इंटर व्ह्यु
"येउ का आत सर?"
या. बसा.
"पंधरा दिवसांनी येतेय"
चौदा.
"आज तुमचे एच. आर. नाहीत का"?
नाही.
"भेटायची उत्सुकता होती".
ते खंडाळ्याला गेले आहेत.
"परत केंव्हा भेटतील".
सांगता येणार नाही. एका खाजगी कंपनी ने 'रेन फॉरेस्ट' कापुन रिसॉर्ट बनवला. हे गेलेत झाडे लावायला. पंधरा दिवसात १०००० झाडे लावायचा संकल्प सोडला आहे त्यांनी. खंडाळ्याच्यावर सुमारे २००० फुटावर.
"हम्म"
तुम्ही इंटरव्ह्यु नंतर मला न भेटताच निघुन गेलात.
"I was not myself. मॅरॅथॉन धावल्यासारखे झाले."
असे काय झाले? मला पण खुप उत्सुकता आहे.
"तुम्हाला रिपोर्ट आला नाही."
He reports to none. फक्त जाताना एक बंद एनवलप देउन गेले. तुम्ही आल्यावर उघडायाची सुचना देउन.
"बघता के ते उघडुन? कारण तसेच एक एनवलप मला देउन ठेवलेय त्यांनी".
आपण इंटरव्ह्यु बद्द्ल बोलुया.
"खरे सांगु सर. मी स्वतः इतके इंटरव्ह्यु घेतलेत माझ्या करियर मधे.
हा एक वेगळाच अनुभव होता."
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Please come in. Have a seat. Any time during this communication you feel like taking a break do not hesitate to say so.
"O.K"
तुम्ही पी.एच.डी. केली आहे बीहेवीयरल सायन्स मधे. सहा वर्षाचा एच.आर चा अनुभव आहे तुम्हाला. पण तुमचा इंटरव्ह्यु घेणार्याचे शिक्षण फक्त १२वी पास आहे असे सांगितले तर तुम्हाला काय वाटेल?
"तसे असले तर त्याला सबळ कारण असेल."
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
"माझ्या उत्तरावर ते अगदी लहान मुलासारखे निर्व्याज हसले.कदाचित मला रिलॅक्स करण्याकरता केलेला अभिनय असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मी सावध झाले."
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
समजा तुमची नेहेमीची गाडी थोडक्यात चुकली. आणि पुढची गाडी नेमकी अर्धा तास उशीरा आली तर?
"मला ह्या सिच्युएशन चा अनुभव नाही. त्या मुळे ह्या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही".
मिलिटरी डिसिप्लीन्ड डॅड?
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
त्यानंतर असेच प्रश्न ते विचारत गेले. मी न सांगताच माझे सर्व आयुष्य जवळ जवळ उघडे झाले.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
२००७ मधे तुम्ही ज्या कंपनीत काम करता ती जवळ जवळ बुडीत गेली होती. तुम्ही ते काम सोडुन मोठ्या पगारावर सहज जाउ शकला असता. पण तसे न करता जवळ जवळ त्याच पगारावर दोन वर्षे काम तुम्ही केलेत. आणि आज कंपनी फायद्यात आल्यावर, पगार दुप्पट झाल्यावर दुसरा जॉब शोधत आहात. का?
क्रमशः
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा लेख
+१
लेख
+१
वाचतोय
पूर्णपणे
स्पेस
स्पेस
जरा
पर्सनल
दिलगीर
पुस्तक
छान
छान मास्तर.......
इंटरव्यू
व्ह्युतोय..
वाचतोय
एवढ्या
मस्त सुरूवात
काय बी समजलं नाय....
>> विरंगुळा
वाचतोय..
२००७ मधे
>>ह्या
अहो सर