Skip to main content

वादळ वळवाचे

लेखक धनंजय यांनी सोमवार, 05/07/2010 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
वादळ वळवाचे - - - - - वादळ वळवाचे ना धड पोसते ना धड नासते . नि झाड झोडलेले ना धड वाकले ना धड मोडले - - - - -
लेखनविषय:

वाचने 3933
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

In reply to by पाषाणभेद

किंवा अधिक अल्पाक्षरी हवे. असे बघूया : ना धड वाकले वळवेमुळे झाड ना धड मोडले (रचना हायकूच्या धर्तीची आहे.)

वादळ वळवाचे ना धड पोसते नासते झाड झोडलेले ना धड वाकले मोडले असेही चालेल का ? - - - - -

न पोसणारे आणि न नासणारे 'वळवाचे वादळ' आणि न वाकलेले, ना धड मोडलेले असे ते 'झोडलेले झाड' समजून घ्यावे लागेल. तर कवितेचा आनंद घेता येईल. तो पर्यंत ही केवळ पोच...! -दिलीप बिरुटे

छान. धनंजयांच्या कविता वाचणे हा नेहमी वेगळा अनुभव असतो. धनंजय नुसते प्रयोगशील नाहीत तर त्यांच्या कविता कैकवेळेस भावनाप्रधानही असल्याचे मला भासते. कविता वाचतांना रिडिंग बिटिविन द लाईन्स हे अपेक्षितच असते, पण दर वाचनाला नविनच लाईन गवसणे, अशी कविता विरळच.

कविता आवडली. दुसर्‍या कडव्याच्या सुरुवातिला "नि" का बरं आहे? नसला तरी अर्थात फरक पडला नसता असं वाटलं. नंदू

याला हायकू म्हणायचे का? युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.अय युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

हायकूच्या धर्तीची रचना आहे. त्यातल्या त्यात दुसरे कडवे (वेगळे काढून) असे लिहिल्यास (कडक नियमबद्ध) हायकू म्हणता येईल : . न वाके वळिवीं वृक्ष न मोडे . (५-७-५ मात्रा. मात्र मराठीत हायकू लिहिताना ओळी त्यापेक्षा थोड्या लांब घेतात. वरील कवितेतल्या इतकी लांबी चालेल. दोन कडवी स्वतंत्र हवीत. दुसर्‍या कडव्याच्या सुरुवातीचा 'नि' काढून टाकावा लागेल.)

In reply to by धनंजय

कमीत कमी शब्दात पूर्ण अर्थवाही हायकू मस्तच! नशिबाचा फटका हा अर्थ छान लागला मुळ कवितेमधे!

मोडले ना वाकले झाड झोडलेले | नासते ना पोसते वादळ वळवाचे || वळव की वळिव ?

In reply to by पहाटवारा

वळीव/वळव हे वैकल्पिक प्रथमांत रूप, त्यातल्या त्यात "वळीव" म्हणायला सोपे वळवाचा/वळिवाचा असे वैकल्पिक सामान्यरूप, त्यातल्या त्यात "वळवाचा" म्हणायला सोपे. (अशी उदाहरणे मराठीत खूप दिसतात. उडीद/उडद -> उडदाचा/उडिदाचा ; अधोरेखित रूपे अधिक प्रचलित आहेत.) शब्दांचा क्रम बदलल्यामुळे वेगळाच - तोही सुंदर - अर्थ प्रकाशित होतो आहे!

न घरका न घाटका किंवा त्रिशंकू म्हणता येईल अशी अवस्था दर्शविणर्‍या ह्या हायकू सदृश ओळी आवडल्या. स्वतः कवीने तसेच इतरांनी सुचवलेल्या सुधारणाही चांगल्या आहेत.