एक करता येईल.
काकांना कारण विचारा. कदाचित, ते धडधाकट दिसत असले तरी त्यांना बरे वाटत नसेल किंवा दुसरी काही अडचण असेल. ते कारण तुम्हाला पटले तर काकांना जागा द्या. नाही पटले तर "काका, मला खूप घाई आहे. जमणार नाही." असे स्पष्ट सांगा.
असो.
परदेशातील म्हातार्यांची आपल्या देशातील म्हातार्यांशी तुलना न केलेली बरी. :( आपल्याकडले अनेक म्हातारे वयाच्या ८० व्या वर्षी टुणटुणीत नसतात हे सत्य आहे.
मत आणखी काहीला दिले.
आधी मत दिले आणि मग प्रियालीचा प्रतिसाद बघितला. मलाही तसं काहीसं म्हणायचं आहे. मला शक्य असेल तर मी सहकार्य करेन. शिवाय म्हातारेच नाही तर गरोदर बायका किंवा अजून काही खरंच गरजू असतील तर नक्कीच मदत करेन. आता गरजू आहे की नाही हे ठरवायचे निकष नाहीत पण माझ्या त्यावेळच्या जजमेंट प्रमाणे निर्णय घेईन.
बाकी तिथले म्हातारे आणि इथले म्हातारे यांची तुलना नकोच. पाश्चात्य देशांमधून माणसं शारिरीक दृष्ट्या आपल्या इथल्या पेक्षा जास्त जागरूक असतात पहिल्यापासूनच शिवाय तिथे फारसे कोणावरही अवलंबून न राहता आपले आपण जगायची सवय समाजातच आहे असे वाटते. आपल्याकडे गळ्यात गळे घालायाचा समाजधर्म आहे.
बिपिन कार्यकर्ते
तिथले म्हातारे आणि इथले म्हातारे यांची तुलना नकोच
त्याना तिथे सोशल सिक्यूरीटी असते.
वाहतुकीतून जाताना ( चालताना) रस्ता क्रॉस करताना इथे कित्येक वयस्क लोक वाहनचालकाना अजिजीने विनन्ती करीत असताना दिसतात. रीक्षा/ २व्हीलर चालकाना त्याची अजिबात पर्वा नसते किंवा त्याना तो उर्मटपणा दाखवायला कदाचित आवडत असते. लोकानी चालायचा सिग्नल असला तरी पुणेकर त्याकडे उद्दाम्पणे दुर्लक्ष्य करतात हे दृष्य पुण्यात सर्वत्र दिसते.
एकटे जगणार्या वृद्धाना साधे रस्ता क्रॉस करणे सुद्धाअ पुण्यात किती अवघड झाले आहे. त्यांना थोडी मदत केली तर बिघडले कुठे?
त्यात दोन मिनिटे खर्ची पडली म्हणून असे कितीसे नुकसान होणार आहे?
भारतात असताना मी नेहमीच वृद्धांना (अंदाजे कळेल तसे) जागा करुन देतो(रांगेत, बसमध्ये इ.). धडधाकट वाटले वगैरे तरी कारण त्यांच्या पेक्षा मी नेहमीच धडधाकट असतो ;)
अमेरिकेत मात्र मला (मी धडधाकट आहे, मला गरज नाही) विपरीत अनुभव आल्याने मी थोडा सावध असतो, मदत हवी आहे का इतकं विचारतो मात्र.
-Nile
प्रियाली आणि बिपिनः
तुलना अशासाठी की हे मला दिसलेले काका अगदीच काही म्हातारे किंवा शारीरिकदृष्ट्या विकलांग वाटत नव्हते; पन्नास-पंचावन्न वर्षांचे असतील. पण तरीही रांगेत मागे दोन-तीन (आपल्यापेक्षा) तरूण लोकं दिसत आहेत तर वयाचा फायदा झाला तर वेळ वाचेल असं काहीसं त्यांच्या चेहेर्यावरून मला वाटलं. "माझ्याकडे दोनच वस्तू आहेत त्यासाठी मी दहा-पंधरा मिनीटं का घालवू?" असं काहीसं! मला परदेशी म्हातारे आठवले कारण त्या म्हातार्यांना वयामुळे कोणी सहानुभूती दाखवलेली आवडत नाही तर इथे वयाचा फायदा करून घेण्याचे प्रकार सुपरमार्केटात, रेल्वेच्या तिकीटाच्या रांगेत सगळीकडेच दिसतात.
मी जागा दिली नाहीच, कारण माझ्या हाताला खरंच रग लागली होती आणि पोटात कावळे कोकलायला लागले होते. यांना इथे जागा द्यायची आणि स्कूटर चालवत घरी जाताना भुकेने माझ्या हातून काही अपघात व्हायचा असाही विचार डोक्यात येऊन गेला.
खरंच अपंग असतील, गर्भवती महिला, कडेवर तान्हुलं घेऊन जाणारे पालक असतील तर अनेकदा त्यांनी न मागता, विचारता मी त्यांना रांग मोडायला सांगते; ट्रेनमधे आरक्षण असेल तरीही मी उभी रहाते पण त्यांना जागा देते.
अदिती
यात फरक आहे. बसमधली जागा माझी स्वतःची असते. खूप वेळा वृद्ध व स्त्रियांना (विशेषतः गरोदर किंवा मूल असलेल्या) जागा दिलेली आहे.
