Skip to main content

दुध आवडते का? कशाबरोबर ?

लेखक कच्चा पापड पक्का पापड यांनी सोमवार, 19/07/2010 16:05 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2663
प्रतिक्रिया 60

प्रतिक्रिया

धारोष्ण दूध नुसतेच आवडते. काहीही न घालता. पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

पुप्याशी सहमत आहे! शिवाय दुधात दही, तूप, मध आणि साखर घालून केलेलं पंचामृत म्हणजे अगदी स्वर्गसुख! त्यामुळे शेवटच्या पर्यायाला मत दिले आहे! :)

In reply to by मेघवेडा

सहमत !! पंचामृत प्रचंड आवडते!! शिवाय चहा,कॉफी,बोर्नव्हिटा, मसाला दूध, सिरिअल्स, दूध-साखर पोळी इत्यादीत सुद्धा दूध आवडते. रादर, दूधच खूप आवडते! :)

मसाला दूध.शिवाय लाइट टी म्हणजेच जास्त दूध घातलेला चहा. ------- बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल,लॉस एंजेलिस ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालापाहिजे.

पाणी घातलेले दुध अजिबात आवडत नाही. बर्‍याच लोकांना खर्‍या दुधाची चव माहित नसते त्यामुळे त्यांना आवडत नाही. पुप्याशी सहमत. धारोष्ण दुधाची चव अप्रतिम असते. पण असे दुध लहान मुलांना देऊ नये. पचायला जड असते. गायीचे दुध चांगले असते असे आयुर्वेदीकवाले म्हणतात. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by विनायक प्रभू

मास्तरांना काय आठवले असेल याची कल्पना आली. पण आज मास्तर सर्वच धाग्यांवर लोळुन हसताहेत. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

तुमच्या कल्पना शक्तीला मी काय करणार हो ममो. माझ्या बाबतीत म्हणाल तर घसा स्वच्छ ठेवायला रोज हळद घालुन दुध पितो. स्मायली बद्दल म्हणाल तर धागा उच्च आहे ह्याची दाद.

In reply to by विनायक प्रभू

मास्तरांचे दादांसारखे झालेय.... त्यानी लोळण्याऐवजी हम्म असे म्हंटले असते तरी बरेच जण लोळले असते. अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे http://www.sdphadnis.com/sdphadnis_img_002.gif" width="202" height="100" al

In reply to by विनायक प्रभू

मास्तरांना 'जे' दूध आवडते तेच. :D त्याशिवाय कमला नेहरु पार्क, एरंडवणा येथे मिळणारा 'बासुंदीयुक्त' चहा! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

दुध + बाजरीची भाकरी याच कॉम्बिनेशनवर वाढलो. भाजी वगैरे अशा गोष्टी कधी आवडल्या नाहीत. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अन्यला मत दिलं आहे. सर्व प्रकारचे मिल्क्शेक. (स्ट्रॉबेरी, मँगो) आदि. आवडतात. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मला पहिला पर्याय सोडून सगळेच पर्याय निवडवेसे वाटले. पण जमलं नाही. तशी प्रोव्हिजन पायजेल.

दूध व साखर ला मत दिले आहे. नैवेद्यासाठी ठेवलेल्या दुधाची चव वेगळी आणि छान लागते. रेवती

In reply to by चतुरंग

ऐसेच बोल्ता... नैवेद्याचं दूध म्हणजे क्या कहने!!

आपल्याला तर बुवा खरवस आवडतो. पण असा पाणी मिसळलेल्या दुधासारखा स्वस्त धागा काढण्याइतकं मिपा गरीब कशामुळे झालं असेल?

१. स्ट्रॉबेरी, बनाना, चॉकलेट, मँगो मिल्कशेक २. फक्त दूध (काहीही न घालता) ३. पुरणपोळी - दूध ४. पंचामृत ५. मसाला दूध दूध (अमेरिकेत मिळणारे) आवडते कारण त्याला उग्र वास नसतो.

In reply to by प्रियाली

तसा तो भारतातल्या दूधालाही नसतो. दुसर्‍या कुठल्या ठिकाणाबद्दल बोलत असाल तर माहिती नाही.

In reply to by Pain

भारतातल्या दुधाला वास असतो. आपल्याला येत नसेल. मला येत असेल. एवढेच काय, भारतातील प्रत्येक गोष्टीला वास असतो असे मला वाटते. लसूण, आले, कांदा, मासे, पालेभाजी वगैरे वगैरे. याचा अर्थ भारतातील गोष्टींवर टिका करणे आहे असा नाही आणि नाही असा नाही. बर्‍याचदा वास नसल्याने अमेरिकेत काय खातो आणि का खातो हे देखील मला कळत नाही. वैताग येतो पण उग्र दर्प कमी असेल तर बरेही वाटते.

In reply to by विनायक प्रभू

बै मी माझ्या भारतातील लिखाणाबद्द्ल बोलत होतो.

In reply to by प्रियाली

लसूण, आले, कांदा, मासे, पालेभाजी यांना तर वास असतोच. माशांचा वास तर दूरवर येतो. पण दुधाचा वास यांच्याइतका जाणवण्यासारखा मला किंवा ओळखीच्या कोणालाही आला नाही. आहे असा नाही आणि नाही असा नाही. :)) :)) म्हणजे काय ?

In reply to by Pain

ज्यांना दूध आवडत नाही त्यांना विचारून बघा ते नक्कीच सांगतील की दुधाला वास येतो. असो. वरही या चर्चेत एक प्रतिसाद आहेच. आहे असा नाही आणि नाही असा नाही. ) ) म्हणजे काय ? म्हणजे आहे असा नाही आणि नाही असा नाही. :))

In reply to by प्रियाली

याचा अर्थ भारतातील गोष्टींवर टिका करणे आहे असा नाही आणि नाही असा नाही. बरोबर आहे. भारतातल्या लोकांना किती घामट वास येतो हे परदेशात गेल्यावर कळते. त्यात टिका करण्यासारखे काहीच नाही. अँटी पर्स्पीरंट वापरणे भारतात माहितीच नसते.

In reply to by आमोद शिंदे

त्यात टिका करण्यासारखे काहीच नाही. (वस्तुस्थिती आहे) तुम्ही हा जो अर्थ सांगितलेला आहे ( आणि मलाही तोच वाटला), त्यासाठी "याचा अर्थ भारतातील गोष्टींवर टिका करणे आहे असा नाही" इतकेच पुरेसे आहे. पुढे "नाही असा नाही." हे जे लिहिलय त्यामुळे "आहे" असा अर्थ होतो आणि तो तर अभिप्रेत नाही! मग का लिहिलय अस माझा प्रश्न आहे.

In reply to by Pain

पुढे "नाही असा नाही." हे जे लिहिलय त्यामुळे "आहे" असा अर्थ होतो आणि तो तर अभिप्रेत नाही! मग का लिहिलय अस माझा प्रश्न आहे.
कारण उद्देश नसला तरी टिका होते आहेच त्यामुळे नाही असा नाही. :)

In reply to by प्रियाली

दूध (अमेरिकेत मिळणारे) आवडते कारण त्याला उग्र वास नसतो.
सहमत आहे. अमेरिकतले दूध खोक्यातून डायरेक्ट पिऊ शकतो.

In reply to by आमोद शिंदे

सहमत आहे. अमेरिकतले दूध खोक्यातून डायरेक्ट पिऊ शकतो.
भारतात डायरेक्ट कंटेनरमधुन पियाले तरी चालते. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

आमास ठाव हाय आमी खर लिवल तरी आणी फटु लावाला तरीबी आमचा आयडी कायमचा बॅन करत्याल. तवा आमी आपलं गपगुमानच बसतो बघा. :$ :$ :$ *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

खरवस कच्चं दूध ( गरम / गरम करून गार केलेलं अजिबात आवडत नाही ) दूध + मध पुष्करिणी

दूध फक्त चहातून आवडते. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

आणि विरजण घालायला ? :) पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

अर्थातच दही ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

नुसतेच दूध पितो पण वर दिलेल्या बहुतांश सर्व गोष्टी आवडतात. सध्याचे वाईट दिवस जाउन पुर्वीचे चांगले दिवस येतील अशी आशा आहे.

१. दूध + नेसकॅफे (गोल्ड) + मध २. दूध + ब्रू + साखर ३. दूध + विरजण + काही तास ४. दूध + उष्णता + दुधाचा मसाला ५. दुधातले फॅट्स + व्हिस्की अदिती

In reply to by भाग्यश्री

पिऊन पहा, वेगळाच फ्लेवर येतो. पाण्यात नेसकॅफे घालून नावापुरतं दूध असलेली कॉफी पिणार असलीस तर मध आणखी मस्त लागतं. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नेसकॅफे माहित नाही पण नावापुरतं दूध असलेली काळी कॉफी विथ मध .. मस्त लागते :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

क्रीम आणि व्हिस्की?? कसे काय बरे?.....जर्रा नीट सान्ग ना...

फक्त आयरिश कॉफी आणि तत्सम प्रकार. =P~ ;) - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

In reply to by नाटक्या

कलुहा आणि वोडका दुधात घालून पिउन बघा..मस्त व्हाईट रशीयन बनते

In reply to by Pain

पण मला काथ्याकुटात आवडत नाही हो ;) (कौलातही आवडत नाहीच म्हणा. (: ) -Nile

दुध+चहा दुध + कॉफी दुध+ भात (भातावर सायी आली पाहिजे) अजुन एक प्रश्न शेळीचे दुध पिल्याने मुले चपळ आणि हुशार होतात का? आमच्या शेजारी त्याच्या मुलाना शेळीचे दुध विकत आणुन पाजतात.त्यानी मला हे कारण सांगितले. खरे आहे का? वेताळ

In reply to by वेताळ

तुमचे शेजारी गांधींचे भक्त असतील... तसेही म. गांधी होते हुशार आणि चपळ...:) पुष्करिणी

In reply to by वेताळ

नाही, ते पचायला हलके असते, आणि कदचित स्वस्तही*. गांधीजी शेळीचे दूध पीत असत असे कुठेसे वाचले आहे.

मला दुध आवडतं .. अगदी कसंही ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

O:) .....कसेहि..कहिहि घालुन्....केन्व्हाहि.... पन्चाम्रुत्.....प्रचन्ड्ड् आवडते.....

शेवटच्या पर्यायाला मत दिलेय... रसनाशाही गुलाब-थंड दुधात टाकुन ब्लेन्डर ने फिरवावे .... :P कोल्ड कॉफी.... नेसकॅफे... :X 8} (बदामशेक्,फालुदा,आईसक्रीम...) ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

साखरे बरोबर मिसळण्यासारखे कुठलेही फ्लेवर, कॉफी, रुह अफजाह वगैरे घालुन आवडते. सिजनप्रमाणे गार अथवा गरम. पंचामृतसुध्दा आवडते.नव्हे खूप आवडते.

सैपाक करताना जे दूध प्यायले जाते ते दूध प्यायला मला खू SSSSSSS प आवडेल. पण दुर्दैवाने अजून पिण्याची संधीच मिळाली नाही. जे दूध शाळेत जाणारी मुले पितात त्याबाबत विचाराल तर पर्याय चारला मत दिले आहे.