Skip to main content

गे कविते

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 05/07/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
गे कविते आज थोडा, दर्द ओला सजवून ये , मैफिलीचा रंग गहिरा, गर्द डोळां भिजवून ये .. १ बोलणे चाले सदाचे, आपुलाले मनी ओठी , चार गोष्टी अंतरीच्या, या जगा सुचवून ये.. २ कोण कैसे मज हसावे ? गे कविते पायी तुझ्या, वेड घेऊन सर्व जगती, सत्य हे दावून ये .. ३ -- सागर लहरी २२.२.२०१०
लेखनविषय:

वाचने 1967
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by टारझन

=)) =)) वेगळ्या लहरी उठल्याचे वाचून Give Some sunshine या गाण्याची आठवण झाली. -झप्पी राहीली हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मलाही पहिल्यांदा तसेच वाटले.. कविता वाचायला उधडली आणि बोलणे चाले सदाचे, आपुलाले मनी ओठी , यावर नजर पडली, त्यामुळे खरोखर "वेगळी" कविता असावी असे वाटले. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

>>>कविता वाचायला उधडली वाचायला तुम्हाला कविता 'उधडावी' का लागते ब्वा? चला पटकन शिवुन टाका बरे! परा-टारा सारखे लोक नाहितर बघायला धावतील लगेच किषोर कि बॉबी ते.

In reply to by टारझन

शिर्षक वाचुन 'आदमी हु आदमीसे प्यार करता हु' अशा टायपातली कविता असेल असे वाटले होते. त्याच बरोबरीने कवितेला 'लेस' च्या ऐवजी 'गे' असे का संबोधले असावे हा प्रश्न पडला आहेच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

हा हा हा .. मला तर कविता सुचत होती "पप्पी पहिली" बे पर्‍या, पुर्वी तो किषोर असुन हल्ली कविता म्हणुन वावरण्याची शक्यता णाकारता येत नाही :) =)) =)) =))

गे कविते हे शीर्षक वाचून घाबरतघाबरतच धागा उघडला. मिपा जरा बोल्ड झाले की काय असे काहीसे वाटून गेले.

कविता खरंच छान आहे..
कोण कैसे मज हसावे ? गे कविते पायी तुझ्या, वेड घेऊन सर्व जगती, सत्य हे दावून ये .. ३
वा!! ====================== कोकणी फणस जब हम जवां हों गे जाने कहां हों गे

कवीतेच्या शिर्षकावर इतक्या उड्या का पडल्या हे (सालस.. निरागस.. सज्जन.. असल्यामुळे ) मला आधी कळेचिना ! आणी नंतर एकदम ट्युब पेटली ! (मी "त्या" तला नाही हो !) आणी आता विडंबनाचा दंडुका कधी बसणार असे वाटले. >:) असो. रामदास जी , आशिष जी कौतुका बद्दल धन्यवाद आपला नम्र सागरलहरी