Skip to main content

पाउस आनि निसर्ग

लेखक अनिरुद्धशेटे यांनी मंगळवार, 20/07/2010 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
पाउस आणी निसर्ग पाउस हा नसतो फक्त आनंदाचा उरुस तर पाउस हा असतो आभाळाच्या लेकरांनी विश्वाच्या ओसरीत घातलेला धुडगुस पाउस म्हणजे आभाळाने धरणीला दिलेला असतो एक नजराणा आणी पाउस म्हणजे आकाशाचा धरतीला भेट्ण्याचा असतो एक खोटा बहाणा या जलदाच चैतन्य भेटत असत जेव्हा प्रितीत तेव्हा पाउस घेत असतो स्रुजनाला आपल्या गोड मिठीत तहान विसरुन मेघ जेव्हा जलधारा शिंपुन होतात अधु धरणी मात्र होते तेव्हा हिरवा शालु नेसलेली नववधु पावसाच या निसर्गाला काहिच नसत सांगण आणी निसर्गाच या पावसाकडुन काहीच नसत मागण कारण पाउसच असतो या निसर्गाच शुभ्र कोंद्ण आणी निसर्गच असतो या पावसाच हिरवं अंगण ..............अनिरुद्ध
लेखनविषय:

वाचने 1276
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

सध्या पुण्यात बिलकुल पाऊस पडत नसल्याने नो प्रतिक्रिया. :( पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.