Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सोम्यागोम्या on गुरुवार, 06/17/2010 - 04:16
माननीय मिपाकरहो, या पूर्वी मी काही जणांवर बिनकामी धागे काढले म्हणून टीका केली त्यांची जाहीर माफी मागून मी हा धागा काढत आहे. काय करणार माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता! मिपाकर नक्की मदतीला धावून येतील अशी आशा मला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी भारतात येणार आहे आणि मला माझ्या गर्लफ्रेन्डला एक सरप्राईजिंग, रोमँटिक डेटवर घेऊन जायचं आहे. नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही झालं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील. मला तिला जाम खूष करायचं आहे. :X इतर गोष्टींची थोडी फार माहिती सांगितली म्हणजे पर्याय सुचवायला मदत होईल असे वाटते. तो दिवस आम्ही मुंबई मध्ये किंवा एका दिवसात जाऊन मुंबईत परत येता येईल अशा ठिकाणी घालवू शकतो. माझ्याकडे मुंबई मध्ये बाईक उपलब्ध आहे. बाईक चालवण्यात मी एक्स्पर्ट आहे. कार उपलब्ध आहे पण मला मुंबईत ड्रायव्हिंग येणार नाही. मी मुंबईचा नाही त्यामुळे कुठुन कसं जायचं व रस्ते मला ठाऊक नाहीत.माझं बजेट आहे १० हजार रुपये. अर्थात तेवढे खर्च केलेच पाहिजेत असं काही नाही पण काही झकास कल्पना असेल तर तयारी आहे. मी पट्टीचा मत्स्याहारी व मांसाहारी असून ती शुद्ध शाकाहारी आहे. आता पर्यंत माझ्या समोर आलेले पर्याय असे: १. माथेरानः माथेरानला जाण्यासाठी जुलै ही योग्य वेळ आहे का? नेरळ पासूनची मोनो रेल जुलै मध्ये चालू असते का? मी हे वाचून थोडी फार माहिती काढली आहे पण मी स्वतः कधी तिकडे गेलो नाही. नेरळ पर्यंत जाण्यास लोकल किंवा ट्रेन वापरावी की बाईक? बाईकने जाण्यास मजा येईल की वाट लागेल. पावसाचं काय? पाऊस बेक्कर लागला तर बाईकवर जाणे शक्य आहे का? २.लोणावळा: लोणावळ्याला बुशी डॅम राजमाची पॉईंट आणखी काही आहे का? मस्त जेवण कुठे मिळेल? ३. गेट वे ऑफ इंडिया: जागा छान आहे पण अख्खा दिवस तिथे जाऊन करायचे काय हा प्रश्न आहे. ४. बोरिवली नॅशनल पार्क: तिथे जाऊन वाघ सिंह काय बघायचेत असं एक मित्र म्हणाला त्यामुळे हा पर्याय कितपत चांगला आहे याची कल्पना नाही. फक्त ठिकाणच नव्हे तर तिला सरप्राईज देण्यासाठी आणखी काही कल्पना असतील तर उदा. गिफ्ट आयडिया (आठवा तुम्हाला मिळालेले/ तुम्ही दिलेले मोस्ट रोमॅंटिक गिफ्ट) तर ते पण सांगा. अनुभवी मिपाकरांना या प्रसंगी मदत करण्यासाठी मी कळकळीचे आवाहन करतो. सखोल प्रतिसाद लिहायला वेळ नसेल तर जाताजाता कल्पना सांगितलीत तरी चालेल. टर उडवायची तर उडवा हो पण धाग्याचा विषय बाजुला पडु नये एवढीच अपेक्षा. आणखी काय लिहु? प्रतिसादांच्या अपेक्षेत ! ~ सोम्यागोम्या
  • Log in or register to post comments
  • 23319 views

प्रतिक्रिया

Submitted by मितभाषी on गुरुवार, 06/17/2010 - 14:39

Permalink

एक कमरें

एक कमरें मे बंद हो, और चाबी खो जाए >>>>> अहो निळे कि नाइल, असं जरी झालं तरी सोम्यागोम्या चावी कशी शोधावी? असा धागा काढील किंवा चावी सापडत नाही म्ह्टल्यावर आता पुढे काय करु असा ठणाणा करीत बसेल. :D
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 06/17/2010 - 14:42

In reply to एक कमरें by मितभाषी

Permalink

तेव्हाचं

तेव्हाचं तेव्हा पाहुन घेउ. फारच अडचण असेल तर तुम्हाला वैयक्तीक रित्या समस्या सोडवण्यास धाडु. -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on गुरुवार, 06/17/2010 - 14:46