रांगेत मी मागच्या सर्वांच्या बाबतीत निर्णय घेऊन त्यांची प्रत्येकी दोन मिनिटं वाढवत असतो. खूप वेळा गैरफायदा घेणारेही दिसले आहेत. त्यामुळे पर्याय २ ला मत दिलं आहे. व्हीलचेअरवर किंवा अगदी त्राण नसलेल्याला जागा देईनही.
आणखी काहीला मत दिले आहे. म्हणजे असे की हे "केस बाय केस" बेसीसवर बदलू शकते असे म्हणायचे आहे.
तुम्ही सांगितलेल्या संदर्भात दुर्लक्षच करेन अथवा वर प्रियाली आणि बिपिनने म्हणल्याप्रमाणे "का" म्हणून (सभ्यपणे ;) ) विचारेन.
माझे आजोबा वयाच्या पंच्याऐशी पर्यंत फलटणमध्ये सायकल चालवायचे. ठाण्याला आले असताना त्यांना रहदारी जास्त असल्याने, नुसता राम-मारूती रस्ता क्रॉस करायला आई-बाबांनी मदत करायला सांगितली तर, "मी काय म्हातारा आहे का?" म्हणायचे... तरी देखील आपल्याकडील आणि पाश्चिमात्य राष्ट्रातील वृद्धांच्या तब्येतीत खूप फरक असू शकतो. मात्र त्याचा येथे संबंध नाही. एकूणच दुसर्याला किव अथवा करूणा करायला लावून फायदा घेण्याच्या वृत्तीचा संबंध आहे असे वाटते.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
अदिती, त्यांनी विकलांग असायला हवे असे नाही ना. कदाचित त्यांना डायबिटिस असेल. चक्करल्यासारखे वाटत असेल. कधीकधी वयस्क माणूस धडधाकट असतो पण तरीही त्याची अडचण असू शकते. माझा अनुभव असा आहे की चटकन कारण विचारले आणि माणूस सराईत नसेल तर गडबडतो. तो गडबडला की चलाखी आपल्याला समजून येते. मग आपण त्यांना सांगू शकतो की "मी घाईत आहे. थकलेली आहे. तुम्ही मागून या."
मला परदेशी म्हातारे आठवले कारण त्या म्हातार्यांना वयामुळे कोणी सहानुभूती दाखवलेली आवडत नाही तर इथे वयाचा फायदा करून घेण्याचे प्रकार सुपरमार्केटात, रेल्वेच्या तिकीटाच्या रांगेत सगळीकडेच दिसतात.
आपल्याकडे दिसते हे खरे असावे कारण मदत करण्याची, मोठ्यांचा मान राखण्याची आपली पद्धत आहे.
परदेशातही त्यांना सहानुभूती नको असते पण मदत केली तर कधीतरी ते त्यांनाही आवडते. पूर्वी माझी शेजारीण ८२ वर्षांची वृद्धा होती. गपीष्ट होती. ग्रोसरी करून आली की दुधाचे कॅन वगैरे उचलण्यास तिला त्रास होत असे. अशी कधी मला बाहेर भेटलीच तर तिच्याशी बोलता बोलता मी तिचा कॅन उचले. तिने कधी मला रोखले नाही. तिच्या दारात तो कॅन पटकून मी चालू पडत असे. तिने मला मदत कर म्हणून सांगितले नाही आणि मदत करू नकोस असेही सांगितले नाही पण पुढे काही घडलेल्या घटनांवरून तिच्या मनातली आमच्याबद्दलची प्रतिमा चांगली होती हे जाणवले होते.
आता काका वयस्क नव्हते तर त्यांना मदत करण्याची आवश्यकता नाही पण मग पार्श्वभूमीत वयस्क माणसांसाठी लिहिलेल्या ओळींचीही आवश्यकता नाही. :)
१) त्या व्यक्तीची परिस्थीती (अपंग/गर्भवती/व्रुद्ध्/त्राण नसणे वगैरे)
२) आपली घाई/ उपलब्ध वेळ
मदतीला तयार असूनही कधी संधीच मिळाली नाही ( फक्त रांग नव्हे तर अपघात वगैरे. हा आता त्यासाठी तो व्हावा अशी इच्छा नाहीये :)) )
हा अनुभव वाचून असे वाटले की हे काका फक्त वेळ वाचवायला पुढे घुसायचा प्रयत्न करताहेत.
कदाचित बाहेर कोणी त्यांच्याकरता थांबले असेल.
प्रियालींचा मुद्दा कळला नाही.
या अनुभवाचा आणि परदेशांतील व्रुद्धांचा काय संबंध ?
असा अनुभव जगात कुठेही येऊ शकतो.
(२) ला मत दिलं आहे कारण मी त्या आजोबांना जागा दिली आणि मागचं कोणी भांडायला उठ्लं तर माझी तंतरेल
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
'आणखी काही' या पर्यायास मत दिले आहे.
वेळेप्रमाणे ठरेल.
आजीआजोबा पुरेसे वयस्कर असायला हवेत.
कधीकधी तरण्याताठ्यांनाही खरच रांग मोडून जाण्याची गरज असू शकते.
आजी आजोबा लोक बंडला मारू शकतात तर तरूण लोकही गरजू असू शकतात.
माझे पूर्वीचे शेजारी शुगरमन आजोबा (पणजोबा) त्यांच्या पणतवाला अठवड्यातून ३ दिवस संभाळायचे. नंतर ते कॅन्सरने गेले. ते अगदी शेवटच्या दिवसात असताना आज्जीनी लांबून मला बघितले. घाईघाईने येवून आजोबांबद्दल सांगत होत्या. त्यांना तेवढंच बरं वाटलं. आधी अनेकवेळा बाजारहाट करून येताना आम्ही त्यांच्या घराचे दार उघडून देत असू. पण त्यांनी स्वत:हून कधीही मदत मागितली नाही.
