Skip to main content

वस्ती..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 29/06/2010 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
मी जी दुनिया पाहिली, ज्या दुनियेत राहिलो त्या 'वस्ती'त मला रौशनी नावाची एक घरवाली मावशी भेटली.. त्या वस्तीला, त्या रौशनीला या काही ओळी समर्पित.. वस्ती पाखरांची झळाललेली होती मस्ती कामांधांची उफाळलेली होती! मद्याचे प्याले नाचत होते भूक विश्वामित्राची चाळवलेली होती! गेलो कराया सांत्वन पाखरांचे गात्रे तयांची जळालेली होती! दिले धडे मी शुचिर्भूततेचे यौवंने पाखरांची पोळलेली होती! आला थवा हा नवा पाखरांचा सात्त्विकता तेथे हारलेली होती! --तात्या अभ्यंकर.
लेखनविषय:

वाचने 4104
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

प्रयत्न तात्याशेठ, क्षमस्व, पण तुमच्या व्यतिचित्रां सारखी मजा नाय आली बा.. (स्पष्ट)केशवसुमार स्वगतः हल्ली गद्य लेखकांमध्ये कविता करायचे फॅड आलेले दिसते :W , आधी संजोपराव ~X( , आता तात्या :T कविता म्हणजे काय खाय्ची गोष्ट वाटते की काय ह्यांना..आयुष्य मध्याचा लोच्या दुसर काय (|:

In reply to by पाषाणभेद

स्वगतातल्या गद्य मधल्या ग ऐवजी चुकून म वाचला. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

छान गझल. निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका>(योगेश २४ यांच्या परवानगीने)

मला 'देखावे' पेक्षा ही कविता आवडली. कारण - समजली आणि संदर्भ ही लागले. खरच छान केली आहे कविता. जय महाराष्ट्र , जय मराठी !