In reply to तेव्हाचं by Nile

Permalink

नक्को

नक्को नक्को कशाला उगीच. ;) भावश्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 06/17/2010 - 15:17

Permalink

नागाव,

नागाव, किहिम वगैरे अलिबागच्या आसपास पाहा.. किंवा दिवेआगार वगैरे. छान निसर्ग... निवांतपणा.. नुकत्याच शाळा-पाऊस सुरू झाल्यामुळे सध्या शिजनपण नाही, त्यामुळे गर्दी कमी..आणि माफक खर्चात राहणे-खाणे-पिणे.. समुद्रकिना-यावर निवांत भटका... हॉटेलवजा भाड्याच्या खोल्या भेटतात. मस्त मजा मस्ती करा..गेम वाजवा.. हॅप्पी मान्सून.. :) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by नील_गंधार on गुरुवार, 06/17/2010 - 16:12

In reply to नागाव, by विसोबा खेचर

Permalink

बरेच

बरेच अनुभवी दिसताय! ;) समुद्रकिना-यावर निवांत भटका... हॉटेलवजा भाड्याच्या खोल्या भेटतात. मस्त मजा मस्ती करा..गेम वाजवा.. हे बाकी खासच. नील.
  • Log in or register to post comments

Submitted by सोम्यागोम्या on Fri, 06/18/2010 - 20:59

In reply to नागाव, by विसोबा खेचर

Permalink

तात्या, ठिक

तात्या, ठिकाणांच्या माहिती बद्दल आभारी आहे. प्रतिसाद छान होता शेवटचे अनाहूत सल्ल्याचे वाक्य रुचले नाही. असो. प्रतिसादाबद्दल आभार. ~
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 06/18/2010 - 21:07

In reply to तात्या, ठिक by सोम्यागोम्या

Permalink

प्रतिसाद

प्रतिसाद छान होता शेवटचे अनाहूत सल्ल्याचे वाक्य रुचले नाही.
मला वाटले होते की आपण हलके घ्याल, म्हणून बेधडकपणे लिहिले होते.. परंतु ते वाक्य आपणास रुचले नाही त्यावरून ते लिहायला नको होते असे आता वाटते.. तरीही मनापासून क्षमस्व.. तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सोम्यागोम्या on Fri, 06/18/2010 - 21:12

In reply to प्रतिसाद by विसोबा खेचर

Permalink

चालायचेच

तात्या, चालायचेच हो. आता हलकेच घेतले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on गुरुवार, 06/17/2010 - 15:26

Permalink

लोणावळा

लोणावळा चांगला आहे पण १ ते २ दिवसांकरीता ठिक आहे. महाबळेश्वरही चांगल आहे. रत्नागिरीत आंबोली घाट आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on गुरुवार, 06/17/2010 - 15:30

Permalink

अलीबागला

अलीबागला गेलात तर मुरूडचा समुद्र किनाराही चांगला आहे. समुद्र किनार्‍याला लागुनच लॉजींग आहेत. सकाळी तेथे ताजी ताडीही मिळते. तसेच तिथल्या पाटील खानावळीत चांगल्या मच्छीचे प्रकार मिळतात.
  • Log in or register to post comments

Submitted by सोम्यागोम्या on Fri, 06/18/2010 - 21:02

In reply to अलीबागला by जागु

Permalink

धन्स

जागु, धन्यवाद. पाटील खानावळीसकट माहिती दिल्याबद्दल धन्स ! ताडी प्यालो तर ती मला ताडील !
  • Log in or register to post comments

Submitted by माउली on गुरुवार, 06/17/2010 - 16:47

Permalink

पवना.....

पवना... लोनावळा पासुन १० किमी आहे. फारच एकांत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सोम्यागोम्या on Fri, 06/18/2010 - 21:00

In reply to पवना..... by माउली

Permalink

माऊली

माऊली आभारी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 06/17/2010 - 16:55

Permalink

मोठा अवघड आणी सोपा प्रश्न!

