Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विनायक प्रभू on Mon, 06/14/2010 - 23:27
"येउ का आत सर?" या. बसा. "पंधरा दिवसांनी येतेय" चौदा. "आज तुमचे एच. आर. नाहीत का"? नाही. "भेटायची उत्सुकता होती". ते खंडाळ्याला गेले आहेत. "परत केंव्हा भेटतील". सांगता येणार नाही. एका खाजगी कंपनी ने 'रेन फॉरेस्ट' कापुन रिसॉर्ट बनवला. हे गेलेत झाडे लावायला. पंधरा दिवसात १०००० झाडे लावायचा संकल्प सोडला आहे त्यांनी. खंडाळ्याच्यावर सुमारे २००० फुटावर. "हम्म" तुम्ही इंटरव्ह्यु नंतर मला न भेटताच निघुन गेलात. "I was not myself. मॅरॅथॉन धावल्यासारखे झाले." असे काय झाले? मला पण खुप उत्सुकता आहे. "तुम्हाला रिपोर्ट आला नाही." He reports to none. फक्त जाताना एक बंद एनवलप देउन गेले. तुम्ही आल्यावर उघडायाची सुचना देउन. "बघता के ते उघडुन? कारण तसेच एक एनवलप मला देउन ठेवलेय त्यांनी". आपण इंटरव्ह्यु बद्द्ल बोलुया. "खरे सांगु सर. मी स्वतः इतके इंटरव्ह्यु घेतलेत माझ्या करियर मधे. हा एक वेगळाच अनुभव होता." >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> Please come in. Have a seat. Any time during this communication you feel like taking a break do not hesitate to say so. "O.K" तुम्ही पी.एच.डी. केली आहे बीहेवीयरल सायन्स मधे. सहा वर्षाचा एच.आर चा अनुभव आहे तुम्हाला. पण तुमचा इंटरव्ह्यु घेणार्‍याचे शिक्षण फक्त १२वी पास आहे असे सांगितले तर तुम्हाला काय वाटेल? "तसे असले तर त्याला सबळ कारण असेल." >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> "माझ्या उत्तरावर ते अगदी लहान मुलासारखे निर्व्याज हसले.कदाचित मला रिलॅक्स करण्याकरता केलेला अभिनय असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मी सावध झाले." >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> समजा तुमची नेहेमीची गाडी थोडक्यात चुकली. आणि पुढची गाडी नेमकी अर्धा तास उशीरा आली तर? "मला ह्या सिच्युएशन चा अनुभव नाही. त्या मुळे ह्या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही". मिलिटरी डिसिप्लीन्ड डॅड? >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> त्यानंतर असेच प्रश्न ते विचारत गेले. मी न सांगताच माझे सर्व आयुष्य जवळ जवळ उघडे झाले. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> २००७ मधे तुम्ही ज्या कंपनीत काम करता ती जवळ जवळ बुडीत गेली होती. तुम्ही ते काम सोडुन मोठ्या पगारावर सहज जाउ शकला असता. पण तसे न करता जवळ जवळ त्याच पगारावर दोन वर्षे काम तुम्ही केलेत. आणि आज कंपनी फायद्यात आल्यावर, पगार दुप्पट झाल्यावर दुसरा जॉब शोधत आहात. का? क्रमशः
  • Log in or register to post comments
  • 4619 views

प्रतिक्रिया

Submitted by टारझन on Mon, 06/14/2010 - 23:33

Permalink

हा लेख

हा लेख कुठुन सुरू झाला .. आणि कुठे संपला समजले नाही ... मी रँडमली ओळी वाचल्या .. तेंव्हा थोडा समजला (असे मला वाटले) बाकी षिर्षकात " इंटर व्यु" मधली स्पेस हृदयाला भीडली :) - (टॉप व्ह्यु) टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 06/15/2010 - 15:08

In reply to हा लेख by टारझन

Permalink

+१

सहमत. :O कोण कोणाशी कशाविषयी बोलत आहे हे नक्की कळलं नाही. :( नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 06/14/2010 - 23:33

