Skip to main content

वारी

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 17/07/2010 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
आले माहेरी माहेरी माझ्या विठाईच्या दारी फारा दिसांनी ग झाली माझी पंढरीची वारी वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना खुल्या आकाशी चांदणं रात चंद्राने भिजली नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी काही भेटल्या ग सया सया आठ-आठवाच्या वारी सरली गुजात जुन्या हास-आसवाच्या नवे सौंगडी भेटले, जिवाभावाचे मैतर नव्या आठवांची घेते घेते भरून घागर आता पाय स्पर्शू किती घेऊ आशीर्वाद किती किती मातीचे ओघळ ओघळवू मी या हाती माझी पंढरीची वाट वाट सूर्याची पूर्वीची आता पश्चिमेची ओढ ओढ लागली प्रियाची गेलं माहेर माहेर झाला वळसा वळसा चंद्रभागेच्या पाण्यात माझा बुडला कळसा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3760
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

कविता आवडली. काही भेटल्या ग सया सया आठ-आठवाच्या वारी सरली गुजात जुन्या हास-आसवाच्या - हे कडवं विशेषकरुन आवडलं.

वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना हे आवडलं.

मस्त आहे >>>आता पश्चिमेची ओढ ओढ लागली प्रियाची हे वाचून डोळे पाणावले.कंठ दाटून आला. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

मस्तच, छान काव्य! (म्हटलं तर पंढरीची वारी म्हटलं तर भारतवारीनंतर मनात उठणार काहूर असं दोन्ही साधलं आहेस) चतुरंग

In reply to by चतुरंग

म्हटलं तर पंढरीची वारी म्हटलं तर भारतवारीनंतर मनात उठणार काहूर असं दोन्ही साधलं आहेस
छान! आळश्यांचा राजा

In reply to by चतुरंग

काही भेटल्या ग सया सया आठ-आठवाच्या वारी सरली गुजात जुन्या हास-आसवाच्या संदर्भः शिवाजी-अफझलखान भेट ? प्राजेश वारीघडवी ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पंढरीची वारी एकदम मस्तच...! असेच येत जा दिंडीला. :) -दिलीप बिरुटे

नवे सौंगडी भेटले, जिवाभावाचे मैतर नव्या आठवांची घेते घेते भरून घागर
मस्त! _________________ बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

अगदी ... गुर्जी, तुमची कविता आवडलीच! अदिती

मस्त!!!

वा !! छान कविता.. आवडली. -- लिखाळ. देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली.

चांगली जमलीय... अवांतर : हम्म्म.. आता पल्याड जायची वेळ जवळ आलेली दिसते...

वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना खुल्या आकाशी चांदणं रात चंद्राने भिजली नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी खूपच छान .. सुरेख आहे वारी !

छान!!

हम्म छान कविता. वारी संपताना मेंदूतला केमिकल लोचा बरोब्बर उतरला आहे कवितेतून. पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

कविता आवडली . "वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना खुल्या आकाशी चांदणं रात चंद्राने भिजली नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी" =D> =D> =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/