याउलट अनुभव पुण्यात आला. वीजबिल भरायला आलेले आजोबाटाइप गृहस्थ रांगेत घूसू पहात होते. आता नेमका ज्याचा नंबर होता तो टग्या निघाला. आजोबा घाईघाईने म्हणाले,"झालच आहे." टग्याने त्यांना बरोब्बर पकडून सर्वांसमक्ष म्हणाला," आमचंही झालच आहे, धुवायचं राहिलय, जावा मागे." सगळ्यासमोर हसं झालं.
रेवती
सर्वात प्रथम माझे मत सांगतो 'वयस्कर (अगदी ५० चा पण ), आजोबा टाईप, गरोदर स्त्रिया, लहान मुले बरोबर असलेली स्त्री / पुरुष ( अगदी २५-२६ चा पण )' आदी जणांना आम्ही जिथे शक्य असेल तिथे अवदी अवश्य जागा देतो.
का ?
माहित नाही, त्या क्षणाला आम्हाला जागा द्यावी अशी इच्छा होते व आम्ही जागा देतो, सो सिंपल !
>>वीजबिल भरायला आलेले आजोबाटाइप गृहस्थ रांगेत घूसू पहात होते. आता नेमका ज्याचा नंबर होता तो टग्या निघाला. आजोबा घाईघाईने म्हणाले,"झालच आहे." टग्याने त्यांना बरोब्बर पकडून सर्वांसमक्ष म्हणाला," आमचंही झालच आहे, धुवायचं राहिलय, जावा मागे." सगळ्यासमोर हसं झालं.
???
कमाल आहे !
आजकाल लोकांना कुठे टॉण्ट्स मारावेत, कुठे कुजकट बोलावे, कुठे तत्वज्ञान पाजळावे व कशावर निर्लज्जासारखे दात काढावेत ह्याचे 'तारतम्य'च नाही राहिले असे खेदाने म्हणावे लागेल.
अर्थात हे आमच्या वैयक्तिक अनुभवातुन आलेले मत आहे म्हणुन आम्ही त्यावर ठाम आहोत.
असो, आमचे मत 'पहिल्या पर्यायाला' दिले आहे.
------
छोटा डॉन
अश्यावेळी आजोबांनी सरळपणे विचारले का नाही? शक्यतो कोणी नाही म्हणत नाही पण "मी वयस्कर आहे (किंवा जे कारण असेल ते) पुढे गेलो तर चालेल का?" असे विचारले तर कुठे बिघडते?
मागचे तरणे बापडे/बाया असले तरी प्रत्येकाला आपापली कामे असतात. अगदी कडेवरची नसली तरी ३ ते ४ वर्षाच्या मुलांना घेवून आलेले आया/बाप असतात. नेमकी मुलांना शू लागलेली असते. अश्यावेळी "बाळा, आपला नंबर येइलच आता, पटकन काम करून जावू." असे लोकही असू शकतात. घरी जावून वयस्कर व्यक्तींना घेवून डॉ. कडे जाणे. वेळेवर औषधे देणे, स्वयंपाक करणे इ. कामे असताना जी तारांबळ उडते त्यात ती व्यक्ती आपले काम आधी करणार कि दुसर्यांचे? तरीही मुद्दाम अडवणूक करणारे सगळेच नसतात. विचारलं तर तेवढच बरं वाटतं. शेवटी काही झाले तरी मध्ये जाणार्या अश्या व्यक्ती दुसर्याच्या हक्काचा नंबर घेउन जाणार असतात. आपला नंबर येइपर्यंत तासभर वाट पाहून झाल्यावर मध्ये घुसताना विचारणेही जमत नसले तर कसले आलेत सिनियर? नुसते केस पांढरे होवून सिनियर म्हणवणारे बरेच असतात.
रेवती
ज्यावेळी जे योग्य वाटेल ते करते...कारणं सगळ्याच गोष्टीना असतात...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
गेले बरेच दिवस काही विचार डोक्यात येत होते. मोठे आहेत म्हणूनच एखाद्या माणसाला मान, सन्मान, आदर द्यायचा का? एखादा माणूस आपल्या आधी जन्माला आला या आणि याच्च कारणामुळे त्या माणसाला मान का द्यायचा?
कोणत्याही कारणासाठी मान मागावा लागला तर मान राहिला का? माझेही आजोबा मला कधी कधी रस्ता ओलांडताना "चल पटकन" असं म्हणत ऑलमोस्ट धावडवत न्यायचे, तेव्हा वय असेल ८५ च्या आसपास! आणि हे पहाणार्या साधारण पासष्टीच्या माणसाने एकदा त्यांना रस्त्यात वाकून नमस्कार केला होता. सगळेच लोकं अशी तब्येत टिकवून असतील असं नाही, पण मग हिंदीत ज्याला बटोरना म्हणतात, तसं "सहानुभूती, कीव बटोरना" हा प्रकार का? "मी मोठी/ठा आहे म्हणून मला नियम लागू होत नाहीत" असं जर आपण आपल्या घरातल्या लहान मुलांना शिकवलं तर काय परिणाम होतील? हाच न्याय जर घराबाहेरही लावला तर कुठे चुकतं का?
रेवतीताईनेही उदाहरण आणि स्पष्टीकरण दिलं आहे, गरज काही फक्त उतारवयामुळेच निर्माण होते असं नाही; लहान मुलं, मधुमेही, रूग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांनाही वेळेची निकड असते. बर्याचदा घरात वेळ जात नाही म्हणून निवृत्त झालेले लोकंही अशी "वेळखाऊ" कामं करायला येतात. अशा वेळी ज्या तरूण लोकांना, ज्यांचा घरी कामं खोळंबली आहेत, ऑफिसात मस्टर वाट पहात आहे, अशांनाच रांगेत मागे ढकलण्यात किती शहाणपणा?
कालच्याच माझ्या प्रसंगात माझ्या अगदी तोंडावर आलं होतं, "काका, पाच मिनीटं दुसर्या दिशेला चाललात तर वाण्याचं दुकान आहे, तिथेही हेच बिस्किटाचे पुडे, याच किमतीला मिळतात आणि तिथे अशी रांगही लावावी लागत नाही." एक-दोन किरकोळ वस्तू घ्यायला सुपरमार्केटात यायचं आणि दुसर्याला रांग मोडू देण्याची विनंती करायची याची गरज काय? (त्यातूनही माझ्या पहाण्यात आजकालची फुकट गेलेली तरूण मुलं शांतपणे रांगेत वाट पहात उभी रहातात आणि रांग मोडण्याचा हट्ट करणारे मात्र म्हातारेच असतात.) एकाद्या ठिकाणची एखादी सिस्टम आहे म्हणजे आहे, ती मोडण्याची एवढी इच्छा कुठून निर्माण होते?
पिकल्या केसांबरोबर शहाणपण आणि रांगेतूनच पुढे सरकण्याची सहनशक्ती येत नसेल तर त्या पिकल्या केसांना किती आदर द्यावा?
अदिती
गरज काही फक्त उतारवयामुळेच निर्माण होते असं नाही; लहान मुलं, मधुमेही, रूग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांनाही वेळेची निकड असते.
अगदी..
परदेशातला एक अनुभव सांगते,
सहसा कोणी वयस्क मंडळी येथे मदत मागताना दिसत नाहीत,त्यांना सहानुभूती दाखवलेली आवडत नाही. पण एकदा मी ट्रामने जात असताना पहिल्या रांगेतल्या सिंगल सीटवर बसले होते. (जी माझी अगदी आवडती जागा आहे..) त्याच्या शेजारच्या दोन माणसांच्या आसनावर खिडकीकडील बाजूत एक काळा तरुण बसला होता. पुढच्याच स्टॉपला एक साठी/पासष्ठीची महिला ट्राममध्ये चढली आणि तिने मला माझ्या जागेकरता विनंती केली. वास्तविक माझ्या शेजारच्याच सीटवर खिडकीची नसलेली एक जागा रिकामी होती, मी तिला ती दाखवली तर नाक मुरडून ती म्हणाली ती जागा खिडकीची नाहीये.तिची अपेक्षा मी तिला खिडकीची सिंगल सीट द्यावी, तो तिचा हक्कच आहे अशी दिसली.
अर्थातच मी माझी जागा तिला दिली नाही. ती तश्शी तिथेच माझ्याकडे रागाने पाहत उभी राहिली आणि मी खिडकीतून बाहेर पाहत राहिले. पुढे ४ स्टॉप ती रिकामी जागा मात्र तशीच रिकामीच होती!
सबब, लगेच जागा करुन न देता आधी कारण विचारेन ,योग्य वाटले तर रांग मोडू देईन अथवा जागा देईन.
स्वाती
त्या स्त्रीला खिडकी नको असावी असा प्राथमिक अंदाज. केवळ तिथे काळा मुलगा होता म्हणून तिने ती जागा नाकालई असावी असे वाटते का?
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
आदिती जर आजोबा आजारी वगैरे असतील तर ठिक आहे. त्यांना उभ राहायला त्रास होत असेल तर त्यांना प्राधान्य द्यावे. पण जर आपण त्यांच वय पाहून आपली गैरसोय करुन सहानुभुती दाखवली की आपण एक प्रकारे त्यांना परावलंबी बनवतो अस मला वाटत.
सर्व पर्यायांचा वेगवेगळ्या वेळी/ परिस्थितीत वापर करेन.
काय आहे शक्य तेव्हा इतरांना मदत केली असल्याने, मला जेव्हा घाई असेल तेव्हा सभ्यपणे नकार द्यायला काहीही अपराधी वाटणार नाही.
पहिल्या पर्यायाला मत दिले आहे..
जाऊ द्या! माणूस वयस्कर आहे. खरं-खोटं त्याला माहीत.. असेल त्याचाही काहीतरी शारिरीक प्रॉब्लेम.. किंवा नसेलही.. आपल्या 'काका'पणाचा कदाचित तो गैरफायदाही घेत असेल..
जाऊ द्या.. आपल्यालाही केव्हातरी म्हातारं व्हायचं आहे..
तात्या.
जिथे जिथे असे प्रसंग आलेत तिथे त्या म्हातार्या माणसाला मी आजवर जागा दिली आहे. पहिल्या पर्यायाला मत दिलंय. माझं लॉजिक सोपं आहे.... माणूस म्हातारा/री आहे, ह्या वयात पेशन्स कमी कमी होत जातो आणि शरीराची ताकद क्षीण होत जाते. उगाच त्यांना नाकारून नंतर मनात चुटपुटण्यापेक्षा त्यांना द्यावी जागा आणि मोकळे व्हावे!
