Skip to main content

लपंडाव

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी बुधवार, 21/07/2010 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
कायम सुरु असतो आठवणींचा लपंडाव भावनांचा, शब्दांचा, अन नात्यांचा लपंडाव कधी नाती माझ्यापासून लपतात तर कधी मी त्यांच्यापासून ... कधी शब्द माझ्यापासून लपतात तर कधी मी त्यांच्यापासून ... इच्छांचेही तेच , नात्यांचेही तेच प्रेमाचेही तेच अन आप्तांचेही तेच ... माझे मन, अन माझ्या सावल्या माझे विचार, अन माझे प्रतिबिंब ह्यांनी मांडलेला लपाछपिचा डाव आयुष्य माझे म्हणजे एक लपंडाव binarybandya™
लेखनविषय:

वाचने 1828
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

माझे मन, अन माझ्या सावल्या माझे विचार, अन माझे प्रतिबिंब ह्यांनी मांडलेला लपाछपिचा डाव आयुष्य माझे म्हणजे एक लपंडाव क्या बात है !! आवडली कविता !! :)