Skip to main content

पालेभाजी - अंबाडी

लेखक जागु यांनी शनिवार, 17/07/2010 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: १ जुडी अंबाडीची पाने धुवुन चिरुन पाव वाटी तांदळाची कणी पाव वाटी तुरडाळ १ गड्डा लसुण ठेचुन ३-४ लाल मिरच्या राई, जिर, हिंग, हळद मिरचीपुड १ चमचा चविपुरते मिठ थोडा गुळ तेल पाककृती: कुकरमध्ये तेलावर लसणाची फोडणी देउन त्यात लाल मिरची, राई, जिर, हिंग, हळद घालुन त्यावर कणी, तुरडाळ व चिरलेली भाजी घालावी मग गरजेपेक्षा थोडे जास्त पाणी घालावे. त्यात मिरची पुड, मिठ, गुळ घालावा. आणि कुकरला २ ते ३ शिट्ट्या द्यायच्या. झाली तयार अंबाडीची आमटी आंबोळी यांच्या मागणीवरुन.

वाचने 6822
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

माझी आवडती भाजी! भाकरीबरोबर भन्नाट लागते! जागुतै, तुझी भाजी करण्याची पद्धत वेगळी आणि आमटीच्या अंगाने जाणारी दिसते. मला ती नविनच समजली. मी जी करते ती साधारण गोळा भाजीच्या जवळ जाणारी आहे. भाजी उकडून घेतल्यावर अतोनात आंबट असेल तर थोडी पिळून घावी लागते. थोडे बेसन लावून मग शिजलेली कणी घालते बाकी कृती सेम! पानात वाढून घेतल्यावर त्यावर जास्तीची लसणीची फोडणी करून घालते. एवढ्यात ही भाजी मिळाली तर बघते. करायलाच हवी! :) रेवती

In reply to by रेवती

रेवतीताई तुम्ही पण तुमची कृती इथेच डिटेलमध्ये लिहा म्हणजे दोन्ही प्रकारे भाजी करून बघता येईल. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by रेवती

रेवतीताई म्हणतात तशी बेसन, गुळ असलेली अंबाडीची गोळा भाजी माहीत आहे. पण ही आमटी पण छान पौष्टीक वाटते आहे. धन्यु!

गावी गेल्यावर माझी आजी ही भाजी करून खाऊ घालायची.. एकच फरक होता, लाल मिरच्यांऐवजी ती हिरव्या मिरच्या टाकायची.. तांदळाच्या भाकरीबरोबर्र एकदम सरस लागते ही भाजी. मी लसूण खायला टाळाटाळ करायचो तेव्हा आजी म्हणायची.. ''खा बावा, लसनीने हाडं मजबूत होतात..'' ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/

रेवती खरच तुमची रेसिपीही टाका. सहज, शिल्पा धन्यवाद. प्रभो बर झाल तुम्ही लिहीलत की तुमची आई पण अशिच बनवते. नाहीतर म्हटल मी काय वेगळच केल की काय. कारण आमच्याकडे मी ही भाजी पहिलांदाच बनवली. आशिष लसूण ह्या आमटीत, लसणाची चटणी छान लागते.

तुम्ही सांगीतलेली अंबाडीची भाजी पाहिली आहे पण कधी चाखली नाही. आमच्या घरा समोर एक झाड होतं, सधारण आवळ्याच्या झाडा एवढ. त्याला हिरव्या रंगाची, लहान लिंबाच्या आकाराची, काहीशी लांबट फळं यायची. त्याला पण अंबाडिचं म्हणायचे लोक. ती फळं खुप आंबट असायची. आई त्यांचे लोणचे करायची आणि खारात टाकायची.

In reply to by गणपा

प्रभू मास्तरांना मस्का मारणे. ते थोडासा मस्का घरी नेतील. नंतर काही दिवसांनी सँक्शन आलं की आंबाड्याची भाजी ,सोबत उकड काढून केलेली तांदळाची भाकरी . झालंच तर बटाट्याचे स्वांग . डाळीचे तोंय आणि भात. मग पोटात विठ्ठल विठ्ठल.

In reply to by रामदास

आठवलं हो आठवलं! ग्रेटच चव आहे काकूंच्या हाताला! मी मुंबईत रहात असते तर त्यांच्याकडेच स्वयंपाक शिकण्यासाठी गेले असते. रेवती

गणपा हे आंबाडे आहेत. हे पिकल्यावरही छान लागतात. ह्याचे लोणचे करतात. सध्या बाजारत भरपुर येत आहेत. मलाही घालायचे आहेत लोणचे.

आणि शिळी ज्वारीची भाकरी + कांदा =P~ =P~ =P~ *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

मला आज अंबाडी मिळालिये. आज भाजी करेन. पण मी तुरडाळ न घालता तान्दळाच्या कण्या काढुन करणार आहे. लाल मिरच्या व लसणाची फोडणी देइन वरुन.. भाकरी नाहि जमत ... खबुसाबरोबर खाइन. वरिल हिरवी फळे भोकरं आहेत का? चुचु