लेख भारावून लिहीला आहे हे जाणवते, प्रा. भोसले यांना आदरांजली.
(फक्त बातमी वाचण्याआधी नक्की कोणाचे निधन झाले हे कळले नाही, मी अभियंता या शब्दावरच अडकून पडले).
ह्म्म्म्म.. 'प्राचार्य' हे संबोधन दुसर्या कुणासाठी असुच शकत नाही, असाच भाव निर्माण झाला आहे... आमच्या सगळ्यांमधे प्राचार्य असाच उल्लेख व्हायचा..मला आत्ता तुमची प्रतिक्रीया वाचल्यावर जाणवतय कि मी लेखात त्यांचे नावच लिहीलेले नाही..
'प्राचार्य' हे संबोधन दुसर्या कुणासाठी असुच शकत नाही.
अगदी हेच म्हणतो.
लेख वाचताना गलबलुन आले.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
प्राचार्य. शिवाजीराव भोसले यांना विनम्र श्रध्दांजली.
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
एका संथ लयीत आणि एकातून एक उलगडणार्या वाक्यांची मालिका तासोनतास चालू ठेवणार्या प्राचार्यांचे भाषण ऐकायची संधी काहीवेळा मिळाली. मनावर कायमचा ठसा उमटविणार्या ह्या सरस्वतीसुतास श्रद्धांजली.
ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं
हे वाक्य सर्वार्थाने सार्थ करणार व्यक्तिमत्व.....
प्राचार्यांना श्रद्धांजली!
आंबोळी
वक्ता कसा असावा तर प्राचार्यांसारखा.
उगाच कसलाही अभिनिवेश न आणता जे पोचवायचे ते थेट श्रोत्यापर्यन्त पोहिचवणार. त्यांच्या व्यक्तीमत्वातील साधेपण आअणि भाषेवरचे प्रभूत्व हे त्यांच्या व्याख्यानाचे हायलाईट्स असते.
अनुप्रास साधणार्या कोट्या त्यातून होणारे विनोद आणि त्याचबरोबर श्रोत्यांना दिलेजाणारे बौद्धीक ...एकूणच वातावरण मंत्रमुग्ध होऊनजात असे.
उदा: गर्दी मध्ये दर्दी असू शकतात पण दर्दींची गर्दी असणे हे आगळेच ....
व्याख्यानाचा एकदीड तास आणि त्यानन्तरचे दोनतीन दिवस अक्षरशः भारलेल्या अवस्थेत जायचा. व्याख्यानाची गुंगी उतरूच नये असे वाटायचे
लेख वाचताना गलबलुन आले......... योगेश म्हणाले तशीच अवस्था झाली.
जाउद्या.. ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला...अगदी खरंय!
प्राचार्य. शिवाजीराव भोसले यांना विनम्र श्रध्दांजली.
मी सध्या त्यानी लिहलेले दीपस्तंभ हे पुस्तकच वाचत आहे, मी त्यांची बरिच ध्वनी मुद्रीत असलेली व्याख्याने एकली आहेत. फार सुंदर बोलायचे .
पुन्हा एकदा विनम्र श्रध्दांजली.
त्यांचे "शिवशाही आणि लोकशाही" विषयावरील व्याख्यान ऐकुन भारावलो होतो.. आमचा मित्र ब्रिजेश मुळे असा श्रवण भक्तीयोग अभियांत्रिकी च्या काळात औरंगाबाद्च्या संत एकनाथ रंग मंदिरात आला..
ओजस्वी वक्त्यास श्रद्धांजली!
खुप खोल खोल दाटुन आलय मनात, खुप लिहायचं होतं.. लिहीताही येत नाहिये.. थांबतो..
जाउद्या.. ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला..
खूपच सुंदर लिहिलंत साहेब..जियो..!
प्राचार्यांना आदरांजली..
अनेक व्याख्याने ऐकण्याचा योग आला. इतके ओघवते वक्तृत्व पुन्हा प्रत्यक्ष ऐकायला मिळेल असे वाटत नाही. विवेकानंदांवर ते खूप समरसून बोलत असत. त्यांच्या अभ्यास वादातीत आहे. परंतु त्यांचे योगी अरविंदावरचे पुस्तक फारसे आवडले नव्हते. त्यांची अध्यात्माची आवड वाखाणण्यासारखीच होती पण अध्यात्माचे त्यांनी केलेले उदात्तीकरण मला फारसे पटत नाही.
>> ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला..
माझ्या वरच्या लेखातील शेवटचे हे वाक्य, पुलंच्या एका लेखातील आहे, त्यावेळेला आठवेल तसं भावनेच्या आवेगात लिहुन गेलो. भाईंचा उल्लेख राहीला, क्षमस्व.
पुढील दुव्यावरुन प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची एमपी थ्री स्वरुपातील ३ व्याख्याने उतरवून घेता येतील
१. योगी अरविंद
२. स्वामी विवेकानंद
३. छत्रपति शिवाजी महाराज
http://www.4shared.com/dir/19sXzgYL/Vyakhyane.html
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
श्रद्धांजली
ह्म्म्म्म..
'प्राचार्य'
अच्छा
प्राचार्य
श्रध्दांजली
एका संथ
ही सगळी
वक्ता कसा
लेख
डोळ्यात
प्राचार्य. शिवाजीराव भोसले यांना विनम्र श्रध्दांजली.
विनम्र श्रध्दांजली.
समाजाला
श्रवण भक्ती
प्राचार्य
खुप खोल
किती
हेच म्हणतो
विनम्र श्रद्धांजली
>> ही सगळी
http://tatya7.blogspot.com/20
डाऊनलोड व्याख्याने
धन्यवाद