नमस्कार मंडळी >:) ,
अस्मादिकांना ह्या विभागात बघून दचकू नका :O ... व्यावसायिक स्पर्धेमुळे आता आम्ही मिपाच्या सर्व विभागात शिरकाव करायचे ठरवले आहे.. :B
पाककृतीच लिहिणार आहे .. :$ आपापल्या स्वयंपाकघरात तुम्ही तिचे स्वतःच्या जबाबदारीवर विडंबन करू शकता.. :D
गेले काही वर्षे भारता बाहेर राहावे लागते आहे आणि प्राण्यांची प्रेते खात नसल्यामुळे नाईलाजाने कार्यालयातील मुकादमाचे काम संपले की आचार्याचा अवतार घ्यावा लागतो..
थोडी घरी स्वयंपाकघरात केलेली खुडबूड, अनेक दूरदर्शन वाहिन्यांवर पाहिलेले स्वयंपाकाचे कार्यकम आणि वेगवेगळे प्रयोग करायची वृत्ती ह्यातून काही न फसलेल्या पाककृती निर्माण झाल्या त्या आता तुमच्या सेवेस आणायचा मानस आहे..
मग चला हिंमत गोळा करा :SS आणि साहित्य लिहून घ्या.. B)
त्या आधी एक सूचना : आमची पाकृ संपूर्णपणे स्वतःच्या जबाबदारीवर करून पाहावी नंतर होणार्या/झालेल्या त्रासास 8} मंडळ जबाबदार राहणार नाही..
साहित्य:
सर्व साहित्य एका माणसाला >:) पुरेल ह्या हिशोबाने दिले आहे..
अख्खे मसूर १५० ग्रॅम
१ मध्यम आकाराचा कांदा
१ लहान अर्धा कच्चा टोमॅटो
२ लसूण पाकळ्या
१ टेबल चमचा खोवलेले ओले खोबरे
२ टेबल चमचा कांदालसूण मसाला
लाल/हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार
मीठ, साखर, कोथिंबीर, लिंबू आवडीनुसार
फोडणी साठी मोहरी, जिरे, हिंग, हळद, तेल (ह्याचे प्रमाण किती ते माहिती नसेल तर आपण स्वयंपाकघरात पाय ठेवण्यास लायक नाही असे समजावे ;) )
कृती :
अख्खे मसूर स्वच्छ धूवून २ तास पाण्यात भिजत ठेवा..
कांदा, लसूण, मिरच्या बारीक चिरून घ्या
गॅसवर पॅनमध्ये आपल्या डायेट प्लॅन नुसार तेल गरम करा
"
त्यात हिंग, मोहरी जिरे, बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि मिरच्या टाकून लालसर होई पर्यंत परता..
त्यात आता भिजवलेले मसूर मिसळा वरून थोडी हळद आणि कांदालसूण मसाला घाला. (गडबडितं ह्या पायरीचा फोटो काढायचा राहिला)थोडा पाण्याचा हबका मारावा आणि झाकण ठेवून ३-४ मिनिटे वाफ येऊ द्यावी
नंतर त्यात खोवलेले ओले खोबरे आवडी/तब्बेती नुसार मीठ आणि साखर घालावी अजून ३-४ मिनिटे परतावे. शेवटी कोथिंबीर मिसळावी, लिंबू पिळावे आणि
झाले तयार मसाला मसूर
ह्या बरोबर ज्वारीची भाकरी अर्धा कच्चा टोमॅटोच्या फोडी म्हणजे स्वर्ग..
इथे भाकरी मिळत नाही पण पिटा ब्रेडचा एक प्रकार मिळतो तो ७०% भाकरी गत लागतो.. त्यावर काम चालवून नेतो..
१० मिनिटात फडशा.. चा. पु. सा. के.
अवांतर: मसूर मिळाले नाही तर भिजवलेली तुरडाळ ही फक्कड लागते, इतर डाळी आणि कडधान्ये ही चालू शकतील असे वाटते
नंतर मुखशुद्धीला भरूच शेंग
एक जोरदार ढेकर :\
आणि हो (|: तयारी मध्ये अंथरूण आधीच घालून ठेवा हे सांगायचे विसरलो.. I) O:)

वाचने
11965
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा !
आवडेल
थत्तेशेठ,
In reply to आवडेल by नितिन थत्ते
खाना खजाना
खुसखुशीत !
आयला, गणपाला चॅलेंज!
गुर्जी स्वंयपाकघरात बघुन डोळे पाणावले.
दिसतंय तर मस्तच
छ्या ..
In reply to दिसतंय तर मस्तच by ३_१४ विक्षिप्त अदिती
अर्थात, हे
In reply to छ्या .. by केशवसुमार
चला आमच्या
वा खुप
क-ड-क !!!
:-)
हायला गुर्जी कांपीटीशन मंदे.
मस्त
काय दिवस आलेत?
हातातल्या
तयार
पाकृ
चांगली
हे पाकृचं विडंबन की काय
मस्त..
धन्यवाद. ज्वारीच्या भाकरीच्या उल्लेखाबद्दल निषेध
धनंजयशेठ,
In reply to धन्यवाद. ज्वारीच्या भाकरीच्या उल्लेखाबद्दल निषेध by धनंजय
जबरा !
डोक्यात घोळत राहाणारे शीर्षक
छान
अख्खा मसूर
धन्यवाद!!
आम्ही मसूर
कुकरमधे
In reply to आम्ही मसूर by sur_nair
अय्या, कढई
In reply to कुकरमधे by ३_१४ विक्षिप्त अदिती
एकदम मस्त
In reply to आम्ही मसूर by sur_nair