Permalink

लेख

लेख आवडला..पुढचा भाग लवकरच टाका. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 06/15/2010 - 03:07

Permalink

+१

बाकी षिर्षकात " इंटर व्यु" मधली स्पेस हृदयाला भीडली असेच म्हणतो..! -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 06/15/2010 - 06:28

Permalink

वाचतोय

वाचतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on Tue, 06/15/2010 - 07:31

Permalink

पूर्णपणे

डोक्यावरुन गेला 8|
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 06/15/2010 - 08:46

Permalink

स्पेस

या लेखनाच्या शीर्षकात ती स्पेस टाकल्याने लेख वाचला जाईल, असे मास्तरांना वाटत असावे का? तसे नसेल तर ती केवळ टायपो मानण्याजोगी स्थिती आहे असे म्हणता येईल का? नसल्यास मास्तरांच्या या खोडीवर होणारी टीका अनाठायी म्हणता येणार नाही हे बरोबर ना? मास्तर मध्यंतरी लिहित नव्हते. पुन्हा लिखाण सुरू झाले हे चांगले म्हणावे की या स्पेससारखी खोड कायम आहे याचे वैषम्य वाटून घ्यावे? मास्तर, या असल्या स्पेसमध्ये काय अडकून पडलाहात कळत नाही. याच्याहीपलिकडं बरंच काही असतं आणि अलीकडंही असतं. आणि तुमच्याक़डं असणाऱ्या प्रसंगांमध्ये ते खूप असतं. त्याकडं नीट लक्ष वेधण्यासाठी तुम्हाला या उचापती करण्याची गरज नाही. पंचायती सोडवण्याचा उद्योग करणाऱ्यानं करून ठेवलेली ही एक पंचाईतच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 06/15/2010 - 09:00

In reply to स्पेस by श्रावण मोडक

Permalink

स्पेस

तुमचा इंटरव्ह्यु घेणार्‍याचे शिक्षण फक्त १२वी पास आहे श्रामो ह्या वाक्यावरुन मी इंटर झालेल्या व्यक्तीचा पॉइंट ऑफ व्हू असा अर्थ घेउन वाचत आहे. हे क्रमशः आहे त्यामुळे कथा शेवट होइपर्यंत मास्तरांना बोलणार नाही. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 06/15/2010 - 09:13

In reply to स्पेस by सहज

Permalink

जरा

जरा वाट पहा हो. मी इतका मोठा झालेलो नाहीये. 'मोठे व्हा' हे मला लागू होतंय म्हटलंय मी इतरत्र. :) च्यायला, या सहजकाकांची सकाळ आहे वाटतं अजून. कोणी भेटलं नाही जणू... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Tue, 06/15/2010 - 10:05

In reply to स्पेस by श्रावण मोडक

Permalink

पर्सनल

श्रामो तुम्ही माझे पर्सनल 'चित्रगुप्त' आहात का हो? पण मी इंटर्व्ह्यु घेउन तुमची अपॉइंट्मेंट केल्याचे आइच्यान आठवत नाही हो. असो. जरा वाट बघा. मग निर्णयास पोचा. मी मधे लिहिणे बंद केले होते? आता अकाउंटंट पण ची पोस्ट आहे का? असो.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 06/15/2010 - 15:48

In reply to पर्सनल by विनायक प्रभू

Permalink

दिलगीर

श्रामो तुम्ही माझे पर्सनल 'चित्रगुप्त' आहात का हो? नाही, पात्रता नाही. पण मी इंटर्व्ह्यु घेउन तुमची अपॉइंट्मेंट केल्याचे आइच्यान आठवत नाही हो. असे झालेच नसल्याने ते न आठवणे स्वाभाविकच की गुरूजी. असो. असोच. जरा वाट बघा. ओके. मग निर्णयास पोचा. जी आज्ञा सरकार. मी मधे लिहिणे बंद केले होते? मी म्हटलं की, "मास्तर मध्यंतरी लिहित नव्हते." पुन्हा लिखाण सुरू या शब्दांमुळे तुम्ही लिहिणं बंद केलंत असा अर्थ निघत असल्यास दिलगीर आहे. आता अकाउंटंट पण ची पोस्ट आहे का? क्रिप्टिक. कळ्ळंच नाय. असो. बरं... :)
  • Log in or register to post comments

