टणत्कार (खुलाशासह )
किर्र किर्र रातकिड्यांचा आवाज चालु होता. गेल्या दोन दिवसांपासुन पावसाचा जोर कमी झाला म्हणुन पर्णकुटीच्या बाहेरच गवताची शय्या केली होती. तिच्यावर पडल्या पडल्या आभाळात नजर टाकता टाकता कधी डोळा लागला ते कळलंच नाही. गार हवेने आता जाग आली. मधुनच दोन चार चुकार ढग हळुच चालले आहेत. पुर्वेकडे चंद्रकोर दिसत आहे म्हणजे पहाट व्हायला आली असावी. कृष्ण पक्ष चालु आहे. बोलता बोलता चार महीने झाले ह्या पर्णकुटीत राहुन. येवढा पावसाळा संपला की आपण कामाला लागु हे आश्वासन मिळाले अन त्या आश्वासनावर मनातले दुःख कसं बसं सावरुन धरलं आहे.
पण असं तर नाही ना की माझे काम तो विसरुन गेला असेल? अनेक दिवसांच्या रानावनातल्या खडतर आयुष्यानंतर मिळालेले विलासी सुख त्याला कर्तव्याचा विसर तर देत नसेल? राजकारणातला एक मोहरा म्हणुन मला पुढे करुन कार्यभाग साधुन मला दुर्लक्षाने अपमानित तर करत नसेल? काळ सर्व दुःखांवर औषध आहे, हे जाणुन मुद्दाम कालक्रमणा होउ देउन माझ्याचकडुन जाउ दे आता असे तर त्याला ऐकायचे नसेल?
खरोखर अनोळखी प्रदेशात अनाहुतासारखा असलेला मी एकटा काही करु शकत नाही. पण त्याला मदत तर मी एकट्यानेच केली. कोण होते मदतीला ? मीच मदत केली. मग हे काम मी एकटा का नाही करु शकत. फक्त कोणत्या दिशेला जायचे ते समजले पाहिजे. एकदा ती दिशा समजली की मी नक्की एकटाच सर्व काम करेल? पण सर्व पृथ्वी तर मी एकटा शोधुन काढु शकत नाही.
विचारांच्या आवर्तात सापडलं की वेळ कसा निघुन जातो ते समजतच नाही. आज काही करुन निर्णय घेवुन टाकु. तो मदत करत असेल तर ठिक नाहीतर आपण पुढे चालायला लागायचं.
असा विचार करुन रामाने पलिकडे शांत झोपलेल्या लक्ष्मणाकडे एक नजर टाकली. हलकेच उठुन धनुष्य उचलले. पुन्हा एकदा प्रत्यंचा ढिली करुन ताणली. सरळ रेषेत धनुष्य धरुन दोरी खांद्यापर्यंत ओढुन एक बाण दरीच्या दिशेने सोडला. सपकन झालेल्या आवाजाने लक्ष्मण जागा होवुन पाहु लागला. जवळ जाउन रामाने बाण सोडलेल्या दिशेने पहायला लागला.
रामाचा चेहरा संतापाने फुलला होता. कपाळावरची शीर ताड ताड उडत होती. दरीमधे असलेल्या सुग्रीवाच्या निवासस्थानाकडे पाहुन राम म्हणाला..लक्ष्मणा ! जा !! त्या सुग्रीवाला विचार... तुला कर्तव्याचा विसर तर पडला नाही? सुंदर ललनांच्या बाहुपाशामधे गर्क होवुन मित्रांना विसरुन तर गेला नाही? कि राज्यपद मिळाल्यावर मित्रद्रोहाचे पातक कसेही धुवुन काढता येईल असे तर तुला वाटत नाही? विसरु नकोस ज्याच्या भयाने तु रानावनात फिरत होतास तो वाली या रामाच्या एका बाणाने मेला ! जा लक्ष्मणा सांग...सांग त्या सुग्रीवाला... वाली ज्या मार्गाने गेला तो मार्ग अजुनही बंद झालेला नाही... ! आणि पुन्हा एकदा रामाने धनुष्याचा टणत्कार केला.
खुलासा - पावसाळा संपल्यावर सीताशोध घेउ असे सुग्रीवाने वालीला मारल्यावर रामाला आश्वासन दिले होते. पावसाळा संपला पण अजुन सुग्रीवाकडुन काही हालचाल नाही हे पाहुन राम बेचैन होउन लक्ष्मणाला सुग्रीवाकडे पाठवतो असा प्रसंग आहे. तेवढेच फक्त कथेत घेतले आहे. मुद्दाम मागचा पुढचा संदर्भ दिला नाही, म्हटले बघु.. कसे जमते आहे ते. काही जणांनी आंतरजालाशी संदर्भ लावला. काही जणांनी अजुन कशाशी लावला, ते व्यनीतुन कळवले. असो. धन्यवाद.
प्रतिक्रिया
टणत्कार
वाली वध
राम,
(विषय दिलेला नाही)
छान कथा ..
वाटाण्याच
बाकी
आवडेश. व्यर
शैली छान.
नानास्टाई
नाना लै
तो वाली या
ओह्ह
|| जय श्रीराम ||
माझा ज्ञान
वर, शाप हे
|| रघुवीर समर्थ ||
बालीला एक
वालीला
छान!!
छान
मला ऐकु आलेले टणत्कार
हा हा हा.
भारी
लै भारी ...
नान्याचा वाल्मिकी झाला कि काय?
श्री नानारामायण
अरेरे
नान्याला
धीरगंभीर