✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ये परतीचा वारा...

य
यशोधरा यांनी
Wed, 07/07/2010 - 01:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5466 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

कविता

मुक्तसुनीत
Wed, 07/07/2010 - 02:43 नवीन
संवेदनशीलतेने केलेला कवितेचा रसास्वाद आवडला. कुठल्या संग्रहातली कविता आहे ?
  • Log in or register to post comments

अर्रर्र..

यशोधरा
Wed, 07/07/2010 - 02:49 नवीन
अर्रर्र.. फसलं की मग लिखाण... असो. :) रसास्वाद नाही. ३ वेगवेगळ्या कवितांमधली कडवी/ ओळी लिहिताना आठवली तशी वापरली आहेत. सूट होतात असं वाटलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

उत्तम

नंदन
Wed, 07/07/2010 - 03:01 नवीन
मुक्तक आवडलं.
त्याच्या अफाट पसार्‍याची कळत नकळत पुसटशी जाणीव होते आणि त्याचबरोबर स्वतःच्या नगण्यतेचीही. पुन्हा एकदा प्रश्न पडतात, कशासाठी केला होता अट्टाहास? हर्ष, खेद मावळतात.
--- बोरकरांच्या कवितेत हे द्वंद्व अनेक ठिकाणी दिसून येतं. जगताना येणार्‍या अनुभवांची समृद्धता आणि त्याचवेळी स्वतःच्या नगण्यतेची जाणीव. वर दिलेल्या समर्पक उदाहरणांसोबतच 'रसलंपट मी तरी मज अवचित गोसावीपण भेटे', 'कळत जाते तसे...' अशा अनेक ओळी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

ह्याच संदर्भात

वाचक
Wed, 07/07/2010 - 08:19 नवीन
जी. ए. - सुनिताबाई पत्रव्यवहारात चर्चिला गेलेला एक मुद्दा आठवला - बोरकर एवढे भाववृत्तीचे कवी असून त्यांनी गांधीचे चरित्र काव्यबद्ध करण्याचा निर्णय कसा घेतला त्याबद्दल जी. एंना फार कुतूहल होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

खराय

मुक्तसुनीत
Wed, 07/07/2010 - 08:21 नवीन
होय हे मीदेखील वाचले आहे. खरे म्हणजे यात इतके आश्चर्यचकित होण्यासारखे काय आहे कळत नाही. यापेक्षा मोठे मोठे पॅराडॉक्सेस पहायला मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक

खूप छान

अरुण मनोहर
Wed, 07/07/2010 - 03:17 नवीन
खूप छान लिहीलं आहे. पुन्हा पुन्हा वाचलं. प्रत्येकवेळी वाक्यांच्या मागे जाऊन विचार केला, तेव्हा जीवनाच्या अथांगतेची नव्याने जाणीव झाली.
  • Log in or register to post comments

+१

मीनल
Wed, 07/07/2010 - 05:05 नवीन
सहमत. खूप छान लिहिले आहे. कलात्मक/ साहित्यिक/ वास्तविक? कुठचे आहे हे लेखन? की हे सर्वच????? उत्तम!!!! मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

संवेदनाशी

रेवती
Wed, 07/07/2010 - 06:55 नवीन
संवेदनाशील लेखन आवडलं! हे सगळं मनातल्या मनात चालू असतं पण शब्दबद्ध करता येणं महत्वाचं! तुला ते चांगलं जमलं म्हणून कौतुक! रेवती
  • Log in or register to post comments

हा त्येच त्येच :)

टारझन
Wed, 07/07/2010 - 08:58 नवीन
प्रतिसाद टंकुन दिल्याबद्दल आभारी आहे रेवती :) - (द लेजेंडरी वारा ऑफ) परती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सुरेख !

पहाटवारा
Wed, 07/07/2010 - 09:31 नवीन
यशोधरा, तुझे हे मनातले दवंबिन्दू टिपुन कागदावर जसेच्या तसे ऊतरवण्याचे स्किल खरंच अप्रतीम आहे. मागे देवघरातील समईच्या ऊजेडात वाटलेली मनःशांती हि तु अशीच सुरेख टिपलेली ! येउद्या असेच लेख अजुन ! -पहाटवारा
  • Log in or register to post comments

दवबिन्दु!!

