या सर्व लोकांना शतकानुशतके ते त्याच गोष्टीला अनुकूल होते / आहेत असा एकांगी विचार लोकांच्या माथी मारून, न समजणार्‍या सामान्य लोकांचे brainwashing करून त्याचे आपल्या राजकीय फायद्यासाठी भांडवल करायचे याला विरोध आहे. इतिहासातल्या गोष्टी इतिहासात - जर नसतील दादोजी कोंडदेव शिक्षक, तर नाही शिकणार पुढची पिढी ते. पन्नास वर्षांनी कोणाला नाही लक्षात राहणार ते कोण होते. एका स्वामिनिष्ठ कारभार्‍याचे नाव खराब झाल्याने खूप मोठा फरक पडत नाही. पण त्या इतिहासाच्या वादात महाराष्ट्राची अशी अंतर्गत मुद्दामून दुफळी करणे ही नीच (माफ करा याहून योग्य शब्द मिळाला नाही) मनोवृत्ती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Dipankar on Fri, 07/23/2010 - 11:06

In reply to ब्रिगेडही त्याच रांगेत by मैत्र

Permalink

जो न्याय

जो न्याय अष्टप्रधांनांमुळे ब्राम्हणजातीला तोच न्याय मोरे, शिर्के, घोरपडे, मोहिते, खोपडे वगैरे सर्वांना लागु करा. अष्टप्रधान मंडळाला सोयराबाईची फुस होती हे सोयीस्कर वगळले जाते. संभाजी राजांबरोबर बलिदान केलेला कवीकलश ब्राम्हण होता हे नजरेआड केले जाते. हा द्वेष नव्हे तर काय आहे मला ब्राम्हण असल्याचा आजिबात अभिमान नाही जाती हिंदुधर्मातुन नाहीश्या होउ देत या मताचा मी आहे. पण कोणी ब्राम्हण आहे म्हणुन द्वेष करत असेल तर मी नक्की उत्तर देणार
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Fri, 07/23/2010 - 11:25

In reply to ब्रिगेडही त्याच रांगेत by मैत्र

Permalink

मैत्रजी आपले काही मुद्दे पटतात.

महाराजांना घडविण्यात आणि त्यांच स्वराज्याच स्वप्न वास्तवात उतरविण्यास अनेक लोकांचे मोलाचे सहकार्य होते. राजमाता जिजाऊंनी महाराजांना कधीही राजपुत्रासारख वागवुन राजवाड्यात बंदिस्त केल नाही. बाल शिवाजीला समाजातील सर्व थरातील मुलांच्यात रमु दिल , खेळु दिल हा फार मोठा दुरदर्शीपणा होता. महराजांच्या आफाट कर्तुत्वाला केवळ कोणी एकटा संत अथवा शिक्षकच कारणीभुत नाहीत हे समजुन घेतल पाहीजे. (आणि तसे माननारे महराजांचा उपमर्द करीत आहेत असे मला वाटते.) मागील वर्षी मी शिवथर घळीत गेलो होतो. आज पर्यंत महाराजांना देवीने स्वपनात येऊन भवानी तलवार दिल्याचे ऐकुन होतो पण "दासबोधातील कर्मयोग (दासबोध विवरण भाग ५) ले. सुनिल चिंचोलकर" यांच्या पुस्तकाच्या मुखपॄष्ठावरील चित्रात संतरामदास महाराजांना तलवार देता आहेत आणि महाराज नम्रपणे गुड्घ्यावर बसुन स्विकारताना दाखवले आहे. हा प्रकार माझ्यासाठी नविनच होता. ईतिहास जाणकार प्रकाश टाकतील का? Image removed. ************************************************ दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Fri, 07/23/2010 - 12:14

