मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकदिवसीय सहल काढुया का?

वेदश्री · · कौल

वाचने 2404 वाचनखूण प्रतिक्रिया 54

In reply to by धमाल मुलगा

वेदश्री Mon, 04/28/2008 - 16:59
मला वाटलंच होतं तू पहिला प्रतिसाद टाकशील असं. विजुभाऊंशी बोलताना पाटेश्वराची धमाल माहिती कळली पण ते म्हणे की ७-८च्या ग्रुपमध्ये जा असं. इकडे नविन असल्याने कुठून शोधायचा मी बापडीने ग्रुप? म्हणून मेंबरं शोधायला कौल घ्यावा म्हटलं.. मेंबर्स नक्की झाले की ठिकाण ठरवायचं आणि जायचं ही काही बडी गोष्ट रहाणार नाही.

In reply to by वेदश्री

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 17:12
ए...मावशे... पहिला प्रतिसाद मीच टाकेन म्हणजे? काय वळू वाटलो काय मी..बोंबलत हिंडायचं नाव निघालं की सगळ्यात पुढं असायला? :) बरोबर ओळखलस.... पण विजुभाऊंनी सांगितलय..तिथं तरसं/बिबटे असतात आणी वनखात्याची परमिशन नाईय्ये दंबूक न्यायला...कसं करायचं?

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 17:09
आंद्या मस्तच! आणि तिथून मग कात्रजला सर्पोद्यानापाशी जाऊ...घोड्यावर बसु, पावभाजी खाऊ, साप-नाग आणि पाखरं बघू अवांतरः हे कार्टं तुपसाखर पोळी काही सोडत नाही आणि लेकाचं बारिकही होत नाही!!!

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 17:15
सर्पोद्यान ७ वाजता बंद होते, तिथुन आपण आमच्या भारती विद्यापिठाच्या एरिआत जाउ, तिथे आपल्याला छान छान गुटगुटीत पाखरे पहायला मिळतील, शेवटी छंद आहे आपला तो !

In reply to by धमाल मुलगा

>> आणि तिथून मग कात्रजला सर्पोद्यानापाशी जाऊ...घोड्यावर बसु, पावभाजी खाऊ, साप-नाग आणि 'पाखरं' बघू हो हो...मग नक्की जाउ ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 17:21
अर्थाचे अनर्थ नका रे करु पोट्ट्यांहो.... मला जोडे बसतात... च्यायला, आम्ही काहीही बोललो तरी त्यातून वाईटच अर्थ काढतात बॉ लोक. दादा कोंडक्यांना विचारायला पाहिजे काय करावं ते!

विसोबा खेचर Mon, 04/28/2008 - 17:12
येत्या रविवारी पुण्यात येतो आहे. संध्याकाळी कुठेतरी बसून एक लहनसा कट्टा करायची इच्छा आहे. बोला, कोण कोण लोकं येणार? साला, जे येतील ते आपले! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 17:16
येत्या रविवारी पुण्यात येतो आहे. संध्याकाळी कुठेतरी बसून एक लहनसा कट्टा करायची इच्छा आहे. ये बहुत ना-इन्साफी है| मला मुंबईला परत यावं लागतं ना रविवारी... सोमवारचं हापिस चुकवून कसं चालेल? सक्काळी सक्काळी ९:३० टोल्याला पोचावं लागतंय...नायतर साला कोर्टमार्शल करतात...येडे आहेत हापिसवाले.

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Mon, 04/28/2008 - 17:22
बेष्ट आमि येनार. धमाल्या तुझी जाण्याची कायतरी सोय करुया.ठाण्याला जायला सक्काळी बक्कळ गाड्या असतात. अगदी ८:००पर्यन्त पोचशिल अशा

In reply to by धमाल मुलगा

केशवसुमार Mon, 04/28/2008 - 20:01
ए भाऊ पनवती नको लाऊ... रात्र भर बस सेवा आहे.पुणे..मुंबई.. कोणी ही तुझी पालखी/पार्सल टाकून देतील रात्रीच्या गाडीत.. (दम देणार)केशवसुमार स्वगत :- मुंबईला वाहक लाथ घालून उठवेलच..

