काही राहीलेले
काही राहीलेले....span>
ते सर्व राहीले मागे
जे काट्यात उमलले होते...
फक्त पाकळ्या हातात
गंध श्वासात राहीले होते...
मी शोधल्यात ज्या मातीत
काही ओळखीच्या पाऊलखुणा
त्या मातीत जणू आता
आभास राहीले होते.....
मी सावरू न शकलो
तू निघून गेल्यावर...
त्या सावलीच्या मागे
काही आघात राहीले होते......
बरेच काही सांगायचे होते
तुला निघुन जाण्याआधी
कविता पुर्ण झाली.
तरी शब्द राहिले होते
;">-पंचम
मी
भन्नाट पंचमदा....
आज काय
खल्लास ! ! ! Ultimate ! ! !
मी