भिकारी
सकाळी सकाळी फेरफटका मारताना गल्लीतील भुभ्यांबरोबर थोडस खेळल्यावर पुढे गेलो. भुभ्यांच्या गार गार नाकाचा सुखद स्पर्श मनात रेंगाळत होता. चालता चालता कोपर्यावर एक भिकारीसदृष माणुस स्वत:शीच बोलत होता. "हरामखोर साले ....... " अज्ञात व्यक्ति वा समुहाबद्दल मनात विखार होता. भाषा हिंदी वाटत होती. नजर शुन्यात होती. दाढी वाढलेली. अगदी ग्रीक तत्ववेत्यांसारखी. पॆंट शर्ट मेणचट्ट.मध्यम बांधा, उंची अंदाजे पावणे सहा फुट. तिरिमिरीत चालत होता. माझे लक्ष त्याच्याकडेच होते.लोक त्याला टाळत होते. पण त्याला कशाचीच फिकीर नव्हती. त्याला न्हाउमाखु घातले असते व चांगले कपडे घातले असते तर रुबाबदार दिसला असता. मनात विचार चालु होता. किती असतील असे लोक पुण्यात,भारतात. त्याच्या जागी स्वत:ला कल्पुन पाहिले. शी! काय हे विचार! मनातुन झटकुन टाकत पुढे गेलो.
कॊन्क्रीटच्या गल्ल्या होत्या. रस्त्यावर मधेच एक म्हातारा भिकारी बसला होता. थोडा खुरडत सरकत होता. मला त्याच्याकडे पहायची हिंम्मत होत नव्हती. रस्ता बदलताही येत नव्हता. अजिबात पहायच नाही व झटकन पुढे सरकून
जायच असा विचार मनात आला. त्याप्रमाणे कार्यवाही करायची म्हणुन वेग वाढवला. मन अस्वस्थ होत. शेवटी एक कटाक्ष त्याच्याकडे गेलाच. तत्क्षणी त्याने हात पसरले चेहर्यावर करुण भाव. मी नजर वळवली व निर्लज्जासारखा पुढे चाललो. खिसा चाचपला. सहसा खिशात पैसे नसतात सकाळी सकाळी. थबकलो. खिशात दहा रुपये होते. काय कराव विचार करत
होतो. एक मन सांगत होत कि द्यायला पाहिजेत. कुणा कुणाला देणार? असे किती तरी भिकारी असतात. दुसर मन सांगत होत. मन असंवेदनशील बनत चालल होत. बघु भिकार्याने मागे वळुन पाहिले तर द्यायचे नाहितर नाही असा विचार केला. त्याला मागे वळून पहाण्याची संधी ५ सेकंदाची दिली होती. .शासनाने अशा लोकांना दयामरण द्यायला हवं असा विचार मनात रेंगाळत होता.सगळ काही मीच ठरवत होतो. त्याला विचारले असते कि बाबा तुला जगायचय कि सुखाने मरायचय? काय उत्तर त्याने दिल असत? विचार भिरभिरत होते. मृत्यु कोणाला चुकलाय? विज्ञानात उद्या अमर होण्याचा शोध लागेल ही कदाचित. त्याने काय फरक पडेल हे आज सांगता येत नाही.
डिमेन्शियाग्रस्त आईनी एकदा विचारल होत. झाल आता माझ सगळं.काही इच्छा नाही. डॊक्टरांकडे अशी सुविधा नाही का? बास झाल जगणं!
माझ्याजवळ उत्तर नाही. भय इथले संपत नाही.मग तुझी आठवण येते. परमेश्वरा तुच आहेस रे बाबा! पण तुझ्या जागी! माझे काय? पुन्हा प्रश्न आहेच.
वाचने
2830
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
छान आहे
एकदम छान
+१
भिकारी
विषयांतर
In reply to विषयांतर by अरुंधती
तो भिकारी
In reply to तो भिकारी by प्रकाश घाटपांडे
काय लिहू ?? सुन्न ...
बघा, विचार करा
दयामरणाचा अज्येंडा