अर्थात हा चांगुलपणा अनेकदा नडतोही! ज्याला जागा दिली तो माणूस त्याचेच पाल्हाळ लावतो/ चेंगटपणे काम उरकतो/ उगीच वेळकाढूपणा करतो तेव्हा डोक्यात जाऊ लागतो. त्याला खडसावावे असे वाटते. पण अश्या वेळी मी माझे आजी आजोबा आठवते आणि आपण त्यांना असे प्रश्न विचारले असते का, हा विचार करुन गप्प बसते.
सर्वात शेवटी त्या व्यक्तीच्या वयाचा आणि पिकल्या केसाचा परिणाम म्हणून का होईना, कधी नाईलाज म्हणून किंवा कधी खुशीनेही त्या व्यक्तीला जागा करुन देते.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
आणखी काही ला मत दिले आहे..
हे त्यावेळेसची परिस्थितीनुसा ठरवायचा प्रयत्न करतो..
शक्यतो त्यांना जागा करुन द्यायचा प्रयत्न करतो पण कधी कधी ते शक्य होईलच असे वाटत नाही.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
पहिल्या पर्यायाला मत दिलं आहे.
जडण घडणच अशी झाली आहे की नेहमी मोठ्यांना मदत करावी.
त्यामुळे अनेकदा गैर फायदाही घेतला गेलाय. पण गरजुंना मदत करायला हात पुढे होतोच.
इकडे जपानातली म्हातारी माणसं (खरचं म्हातारी म्हणावी इतकी) शक्यतो मदत मागत नाहीत आणि जर तुम्ही केलीच तर ते कमीत कमी ५-६ वेळा तरी 'धन्यवाद' म्हणतील नाहीतर 'तुम्हाला माझ्या मुळे त्रास होत आहे, माफ करा' असे म्हणतील.
इथे तर दुसर्यांचा आदर करणारे काही माथेफिरू पण आहेत. उदाहरणच द्यायच झालं तर एकदा एका मेट्रो स्टेशनवर मी लिफ्ट वापरत होतो. लोकं पटापट लिफ्ट्मधे शिरली आणि शेवटी एक म्हातारी(साधारणपणे ७० च्या वरच असावी) आत आली.
नेमकी ती आत यायला आणि 'Overload' व्हायला एकच वेळ. १०-१५ सेकंदानी कुणी बाहेर जात नाही हे पाहून ती म्हातारी लिफ्ट्च्या बाहेर गेली.
त्यानंतर जेव्हा लिफ्टच दार उघडलं तोच एक जोरदार आवाज आला.
माझ्या समोरच्या एका साधारण ४० च्या आसपासच्या एका माणसाने त्याच्या पुढे असलेल्या माणसाच्या पाठीवर जोरदार फटका मारला.
नंतर तो त्या माणसाला मारत मारत स्टेशनच्या बाहेर घेउन गेला.
आणि जाताना मारत ओरडत होता 'च्यान्तो यात्ते नाई'....
नंतर मला कळालं की तो म्हणत होता 'तू हे ठीक नाही केलसं'....
तेव्हापासून मी शक्यतो जागा देतोच असं कोणी म्हातार असल्यावर....
मार खायला आपण घाबरत नाही, पण मारणारा कशासाठी मारतोय हेच नाही कळालं तर काय उपयोग?
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
आहे. माझ्या पी.एन.बँकेच्या आणि टेलिफोन बिलाच्या (एमटीएनएल)च्या काउंटरवर 'ज्येष्ठ नागरिकांसाठी' असे लिहिलेले फलक सुद्धा आहेत. तिथे जाऊन उभे राहिल्यास माझे काम लगेच होऊ शकते. पण मी नेहमी सामान्यांच्या रांगेतच उभा राहतो. कारण
१. त्या रांगेतून सुद्धा १०-१५ मिनिटात काम होतेच. तेवढा वेळ थांबल्याने माझे काही बिघडत नाही.
२.इतरांना महत्वाची कामे असू शकतात. त्यांचा वेळ माझ्या वेळेपेक्षा अधिक मौल्यवान असेल.
मात्र बसमधील राखीव जागेवर नेहमीच आपला हक्क बजावतो, कारण सांगण्याची गरज नसावी.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
घारे काका,
जर वृद्धांसाठी वेगळ्या सोयी असतील तर त्या त्यांनी अवश्य घ्याव्यात असं वाटतं..
उदा. वृद्धांसाठीची जागा मोकळी ठेवून तुम्ही तरूण माणूस बसू शकेल अशा जागी बसलात.. तर तुम्ही तरूण माणूस बसू शकेल अशी एक जागा अडवता आहत.. कारण तो तरूण माणूस वृद्धांसाठीच्या राखीव जागी बसू शकत नाही.. हेच रांगेच्या बाबतीत.. तुम्ही वेगळी सोय असताना सगळयांच्या रांगेत उभे राहीलात तर तुम्ही तुमच्या मागे असलेल्यांचा काही मिनिटे का होईना वेळ घेत आहातच, हो की नाही? :)
उपास मार आणि उपासमार
उदा. वृद्धांसाठीची जागा मोकळी ठेवून तुम्ही तरूण माणूस बसू शकेल अशा जागी बसलात.. तर तुम्ही तरूण माणूस बसू शकेल अशी एक जागा अडवता आहत..
