Skip to main content

घो(स)ळ

लेखक आंबोळी यांनी शुक्रवार, 25/06/2010 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
च्यायला या नान्याने सगळ्यांनांच झपाटलय.... हातात हात घेवुन आम्ही झपाटायचो ती एकाच्या मानगुटीवर बसायची अन् मी दुस-याच्या अंगात यायचो झाडावर लटकत लोंबत असतांना बोलत असतांना असंच सगळ्यांना झपाटायच एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो पुनर्जन्माच्या फेर्‍यातून कधीतरी तिचा आत्मा मुक्त झाला मी मात्र मारत आहे त्याच गावातून झपाटण्यासाठी चकरा.... बॉडी टु बॉडी. ---कंदिलकुमार सहजरावांच्या सल्ल्या नुसार जळ्ळा तो शिर्षकात आणलेला आहे.
लेखनविषय:

वाचने 2993
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

कंदिलकुमार, तुम्ही "खतरनाक" प्रियालीताईंचे मित्र दिसता ... विडंबन भारीच. अदिती

सहजरावांच्या सल्ल्या नुसार जळ्ळा तो ळ शिर्षकात आणलेला आहे. तोच विचार करत होतो."भूत" शीर्षक हा रडीचा डाव झाला असता. *त नाव घेवुन कुठकुठली अजुन विडंबने येऊ शकतील ही कल्पना करुनच अंगाला कापरं भरले. बाकी तुमचे विडंबन वाचुन दातखी बसली. बाकी "हडळ" हे ही शीर्षक चालुन गेले असते.. (घाबरट) योगेशु.. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

हे आम्हाला सर्वात जास्त आवडलेले विडंबन.. या विडंबनाला आम्ही मुखपृष्ठावर स्थान देणार! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हो, पण चित्रासह (सचित्र) द्या म्हणजे झालं......................... :D ;) =))

In reply to by सुधीर१३७

चित्रही तयार आहे.. एकदम मस्त आणि साजेसं चित्र सापडलं आहे.. :) इथे पहा! :) आपला, (कल्पक मुखपृष्ठकार) तात्या.

In reply to by सुधीर१३७

चित्रही तयार आहे.. एकदम मस्त आणि साजेसं चित्र सापडलं आहे.. :) इथे पहा! :) आपला, (कल्पक मुखपृष्ठकार) तात्या.

कंदिलकुमार, खतरनाक विडंबन १ लंबर.. हा हा हा.. (झपाटलेला)केशवसुमार अवांतरः तात्या: अमावसेचा मुहुर्त धरा.. (सुचक)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

तात्या: अमावसेचा मुहुर्त धरा..
हरकत नाही.. अवसेचा मुहूर्त चांगला आहे..आज पुनव आहे. अजून १५ दिवसांनी मुपृवर टाकेन. आठवणी पुन्हा ताज्या होतील.. :)

लै भारि, .../\... अभिज्ञ -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

वा उत्तम जमलंय... "ळ" कवितेचा प्याटर्न आणि विषयाची दाहकता यांचे उत्तम मिश्रण