:) प्रत्येक गर्लफ्रेंडचा स्वभाव+आवडीनिवडी ह्याप्रमाणे जाण्याची ठिकाणॅ आणि भेटवस्तु बदलतात... ;) जोक्स अपार्ट, मला एक सांगा, तुम्हाला एखादं विविक्षित ठिकाणच हवं आहे असं आहे का? तसं नसेल तर खालील रेसिपी कशी वाटते सांगा. ;) तयारी: १ बाईक, टाकीभर पेट्रोल, क्लच,ब्रेक्स मेंटेनन्स पुर्ण :) बॅकपॅकमध्ये तिच्या आवडीचे चॉकलेट्स, प्रवासात काहीच मिळालं नाही तर गोंधळ नको म्हणुन बॅकअप प्लॅनसाठी सँडविचेस. गिफ्ट: मैत्रिणीचा स्वभाव कसा आहे? ---ती 'च्चो च्विट' वगैरे म्हणणार्‍यांमधली असेल तर आधी एखादं छोटं टेडी वगैरे आणि नंतर पेन्डन्ट्/इयर रिंग्ज/ (दोघांचीही हरकत नसल्यास) अंगठी :) {तनिष्कचं ऑनलाईन स्टोअर चेक करा, लै भारी कलेक्षन आहे. :D बजेट वाढवणार असाल तर अस्मि किंवा दिदमासचा पर्यायही लै लै बेष्टातला आहे.} आणि जास्तच रोम्यांटिकपणे गिफ्ट द्यायचं असेल तर, एक रेड रिबन सोबत ठेवा...डोळे मिटायला लाऊन स्वतःभोवती गिफ्टरॅप करतात तशी बांधून समोर उभे रहाण्याकरता :) -- नॉन-'च्चो च्विट' कॅटेगरी असेल तर : ते टेडी क्यान्सल करा. :D बाकी सर्व वरच्याप्रमाणेच. --Adventurous क्याटेगरी असेल तर :: मामला थोडा मुश्किल है भाई.. एखादं नॉटी गिफ्ट चालुन जाऊ शकेल. आता भटकंती:: अहो, आधी गाडीला किक मारुन मुंबईबाहेर पडा...जिकडे मन मानेल (किंवा ती म्हणेल :) ) त्या दिशेने निघा. मुंबई पाठीमागे टाकली की मोकळे रस्ते, छान पाऊस, आजुबाजुला असलेला हिरवाईचा चमत्कार पहात एखादा स्पॉट आवडेपर्यंत मनमुराद भटका. दोघांनाही जिथे थांबावसं वाटेल तिथे गाडी थांबवा... कोसळणारा पाऊस पहा..मस्त भिजा...व्हॉटएव्हर यु वॉन्ट! आणि अशा स्पॉटवर गिफ्ट द्या :D -->पर्याय दुसरा: Adventurous क्याटेगरी असेल तर सरळ एखादा फंटाश्टिक ट्रेक करुन टाका एक दिवसाचा! रात्री परत येताना एखाद्या 'कोझी लाँज'मध्ये डिनर आणि पार्सल घरी ड्रॉप! :) बॉस...आय मे साउंड टू इंन्स्ट्रक्टिव्ह...चेक इट आउट मॅन! दिज आर द बेस्ट लेड प्लॅन्स विथ अ‍ॅश्शुअर्ड सक्सेस! ;) (आता माझ्या सक्सेस श्टोर्‍या नका विचारु... माझं लग्न टिकवायचंय मला. )
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on गुरुवार, 06/17/2010 - 21:47

In reply to मोठा अवघड आणी सोपा प्रश्न! by धमाल मुलगा

Permalink

सकाळपासून

सकाळपासून तुझ्याच प्रतिक्रियेची वाट पाहात होते.. ;) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 06/18/2010 - 15:18

In reply to सकाळपासून by मस्त कलंदर

Permalink

अच्रत

=)) =)) अच्रत बव्ल्त! मी काय 'How to...' छापाची पुस्तकं लिहिणारा वाटलो काय? :P
  • Log in or register to post comments

Submitted by II विकास II on Fri, 06/18/2010 - 15:25

In reply to अच्रत by धमाल मुलगा

Permalink

मी काय 'How to...'

मी काय 'How to...' छापाची पुस्तकं लिहिणारा वाटलो काय? =)) =)) लिही रे. म्हणजे काही दिवसांनी जास्त प्रश्न विचारले कि 'पुस्तक विकत घ्या' असे सांगशील. कल्पना करुनच जाम हसु आले.
  • Log in or register to post comments

Submitted by सोम्यागोम्या on Fri, 06/18/2010 - 21:36

In reply to मोठा अवघड आणी सोपा प्रश्न! by धमाल मुलगा

Permalink

धम्या, एवढा

धम्या, एवढा वेळ काढून अनुभवाचे ज्ञानामृत मज नवशिक्यास पाजल्याबद्दल आभारी आहे ! >>मला एक सांगा, तुम्हाला एखादं विविक्षित ठिकाणच हवं आहे असं आहे का? मस्त वाटावं इतकंच. हेच ठिकाण पाहिजे असं काही नाही. >>गिफ्ट: मैत्रिणीचा स्वभाव कसा आहे? चो च्वीट आणि चो क्यूट असाच आहे ! अस्मिची साईट छान आहे तनिष्क सगळ्यात बेस्ट वाटतेय ! पण तिला घेऊन गेलेलेच बरे. अंगठी नाही आवडली तर चा प्रश्न आहे. >>अहो, आधी गाडीला किक मारुन मुंबईबाहेर पडा... नक्कीच हा खूपच सही प्लान आहे ! असेच काहीसं करेन म्हणतो. >>दिज आर द बेस्ट लेड प्लॅन्स विथ अ‍ॅश्शुअर्ड सक्सेस नक्कीच एवढ्या मस्त कल्पना आहेत या. मस्तच. धमी एकदम लकी आहे ! पुन्हा एकदा धन्यवाद. ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 06/18/2010 - 21:49

In reply to धम्या, एवढा by सोम्यागोम्या

Permalink

हा हा हा!

>>एवढा वेळ काढून अनुभवाचे ज्ञानामृत मज नवशिक्यास पाजल्याबद्दल आभारी आहे ! _/\_ मारा मारा! >>पण तिला घेऊन गेलेलेच बरे. अंगठी नाही आवडली तर चा प्रश्न आहे. फिकीर नॉट! तुला काय वाटलं? शोरुम्समध्ये त्या सेल्सगर्ल्स काय शोपीस म्हणुन रिक्रुट करतात? एकदा चक्कर मारुन पहा..दे आर द ग्रेटेस्ट हेल्प इन सच केस! :) जनरल आवडीनिवडी विचारतात त्या आणि पर्फेक्ट आवडेल अशीच वस्तु काढून समोर ठेवतात. >>नक्कीच हा खूपच सही प्लान आहे ! असेच काहीसं करेन म्हणतो. :) >>नक्कीच एवढ्या मस्त कल्पना आहेत या. मस्तच. धमी एकदम लकी आहे ! :\ हा हा हा! लाजलो मी लाजलो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सोम्यागोम्या on Fri, 06/18/2010 - 21:59

In reply to हा हा हा! by धमाल मुलगा

Permalink

>>शोरुम्समध

>>शोरुम्समध्ये त्या सेल्सगर्ल्स...दे आर द ग्रेटेस्ट हेल्प इन सच केस! हां डोक्यात नाही आलं हे ! पण अडचण अशी आहे की मी येणार रात्री उशीरा अणि हिला सकाळी सकाळी भेटायचे आहे. तनिष्कात जायला वेळ नाही होणार. आणि ऑनलाईन खरेदी मध्ये सेल्स गर्ल्स ची मदत होणार नाही. जसे जमेल तसे आणि दिवस शक्य तितका चांगला बनवण्यासाठी प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 06/17/2010 - 20:37

Permalink

काहीही कर मित्रा

पावसाळयातला लोणावळा - खंडाळा, ते ही बाईकवरून आणि सोबतीला प्रेयसी ! ऊप्फ ... रोमान्स रोमान्स काय म्हणतात तो आपसूकच रोमारोमातून सळसळायला लागेल :) एक सावधगिरीची सूचना -- एकांतवगैरे मिळावा म्हणून उगाच कायच्याकायच आडबाजूला वगैरे जाऊ नका. हाकेच्या आणि नजरेच्या टप्प्यात लोक असणं कधीही चांगलं अन्यथा पावसाळ्यात लोणावळ्याला आधीच बेवडे चेकाळलेले असतात त्यात कुणाला आयती संधी द्यायला नको :( --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 06/17/2010 - 20:46

In reply to काहीही कर मित्रा by संदीप चित्रे

Permalink

+++१

अग्गदी हेच ! आपल्या अंगात रग असेल तर फुकट हाफमर्डरची केस आणि नसेल तर भलताच व्याप! अगदी निर्जन ठिकाणंही टाळलेलीच बरी!
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 06/17/2010 - 20:50

In reply to +++१ by धमाल मुलगा

Permalink

+++२

बरोबर बोलतोय धम्या आणि चित्रेसाब !!! म्हणुनंच कोणीतरी बरोबर कुत्रा न्यावा , हा पर्याय सुचवला असेल काय ? =)) कुत्रा तसा बरा पडेल , कोणाचा वास आला की भुंकेल तरी ... =)) बाकी दुसर्‍या कुत्र्यामागे गुपचुप निघुन नाही गेला म्हणजे मिळवली !!
  • Log in or register to post comments

Submitted by सोम्यागोम्या on Fri, 06/18/2010 - 21:05

In reply to काहीही कर मित्रा by संदीप चित्रे

Permalink

लोणावळा खंडाळा

लोणावळा खंडाळा ऑप्शन छान आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on गुरुवार, 06/17/2010 - 22:43

Permalink

अलीबाग

>>अलीबागला गेलात तर मुरूडचा समुद्र किनाराही चांगला आहे. समुद्र किनार्‍याला लागुनच लॉजींग आहेत. सकाळी तेथे ताजी ताडीही मिळते. =)) =)) =)) बाकी काग्दांबरुबर 'परमिट' बी ठेवा बरोबर...
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 06/18/2010 - 00:07

Permalink

मला काय

मला काय वाटतं - बी युअरसेल्फ. नाहीतर तिच्या अपेक्षा (रोमँटीकपणाच्या) वाढून बसायच्या आणि तुम्ही नंतर पुरे पडणार नाही आणि तिचा विरस होईल. तेव्हा तुम्हाला जे रुचेल, मनाला येईल ते करा. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

Submitted by सोम्यागोम्या on Fri, 06/18/2010 - 21:09

In reply to मला काय by शुचि

Permalink

खरंच

शुचि, खरंच तुमचं एका अर्थी पण एकदा तरी भन्नाट काही तरी करायला मस्त वाटेल मला. अपेक्षा वाढतील पण ठीकय ! लेट्स सी.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Fri, 06/18/2010 - 11:05

Permalink

मुम्बैजवळच ..

प्रवसत वेळ 'वाया' घालवायचा नसेल तर नेरळपर्यन्त ठिक आहे. खाली चौकशी करा. http://www.sagunabaug.com/about_us.htm Saguna Baug, Village Malegaon, P.O. Neral, Dist. Raigad Pin:410101 Phone No. : 02148-238438 / 238338 / 650349 Email: contact@sagunabaug.com Please Note: Booking procedure is to inquire and confirm on phone ============ माउ
  • Log in or register to post comments

Submitted by सोम्यागोम्या on Fri, 06/18/2010 - 21:42

In reply to मुम्बैजवळच .. by कवितानागेश

Permalink

माउ, अशा

माउ, अशा प्रतिसादांसाठीच हा धागा काढला होता. मस्त पर्याय आहे हा ! पॉंड हाऊस खूपच झकास आहे. टु गुड. ह्या धाग्यातले सगळे पर्यात ट्राय करण्यासारखे आहेत ! हे सगळं केलं तर आयुक्षात रोमान्स भरभरून वाहील ! प्रतिक्रियेबद्दल आभार !
  • Log in or register to post comments

Submitted by नम्रता राणे on Fri, 06/18/2010 - 11:54

Permalink

सावध

एवढ्या प्रतिक्रिया वाचुन निर्णय घेईपर्यंत ती गर्लफ्रेन्ड दुसराच कोणतरी 'सोम्यागोंम्या 'पकडेल... तेव्हा .... सावध. म्हणतात ना ‍ 'ऐकावे जनाचे पण करावे मनाचे'. लवकर निर्णय घे.. पावसाळाही सुरु झाला आहे..सुहाना मौसम है...
  • Log in or register to post comments

Submitted by सोम्यागोम्या on Fri, 06/18/2010 - 21:21

In reply to सावध by नम्रता राणे

Permalink

सुहाना

सुहाना मौसम आहे म्हणूनच मजा आहे ! मी जुलै मधेच येणार आहे भारतात तेव्हा निर्णय घ्यायला अवकाश आहे ! >>दुसराच कोणतरी 'सोम्यागोंम्या ' हा हा ! तिला झेलणारा हा एकमेव सोम्यागोम्या या भूतलावर अस्तित्वात आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 06/18/2010 - 22:05

In reply to सुहाना by सोम्यागोम्या

Permalink

हा हा ! तिला

हा हा ! तिला झेलणारा हा एकमेव सोम्यागोम्या या भूतलावर अस्तित्वात आहे !
नाही नाही .. पुढचं वाक्य मी बिल्कुल बोलणार नाहीये .. "असे तुला वाटते"
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com