नाही, पुस्तक डीएनए-ह्युमन जिनोम प्रोजेक्ट पर्यंत येऊन थांबते. पुस्तकातले ज्ञान अद्ययावत नाही, काहीसे स्केची आहे असेही म्हणता येईल. परंतु मला त्यात जाणवलेले सौंदर्य हे चैतन्यत्वाकडून जडत्वाकडच्या प्रवासाच्या उत्कृष्ट , मार्मिक चित्रणात जाणवले.
पुस्तकाचं नाव वाचून थोडा गोंधळ झाला कारण reductionist विचारांप्रमाणे जनुकांपासून आत्मा कसा होऊ शकतो हा प्रवास अपेक्षित होता. थोडं वाचल्यानंतर तो संकल्पनांचा प्रवास आहे हे कळलं.
इतक्या क्लिष्ट विषयाची ओळख करून देणंही सोपं नाही. एकंदरीत लेखक यशस्वी झाला आहे असं दिसतं. वाचायला पाहिजे.
reductionist विचारांप्रमाणे जनुकांपासून आत्मा कसा होऊ शकतो हा प्रवास अपेक्षित होता.
reductionist विचारसरणी म्हणजे काय ? त्यानुसार हा उलटा प्रवास कसा सिद्ध करता येईल ?
जगात आपल्याला अनेक अगम्य गोष्टी दिसतात. त्या कशा कार्य करतात हे माहीत नसतं. त्यांना आपण ब्लॅक बॉक्स म्हणू. reductionist विचारसरणी म्हणजे एखादा ब्लॅक बॉक्स उघडून त्यातले इतर ब्लॅक बॉक्स उघडून बघून शेवटी मूलभूत तत्वं शोधून काढणं. उदाहरणार्थ शरीराकडे बधू - ते विविध प्रकारच्या पेशींनी बनलं आहे. प्रत्येक पेशीचं कार्य बायोकेमिस्ट्रीतून समजतं. बायोकेमिस्ट्री ही केमिस्ट्रीची शाखा, तर केमिकल गुणधर्म हे शेवटी भौतिकशास्त्राच्या अणू-रेणूंच्या गुणधर्मावर आधारित आहे. त्यामुळे एकदा भौतिकी गुणधर्म माहीत असले की त्यावर आधरित शरीर कसं चालतं हे उत्तर देता येतं.
संशोधनाचा प्रवास हा वरपासून खालपर्यंत होतो. तर त्यातून सापडणारं उत्तर हे पायापासून कळसापर्यंत जातं.
व्याख्येबद्दल आभार.
"आधी कळस मग पाया" च्या निमित्ताने एक योगायोग सांगतो : प्रस्तुत पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणातली वाक्ये व्हर्बॅटीम अशी आहेत :
'आधी कळस मग पाया' अशा पद्धतीने प्रारंभ झालेली विज्ञानातली एकमेव शाखा म्हणजे वैद्यक. उपचार म्हणजे वैद्यकाचा कळस. वैद्यकाची सुरवात उपचारांनी झाली. शरीररचना आणि शरीरक्रिया हे वैद्यकाचे पायाभूत विषय. या दोन विषयांचा अभ्यास सोळाव्या शतकापासून सुरु झाला...
पुस्तकाचा सुरेख परिचय.
पुस्तकात फक्त पाश्चिमात्य घडामोडींचाच आढावा घेतला गेला आहे की चरक-सुश्रुत आदींचेही उल्लेख आहेत?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
पुस्तकात सुश्रुत/चरक यांचे उल्लेख आहेत. सुश्रुताने केलेल्या सुघटनशस्त्रक्रिया (प्लास्टीक सर्जरी ?) चे वर्णन आहे. मात्र, यासंदर्भातल्या दस्तावेजीकरणाचा अभाव पुस्तकात नोंदवला गेलेला आहे.
पुस्तक परिचय आवडला. आत्मा आणि जनुके या दोन्ही विषयांवरील चर्चेत हात पोळले असूनही पुस्तक वाचावेसे वाटत आहे. हे सध्या तरी परीक्षणाचे यश म्हणावेसे वाटते.
जाता जाता: मुक्तसुनीत यांचे लेखन हे असे स्वयंप्रकाशित असताना त्यांनी 'लंबोदर पीतांबर फणिवर वंदना' असे म्हणत इतरांची तबके उचलावीत हे खरोखर रोचक आहे. मुसुंनी खरे तर फक्त स्वतःचे लिखाण प्रकाशित करावे. इतर लिखाणावर प्रतिसादही देऊ नयेत.प्रत्येक प्रतिसादामागे एक आरती उचलणारा अदृष्य हात असतो म्हणे!
सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह
पुस्तकाचा विषय उत्सुकता चाळवणारा आहे.
जडापासून चैतन्यापर्यंतचा प्रवास कसा झाला असावा ही माणसाची अदिम उत्सुकता असावी.
मागे एकदा कुठल्याशा लेखात चैतन्याचे स्पष्टीकरण देताना एक दाखला दिलेला आठवला - संवेदना ग्रहण करणारी इंद्रिये, म्हणजे ज्ञानेंद्रिये, त्यांचे काम चैतन्याच्या अभावी करु शकत नाहीत. म्हणजे कसे? तर डोळे उघडे आहेत त्यावर समोरच्या दृश्याची प्रतिमा तयार होते ती मेंदूपर्यंत जाते 'दिसणे' ही जैवरासायनिक प्रक्रिया ह्या पातळीवर पूर्ण होते परंतु बघणार्या व्यक्तीचे चित्त थार्यावर नसले तर 'दिसल्या'ची 'जाणीव' होत नाही, काहीतरी दिसले आहे ह्याची नोंद मेंदू करत नाही असा अनुभव आपल्याला अनेकदा आला असेल. आपण त्या व्यक्तीला म्हणतो सुद्धा "अरे काय रे तुझं लक्ष दिसत नाहीये" किंवा चित्त थार्यावर नाहीये" किंवा आपणच ती व्यक्ती असलो तर सांगतो "मी बघत होतो पण अरेच्या अमूक तमूक कधी झालं मला समजलंच नाही."
सांगायचा मुद्दा असा की केवळ भौतिक, रासायनिक प्रक्रियांचा शोध लागला तरी संवेदनांची संपूर्ण प्रक्रिया समजण्यामागे अजून दोन अंगुळे काही शिल्लक राहते की काय असे वाटते.
चतुरंग
मराठी भाषेच्या एकंदर स्थितीचा विचार करताना ज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांमधला गहन आशय सोप्या भाषेत परंतु विषयाची यथायोग्य ओळख करून देणार्या पुस्तकांच्या अभावाचा उल्लेख येतो. इंग्रजीच्या तुलनेमधे या गोष्टीमधे नक्की तथ्य आहे; परंतु त्याचवेळी जे काम चालले आहे त्याचा वेधसुद्धा घेणे महत्त्वाचेच.
प्रतिक्रिया
छान
भविष्य
पुस्तकाचा
पुस्तक
जनुक ते आत्मा
+१
+२
प्रश्न
reductionist
आधी कळस ..
ओळख उत्तम
असेच बोल्तो...!
चांगला आढावा
छान
पौर्वात्य/भारतीय
परिचय
सुरेख परिचय.
पुस्तकपरिचय आवडला
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी