✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गोड गोड माणूस .

ह
हेमंत रायकर यांनी
गुरुवार, 07/15/2010 - 19:42  ·  लेख
लेख
नमस्कार .मी हेमंत रायकर. व्यवसायानी प्रकाशक. आमचा हा व्यवसाय जयहिंद प्रकाशन -रायकर ब्रदर्स या नावानी प्रसिध्द आहे. आमचे वडील (कै) ग.का. रायकर यांनी हा व्यवसाय सुरु केला आणि नावारुपाला आणला. तो काळ मराठी साहीत्याचा -मराठी मासिकांचा -दिवाळी अंकांचा सुवर्णकाळ होता. श्री दीपलक्ष्मी आधी मासिक होते. सध्या श्री दीपलक्ष्मी हा दिवाळी अंक नियमीत स्वरुपात येतो. या व्यवसायाच्या निमीत्ताने माझ्याकडे उत्तमोत्तम साहीत्याचा खजीना उपलब्ध आहे. या खजीन्यातून काही निवडक लेख मिसळपावच्या वाचकांना द्यायचा मनसुबा आहे*. या मालीकेतला हा पहीला लेख जयवंत दळवींचा आहे. ठणठणपाळाच्या खुसखुशीत लेखनाचा उत्तम नमुना . श्रीदीपलक्ष्मीचे एक खास वैशिष्ठ्य म्हणजे रघुवीर मूळगावकरांची चित्रे. पुढल्या भागात त्यातली काही चित्रे तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. *माझे मित्र आणि मिपा सदस्य श्री रामदास यांचे विशेष आभार.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3336 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

हा अंक

यशोधरा
गुरुवार, 07/15/2010 - 20:45 नवीन
हा अंक विकत मिळेल का?
  • Log in or register to post comments

इथे मिळेल -

पांथस्थ
गुरुवार, 07/15/2010 - 22:17 नवीन
इथे मिळेल - http://www.mimarathi.net/node/2898 - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हाहाहाहा

श्रावण मोडक
गुरुवार, 07/15/2010 - 22:36 नवीन
टिपिकल दळवी लेखन!!!
  • Log in or register to post comments

मस्त..

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/16/2010 - 14:50 नवीन
मस्त.. दळवींची शैली मस्तच. आणि ग.का. ही मोठा माणूस. रायकर, तुमच्याकडे अक्षरशः खजिना असेल ना असल्या गोष्टींचा, आठवणींचा, फोटोंचा? येऊ द्या की राव मग सगळं? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

लेख आवडला...

विसुनाना
Fri, 07/16/2010 - 15:43 नवीन
जयवंत दळवींचा हा लेख इथे दिल्याबद्दल रायकरांचे (आणि रामदासांचे) आभार.
  • Log in or register to post comments

अनेक आभार

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/16/2010 - 16:00 नवीन
अनेक आभार ... रायकर आणि रामदासकाकांचेही! (गद्य विडंबनात आपणच आद्य असल्याची खरड का प्रतिसाद आंतरजालावरच वाचल्याची आठवण झाली.) अदिती
  • Log in or register to post comments

धन्यवाद

गणपा
Fri, 07/16/2010 - 16:10 नवीन
धन्यवाद रायकर. मस्तच उपक्रम राबवताय तुम्ही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत :)
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Fri, 07/16/2010 - 16:14 नवीन
असेच म्हणतो. अवांतर : हा लेख "परममित्र" मधेही समाविष्ट आहे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

असे वाटते

प्रदीप
Fri, 07/16/2010 - 16:43 नवीन
तिथे हा वाचल्यासारखा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

वा! वा!

विंजिनेर
Fri, 07/16/2010 - 16:25 नवीन
वा! वा! छान. अजून एक मला आवडलेली गोष्ट म्हणजे, तुम्ही लेख टंकित स्वरूपात न टाकता छायाचित्र रूपात फ्लिकर वर चढवून टाकता आहात. उत्तम (पूर्व-प्रताधिकार असलेल्या)लेखाचा आनंद तर घेता येतो पण जाल-चोरांना यामुळे थोडा तरी आळा बसावा!
  • Log in or register to post comments

अरे वा..

स्वाती दिनेश
Mon, 07/19/2010 - 19:23 नवीन
मिपावर स्वागत आणि उपक्रम आवडला. तुमच्या पोतडीत अनेक दुर्मिळ ,अनवट अनुभव असतील.. आम्हाला वाचायला आवडतील. स्वाती
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा