माननीय मिपाकरहो,
या पूर्वी मी काही जणांवर बिनकामी धागे काढले म्हणून टीका केली त्यांची जाहीर माफी मागून मी हा धागा काढत आहे. काय करणार माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता! मिपाकर नक्की मदतीला धावून येतील अशी आशा मला आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी भारतात येणार आहे आणि मला माझ्या गर्लफ्रेन्डला एक सरप्राईजिंग, रोमँटिक डेटवर घेऊन जायचं आहे. नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही झालं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील. मला तिला जाम खूष करायचं आहे. :X
इतर गोष्टींची थोडी फार माहिती सांगितली म्हणजे पर्याय सुचवायला मदत होईल असे वाटते. तो दिवस आम्ही मुंबई मध्ये किंवा एका दिवसात जाऊन मुंबईत परत येता येईल अशा ठिकाणी घालवू शकतो. माझ्याकडे मुंबई मध्ये बाईक उपलब्ध आहे. बाईक चालवण्यात मी एक्स्पर्ट आहे. कार उपलब्ध आहे पण मला मुंबईत ड्रायव्हिंग येणार नाही. मी मुंबईचा नाही त्यामुळे कुठुन कसं जायचं व रस्ते मला ठाऊक नाहीत.माझं बजेट आहे १० हजार रुपये. अर्थात तेवढे खर्च केलेच पाहिजेत असं काही नाही पण काही झकास कल्पना असेल तर तयारी आहे. मी पट्टीचा मत्स्याहारी व मांसाहारी असून ती शुद्ध शाकाहारी आहे.
आता पर्यंत माझ्या समोर आलेले पर्याय असे:
१. माथेरानः माथेरानला जाण्यासाठी जुलै ही योग्य वेळ आहे का? नेरळ पासूनची मोनो रेल जुलै मध्ये चालू असते का? मी हे वाचून थोडी फार माहिती काढली आहे पण मी स्वतः कधी तिकडे गेलो नाही. नेरळ पर्यंत जाण्यास लोकल किंवा ट्रेन वापरावी की बाईक? बाईकने जाण्यास मजा येईल की वाट लागेल. पावसाचं काय? पाऊस बेक्कर लागला तर बाईकवर जाणे शक्य आहे का?
२.लोणावळा: लोणावळ्याला बुशी डॅम राजमाची पॉईंट आणखी काही आहे का? मस्त जेवण कुठे मिळेल?
३. गेट वे ऑफ इंडिया: जागा छान आहे पण अख्खा दिवस तिथे जाऊन करायचे काय हा प्रश्न आहे.
४. बोरिवली नॅशनल पार्क: तिथे जाऊन वाघ सिंह काय बघायचेत असं एक मित्र म्हणाला त्यामुळे हा पर्याय कितपत चांगला आहे याची कल्पना नाही.
फक्त ठिकाणच नव्हे तर तिला सरप्राईज देण्यासाठी आणखी काही कल्पना असतील तर उदा. गिफ्ट आयडिया (आठवा तुम्हाला मिळालेले/ तुम्ही दिलेले मोस्ट रोमॅंटिक गिफ्ट) तर ते पण सांगा.
अनुभवी मिपाकरांना या प्रसंगी मदत करण्यासाठी मी कळकळीचे आवाहन करतो. सखोल प्रतिसाद लिहायला वेळ नसेल तर जाताजाता कल्पना सांगितलीत तरी चालेल. टर उडवायची तर उडवा हो पण धाग्याचा विषय बाजुला पडु नये एवढीच अपेक्षा.
आणखी काय लिहु? प्रतिसादांच्या अपेक्षेत !
~
सोम्यागोम्या
प्रतिक्रिया
नक्को नक्को कशाला उगीच. ;)
भावश्या.
नागाव, किहिम वगैरे अलिबागच्या आसपास पाहा.. किंवा दिवेआगार वगैरे.
छान निसर्ग... निवांतपणा..
नुकत्याच शाळा-पाऊस सुरू झाल्यामुळे सध्या शिजनपण नाही, त्यामुळे गर्दी कमी..आणि माफक खर्चात राहणे-खाणे-पिणे..
समुद्रकिना-यावर निवांत भटका... हॉटेलवजा भाड्याच्या खोल्या भेटतात. मस्त मजा मस्ती करा..गेम वाजवा..
हॅप्पी मान्सून.. :)
तात्या.

बरेच अनुभवी दिसताय!
;)
समुद्रकिना-यावर निवांत भटका... हॉटेलवजा भाड्याच्या खोल्या भेटतात. मस्त मजा मस्ती करा..गेम वाजवा..
हे बाकी खासच.
नील.
तात्या,
ठिकाणांच्या माहिती बद्दल आभारी आहे. प्रतिसाद छान होता शेवटचे अनाहूत सल्ल्याचे वाक्य रुचले नाही.
असो. प्रतिसादाबद्दल आभार.
~
लोणावळा चांगला आहे पण १ ते २ दिवसांकरीता ठिक आहे. महाबळेश्वरही चांगल आहे. रत्नागिरीत आंबोली घाट आहे.
अलीबागला गेलात तर मुरूडचा समुद्र किनाराही चांगला आहे. समुद्र किनार्याला लागुनच लॉजींग आहेत. सकाळी तेथे ताजी ताडीही मिळते. तसेच तिथल्या पाटील खानावळीत चांगल्या मच्छीचे प्रकार मिळतात.
जागु,
धन्यवाद. पाटील खानावळीसकट माहिती दिल्याबद्दल धन्स ! ताडी प्यालो तर ती मला ताडील !
पवना...
लोनावळा पासुन १० किमी आहे.
फारच एकांत आहे.
माऊली आभारी आहे.
:)
प्रत्येक गर्लफ्रेंडचा स्वभाव+आवडीनिवडी ह्याप्रमाणे जाण्याची ठिकाणॅ आणि भेटवस्तु बदलतात... ;)
जोक्स अपार्ट,
मला एक सांगा, तुम्हाला एखादं विविक्षित ठिकाणच हवं आहे असं आहे का? तसं नसेल तर खालील रेसिपी कशी वाटते सांगा. ;)
तयारी:
१ बाईक, टाकीभर पेट्रोल, क्लच,ब्रेक्स मेंटेनन्स पुर्ण :) बॅकपॅकमध्ये तिच्या आवडीचे चॉकलेट्स, प्रवासात काहीच मिळालं नाही तर गोंधळ नको म्हणुन बॅकअप प्लॅनसाठी सँडविचेस.
गिफ्ट: मैत्रिणीचा स्वभाव कसा आहे?
---ती 'च्चो च्विट' वगैरे म्हणणार्यांमधली असेल तर आधी एखादं छोटं टेडी वगैरे आणि नंतर पेन्डन्ट्/इयर रिंग्ज/ (दोघांचीही हरकत नसल्यास) अंगठी :) {तनिष्कचं ऑनलाईन स्टोअर चेक करा, लै भारी कलेक्षन आहे. :D बजेट वाढवणार असाल तर अस्मि किंवा दिदमासचा पर्यायही लै लै बेष्टातला आहे.}
आणि जास्तच रोम्यांटिकपणे गिफ्ट द्यायचं असेल तर, एक रेड रिबन सोबत ठेवा...डोळे मिटायला लाऊन स्वतःभोवती गिफ्टरॅप करतात तशी बांधून समोर उभे रहाण्याकरता :)
-- नॉन-'च्चो च्विट' कॅटेगरी असेल तर : ते टेडी क्यान्सल करा. :D बाकी सर्व वरच्याप्रमाणेच.
--Adventurous क्याटेगरी असेल तर :: मामला थोडा मुश्किल है भाई.. एखादं नॉटी गिफ्ट चालुन जाऊ शकेल.
आता भटकंती::
अहो, आधी गाडीला किक मारुन मुंबईबाहेर पडा...जिकडे मन मानेल (किंवा ती म्हणेल :) ) त्या दिशेने निघा. मुंबई पाठीमागे टाकली की मोकळे रस्ते, छान पाऊस, आजुबाजुला असलेला हिरवाईचा चमत्कार पहात एखादा स्पॉट आवडेपर्यंत मनमुराद भटका. दोघांनाही जिथे थांबावसं वाटेल तिथे गाडी थांबवा... कोसळणारा पाऊस पहा..मस्त भिजा...व्हॉटएव्हर यु वॉन्ट! आणि अशा स्पॉटवर गिफ्ट द्या :D
-->पर्याय दुसरा: Adventurous क्याटेगरी असेल तर सरळ एखादा फंटाश्टिक ट्रेक करुन टाका एक दिवसाचा!
रात्री परत येताना एखाद्या 'कोझी लाँज'मध्ये डिनर आणि पार्सल घरी ड्रॉप! :)
बॉस...आय मे साउंड टू इंन्स्ट्रक्टिव्ह...चेक इट आउट मॅन! दिज आर द बेस्ट लेड प्लॅन्स विथ अॅश्शुअर्ड सक्सेस! ;) (आता माझ्या सक्सेस श्टोर्या नका विचारु... माझं लग्न टिकवायचंय मला. )
सकाळपासून तुझ्याच प्रतिक्रियेची वाट पाहात होते.. ;)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
=)) =))
अच्रत बव्ल्त!
मी काय 'How to...' छापाची पुस्तकं लिहिणारा वाटलो काय? :P
मी काय 'How to...' छापाची पुस्तकं लिहिणारा वाटलो काय?
=)) =))
लिही रे.
म्हणजे काही दिवसांनी जास्त प्रश्न विचारले कि 'पुस्तक विकत घ्या' असे
सांगशील.
कल्पना करुनच जाम हसु आले.
धम्या,
एवढा वेळ काढून अनुभवाचे ज्ञानामृत मज नवशिक्यास पाजल्याबद्दल आभारी आहे !
>>मला एक सांगा, तुम्हाला एखादं विविक्षित ठिकाणच हवं आहे असं आहे का?
मस्त वाटावं इतकंच. हेच ठिकाण पाहिजे असं काही नाही.
>>गिफ्ट: मैत्रिणीचा स्वभाव कसा आहे?
चो च्वीट आणि चो क्यूट असाच आहे !
अस्मिची साईट छान आहे तनिष्क सगळ्यात बेस्ट वाटतेय ! पण तिला घेऊन गेलेलेच बरे. अंगठी नाही आवडली तर चा प्रश्न आहे.
>>अहो, आधी गाडीला किक मारुन मुंबईबाहेर पडा...
नक्कीच हा खूपच सही प्लान आहे ! असेच काहीसं करेन म्हणतो.
>>दिज आर द बेस्ट लेड प्लॅन्स विथ अॅश्शुअर्ड सक्सेस
नक्कीच एवढ्या मस्त कल्पना आहेत या. मस्तच. धमी एकदम लकी आहे !
पुन्हा एकदा धन्यवाद. ! :)
>>एवढा वेळ काढून अनुभवाचे ज्ञानामृत मज नवशिक्यास पाजल्याबद्दल आभारी आहे !
_/\_ मारा मारा!
>>पण तिला घेऊन गेलेलेच बरे. अंगठी नाही आवडली तर चा प्रश्न आहे.
फिकीर नॉट! तुला काय वाटलं? शोरुम्समध्ये त्या सेल्सगर्ल्स काय शोपीस म्हणुन रिक्रुट करतात? एकदा चक्कर मारुन पहा..दे आर द ग्रेटेस्ट हेल्प इन सच केस! :)
जनरल आवडीनिवडी विचारतात त्या आणि पर्फेक्ट आवडेल अशीच वस्तु काढून समोर ठेवतात.
>>नक्कीच हा खूपच सही प्लान आहे ! असेच काहीसं करेन म्हणतो.
:)
>>नक्कीच एवढ्या मस्त कल्पना आहेत या. मस्तच. धमी एकदम लकी आहे !
:\ हा हा हा! लाजलो मी लाजलो ;)
>>शोरुम्समध्ये त्या सेल्सगर्ल्स...दे आर द ग्रेटेस्ट हेल्प इन सच केस!
हां डोक्यात नाही आलं हे !
पण अडचण अशी आहे की मी येणार रात्री उशीरा अणि हिला सकाळी सकाळी भेटायचे आहे. तनिष्कात जायला वेळ नाही होणार. आणि ऑनलाईन खरेदी मध्ये सेल्स गर्ल्स ची मदत होणार नाही.
