काळाच्या क्षितिजावरुनी संदेश कुणाचा येतो?
हा किरण कुणाचा डोळां, ती नजर आपुली देतो?
सृष्टीची तुटली नाळ हा कोण दवंडी पिटतो?
उगवता सूर्य विश्वाचा हा कोण भुपाळी गातो?
उपजला कधी, नसताना सदसद् वा अस्ती नास्ती?
जन्माची ज्याच्या वेळ, वेळाच्या जन्मापरती
आदीम क्षणांचा साक्षी, अदृष्ट पाहिले म्हणतो
सत्याच्या खटल्यामध्ये हा कोण पुरावा देतो?
सांकेतिक भाषा याची हो अर्थ गवसता त्रास
खटल्याची तेव्हा पडते ही नवीन तारिख खास
याला न तयाची खंत, हे गाव निरक्षर, झाले!
जाईल पुढिल मुक्कामा, वा त्यापुढल्याही, चाले
कालाच्या आदीपासुन, क्षितिजाच्या अंतापरती
संदेश पसरतो आहे, एक साक्षर शोधत जगती
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3661
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
क्या बात
अच्छा
कविता
निळा पिरॅमीड
कोणता
:-(
पुन्हा
फारसं काही
जन्मजन्मोंतरी
काही कळ्ळं नाही.
कल्पक आशय
छान
प्रेरणा
ह्म्म्म्म
In reply to प्रेरणा by राजेश घासकडवी