स्पंदना
Wed, 07/07/2010 - 10:39 नवीन
दवबिन्दु!! पहाटवार्‍यान अगदी अचुक वर्णन केल या शब्दबिंदुंच !! खरच दवबिंदुं प्रमाणे नाजुक हळुवार, परावर्ति..सल्युट !! धन्यवाद यशोधराजी. अश्याच लिहित रहा. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पहाटवारा

वाचक आणि

यशोधरा
Wed, 07/07/2010 - 10:10 नवीन
वाचक आणि प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

मुक्तक

दशानन
Wed, 07/07/2010 - 10:18 नवीन
मुक्तक आवडलं. छान लिहले आहेस यशो.
  • Log in or register to post comments

माननीय

अवलिया
Wed, 07/07/2010 - 10:33 नवीन
माननीय यशोधराजी, माननीय सदस्या मिसळपाव.कॉम आपले मुक्तक वाचले. आपल्याला प्रतिभेचे दैवी देणे आहे, त्यामुळे मनातल्या भावना चपखल शब्दांत मांडण्याचे आपल्याला कसब प्राप्त झाले आहे. आपल्या हातुन साहित्यसेवा अविरत घडावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आपल्यासारख्या साहित्यिकांच्या साधनेमधे व्यत्यय येतो, त्या गोष्टींना जबाबदार असलेल्या प्रवृत्तींचे निराकरण लवकर होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. दृपलसारख्या कंटेट म्यानेजमेंट सिस्टीम्समुळे हे संकेतस्थळ उभे राहिले आहे त्याबद्दल मी दृपलचा तसेच दृपलटिमचा आभारी आहे. श्री तात्या अभ्यंकर यांच्या प्रयत्नाने हे संकेतस्थळ स्थापन झाले मी त्यांचा आभारी आहे. त्याला अनेक इतर संकेतस्थळे कारणीभुत ठरली, मी त्यांचा आभारी आहे. संपादकांनी केलेले कार्य थोर आहे. त्यांचा महिमा अपार आहे. त्यांचे गुणगान करण्यास मानवी वाणी पुरेसी नाही याची जाणीव आहे. पण तरीही आभार हे मानलेच पाहिजेत. सर्व संपादकांचा मी आभारी आहे. हा प्रतिसाद वाचणा-या वाचकांचा मी आभारी आहे. ज्यांचे ज्यांचे आभार मानणे आवश्यक आहे अशा सर्वांचा मी आभारी आहे. सर्वात महत्वाचे हे संकेत स्थळ चालु ठेवणा-या श्री नीलकांतचा मी आभारी आहे. खरोखर आज मोठा मंगल दिवस आहे. सर्व संपादकांच्या आशीर्वादाने आणि कृपाकटाक्षाने मी हा प्रतिसाद लिहु शकलो आहे. हा प्रतिसाद टिकला आहे. माझे सर्व संपादकांना साष्टांग नमन आहे. माझी खात्री आहे, संपादकांची अशीच कृपा माझ्यासारख्या अल्पमती, निर्बुद्ध बालकावर राहिल. अजुन काय लिहु? शब्दच सापडत नाहीत. मुढावस्था म्हणजे काय याचा मला आज प्रत्यय येत आहे. सर्वांचे मंगल होवो, शुभ होवो हीच कामना.. आपलाच नाना उर्फ अवलिया. संपादकांचा महिमा अपार । संपादकांची थोरवी अपार ॥ कसे मानु त्यांचे आभार । मी तर केवळ पामर ॥
  • Log in or register to post comments

अवलियाजी,

यशोधरा
Wed, 07/07/2010 - 10:37 नवीन
अवलियाजी, LOL! हे काय! आणि धन्यवादही. :) राजे, धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वा

शैलेन्द्र
Wed, 07/07/2010 - 11:20 नवीन
वा सुंदर, "शीड फिटे वाट मिटे, का धरु सुकाणू वल्हवाया का उगीच बळ बळेच आणू? जायचे जिथे तिथेच नेईल नेणारा ओसरली भरती, ये परतीचा वारा..." कवितेच्या शब्दंचा अर्थ काढु नये म्हणतात... वार्‍याने शिळ घालावी तशी तिला मनात घुमु द्यावी.. तुमच्या लेखात अशाच सुरेख लहरी ऊठल्यात...
  • Log in or register to post comments

सुरेख

श्रावण मोडक
Wed, 07/07/2010 - 11:45 नवीन
सुरेख आणि ताकदीचे मुक्तक!
  • Log in or register to post comments

हेच!

स्वाती दिनेश
Wed, 07/07/2010 - 12:36 नवीन
सुरेख आणि ताकदीचे मुक्तक! हेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सुंदर !

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/07/2010 - 13:08 नवीन
सुंदर ! सुंदर !! सुंदर !!! मिळूद्या मला मुळाशी, सारी मिटून दारे मोकाट वारियांनो थोडे मुकाट व्हा रे.... मध्यंतरी मृत्यूविषयी डोक्यात काही विचार चालू होते, आणि तशातच बोरकरांची ही कविता अचानक सापडली. अतिशय परिणाम करून गेली. आज परत या ओळी समोर आल्या. खुद के साथ बातां: या ताई नेहमी नेहमी का लिहित नाहीत? :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

जिवनाचा

Dhananjay Borgaonkar
Wed, 07/07/2010 - 13:16 नवीन
जिवनाचा प्रवास अप्रतिम मांडला आहे.
  • Log in or register to post comments

छान

घाटावरचे भट
Wed, 07/07/2010 - 14:00 नवीन
छान मुक्तक!!
  • Log in or register to post comments

खासच.