In reply to मैत्रजी आपले काही मुद्दे पटतात. by jaypal

Permalink

कर्मयोग

मीही हे पुस्तक पाहिले / वाचले आहे. मला वाटतं ते त्या पुस्तकातल्या आशयाला अनुसरुन एक रुपक आहे. आणि एका रामदास स्वामींनी काही उपदेश केला आणि फक्त त्यानुसार किंवा त्यामुळेच राजांनी स्वराज्य उभारले म्हणणारे मूर्खच म्हणायला हवेत. मूळ बीज, विचार, स्वातंत्र्याची इच्छा ही जाधवांच्या पराक्रमी घराण्यातून आलेल्या जिजाऊंनीच दिली असावी. आपापसात लढून दुसर्या राजा साठी किंवा आपल्याच धन्याच्या हातून लखूजींप्रमाणे मरण्यापेक्षा या बारा मावळातल्या मराठ्यांना एकत्र करून आपले एक राज्य स्थापन करावे हे त्यांनीच बाल शिवाजीच्या मनावर बिंबवले असावे. दादोजी हा इतिहास खरा असला तरी त्यांचे काम हे सरदार शहाजीराजांनी दिलेले जहागिरीचे काम चोख पणे पार पाडणे आणि तरूण वयातील सरदार पुत्राला योग्य ते मूलभूत शिक्षण देणे, कारभारातल्या गोष्टींचे ज्ञान करून देणे एवढे होते. वयाने ज्येष्ठ असल्याने या दोघांबद्दल प्रेम असावे. त्यांचे मत स्वराज्याला फारसे अनुकूल नव्हते कारण शाह्यांची कराल सत्ता त्यांनी आयुष्यभर पाहिली होती. त्यामध्ये काही करता येईल असे त्यांना वाटत नसावे. ज्यांच्याबद्दल जिव्हाळा आणि स्वामिनिष्ठा आहे त्यांना काही होऊ नये असेही वाटत असेल. रामदास स्वामींनी ह्याचा पाया रोवला म्हणणेही चुकीचे. पण त्यांचे विचार हे महाराष्ट्र धर्माला अनुसरुन होते. त्यांनी महाराजांबद्दल जाणले असावे की हा राजा या देशाला तारून नेऊ शकतो. ते बळ आणि चातुर्य दोन्ही शिवाजीराजांकडे आहे. तेव्हा ज्ञानाच्या, संन्याशाच्या समाजकारणाच्या हेतूने त्यांनी आपले काही विचार राजांना सांगितले असावेत आणि असा समाजाभिमुख, बलोपासनेचे धडे देणारा संन्यासी संत राजांना महाराष्ट्र विचार पसरवणारा आणि ज्ञानामुळे, वागण्यामुळे वंदनीय वाटला असावा. हे चित्र जसेच्या तसे न बघता, ती तलवार कर्मयोगाचे पुरुषार्थाचे प्रतीक म्हणून बघावी तर योग्य. साधू संन्यासी यांना आदर दाखवण्याच्या आपल्या परंपरेत हे गुडघ्यावर बसून स्वीकार करणे असावे. त्यात त्यातला आदर, नम्रपणा आहे. बाकी काही सूचित नसावे. राजांनी सर्वप्रथम आउसाहेबांकडुन्म, त्यांच्या आजू बाजूच्या इतर वडील धार्यांकडून, इतर सहकार्यांकडूनही बरेच काही घेतले असावे. त्यात एका कारभार्यांना किंवा समर्थांना सर्व श्रेय देण्याचे कारण नाही. पण त्यांचे contribution सुद्धा महत्त्वाचे आहे एवढेच. शेवटी एक राजा, एक नेता स्वत:च्या कर्तृत्वाने राष्ट्र पुढे नेतो बाकी सर्व यथाशक्ती हातभार लावतात. मार्गदर्शन करणारे अनेक असतात. पण घडवणारा एखादाच बुद्धिमान आणि लढवय्या असतो. त्यामुळे फक्त एक शिवाजी महाराज, एखादे थोरले बाजीराव इतिहास घडवून जातात. त्यात त्या व्यक्तीच्या capabilities आणि थोडे नशीब जे त्यांच्या धैर्याला साथ देते याचाच वाटा मोठा असतो असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Fri, 07/23/2010 - 12:10

In reply to मैत्रजी आपले काही मुद्दे पटतात. by jaypal

Permalink

प्रकाटाआ

दोनदा आल्याने काढून टाकला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Fri, 07/23/2010 - 10:51

Permalink

ब्रिगेडवा

ब्रिगेडवाले हे फक्त चारीत्र्यहननचा धंदा करतात >>>>>>>> ब्रिगेडवाल्यांना तुम्ही नाहक अवास्तव महत्व देत आहात. आणि नकळत मोठे करत आहात.
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Fri, 07/23/2010 - 14:15

