Skip to main content

चला सिंहगडावर...

चला सिंहगडावर...

Published on 18/06/2010 - 16:40 प्रकाशित मुखपृष्ठ
मिपाकरहो... पावसाळा सुरु झाला पण अजुन कोणी सिंहगडला गेलेले दिसत नाही... तोपर्यंत...या फोटोंवरच समाधान मानुया... १. उकलेल्या शेंगा... Shenga २. मस्त काकडी... Kakadi ३. गरम-गरम भजी.... Bhaji ४. फक्कड पीठल भाकरी... Pithala-bhakari ५. उबदार शेकोटी... shekoti ६. आल घातलेला गरम चहा... Chaha ७. भाजलेलं कणीस... kanis ८. गार गार मडक्यातलं दही... Dahi Dahi1 ९. कैरी... kairi kairi1 ता.क. - वरिल फोटो मी काढलेले नाहीत...पण आस्वाद घेऊ शकता :) -- श्रीराजे --
लेखनविषय:

याद्या 5209
प्रतिक्रिया 16

पण अजुन कोणी सिंहगडला गेलेले दिसत नाही... मिपाकरानी सिंहगडावर जाणे सोडून दिलय.... उगा कोण कशाला नडग्या फोडून घेईल? अवांतर : फोटो क्लासच आंबोळी

कॉलेजात असताना निरनिराळ्या मोसमात (उन्हाळा, पावसाळा, हिवाळा) निरनिराळ्या वेळात (भल्या पहाटे, टळटळीत दुपारी, संध्याकाळी, ऐन मध्यरात्री) निरनिराळ्या पद्धतीनी (गाडीवर, सायकलवर, गाडीतून, चढत) आणि निरनिराळ्या लोकांबरोबर (प्रसंगानुरूप) अक्षरश: डझनावारी केलेल्या सिंहगड वार्‍या आठवल्या.... उद्या शनिवार सकाळ.... ६ चा गजर लावून ठेवतो ! जे पी

चळचळा पाणी सुटलं ना तोंडाला!! =P~ =P~ मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

फोटो मस्तच. सिंहगडावरील ते पदार्थ एकदम चविष्ट असतात हे स्वानुभवाने माहीत आहे. मात्र सिंहगड म्हणल्यावर केवळ तिथले पिठलं-भाकरीच लक्षात राहू नये इतकेच वाटते. नाहीतर स्वर्गात तानाजी, "हेची फळ काय मम तपाला?", असे म्हणत बसेल. :-) असे वाटायचे अजून एक व्यक्तीगत कारण म्हणजे, एकदा एका महाराष्ट्रातील कॅथलीक शाळेत शिकलेल्या अस्सल मराठमोळ्या मराठी मुलासमोर (जवळचा मित्र), जेंव्हा सिंहगड हा शब्द आला, तेंव्हा तो लगेच म्हणाला, "हा तोच गड ना, ज्याचा शेप सिंहासारखा आहे?" ... :( -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

जेंव्हा सिंहगड हा शब्द आला, तेंव्हा तो लगेच म्हणाला, "हा तोच गड ना, ज्याचा शेप सिंहासारखा आहे?"
=)) =)) =)) =)) =)) अवघड आहे !! बाकी ताणाजी मालुसर्‍याच्या आणि घोरपडीच्या कथा वारंवार उगळण्यामुळेच सिंहगडाचे महत्व अबाधित राहिले , असे काही आहे असे वाटत नाही असा माझा कयास आहे . खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा ... ते दिलं सोडुन न ऐतिहासिक चर्चा (जी किमान इथे सर्वांना माहित्ये (गृहित धरु का रे मुलांनो ? ) ) मधे आणायचं कारण बाकी खरंच कळलं नाही :) अवांतर : फोटू झकास आहेत ... कॉलेजात असतांना जेंव्हा जायचो तेंव्हा खिषात पैसे नसत , मग आपलं कणिस किंवा पिठलं भाकरी ह्यावर आणंद मानुन घ्यायचो , अलिकडे एकही पदार्थ चापायचा सोडत नाही .. जे जे वाटेत येईल ते सरळ हादडत सुटतो. गड चढताना मात्र वाटेत सरबत किंवा ताक विकणारे बसतात, त्यांच्या ग्लासांचा तो मळकट वास एकदाच घेतला नंतर तोंड लावण्याची डेरिंग नाही बा झाली. ;) सिंहगड अप्रतिम सौंदर्याने नटलेला किल्ला आहे. वर गेलं की काही जास्त पौराणिक खाणाखुणा दिसत नाहीत :) - टाराजी मालुसरे

In reply to by टारझन

पुरेसे मी स्पष्ट लिहीले नाही. पण माझा रोख चर्चा करण्यावर नव्हता. तर सिंहगडाचे म्हणून देखील फोटो टाकता आले तर बघा याकडे होता. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

मात्र सिंहगड म्हणल्यावर केवळ तिथले पिठलं-भाकरीच लक्षात राहू नये इतकेच वाटते. नाहीतर स्वर्गात तानाजी, "हेची फळ काय मम तपाला?", असे म्हणत बसेल.
ह्यातुन वरचा अर्थ प्रतित न झाल्यामुळे माझा गोंधळ उडाला , सॉरी शक्तिमान ;)

सर्व छान आहे. विशेष म्हणजे `बाटली `नाही आस्वाद घ्यायला .ते मस्त. काहींना त्याशिवाय मजाच नाही हो येत ट्रीप मधे. निदान सिंहगडावर तरी असले प्रकार नको असे वाटते. मीनल. http://myurmee.blogspot.com/

नुकतेच गडावर जाऊन आलो, भरपूर काही हादडलं .. पण च्यामारी फोटु आणि खायच्या पदार्थाचे.. छ्या!! नको तिथे मेमेरी वाया नाही घालवत राव.. फोटु काढायला बर्रेच लोकेशन्स आनी सीन्स असतात की असे काही आले समोर की उरकायचे, कशाला ते फोटु आणि नंतर आठवणी.. छे नकोच ते! पण गडावरच्या भज्या आणि कांद्याची चटणी लाजबाब.. ऐतिहासिक म्हणाल तर.. गडावर आता तानाजींच्या पुतळ्यापाशी किंवा परीसरात पादत्राणे न घालता जावे असा एका अलिखित संदेश आहे! वीस एक वर्षापासुन गडावर जातोय कधी असे काही ऐकले नाही (हे सांगणार्‍या व्यक्तिला, तानाजीने सर केलेला कडा मात्र दाखवता आला नाही याचा खेद वाटला) असो, कालाय तस्मै नमः !! जाग्रुती आहे म्हणायची दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

च्च्च्च्च्च्च्च्च तुफान खादाड्या.. पिठले भाकरी तर लाजवाब... :-)