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 07/07/2010 - 14:36 नवीन
खासच.
  • Log in or register to post comments

+१

मितभाषी
Wed, 07/07/2010 - 14:52 नवीन
असेच म्हणतो. भावश्या.
  • Log in or register to post comments

पुन्हा

यशोधरा
Wed, 07/07/2010 - 18:15 नवीन
पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. हल्लीच महिन्यापूर्वी माझा बाबा गेला. त्याच्याशी माझं फार लोभस असं मैत्र होतं. त्यालाही माझ्याशी गप्पा मारायला आवडायचं. त्याच्या लहानपणीचे किस्से, नोकरीनिमित्ताने त्याने जवळ जवळ भारत पालथा घातला, ते किस्से आणि कधी कधी अशाच गप्पा. संवाद साधण्यासाठी आणि तो टिकून रहावा, वृद्धिंगत व्हावा म्हणूनही. एकंदरीतच आयुष्याबद्दल त्याने फार डोळसपणे चिंतन, मनन केलं होतं आणि त्याबद्दल खूप आत्मीयतेने तो बोलायचाही. ते ऐकतानाही खूप छान वाटायचं. त्याच्या आयुष्याबद्द्ल, त्याच्या मृत्यूबद्दल विचार करताना हे सगळं मनात येत राहिलं. जसं जमलं तसं इथे उतरवलं. मात्र, त्याला त्याचं कोडं कधीच उकललेलं होतं.
  • Log in or register to post comments

वेदनेतून निर्मिती होते!

चतुरंग
Wed, 07/07/2010 - 20:25 नवीन
यशोधरा, ह्या मुक्तकामागचा विचार हा तुझ्या बाबाचे जाणे आहे. ती वेदना ह्या मुक्तकाला जन्म देऊन गेली! (सहसंवेदक)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

खरंय!

राघव
गुरुवार, 07/08/2010 - 02:57 नवीन
रंगदांशी सहमत. यशोधरातै, तुमचा नीटस, संवेदनशील लेख अन् तुमचीच वरील प्रतिक्रिया वाचून माझ्या मनातल्या एका कल्पनेला शब्द स्फुरले. म्हणून ही कविता तुमचीच! राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

धन्यवाद

यशोधरा
गुरुवार, 07/08/2010 - 13:52 नवीन
धन्यवाद राघव. खूप सुरेख जमली आहे कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

सुंदर

विसोबा खेचर
Wed, 07/07/2010 - 19:03 नवीन
सुंदर लेखन..! Image removed.
  • Log in or register to post comments

आवडले

तिमा
Wed, 07/07/2010 - 19:11 नवीन
आमचाही आता शेवटाकडे प्रवास चालू झाला आहे. असे विचार हल्ली मनांत येतच होते. तुम्ही त्याला मूर्तरुप दिलेत. बर्‍याच जुन्या गोष्टी आठवल्या की आता असे वाटते की त्यावेळी आपण इतका अट्टाहास का केला ? जास्त समजुतीने का वागलो नाही ? छोट्या छोट्या गोष्टींमधे का उगाच दुसर्‍यांचे मन दुखावले? पण ते त्यावेळेस समजत नाही. त्यामुळे मी हल्ली माझी मते आग्रहीपणे मांडत नाही. समोरच्याचे चुकत असेल तर एकदा सल्ला देतो. परत परत मागे लागत नाही. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

_/\_

धमाल मुलगा
Wed, 07/07/2010 - 20:55 नवीन
काय बोलु माई माझे? शब्द संपले! भाव मात्र अजुनही झिरपताहेत.....
  • Log in or register to post comments

सुरेख मुक्तक

संदीप चित्रे
Wed, 07/07/2010 - 22:09 नवीन
लेख छान ओघवता आहे आणि कवितांच्या ओळी एकदम चपखल जागी वापरल्या आहेस. लेख वाचताना मनाच्या एका कप्प्यात बोरकरांच्याच 'संधिप्रकाशात..'च्या ओळी (डॉ. सलील कुलकर्णीने संगीतबध्द केलेल्या) निनादत होत्या.
  • Log in or register to post comments

मुक्तक आवडलंच..

उपास
गुरुवार, 07/08/2010 - 03:04 नवीन
ह्याच साठी केला सारा हट्टाहास, शेवटचा दिसं गोड व्हावा.. मारव्याची झाक जाणवतेच आहे शेवटी.. आवडलच अगदी.. उपास मार आणि उपासमार
  • Log in or register to post comments

मुक्तक

मेघवेडा
गुरुवार, 07/08/2010 - 14:22 नवीन
मुक्तक आवडलं. नक्षत्रांचे देणे, कळ्या आणि थोडी ओली पाने आठवली! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा