Skip to main content

ब्राझील फुटबॉल जत्रा

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 22/06/2010 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात ब्राझील मधल्या फुटबॉल वेडा बद्दल मी दिलेला प्रतिसाद .. काल झालेला ब्राझील विरुद्ध आयव्हरीकोस्ट सामना, ब्राझीलीयन जनते बरोबर बघण्याचा योग आला त्याची ही क्षणचित्रे.. आयुष्यभर लक्षात राहिल असा हा अनुभव होता... सामना पाहण्यासाठी रस्त्या रस्त्यावर केलेली जय्यत तयारी DSCN0666 DSCN0640 सामना पाहण्यासाठी कोपाकबाना या जगप्रसिद्ध समुद्रकिनारी फिफा ने दोन महाकाय पडदे लावले आहेत.. DSCN0649 DSCN0655 DSCN0652 चला सामना सुरु होण्यासाठी १ तास बाकी आहे लवकर जाउन मोक्याची जागा धरूया.. DSCN0636 DSCN0643 DSCN0649 DSCN0645 DSCN0644 काल ह्या ठीकाणी ९८,००० च्या आसपास लोक सामना पाहण्यास आले होते..(साखळी सामन्याला इतके तर बाद फेरीला किती.... :W ) DSCN0651 DSCN0656 DSCN0654 सामन्या दरम्यान कोकाकोलाचा लुफ्त घेणारे अस्मादिक... :P DSCN0664 ३ गोल झाल्यावर सुरु झालेला जल्लोश पाहून आस्मादिकांनी तेथून पळ काढला.. ;) पुढचा ब्राझीलचा सामना कोपाकबानाला जाऊनच पाहायचा हा निर्धार केला आहे हे. वे. सा. न. ल.

वाचने 4084
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड !!! एकदाची केसुंची एंट्री आली!!!!!!!!!!!!!!!!!!!!! लै भारी फोटो... पण अजून काही तरी लिहायचं ना राव... थोडक्यात आटोपलंय. पण लिहिलं त्याबद्दल धन्यवाद. :) बाकी नायजेरिया, जर्मनी वगैरेमधल्या लोकांनी घ्या मनावर... बिपिन कार्यकर्ते

जबरा फोटुज :) शेवटचा फोटु तर लै बाळसेदार आलाय हो ;) ब्राझिल च्या स्त्रीयांची आजची प्रतिमा कुठे न दिसल्यामुळे हिरमुसलो आहे :( -(ब्राझिल प्रेमी) टारझन

व्वा: चांगलाच फुटबॉल फिव्हर चढलाय जनतेला... अगदी कुत्र्यांपर्यंत पोचलाय.. :) संपादक, कुणीतरी हा धागा फिफाच्या भागात ट्रान्सफर करा ना!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

संपादक, कुणीतरी हा धागा फिफाच्या भागात ट्रान्सफर करा ना!!! तेच बघत होतो... बहुधा नीलकांतलाच जमेल. बिपिन कार्यकर्ते

वा! मिपाच्या फिफा सेक्शनचं वार्तांकन थेट ब्राझिलमधून मजा आली!! बिका म्हणतात तसं इतर देशांतील मिपाकरांनो.. बघता काय? सामिल व्हा! ;) ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

जबर्‍या वर्णन अन फोटू... ब्राझीलियन पोरींविषयी टार्‍याशी सहमत. जे पी

तुमचा अनुभव तुम्ही अगदी योग्य प्रकारे टिपला आहे... :) मदनबाण..... "Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once." Lillian Dickson

ब्राझीलSSSSSSSSS ला ला ला ला ला ला लाSSSSSSSSS जबराच की हो केसुशेठ. शॉल्लेट मज्जा आली असणार. साक्षात फुटबॉलच्या आळंदीत ब्रंहानंदी टाळी नाही लागली तरच नवल. बाकी हे झाल धावतं समालोचन, पुढच्या सामन्याला विषेश पुरवणी येउंद्यात. (जर्मन सपोर्टर )गणपा.