In reply to by वेदश्री

आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 18:31
वरिल प्रतिसादातील 'तु' कोण आहे हे स्पष्ट करावे. कळावे लोभ असावा. डिस्क्लेमरः व्यक्तिगत वादाचा किंवा व्यक्तिगत वाद सुरु करण्यात पुढाकार घेण्यास उद्युक्त करण्याचा सदरहु प्रतिसादाचा हेतु नाही, तसे काहीही आढळल्यास ती टंकलेखनाची किंवा प्रतिसदकर्त्याच्या अल्पमतीची चुक मानुन मोठ्या मनाने माफ करावे.

In reply to by आनंदयात्री

वेदश्री Mon, 04/28/2008 - 18:44
>वरिल प्रतिसादातील 'तु' कोण आहे हे स्पष्ट करावे. मी तात्याला म्हणाले होते. तुम्हाला असे म्हणायची काय गरज? तुम्हीतर येणारच ना..

In reply to by विजुभाऊ

वेदश्री Mon, 04/28/2008 - 17:23
बस्स का विजुभाऊ?! भरवशाच्या म्हशीला टोणाग्यतला प्रकार करू नका बॉ.. तुम्हीच 'विचार करायला हरकत नाही' म्हणालात तर आम्ही कोणत्या गाईडच्या तोंडाकडे पहायचं?

विजुभाऊ Mon, 04/28/2008 - 17:38
मी ट्रीप ला कोठे नाही म्हणालो. अजून दिवस कुठे ठरलाय ट्रीप चा. जाउ या ट्रीपला. ....भरवश्याच्या म्हशीच्या शोधात फिरणारा टोणगा विजुभौ ( ह्म्म्म्म्म्म्म्याआआआअ) स्वगत:आता तर जेथे स्वागतालाच ""म्हशीचे शिल्प आहे अशा पाटेश्वर च्या डोंगरावरच नेईन. **टीपः(रेड्याच्या पाठीवरील ईश्वर म्हणुन पाटेश्वर)

वेदश्री Mon, 04/28/2008 - 17:59
आत्तापर्यंत मी स्वतः मिळून ७ जणांनी कौलदान केलेले आहे पण कौलदार देवा/वींची नावंच कळत नाहीयेत.. :( कौल दोन दिवसांचा काढला आहे.. कधीपर्यंत चालेल म्हणजे? उद्यापर्यंत का? प्च.. लोचा आहे बॉ.

इनोबा म्हणे Mon, 04/28/2008 - 20:25
L) पर जायाचं कुठं? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 12:10
प्रेक्षक? ट्रीप मधे प्रेक्षक काय करणार तो काय गोल्फ चा खेळ आहे चालता चालता पहायला? पण हरकत नाही ट्रीप साठी प्रेक्षक. केसरीच्या वीणा पाटीलाना नवी कॉन्सेप्ट मिळेल =))

अन्जलि Tue, 04/29/2008 - 12:56
अम्हि मुबै वल्यनि कय करय्चे? अम्हला पन यायचय

In reply to by अन्जलि

वेदश्री Tue, 04/29/2008 - 13:00
लॉजिस्टिक्सची सोय कशी करायची ते बघता येईल नंतर.. आधी यायची इच्छा आहे का बोला? असेल तर योग्य कौल द्या म्हणजे झाले ! पुण्याजवळच जायला पाहिजे असेच काही नाही.. सहलही एकच काढायचीये असेही काही नाही. ग्रुप बनला की झकाससे नाव ठेवून जाऊया सहलींना.. पावसाळा काय एखाददिड महिन्यात येतोच आहे, तेव्हा तर जाम धमाल येईल !

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 13:51
धमाल येईल १००००% येईल.त्याला हसायला आणि वात्रटपणा करायला काहीतरी कारण हवच असते

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 14:00
=)) 8}
त्याला हसायला आणि वात्रटपणा करायला काहीतरी कारण हवच असते
+१ सहमत..... हेच म्हणतो मीही.. असेच म्हणतो मीपण !!!!