हे खरं आहे पण मुळात वृद्धांसाठीची जागा मोकळी ठेऊन तरूण माणूस बसू शकेल अश्या जागी घारेकाका बसणार नाहीत असे वाटते.. ते बहुधा वृद्धांसाठी मोकळ्या असलेल्या जागीच बसतील..
तात्या.
तुनचा गैरसमज होतो आहे.
कारण तो तरूण माणूस वृद्धांसाठीच्या राखीव जागी बसू शकत नाही..
जेंव्हा असे होत नाही तेंव्हा मी आपला हक्क बजावण्यासाठी त्या तरुणाला उठवतो. इतर वेळी ही मी शक्यतो राखीव जागेवरच बसतो. राखीव जागा रिकाम्या पडलेल्या आहेत आणि बिचारे तरुण पुरुष उभे राहिले आहेत असे दृष्य मी एकदासुद्धा पाहिलेले नाही.
तुम्ही वेगळी सोय असताना सगळयांच्या रांगेत उभे राहीलात तर तुम्ही तुमच्या मागे असलेल्यांचा काही मिनिटे का होईना वेळ घेत आहातच, हो की नाही?
वृद्धांसाठी वेगळ्या खिडक्या उघडून त्या रिकाम्या ठेवण्याइतके आपण श्रीमंत नाही. सामान्य रांगेच्याच बाजूने पुढे जाऊन थेट काउंटरपाशी गेल्यास ज्येष्ठ नागरिकाचे काम लवकर केले जाते. कधी कधी अशा ज्येष्ठांच्याही रांगा लागतात. तसे झाले तर आळीपाळीने सामान्य आणि विशेष रांगामधून नंबर लागतो.
हा प्रतिसाद लिहिण्यामागील माझा उद्देश एवढाच आहे की परदेशातले वृद्ध तेवढे चांगले आणि आपले म्हातारडे आळशी हा सूर मला आवडला नाही. सगळीकडे सगळ्या प्रकारची माणसे असतात.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
घारे काका, सगळेच वृद्ध लोकं असे असतात असं अजिबात म्हणायचं नाही आहे. विकासने आणि मी आपापल्या आजोबांबद्दल लिहिलं आहे; अशी टुणटुणीत आणि तुकतुकीत म्हातारी माणसं मी लहानपणापासून घरात पाहिलेली आहेत त्यामुळे दुसर्या प्रकारची म्हातारी माणसं पाहिल्यावर थोडा राग येतो.
म्हातारी होईपर्यंत जगले वाचले तर तुमच्यासारखंच म्हातारं व्हायला आवडेल ... चेहेर्यावर सुरकुत्यांबरोबर अजीजी असलेली मलातरी आवडणार नाही.
अदिती
घारेकाका.. तुमचा मुद्दा बरोबर आहे..
>>वृद्धांसाठी वेगळ्या खिडक्या उघडून त्या रिकाम्या ठेवण्याइतके आपण श्रीमंत नाही.
पटतय. ह्या मुद्द्यात आणि 'वृद्धांना वेगळ्या सोयी (उदा. खिडक्या) असाव्यात ह्या मुद्द्यात समतोल साधण आवश्यक पण तितकच कठीण काम आहे. जर समाजातील वृद्धांना अतिरीक्त सोयी हव्या असतील तर त्याचा बोजा कुणालातरी उचलावा लागणारच ना (येथे, इतर तरुणांचा रांगेतील वेळ किंवा मग वेगळी खिडकी ठेवून त्यावर व्यपस्थापनाने केलेला जास्तीचा खर्च.. )
थोडक्यात, जिथे सोयी आहेत तिथे वृद्धांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि जिथे नाहीयेत आणि असायला हव्यात त्यासाठी पाठपुरावा करावा (उदा. जनरल स्टोअरमध्ये वृद्धाची वर्दळ जास्त असेल तर त्यांच्यासाठी वेगळी रांग..)
बाकी देशातील आणि परदेशातील वृद्धांबाबतचा तुमचा मुद्दा बरोबरच ..
उपास मार आणि उपासमार
पहिल्या पर्यायाला मत दिलं आहे,
ह्यात गैरफायदा घेतला जाउ शकतो पण बेनिफिट ऑफ डाउट म्हणून नेहमीच जागा देइन.
परदेशात वृद्ध, अपंग यांच्यासाठी बर्याच सोयी-सुविधा आहेत, ज्या आपल्याकडे नाहीत . त्यामुळे तुलना करणं बरोबर वाटत नाही.
पुष्करिणी
नेहमी आपण जागा देतो.पण नेमक एखाद्यावेळी दिली नाही तर चुटपुट लागुन राहुन कौल काढावा लागु नये म्हणुन पटकन देउन टाकावी हे उत्तम
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
अंमळ गल्लत होतीये! मी चुटपुट लागल्यामुळे कौल काढलेला नाही; अलिकडच्या काळात अशा गोष्टी बर्याचदा पाहिल्यामुळे वैतागून हा धागा काढला आहे. त्यामुळेच घारेकाकांसारखे समजूतदार सिनीयर सिटीझन्सही दिसले, आपल्यासारखंच काही इतरांनाही वैताग येतो हे ही दिसलं.
पुष्करिणी, घारेकाकांनी लिहील्याप्रमाणे आपल्या देशातही वृद्धांसाठी काही सोयीसुविधा आहेतच.
नेकी तर मी केलीच, रांग लावणार्या मागच्या लोकांसाठी! दहा-दहा मिनीटं हातात सामान घेऊन दुकानात त्यांनी रांग लावली होती आणि ते सुद्धा कुठेही गडबड न करता!!
अदिती
हे विचार स्वगत होते /आहेत. मला चुटपुट लागुन राहिली असती. मला चुटपुट लागुन राहिली तर मी नक्की धागा काढला असता. एकदा हा धागा काढला ही होता
आपल्याला उद्देशून असे लिहायचे धाडस आमचे होणार नाही. आमचा तो हक्कही नाही याची जाणीव आम्हाला आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
स्वतःचा अनुभव बघता पर्याय एकला मत दिले आहे.
>> माहित नाही, त्या क्षणाला आम्हाला जागा द्यावी अशी इच्छा होते व आम्ही जागा देतो, सो सिंपल !
१००% माझ्या मनातलं वाक्य डॉन्याने आधीच लिहून ठेवलं होतं.
आणखी काही..
गोष्ट क्षुल्लक वाटत असली तरी तार्किक तसेच व्यावाहारीक दृष्ट्या विचार करता..
१. आजोबांना जागा दिल्यास, तुम्ही आजोबांना उपकार करायचं क्रेडीट घेताय पण मागे रांगेत १० जण असतील तर त्यांची प्रत्येकी २ प्रमाणे २० मिनिटे घेताय..
२. तुम्ही हे करत असताना त्याहून वयस्क आजोबा आले तर काय कराल? त्यांनाही तुमच्या पुढे नंबर द्याल म्हणजे मागच्या लोकांची अजून २ मिनिटे गेली..
३. विचार करा तुम्ही त्या लायनीत दहाव्या नं वर उभे आहात? तुम्ही काय विचार कराल? पुढच्या माणसाने कुणालाही (वयस्क, विमनस्क, गरोदर..) घुसवण्याचा अधिकार त्याला (पुढच्या माणसाला) कुणी दिला? सुपरस्टोअर मधे तसे लिहिले आहे का (उदा. जसे बसमध्ये लिहिलेले असते)? फार तर सुपरस्टोअरला वृद्धांसाठी वेगळी रांग करण्याची विनंती करु शकता.. म्हणजे पुढच्या वेळी म्हातार्या माणसांवर अशी वेळ येऊ नये.. त्यात सुद्धा जास्त म्हातार्याने कमी म्हातार्याच्या पुढे घुसायचं का हे सुद्धा त्या सुपरस्टोरलाच ठरवू द्या :) .. बाकी एका वयस्कावर उपकर करुन इतरांचा वेळ घेणे तद्दन चुकीचेच वाटते..
भारतातल्या लोकसंख्येचा विचार करता आपण अशा किती आजोबांना पुरेसे पडणार आहोत?
वर घासकडवींनी विषद केल्याप्रमाणे बसमध्ये बसण्याची जागा आणि रांगेतला नंबर ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत.. शिवाय रांग कुठली (पाणचट चित्रपटांच्या तिकीटांची, रेशनची की अजून कसली..) ह्यावरुनही अनुमान बदलू शकते.. ;) असो!
उपास मार आणि उपासमार
तुमचे प्रतिसाद पटले आहेत.
सुपरमार्केटमधेही गर्दीच्या वेळी क्विक चेक-आऊट असेल तरीही बरीच कटकट कमी होईल. ज्यांच्याकडे पाचपेक्षा कमी गोष्टी आहेत त्यांच्यासाठी वेगळाच काउंटर असेल तर ट्रॉलीभर सामान असणार्यांच्या चेक-आऊटची वाट पहावी लागणार नाही.
अदिती
+१
एक्स्प्रेस चेक-आउट ची सोय असेल तर थोडा भार कमी होइल.
इथे 'सेल्फ चेकआउट' ची सोय मला फार उपयोगी वाटते... स्वतः सामान स्कॅन करून, पैसे (कार्डने) भरुन पिशव्या भरून चालू पडायचे... बहुतेक आजी-आजोबा व वेळखाउ काका-काकू ह्या सेल्फ चेकाआउटच्या भानगडीत पडत नाहीत.
थोडसं अवांतर..
सार्वजनिक ठिकाणी, जाने-दो, चलता है, एवढं काय उगाळायचं ते. .असं म्हणत आपण "सामाजिक शिस्त" मोडतो किंवा तशी मोडणार्यांना प्रोत्साहन देतो असं स्पष्ट वाटतं. काथ्याकूट करण्यासारखा विषय नसला तरी साध्या साध्या गोष्टीतही आपण (म्हणजे आपली सिस्टीम) डोक्याने काम का करत नाही हे कोडं सुटत नाही..
अवांतरः एखाद्या ठिकाणी एकापेक्षा जास्त खिडक्या असतील आणि माणसे लाइनित असताना नविन खिडकी उघडली की होणारी पळापळ तुम्ही पाहिली असेलच.. किंवा एखादेवेळी एक लाईन पुढे सरकते आणि दुसरी (कदाचित तुम्ही आहात ती) पुढच्या माणसास वेळ लागत असल्याने फारच हळू हळू पुढे सरकते, त्यामुळे कदाचित तुमच्या नंतर आलेला माणूस केवळ सुदैवी म्हणून त्याचा दुसर्या रांगेत नंबर लागून काम करुन जाऊ शकतो.. रांग लावण्याचे प्रयोजनच "जो आधी त्याचे काम आधी' असे असेल तर ते अर्थातच सफल होत नाही. ही गोष्ट कितीही क्षुल्लक वाटत असली तरी बेशिस्त आहेच. त्यापेक्षा एकच लाईन आणि त्यातली सगळ्यात पुढची व्यक्ती जी खिडकी उपलब्ध असेल त्यावर जाईल (उदा. टोकन सिस्टीम) ही सगळ्यात उत्तम योजना. असो, लहान लहान गोष्टीतून आपण सामाजिक न्याय आणि शिस्त पाळू शकलो आणि ती पाळायला हवी ह्याची स्वतः जाणीव ठेवून इतरांना जाणीव करून देउन ती पाळायला प्रोत्साहीत करु शकलो, तरच देश म्हणून प्रगती करु शकू अन्यथा नाहीच .....
अवांतर फारच झाले बहुतेक.. :)
उपास मार आणि उपासमार
काय पाल्हाळ लावलंय ? त्या वेळेस जर वाटत असेल जागा द्यायची तर द्या नाहीतर नका देऊ...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
येथे सर्व 'वय व शरीर' ह्या गोष्टींचाच का सबंध लावतायत?????????/
का 'वय व आदर' हे नाही महत्वाच??
फक्त बोलत नाही मी क्रुती केलेली सांगतो.........
काल ठाण्याला 'चरीत्र प्रमाणपत्र' संबंधात गेलो होतो.अवश्यक कागद जमा करता करता वेळ नुघुन गेली व 'नियमबाह्य' काम करणार म्हणुन अधिकारी भाव खाउ लागले.माझ्याबरोबर दोन 'पिकलेले' ग्रुहस्थ होते.खुप रखडवल्यानंतर आम्हाला आत बोलावल तेव्हा अधिकारी म्हणाला 'हां,बसा कदम'.माझ्या थकव्याने झालेल्या चेह-याकडॅ बघुन त्याने ते बोलले.घामाने पार भिजुन गेलो होतो.पण मी बसायला जाणार तोच बाजुला दोन आपल्यापेक्षा मोठे उभे आहेत हे कळल व मी त्यांना 'बसा काका' म्हटल त्यांनी 'नाही बस तु' वगैरेची फॉर्मालीटी पुर्ण केली व ते बसले.मी बाहेर वाट बघत असताना बसायला दोनच खुर्च्या होत्या म्हणून मी कधी ते बाहेर गेले तरच अधिकारांच्या नावाने बोंबा मारत बसायचो.
ट्रेन मधेही असच करतो...........पण एखाद्या स्त्रीला मनात असुनही जागा देत नाही,स्मार्ट असली की उगाच इम्प्रेशन मारतोय असे भाव तिच्या कींवा बघणा-याच्या तोंडावर दीसतात.
अशी जागा वगैरे करुन देणे हा एक प्रकारचा आदर असतो,असा आदर आपल्यापेक्षा मोठ्यांना द्यायचा की त्यांचे शरीर धडधाकट आहे की नाही ते बघुन द्यायचा हे आपल व्ययक्तीक मत आहे.
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
कारण विचारा
In reply to कारण विचारा by प्रियाली
आणखी काही
दुर्लक्ष
आधी मत
In reply to आधी मत by बिपिन कार्यकर्ते
तिथले
भारतात
तुलना अशासाठी
रांग व बसची जागा
आणखी काही
विकलांग
आणखी काही
In reply to आणखी काही by चतुरंग
:)
१) त्या
हा अनुभव
(२) ला मत
परिस्थिती
आणखी
'आणखी काही'
???
In reply to ??? by छोटा डॉन
अश्यावेळी
ज्यावेळी
मोठे आहेत म्हणूनच ...
अवांतरः
In reply to अवांतरः by परिकथेतील राजकुमार
हे येवढेच
In reply to अवांतरः by परिकथेतील राजकुमार
हे येवढेच
In reply to अवांतरः by परिकथेतील राजकुमार
मुक्तपीठ..?
In reply to अवांतरः by परिकथेतील राजकुमार
अगायाया
सहमत!
In reply to सहमत! by स्वाती दिनेश
खिडकी का वर्ण?
आदिती जर
ऑल द अबाउ
पहिल्या
जिथे जिथे
आणखी काही
तुम्ही काय कराल? व्हेरी शिंपल
पहिल्या
शक्यतो प्रयत्न करील जागा द्यायचा..
सहमत ,पहिल्या पर्यायाला मत दिले आहे.
मी एक ज्येष्ठ नागरिक
In reply to मी एक ज्येष्ठ नागरिक by आनंद घारे
थोडसं असहमत..
In reply to थोडसं असहमत.. by उपास
उदा.
In reply to थोडसं असहमत.. by उपास
वेगळी सोय नसते
In reply to वेगळी सोय नसते by आनंद घारे
घारे काका,
In reply to वेगळी सोय नसते by आनंद घारे
हो ते खरे आहे घारे काका...
In reply to वेगळी सोय नसते by आनंद घारे
लक्षात येतय..
नेकी कर
पहिल्या
येथे
In reply to येथे by II विकास II
तुमचा
In reply to तुमचा by अवलिया
तुमचा
In reply to येथे by II विकास II
अरे हो की ...
चुटपुट
In reply to चुटपुट by प्रकाश घाटपांडे
अंमळ गल्लत
In reply to अंमळ गल्लत by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वगत
आत्तापर्यंतचा
आणखी
In reply to आणखी by उपास
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१ एक्स्प्र
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद..
काय
In reply to काय by शिल्पा ब
अय्या
In reply to काय by शिल्पा ब
य पाल्हाळ
येथे सर्व