मला भुई(प्रमाणे थोर) म्हणल्याबद्दल दुर्बिटणे बैंचे आभार मानतो.
बाकी शिल्पा काकुंना सीमेवर काश्मिर सिमेवर धाडा रे. हे म्हणजे त्या धर्मांध आतंकवाद्यासारखेच झाले, कळत काय नाय पण मारायला पुढे.
-Nile
काही हरकत नाही आजोबा...देशाच्या कमीच येऊ...तुमच्यासारखे नाही..
बाकी अतिरेक्यांशी केलेली तुलना भयंकर आवडली...डोळे पाणावले आणि नाक वाहू लागले...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
शिल्पाताई,
एक अनाहूत सल्ला आहे. त्याचा राग मानू नका.एखादी गोष्ट न आवडण्याला आक्षेप नाही. पण ती का आवडत नाही याचे कारण माहित पाहिजे आणि ते तसे माहित नसेल तरीही एखादी गोष्ट न आवडणे (बऱ्याचदा अशा गोष्टीचा द्वेष करणे) याला bigotry म्हणतात. आपल्याला ती गोष्ट का आवडत नाही याचे मत कोणत्याही अभ्यासातून किंवा विश्लेषणातून बनलेले असेल तर त्याविषयी कोणाचाच आक्षेप असायचे कारण नाही. पण ते तसे नसेल तर ते योग्य आहे का हे तुम्हीच मला सांगा.
आणि कोणतीही गोष्ट बहुतांश वेळा पूर्णपणे पांढरी किंवा पूर्णपणे काळी नसते. बहुतांश वेळी ’ग्रे’ छटा सगळ्या गोष्टींना असतात याचेही भान ठेवणे गरजेचे आहे.
क्लिंटन
राग नाही मानत....आणि या विषयाच्या बाबतीत म्हणाल तर मी माझा मुद्दा एका वाक्यात मांडलेला आहे...देश स्वतंत्र झाल्यावर भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळी मराठी बहुल भाग कर्नाटकात का गेला? हे शुद्ध महाराष्ट्राबाद्दल्च्या आकसामुळे हे माझे मत आहे (तो आकस कोणाचा हे जगजाहीर आहे....
)...यातील ग्रे बाजू दाखवा तुम्ही....उगाचच पानेच्या पाने भरून आता महाराष्ट्राला हा मराठी बहुल भाग का देऊ नये असे लिहिण्याची गरज मला वाटत नाही...
वरील nile च्या प्रतिसादांबद्दल म्हणत असाल तर त्याला योग्य असेच उत्तर मी त्याला दिले आहे...
आणि मला एखादी गोष्ट माहित नसेल तर ते मी कबूल करून माहिती मिळवते...हे सुद्धा वरील प्रतिसादात दिसले असेलच...यात bigotry असे वाटावे असे काय म्हंटले मी?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
देश स्वतंत्र झाल्यावर भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळी मराठी बहुल भाग कर्नाटकात का गेला?
बेळगावची १९५१ मध्ये लोकसंख्या किती होती आणि त्यापैकी मराठी भाषिक लोक किती होते हे शोधायचा मी खूप प्रयत्न केला पण विश्वासार्ह माहिती मिळाली नाही. याच चर्चेत सुनील यांनी म्हटले आहे की इंग्रजकालीन नकाशांमध्ये बेळगाव हे मराठीबहुल भागात दाखवलेले नाही. त्याचा संदर्भ मला माहित नाही तेव्हा यावर अधिक टिपण्णी करत नाही.
बेळगाववर महाजन आयोगाचे म्हणणे पुढीलप्रमाणे
"Maharashtra’s claim for Belgaum is of recent origin. Though tabled in Parliament, Maharashtra MPs, especially from the treasury benches, did not vote against the amendment of Belgaum being part of their state. Belgaum is a cosmopolitan city. In 1920, when the AICC session was held in Belgaum, not a single leader from Maharashtra including N C Kelkar demanded that it be part of that state. Geographically, Kannada areas surround the city of Belgaum on three sides and by a smattering of villages belonging to Maharashtra on the fourth. Reorganisation will cause extreme hardship. Status quo should be maintained. From the records of rights of Belgaum city, it is seen that a majority of lands belong to Kannadigas. All the original records in the offices of the mamlatdar and collector are in Kannada. “On the appreciation of the whole material and assessing it objectively, I have reached the conclusion that I cannot recommend the inclusion of Belgaum city in the state of Maharashtra."
भाषावार प्रांतरचना करताना भौगोलिक सलगता हा पण एक घटक मानला गेला होता. महाजन आयोगाने त्याअंतर्गत महाराष्ट्राला निपाणी, खानापूर आणि नंदगड सकट २६२ गावे देऊ केली होती. निपाणीपासून बेळगाव बसने सुमारे एक-सवा तासाच्या अंतरावर म्हणजे सुमारे ५०-६० किलोमीटर आहे असे धरले तर या मधल्या भागात (संकेश्वर आणि इतर) आणि बेळगावच्या पलीकडे जर कन्नड बहुसंख्या असेल आणि केवळ बेळगाव शहरामध्येच मराठी बहुसंख्या असेल तर मात्र भाषावार प्रांतरचनेच्या त्यावेळच्या तत्वाप्रमाणे बेळगाव महाराष्ट्राला मिळू शकले नाही.
या बातमीत बेळगाव महाराष्ट्राला देण्याच्या बदल्यात सोलापूर आणि अक्कलकोट हे कन्नडबहुल भागांवर कर्नाटकने दावा सांगावा अशी मागणी केली आहे. अक्कलकोटमध्ये कन्नड बहुसंख्य आहेत असे ऐकले आहे पण सोलापूरमध्येही तीच परिस्थिती आहे का? त्या भागाची माहिती असलेल्या किंवा तिथे राहात असलेल्या मिपाकरांनी यावर प्रकाश टाकावा. तसे असेल तर भाषावार प्रांतरचनेत भौगोलिक सलगता या कारणामुळे सोलापूर, अक्कलकोट हे भाग कर्नाटकला न मिळता महाराष्ट्राला मिळाले असे म्हणता येईल.
आणि मला एखादी गोष्ट माहित नसेल तर ते मी कबूल करून माहिती मिळवते...हे सुद्धा वरील प्रतिसादात दिसले असेलच...यात bigotry असे वाटावे असे काय म्हंटले मी?
याबद्दल आपले अभिनंदन आणि कौतुकच आहे. आणि bigotry या शब्दामुळे आपण दुखावल्या गेल्या असाल तर जाहिर माफी मागतो. पण तेलंगणाच्या प्रश्नी केंद्र सरकार तामिळभाषिक प्रदेश आंध्रातून काढून वेगळे राज्य करणार आहे हे विधान आणि त्यानंतरची चर्चा थोडी अप्रस्तुत वाटली म्हणून तसे म्हटले. एकेकाळी मी स्वत: bigot होतो आणि त्यामुळे अनेकदा स्वत:ला पूर्णपणे न पटताही किंबहुना उलटे प्रश्न न विचारताच मी अनेकदा काही गोष्टींना कट्टर विरोध करत असे.म्हणजे मी एखाद्या गोष्टीला का विरोध करत आहे हेच मला माहित नसे हे पण मी मान्य करतो.पण नंतरच्या काळात यातील चूक मला कळली. असो.
खरे तर हा प्रश्न आता सोडविण्यापलिकडे गेला आहे.किंबहुना राजकारण्यांना तो असाच नेहेमी भिजत ठेवलेला हवा आहे.
भाषेच्या बाबतीत कन्नडिगा हे महाराष्ट्रीयनांपेक्षा फारच आक्रमक आणि सडेतोड आहेत.
बंगळुरु मध्ये सर्व मल्टीनॅशनल कंपन्यांचे इंग्लिश बरोबरच कन्नड मध्येही मोठमोठे फलक आहेत.(इंटेल,ओरॅकल,असेंचर इ.इ.)
आपल्याला राज ठाकर्यांनी राडा केल्यावर मुंबईतही अशी अंमलबजावणी करायला हवी अशी जाणीव झाली.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी झाली त्याला कारण म्हणजे आचार्य अत्र्यांचे नेतृत्व त्याला लाभले.त्या दर्जाचा नेता आता महाराष्ट्रात नाही.
नेते म्हणवुन घेणारे जे कोणी आहेत ते कुणाचे ना कुणाचे तरी मिंधे आहेत.त्यांच्याकडुन हा प्रश्न सोडविला जाण्याची आशा बाळगणे व्यर्थ आहे.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
मराठवाडा -विदर्भाचे काय??
पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई ने विदर्भाचे इतके दिवस हाल केले ... मग बेळगाव कशावरून सुखी राहील...
इकडे बेळगाव महाराष्ट्रात घ्या म्हणायचे, आणि तिकडे विदर्भातील मराठीच लोक वेगळे राज्य मागत आहेत... याचा अर्थ लागतोय का??
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात शहीद झालेल्यांचा खरच अभिमान वाटतो, पण मराठवाडा - विदर्भ महाराष्ट्रात घेताना एक नागपूर करार झाला होता. त्याचे काय?? त्यातील किती आश्वासन पूर्ण केलीत. महाराष्ट्रात येऊन, मराठी राज्य मिळाले, याव्यातीरक्त मराठवाडा -विदर्भाला काय फायदा झालं ?? साखरेचा प्रश्न असला की दिल्ली तापते, कापसाकडे कोणी लक्षही देत नाही. विदर्भ एकूण ५००० मेगा वॉट वीज निर्मिती करत, वीज मुंबईला आणि विदर्भात लोड शेडींग!! मराठवाड्याचा तर प्रश्नच नाही. म्हणायला मुख्यमंत्री आहेत मराठवाड्याचे, पण वैधानिक मंडळाच्या अनुशेष पण भरून निघत नाही, का तर मंत्रिमंडळातील पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री पाठींबा देत नाहीत. कृष्णा खोरे प्रकल्प चालू केला तेंव्हा सगळ्यात जास्त फायदा मराठवाड्याला होणार होता म्हणे, पण आत काय सगळे पाणी पश्चिम महाराष्ट्रात!! यात पश्चिम महाराष्ट्राचा बिलकुल राग नाही, कोणाला तसे वाटले असल्यास खर्च क्षमस्व!! त्यांनी त्यांचे लोक-कार्य केले, इतरांना करू देले नाही, त्यांना ते करता आले नाही हा भागच वेगळा.
मुद्दा हा आहे की, येथे असलेल्या महाराष्ट्राची ही दैना तर उदया बेळगाव-निपाणी इकडे आल्यावर त्यांचे असेच काही झाले तर? ६० वर्षापूर्वी कदाचित हा मुद्दा मोठा असेन, पण आत त्याला काय अर्थ आहे?? शेवटी आपल्याच नेत्यांनी महाजन आयोगाच्या शिफारसी स्वीकारायाल्या, खेळ तिथेच संपला होता!! आत उगाच भावना कशाला भडकावायाच्या. मिसळ-पाव वर एवढीच अपेक्षा आहे, की जेवढी तिडीक मराठी , बेळगाव , बिहारी मुद्द्यावर येते तेवढीच जर विदर्भाच्या शेतकर्याची आत्महत्या, मराठवाड्याची दैना, आणि एकूणच महाराष्ट्राची बिघडत चाललेली परिस्थिती यावर आली आणि ती मतदानात दिसली तर बरं होईन.
चर्चा आता हळूहळू भाषावार प्रांतरचनाच योग्य होती का ह्या मुद्द्यावर येते आहे.
एक तत्व म्हणून भाषावार प्रांतरचना ही योग्यच आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच कॉन्ग्रेसने (सत्ता हातात येताच) भाषावार प्रांतरचना करण्याचे आश्वासन दिले होते. सगळ्या प्रमुख भाषांना राजाश्रय मिळण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचेदेखिल होते.
परंतु, भाषावार प्रांतरचना करताना त्यात सगळीकडेच सीमाभाग येणार हे लक्षात ठेऊन, त्यासंबंधीचे वाद कसे सोडवायचे, ह्याची जाहीर नियमावली करायला हवी होती, ते झाले नाही. त्यामुळेच फक्त आपल्यावरच अन्याय केला जातोय, अशी भडकावणी करणे सोपे झाले.
आता पुन्हा बेळगावकडे वळू. बेळगाव कर्नाटकाला देणारा महाजन आयोग हा काही पहिलाच आयोग नव्हता. त्यापूर्वीच्या आयोगांनींदेखिल बेळगाव कर्नाटकाला बहाल केले होते.
माझ्याकडे सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा, ग्रियर्सन यांनी संपादित केलेल्या लिन्ग्विस्टिक सर्वे ऑफ इन्डियाच्या पहिल्या खंडात दिलेला नकाशा आहे. त्यात मराठी भाषा बोलली जाणार्या भूभागाचा जो नकाशा दिलेला आहे, त्यातही बेळगाव नाही.
आता हे का ह्याचा शांतपणे विचार केला गेला आहे काय? की आम्हाला वाटते तेच आणि तेवढेच खरे, असा अट्टाहास धरायचा?
मुख्य प्रश्न बेळगाव महाराष्ट्रात येते की कर्नाटकात राहते हा मुळीच नाही (कारण भाषावार प्रांतरचनेचा जो मुख्य हेतू - प्रत्येक भाषेला स्वतःचे राज्य मिळावे - तो साध्य झालेला आहे). प्रश्न आहे तो, कर्नाटकात राहूनही बेळगावातील मराठी मंडळी आपले मराठीपण सुखरूप जपू शकतात की नाही. आणि ते जर होत असेल, तर अन्य कुणाला ह्यात पडण्याची आवश्यकता नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
ी. बंडू गोखले ला ह्या स्वतंत्र भारतात मारले गेले ही जखम मराठी माणूस म्हणून माझ्या ठायी ओली राहीलच, ती विसरता येणार नाही
तुमच्या भावना अगदी खोल मनापर्यंत पोहाचल्या.वाक्य मस्त लिहलत.
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
माझ्या लेखी बेळगाव कर्नाटकात राहिले काय किंवा महाराष्ट्रात आले काय काहीही फरक पडत नाही. बेळगावात मराठी संस्कती तिथल्या मंडळींनी टिकवून ठेवणे गरजेचे हे जास्त महत्त्वाचे. आणि तेवढे स्वातंत्र्य कर्नाटकचे सरकार देईल असे वाटते. मी सध्या रहात असलेल्या इंदूरमध्ये आधीच्या काळात बव्हंशी प्रजा मराठी होती, पन्नास टक्क्यांहून जास्त तर नक्कीच. आता तशी परिस्थिती नाही. परंतु, मराठी भाषकांचा शहरावरचा प्रभाव पुसून न टाकता येणारा आहे. मराठी भाषकांची राज्यातील संख्या लक्षणीय असल्याने राज्य सरकारला मराठी अकादमी सुरू करावी लागली. त्याला नियमित पैसा मिळतो आणि त्यातून बरेच काही चांगले उभे राहिले आहे. इंदूरचे महापौर, खासदार मराठी आहेत. ८१ पैकी १८ नगरसेवक मराठी आहेत. ज्याच्या शिक्षणमंत्री मराठी आहेत. इथल्या अनेक वर्तमानपत्रांचे पत्रकार मराठी आहेत. नई दुनियाचे आणि भास्करच्या ग्वाल्हेर आवृत्तीचे संपादक मराठी आहेत. इथून तीन दिवाळी अंक निघतात. तेही दर्जेदार. शिवाय मी मराठी नावाचे साप्ताहिकही निघते. ते नेटवरही आहे. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांची तर कायम रेलचेल असते. नाटक-गाण्यांपासून सगळे कार्यक्रम नित्याने होतात. इथल्या ग्रंथालयाला पुढच्या साताठ वर्षांत शंभर वर्षे पूर्ण होताहेत. (मराठी आणि हिंदी ग्रंथालयासाठी यशवंतराव होळकरांनी स्वतंत्र अनुदान दिले होते. त्यातून हे ग्रंथालय सुरू झाले होते. शिवाय त्यावेळी पुस्तक प्रकाशनांसाठी निधीही दिला जायचा.) त्याशिवायही नवनवीन लायब्रर्या सुरू होताहेत. मी लावलेल्या लायब्ररीत मराठीतील लेटेस्ट पुस्तके मला सहजी मिळताहेत.
................. एका हिंदी भाषक राज्यात राहून इतकं मराठीपण जपलं जातंय. तंटाबखेडा न करता राहिल्याने इंदूरवासिय मराठी भाषकांनी हे मिळवले असावे काय?
---
अवांतर- संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात बर्हाणपूर आणि त्या लगतच्या काही प्रांतांनीही महाराष्ट्रात सामील व्हावे अशी टूम निघाली होती. तिथले दोन आमदारही मराठी होते. पण त्या मागणीला जनसमर्थन मिळाले नाही. पण त्या भागात नियमित मराठी वृत्तपत्रे येतात, इतकेच काय मराठी वृत्तपत्रांचे बातमीदारही त्या भागात आहेत.
(भोचक)
जाणे अज मी अजर
आणि तेवढे स्वातंत्र्य कर्नाटकचे सरकार देईल असे वाटते
ते तसे स्वातंत्र्य वर्षानुवर्षे आहेच. शहरात शिरल्यावर प्रथम दिसते ते मारुतीचे देऊळ- पंचवटी सोन्या मारुति देवालय
. नाव शुद्ध मराठीत आहें. नंतर कन्नडमध्ये लिहिले आहे. साईबाबा मंदिर आणि इतर काही धार्मिक स्थानांची नामे प्रथम मराठीत आणि नंतर कन्नडमध्ये आहेत. मराठा शिक्षण मंडल खूप पूर्वीपासुन आहे.
मिसळ्पाव/वडापाव्/कोल्हापुरी जेवण मिळणारी अनेक बेळगावात उपहारगृहे आहेत. किर्लोस्कर रोडवर असलेल्या आदिनारायण भोजनालयात्(हे नावही मराठीतच आहे!) उत्कृष्ट मराठी इश्टाइल मांसाहारी थाळी मिळते.टिळकवाडीत अजुनही बहुतांशी घरे मराठी माणसांचीच आहेत. मुंबई/पुण्यात "तबला/पेटी"शिकण्याचे वर्ग आता दिसत नसले तरी बेळगावात अजुनही दिसतात.
ही उदाहरणे द्यायची कारणे म्हणजे -कुठल्याही राज्य सरकारने नावे बदलून लोकांना दुखावण्याचा/चिडवण्याचा वे****पणा येथे केलेला नाही.म्हणूनच गेल्या २५ वर्षात स्थानिक लोकांना या सीमा प्रश्नाचे महत्व उरले नाही.
P = NP
तमाम मराठी जनांच्या बेळ्गावकरांबद्दलच्या भावना समजल्या. अन बेळ्गाव महाराष्ट्रात अजुन कसे नाही याच उत्तर मिळाले. मुळात इथल्या जनतेलाच बेळ्गाव नको असेल तर सामील कसे होईल?
बेळ्गाव म्हणजे काय पुणे मुंबई आहे का? काय फायदा बेळ्गाव महाराष्ट्रात येउन?
'अवघे विश्वचि माझे घर' असे मानणारे बरेच जण भेटले, पण यांच्या घराला, बिल्डिंग ला कुंपण नसेलच असे वाट्त नाही. जोपर्यंत स्वत:च्या घरापर्यंत असे प्रश्न येत नाहीत तोपर्यन्त मजा बघायची सवयच आहे म्हणा आपल्याला.
क्लिंटन आणि पंगा यांना विनंती की आपापले प्रतिसाद गोळा करून वेगळे लेख बनवावे. अतिशय सुरेख प्रतिसाद दिलेले आहेत. यांना तोडीस तोड प्रतिवाद म्हणून एकही मुद्देसूद प्रतिसाद दिसला नाही याचं आश्चर्यही वाटतं आणि वाईटही. उलट प्रतिवाद म्हणून पुन्हा पुन्हा भावनेचाच मुद्दा मांडला जातोय.
अदिती आणि भोचक यांनी मांडलेले मुद्देही महत्त्वाचे आहेत.
आळश्यांचा राजा
महाराष्ट्राला नेहमी कोणतीही गोष्ट भांडून का घ्यावी लागले. महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेले खासदार काय दिल्ली जाऊन झक मारतात काय असा संतप्त सवाल करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीमा प्रश्नी महाराष्ट्रातील ४८ खासदार काहीच करत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. राज्याचे प्रश्न हाता बाहेर गेल्यावर यांना जाग येते. मग इतर वेळी फक्त दिल्ली तोड्या-पाण्या करण्याचे काम करतात असे दिसते, असा जोरदार टोलाही यावेळी हाणला.
माटुंगा येथे मनसे रेल्वे कामगार संघटनेच्या तिस-या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सीमा प्रश्नाबाबत राज ठाकरे आतापर्यंत काहीच बोलले नव्हते. ते या कार्यक्रमात बोलतील म्हणून वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. राज ठाकरे म्हणाले, मराठी अस्मितेचा प्रश्न असेल तर महाराष्ट्रातील ४८ खासदार का एकत्र येत नाहीत. इतर राज्यांचे खासदार त्यांच्या अस्मितेच्या प्रश्नावर पक्षभेद विसरून एकत्र येतात. त्यावेळी केंद्राला आपले मत बदलावे लागते. आपल्याकडे एकत्र येणे नाही आणि मग म्हणायचे केंद्राने खंजीर खुपसला आहे, असे म्हणून राज ठाकरे यांनी बाळासाहेबांनी सीमाप्रश्नावर केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. महाराष्ट्राची पाठ आहे की काय प्रत्येक प्रश्नावर त्यात खंजीर खुपसला जातो.
प्रत्येक प्रश्नात आपल्याला आंदोलन करावे लागते. रेल्वे परिक्षा मराठीत असो, रोजगाराचा प्रश्न असो की सीमेचा भांडावेच का लागते हा मला प्रश्न पडतो. आपल्या खासदारांची धोतरं केंद्रातील मंत्र्याच्या खुर्च्यांखाली अडकलेली आहेत. त्यामुळे जरा जरी सरकलं तर धोतर फाटेल याची त्यांना भीती वाटते.
बेळगाव प्रश्नी केंद्राने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेवले गेल्याचे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने सांगितले. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, पवारसाहेबांना क्रिकेटच्या उजेडापुढे सीमाप्रश्नाचा अंधार दिसलाच नाही. त्यांचं लक्षच नाही इकडे. मराठी माणूस तिकडे हाल सहन करतो त्यांची ४८ खासदारांना काही देणे घेणे नाही.
सीमा प्रश्न भाजप-शिवसेनेची सत्ता केंद्रात होती तेव्हाच सुटला असता. शिवसेनेने त्यावेळी सांगितले असते की भाजपने सीमा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही सरकारला पाठिंबा देणार नाही, अशी आक्रमक भूमिका का दाखवली नाही. पण त्यांनी तसे केले नाही. काँग्रेसकडून यापूर्वीही कधी अपेक्षा नाही आणि पुढेही नाही. आपण बेसावध राहतो त्यामुळे आपल्यावर ही वेळ येते, त्यामुळे गाफिल राहण्यात अर्थ नाही एखादा प्रश्न त्याचवेळी सोडवाला हवे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बेळगाव प्रश्नी केंद्राने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेवले गेल्याचे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने सांगितले
शरद पवार आणि अंधारात? १९८६ साली अटक करुन घेण्यासाठी ते बेळगावला आल्याचे आठवते.असो.
सीमा प्रश्न भाजप-शिवसेनेची सत्ता केंद्रात होती तेव्हाच सुटला असता
सध्या कर्नाटकात दिल्लीश्वरांची थुंकी न झेलणारे,कुठल्याही समाजाचे 'लांगुलचलन' न करणारे सत्तेवर आहेत्.ते ज्या मंडळीना रिपोर्ट करतात ती मंडळी(भागवत्/गडकरी) अस्सल मराठी आहेत.सेना-(महाराष्ट्र)भाजपाने आता पुढाकार घेवून हा प्रश्न एकदाचा मिटवून टाकावा. काय बोलता?
पुढं काय करायचंय ते बोला.
बेळगाव महाराष्ट्रात आलं तर तिथे सोन्याचा धूर निघणारे का?
गेली ६० वर्षं ते कर्नाटकात आहे तर असा काय त्रास झाला महाराष्ट्रातल्या किंवा बेळगावातल्या लोकांना?
*****************************
अळवावरचे पाणी
प्रतिक्रिया
ह. घ्या
मला
काही हरकत
एक नंबर..
आमचं मन
अनाहूत सल्ला
राग नाही
उत्तर
खरे तर हा
मराठवाडा -विदर्भाचे काय??
बेळगाव
ी. बंडू
माझ्या
ते
'अवघे विश्वचि माझे घर'
धमाल दंगा
राजसाहेब म्हणतात......
शरद
मागचं राहू द्या हो...