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 14:38
धमाल मुला ला कोठे न्या तो वात्रटपणा करतोच. परवा कोणीतरी म्हणाले की जुन्या कोर्टात जज्ज साहेब टेबलावर हातोडा मारुन ऑर्डर ऑर्डर असे ओरडल्यानन्तर धमाल मुलगा "दोन मिसळ आणि दोन कटींग चहा" असे ओरडला म्हणुन. ख खो ध मु जा. ::::: धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 14:43
ख खो ध मु जा.
च्यामारी...हे काय असतं? आणि ओ भौ..मी कधी गेलो होतो कोडतात? आपल्या नावावर येकपन केस नाय...(सगळ्या एकतर भाईरच शेटल केलेल्या नायतर चुकीचं नाव लिहिलेल्या)
::::: धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ
भाव...तुमी न्हाई येनार? आपल्यासंग तुमी न्हाई येनार?? जावद्या तिच्याआयला, आपन मंग टीरिप क्यानसलच करुन टाकनार!!!! -(दु:क्की) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 14:50
ख खो ध मु जा. रे खोटे माल मुलगा जाणे. धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ ...याचा अर्थ तुला व्यवस्थीत सांभाळणारा विजुभाऊ. तुला काय वाटले तु बरोबर असताना उगाच पोपट कशाला करुन घ्या या विचाराने कोठे न जाणारा? हास बघु आता. लब्बाला स्वगतः घ्या ना संभाळुन याला जरा.उगाच डोके बिके फिरले तर आणखी कै च्या कै बोलेल.

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे Tue, 04/29/2008 - 14:46
जज्ज साहेब टेबलावर हातोडा मारुन ऑर्डर ऑर्डर असे ओरडल्यानन्तर धमाल मुलगा "दोन मिसळ आणि दोन कटींग चहा" असे ओरडला =)) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

भोचक Tue, 04/29/2008 - 15:46
तिकडे तुमची मज्जा आहे बॉ. आम्ही इकडे सांची, भोजपूरला जाऊन आलोय. भर उन्हात. बायको, मुलगी नि मी. ते पण मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या 'अनुबंधित ट्रेवल्स' बसमधून.

In reply to by मनस्वी

विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 16:32
आयोजक म्हणतात आधी यायची इच्छा आहे का बोला? असेल तर योग्य कौल द्या म्हणजे झाले ! पुण्याजवळच जायला पाहिजे असेच काही नाही.. सहलही एकच काढायचीये असेही काही नाही. ग्रुप बनला की झकाससे नाव ठेवून जाऊया सहलींना. ही काहीशी वधुवर मेळाव्या सारखी काही कल्पना वाटतेय. ::::या जन्मी ची वधु ऑलरेडी असलेला विजुभौ ( हा त्यांचा सातवा जन्म आहे )

स्वाती राजेश Tue, 04/29/2008 - 16:30
आयोजक उष्णता कमी करण्याच्या खटपटीत आहे.:) कात्रज घाट संपला कि उजव्यासाईडला फाटा आहे बनेश्वरचा ती जागा सुद्धा ट्रीपसाठी छान आहे. एक पाऊस येऊन गेला असेल तर तिथे मजा येते जायला. कारण तिथे छोटा ओढा/ धबधबा आहे.

बाकरवडी Wed, 08/19/2009 - 10:34
:) :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

टारझन Wed, 08/19/2009 - 01:14
वेळ जात नाहीये का बे बाकर्‍या ? धागा पण्णास वर्षापुर्वीचा आहे .. तुला वृत्तांत हवाय आता ?

In reply to by टारझन

आमचे एक आंतरजालीय मित्र होते (होते म्हणजे ते अजूनही आहेत, मित्र आहेत का नाही याची खात्री नाही), त्यांना एक दिवस अशीच जुने धागे उकरायची लहर आली होती. तेव्हा आम्ही आमच्या कंपूसकट बरंच काही ... असो. अदिती