मी जी दुनिया पाहिली, ज्या दुनियेत राहिलो त्या 'वस्ती'त मला रौशनी नावाची एक घरवाली मावशी भेटली.. त्या वस्तीला, त्या रौशनीला या काही ओळी समर्पित..
वस्ती पाखरांची झळाललेली होती
मस्ती कामांधांची उफाळलेली होती!
मद्याचे प्याले नाचत होते
भूक विश्वामित्राची चाळवलेली होती!
गेलो कराया सांत्वन पाखरांचे
गात्रे तयांची जळालेली होती!
दिले धडे मी शुचिर्भूततेचे
यौवंने पाखरांची पोळलेली होती!
आला थवा हा नवा पाखरांचा
सात्त्विकता तेथे हारलेली होती!
--तात्या अभ्यंकर.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4076
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडलेली
क्या बात है !
चांगला
उत्क्रांत
In reply to चांगला by केशवसुमार
स्वगतातल्
In reply to उत्क्रांत by पाषाणभेद
छान
कविता
कविता
मला
छान.
प्रतिसादक