जसे जमेल तसे आणि दिवस शक्य तितका चांगला बनवण्यासाठी प्रयत्न करेन.
पावसाळयातला लोणावळा - खंडाळा, ते ही बाईकवरून आणि सोबतीला प्रेयसी ! ऊप्फ ... रोमान्स रोमान्स काय म्हणतात तो आपसूकच रोमारोमातून सळसळायला लागेल :)
एक सावधगिरीची सूचना -- एकांतवगैरे मिळावा म्हणून उगाच कायच्याकायच आडबाजूला वगैरे जाऊ नका. हाकेच्या आणि नजरेच्या टप्प्यात लोक असणं कधीही चांगलं अन्यथा पावसाळ्यात लोणावळ्याला आधीच बेवडे चेकाळलेले असतात त्यात कुणाला आयती संधी द्यायला नको :(
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
अग्गदी हेच !
आपल्या अंगात रग असेल तर फुकट हाफमर्डरची केस आणि नसेल तर भलताच व्याप!
अगदी निर्जन ठिकाणंही टाळलेलीच बरी!
बरोबर बोलतोय धम्या आणि चित्रेसाब !!!
म्हणुनंच कोणीतरी बरोबर कुत्रा न्यावा , हा पर्याय सुचवला असेल काय ? =))
कुत्रा तसा बरा पडेल , कोणाचा वास आला की भुंकेल तरी ... =)) बाकी दुसर्या कुत्र्यामागे गुपचुप निघुन नाही गेला म्हणजे मिळवली !!
लोणावळा खंडाळा ऑप्शन छान आहे.
>>अलीबागला गेलात तर मुरूडचा समुद्र किनाराही चांगला आहे. समुद्र किनार्याला लागुनच लॉजींग आहेत. सकाळी तेथे ताजी ताडीही मिळते.
=)) =)) =))
बाकी काग्दांबरुबर 'परमिट' बी ठेवा बरोबर...
मला काय वाटतं - बी युअरसेल्फ. नाहीतर तिच्या अपेक्षा (रोमँटीकपणाच्या) वाढून बसायच्या आणि तुम्ही नंतर पुरे पडणार नाही आणि तिचा विरस होईल.
तेव्हा तुम्हाला जे रुचेल, मनाला येईल ते करा.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
शुचि,
खरंच तुमचं एका अर्थी पण एकदा तरी भन्नाट काही तरी करायला मस्त वाटेल मला.
अपेक्षा वाढतील पण ठीकय ! लेट्स सी.
प्रवसत वेळ 'वाया' घालवायचा नसेल तर नेरळपर्यन्त ठिक आहे.
खाली चौकशी करा.
http://www.sagunabaug.com/about_us.htm
Saguna Baug,
Village Malegaon,
P.O. Neral,
Dist. Raigad
Pin:410101
Phone No. : 02148-238438 / 238338 / 650349
Email: contact@sagunabaug.com
Please Note: Booking procedure is to inquire and confirm on phone ============
माउ
एवढ्या प्रतिक्रिया वाचुन निर्णय घेईपर्यंत ती गर्लफ्रेन्ड दुसराच कोणतरी 'सोम्यागोंम्या 'पकडेल... तेव्हा .... सावध.
म्हणतात ना 'ऐकावे जनाचे पण करावे मनाचे'.
लवकर निर्णय घे.. पावसाळाही सुरु झाला आहे..सुहाना मौसम है...
सुहाना मौसम आहे म्हणूनच मजा आहे ! मी जुलै मधेच येणार आहे भारतात तेव्हा निर्णय घ्यायला अवकाश आहे !
>>दुसराच कोणतरी 'सोम्यागोंम्या '
हा हा ! तिला झेलणारा हा एकमेव सोम्यागोम्या या भूतलावर अस्तित्वात आहे !
हा हा ! तिला झेलणारा हा एकमेव सोम्यागोम्या या भूतलावर अस्तित्वात आहे !नाही नाही .. पुढचं वाक्य मी बिल्कुल बोलणार नाहीये .. "असे तुला वाटते"
एक कमरें