Permalink

सावरकर आणि शिवाजी

ह्या दोन्ही व्यक्तींबद्दल मला नितांत आदर आहे. सावरकरांची शिवाजीभक्ती प्रसिद्ध आहेच. आता काही लोकांना मिरच्या झोंबतील. पण बाबासाहेब पुरंदर्‍यांनी एका भाषणात म्हटले होते की १७ व्या शतकात जन्मलेले सावरकर म्हणजे शिवाजी महाराज. आणि १९ व्या शतकात जन्मलेले शिवाजी महाराज म्हणजे सावरकर! असो. मूळ लेखात असे म्हटले आहे की अंदमानच्या तुरंगातले सावरकरांचे स्मारक उखडून टाकले आणि स्वातंत्र्यवीरांच्या नावाने गरळ ओकले गेले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जोरदार निषेध केला मग तसा लेनचा का नाही केला? उत्तर १. सावरकर स्मारक नष्ट करणे, त्यांच्याविरुद्ध गरळ ओकणे वगैरे कृत्ये त्यांना हीन लेखणे ह्या एकमेव उद्देशाने केली होती. लेनच्या पुस्तकाचा मूळ हेतू हा शिवबांचे जन्मदाते कोण याविषयी काही हीन सांगावे हा वाटला नाही. त्या पुस्तकाचा अत्यंत छोटा भाग त्याविषयी बोलतो आणि तेही सांगोवांगी, असे म्हटले जाते वगैरे. तेव्हा दोन्हींची तुलना होत नाही. २. इतका निषेध होऊनही सावरकरांचे स्मारक हटवले गेले ते गेलेच. ३. फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट ह्या पुस्तकात सावरकर व नथुराम गोडसे ह्यांचे गे संबंध होते असा "शोध" लावला आहे. ही ह्या देशभक्तावर घाणेरडी टीका आहे. परंतु ह्या पुस्तकावर बंदी नाही. ४. स्वातंत्र्य मिळून ४०-५० वर्षे होईपर्यंत ह्या स्वातंत्र्यवीराचे पोस्टाचे तिकिट निघू शकले नव्हते. तेव्हा सावरकराशी ह्या प्रकरणाची तुलना होत नाही. मूळ लेखकाला सावरकर प्रकरणाशी तुलना करून ह्या विषयाला एक जातीय पैलू द्यायचा होता. खरे तर सलमान रश्दीच्या पुस्तकावरील बंदीशी तुलना करणे जास्त योग्य आहे. दोन्ही पुस्तके आहेत. दोन्हीविरुद्ध कुठल्यातरी गटाच्या तीव्र भावना आहेत. मात्र रश्दीच्या पुस्तकावर बिनबोभाट बंदी घातली गेली. लेनच्या पुस्तकावर मात्र उठवली गेली. हा साक्षात दुटप्पीपणा आहे. पण रश्दीच्या प्रकरणात ती "मजा" नाही. नेहमीच्या गटावर तोंडसुख घेण्यात जी गंमत आहे ती सॅटानिक व्हर्सेस मधे नाही. म्हणून मग सावरकर. दुसरे असे की दादोजी कोंडदेव हे गुरु होते हे सिद्ध कसे करणार? त्यांची काही शाळा नव्हती जिथे महाराजांचे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सापडेल. एक ज्येष्ठ, सचोटीने काम करणारा कारभारी एवढेच ते असले तरी त्या निमित्ताने महाराजांचा त्यांच्याशी संपर्क येऊन त्यातून ते काहीतरी शिकले असणे सहज शक्य आहे. हे स्वीकारल्यामुळे महाराजांचे कर्तृत्व कसे काय कमी होते? मला तरी ह्यात काही गैर वाटत नाही. ब्रिगेड वगैरे मंडळींनी ह्या थोर व्यक्तीला एका जातीत बंदिस्त करायचा घाट घातला आहे. देव करो आणि त्यांचा इस्कोट होऊ दे.
  • Log in or register to post comments

Submitted by अशोक पतिल on Sat, 07/24/2010 - 18:15

Permalink

आपले आराध्य !!!!!

लहानपणी इतिहास शिकलो , रामदास / ज्ञानेश्वर , शिवाजी महाराज, पेशवे बाजीराव, व अन्य व्यक्तीरेखा ह्र्दयात अश्या कही ठ्सल्यात की कोणी कितीही सशोधन करो, त्या प्रतिमा कधीही पुसता येणार नाहित. कोणी कितीही सशोधन करो या काहिही करो , आपण सर्व मराटी जनाचे हे कर्तव्य हे आहे कि महाराष्ट्र धर्माचे आराध्य विषयी कायम श्रधा असु द्यावी. आपली जातीविषयी अभिमान असु द्यावा परन्तु आपल्या आराध्या विषयी जातपात नसावी.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sun, 07/25/2010 - 11:28

Permalink

पुन्हा एकदा !!

मित्रा आम्हाघरिधना, लेनच्या पुस्तकावर बंदी नकोच यायला. अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरेशी याचा काहि संबंध नाहि. या पुस्तकावर बंदी आलि असती तर आपण एक नामी संधी वाया घालवली असती. हे तथाकथित विद्वान (खास करुन हे फिरंगी) लेखणीच्या वापर फार काळजीपूर्वक करतात. त्या लेखणीनामक शस्त्राची किंमत त्यांना ठाऊक आहे. आणि त्यांचा संपूर्ण बिमोड करायचा असेल तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे. अन्यथा आपण आपल्याच राज्यात तोडफोड करु आणि ते लोक परत असं वेडंवाकडं लिहायला मोकळे. मूळात या लेन प्रकरणी शिवप्रेमींनी लेखणीनेच रान माजवयला हवे. स्त्री चारित्र्य -> त्यातुन स्त्रीयांना मिळणारे आत्मबल -> या आत्मबलाने शिवाजीवर संस्कार करणारि जिजाऊ -> या संस्काराच्या शिदोरीवर राज्य स्थापन करणारा शिवाजी -> यातलं काहिच समजायच्या लायकिची नसलेली लेन ची दिवाळखोरीत निघालेली बुद्धी, अशी हि साखळी जर आपण व्यवस्थीत पब्लीश (मराठी शब्द ??) करु शकलो तर या गोर्‍या माकडांना पुन्हा असं काहि लिहायची छाती होणार नाहि. आणि हेच त्यांच्या गलीच्छ विचारसरणीला योग्य उत्तर असेल. समस्त शिवप्रेमींनि या संधीचा लाभ घ्यावा. मराठी/मराठा/हिंदु/भारतीय आम्हाघरीधना, इतीहासात डोकाउन बघीतल्यास आपण आपापसात भांडुन आपलीच लावलेली वाट, आणि शिवाजीसारख्या फार कमि लोकांनी दाखवलेली ऐक्याची वाट, या दोनच वाटा दिसतात. यातल्या कुठल्या वाटेवरुन चालायचं हिच खरी कसोटी. भवीष्यात तु आणि मी "आम्ही" बनुन खांद्याला खांदा लाउन चालतो, कि एकमेकांचे हाथ तोडतो यावरच स्वर्गस्थ शिवप्रभुंच्या आत्म्याचि शांती अवलंबुन आहे. (शिवप्रभुंच्या आत्मशांतीचा १००% इच्छुक पण ७५% आश्वस्त) अर्धवटराव -रेडि टु थिंक
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 07/28/2010 - 22:29

Permalink

ब्राह्मणाच्या नावाने खडे

ब्राह्मणाच्या नावाने खडे फोडून तुमचं काय भलं होणार आहे? मी एक आठवले नावाच्या सल्लागाराला काही सल्ल्यांसाठी भेटले होते...आता मी काही त्यांची जात बित पहिली नाही पण भेत्ल्याबरोबर त्यांनी " आमची अमुक तमुक सुद्धा एका बडव्यान्कडेच दिली आहे ", "माझी मुलगी अमुक अमुक संस्थेत आहे" वगैरे चालू केले...याचा काय संबंध होता..पण आम्ही पण ब्राह्मनासार्खेच हुशार आहोत हे दाखवायची संधी काही गैरब्राह्मण सोडताना दिसत नाहीत...अजूनही...तुम्हीच स्वतःला कमी लेखत आहात...मग उगाच बोंबाबोंब करायची ब्राह्मणांनी अमुक अन तमुक... आणि आता हे संभाजी ब्रिगेड प्रकरण...
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com