Submitted by सोम्यागोम्या on Tue, 06/15/2010 - 08:47

Permalink

पुस्तक

अनुभव चांगला, पण एक पानाचं पुस्तक वाचल्यासरखं वाटलं ! पुढचे खंड येऊ देत.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Tue, 06/15/2010 - 11:57

Permalink

छान

छान ! --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Tue, 06/15/2010 - 12:07

Permalink

छान मास्तर.......

पुढे उत्सुकता लागुन राहिली आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by शशिधर केळकर on Tue, 06/15/2010 - 12:14

Permalink

इंटरव्यू

सुरुवात तर छान झाली. पण आणखी एक पान चालले असते. मास्तर तुमचा क्रमशः चा हा पहिलाच प्रयोग आहे का? प्रथम वाचून झाल्यावर क्रमशः कडे लक्षच गेले नव्हते. आहे त्यातच काही सुफळ संपूर्ण समजते का असे पाहात होतो. प्रतिक्रिया वाचल्यावर कळले, की अजून येणे बाकी आहे, आणि हायसे वाटले! तरी एकंदरीत विषयाकडे बघता, क्रमशः ही ३-४ च्या वर जातील असे वाटत नाही, नाही? (चिकित्सक) शशिधर
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 06/15/2010 - 12:16

Permalink

व्ह्युतोय..

व्ह्युतोय.. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 06/15/2010 - 13:36

Permalink

वाचतोय

वाचतोय मास्तर. काही काही हाती लागतय.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Tue, 06/15/2010 - 14:53

Permalink

एवढ्या

एवढ्या लवकर क्रमश का टाकला ? बर आता पुढच येउद्यात लवकर.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानेश... on Tue, 06/15/2010 - 15:01

Permalink

मस्त सुरूवात

पुढे वाचण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वानन्द on Tue, 06/15/2010 - 15:40

Permalink

काय बी समजलं नाय....

कामाच्या लोड मुळे आधीच डोकं बधीर झालंय. विरंगुळा म्हणून वाचायला गेलो तर आणखी भंजाळलो ! स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 06/15/2010 - 19:52

In reply to काय बी समजलं नाय.... by स्वानन्द

Permalink

>> विरंगुळा

>> विरंगुळा म्हणून वाचायला गेलो तर आणखी भंजाळलो ! =)) =)) शब्द काळजाला भिडला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Tue, 06/15/2010 - 18:50

Permalink

वाचतोय..

वाचतोय..
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Tue, 06/15/2010 - 19:05

Permalink

२००७ मधे

२००७ मधे तुम्ही ज्या कंपनीत काम करता ती जवळ जवळ बुडीत गेली होती. तुम्ही ते काम सोडुन मोठ्या पगारावर सहज जाउ शकला असता. पण तसे न करता जवळ जवळ त्याच पगारावर दोन वर्षे काम तुम्ही केलेत. आणि आज कंपनी फायद्यात आल्यावर, पगार दुप्पट झाल्यावर दुसरा जॉब शोधत आहात. का?
लय लय भारी! मास्तर, ह्या विषयावर एकदा सविस्तर चर्चा करायचीये आपल्याशी. अशी मनोवृत्ती असणं चांगलं की वाईट?
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 06/15/2010 - 19:49

In reply to २००७ मधे by धमाल मुलगा

Permalink

>>ह्या

>>ह्या विषयावर एकदा सविस्तर चर्चा करायचीये आपल्याशी आट्टल पुणेकर ;) (अट्टल बेवडा च्या चालीवर वाचावे)
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Tue, 06/15/2010 - 19:24

Permalink

अहो सर

ते 'क्रमशः' चे घोंगडं कशाला भिजत ठेवलयत? पुढचा/चे भाग कधी?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com