(माडीवरचा तो हात!)
ह्या लेखाची प्रेरणा ही विकासरावांचा "(गाडीवरचा तो हात!)" हा खर्या अर्थाने हृद्य (म्हणजे कसा ते मी डोक्यावरी बरीच केसं उपटली तरी कळलं नाही असा माझा कयास आहे ) अनुभव आहे. त्यावरून जरी खालील अनुभव लिहीत असलो आणि म्हणून कंसात शिर्षक दिले असले तरी, ते विकासरावांच्या लेखाचे हे कृपया विडंबन समजू नये ही धमकी. त्याच्या लेखात भारतीय राजकारणातल्या न भूतो न भविष्यती अशा डेबर्या आणि धुर्त (ज्याला १०० पिढ्यांचं हवरटांसारखं खाऊन देखील १०१व्या पिढीच्या खाण्याची भुक आहे असा माझा कयास आहे ) व्यक्तीमत्वाचा जसा अनुभव आहे, तसाच ह्या लेखात अजून एक व्यक्तीमत्व जे कुणाला आवड न आवडो (तसे वरवर तुम्ही व्हाईट कॉलर लोकं आवडलं नाहीच म्हणणार , पण ज्यांचे देठ अजुन हिरवे आहेत त्यांचे तरी डोळे पाणावतील असा माझा कयास आहे) , त्याच्या शिवाय 'त्या' दिवसाची आठवण सांगण्याची इच्छा पूर्ण होणार नाही अशा व्यक्तीचा जाता जाता अनुभव आहे. इतकेच काय ते साम्य...
माझं फोरासरोड वरचं कुतुहल लहानपणापासूनचं. मी साधारण दुसरीत, फार तर इंजिनियरींग च्या तिसर्या वर्षाला होतो असा माझा कयास आहे. खोटे वाटेल पण त्या वयात मी केलेले काही कारणामे पाहुन आणि ते वाढतंच चाललेले पाहून आमच्या तिर्थरुपांना माझी काळजी वाटायची हे त्यांच्या नजरेतून समजायचे. असो. हा विषय माझ्याबद्दलचा नाही तेंव्हा इतके पुरे (तरीबी तुमची लैच्च इच्चा आसलं तर व्यनि टाकाच ) ... तेंव्हा मी झमी झुमझुमबार मधे इंटरव्यु दिल्यावर तिथल्या मालकाने मला ऑन द स्पॉट ऑफर लेटर दिलं होतं ... पण मला झमेली बार वाल्याने ऑफर लेटर मधे जेवण भत्ता इनक्लुड केल्याने मला त्याची ऑफर खुणावत होती .. परंतु झुमझुमबार मधे मी इंटरव्यु द्यायला आलो तेंव्हा कोणी तरी एक हरकाम्या तिकडे डब्बल बुर्जी ची ऑर्डर घेऊन आला होता , त्याच्या तोंडुन काही उल्लेख ऐकले आणि मी झमेली बार ची खुल्लाऑफर नाकारुन झुमझुमबार मधे पार्ट टाईम म्यानेजर कम गल्लामॅन ची नोकरी पत्करली.
तसा मी पांढरपेशा समाजातला. वडील एका चांगल्या ब्यांकेत नोकरीला , आणि आई शिक्षिका. रोज "शुभंकरोती कल्याणम" पासुन ते "हनुमान चालिसा" असे ६१-६२ श्लोक/आरत्या/कविता म्हणन्याची सवय बालपणापासुनंच मला जाणिव पुर्वक लावली होती.(पुन्हा माझ्यावरंच आली का गाडी ? ... असो सवय आहे मला घुम फिर के स्वतःवरंच येण्याची.. ए कोण म्हणतोय रे "पुरे झाले स्वतःची आरती ओवाळणे " ... सखुबाईज शिक्रेट च पुस्तक देउन गप्प बसवा त्या पिवळ्या पानाला..काय म्हणता, काही फायदा नाही ? देठही पिवळाच ? अरेरे .. )
असो , तर मी काय म्हणत होतो ? ह्म्म.. तर मी झुमझुम बार जॉइन केला. पहिल्या दिवशी माझं इंडक्शन ट्रेणींग होतं.. पहिल्या सेशन मधे बारचा एरिया कुठपर्यंत आहे ? बार कोणकोणत्या दारु प्रोव्हाईड करतो ? बार मधे सुविधा काय ? (विशिष्ठ सुविधा काय काय ? ) बार चे मालक , संस्थापक , बिझनेस पार्टणर्स आणि हप्ता घेणारे ह्या सर्वांची माहिती होती ... दुसर्या सेशन मधे बार चा बिझनेस एरियात कसा पसरला आहे , कुठेकुठे कशी उधारी - वसुली आहे ? कोण भाई कोण चोर कोण भुरटा ह्याच बरोबर कोण माडीवाली ह्याची उत्तम माहिती करुन देण्यात आली , आणि मी सुद्धा गाण्याबझावण्यातला होतोच पण बाई-बाटलीतलाही असल्याने मी ह्या गोष्टी पटकन ग्रास्प केल्या. काही दिवसांतच मी पुर्ण बिझणेस हातात घेतला. मी एक नुस्तीच व्हाईट कॉलर विकत घेतली होती. कोणताही शर्ट (किंवा टिशर्ट किंवा स्वेटर)घातला की मी ती व्हाईट कॉलर अशी वरुन फक्त आडकवुन चालत असे .. आणि मी व्हाईट कॉलर म्हणुन मिरवुन घेत असे. गल्ल्यावर बसल्या बसल्या मी गाणं देखील गायचो ... ते ही खर्जातल्या आवाजात. तसा मी बाराणा घराण्यातला , माझा चमन रागावर फार जीव .. भल्याभल्यांणा केसं उपटायला लावणार्या ह्या रागामुळे तिथे माझा बर्यापिकी दरारा णिर्माण झाला होता असा माझा कयास होता. कोणीही पैसे बूडवत नव्हता , उधार घेत नव्हता, त्यामुळे धंद्याला नवी तेजी आली होती... मी सुद्धा एव्हाना खुप फेमस झालो होतो .. एके दिवशी मी बार वरुन माझी "शिप" संपुन निघालो होतो , रात्रीचे १२ वाजले होते ... कुठुन तरी "मला जाऊ द्याना घरी .. आता वाजले की..." चे सुर कानी पडत होते ... तेवढ्यात माझ्या व्हाईट कॉलर वर पच्च्च्य्याक्कन काळी काळी पिंक पडली ... वर पाहातो तो दुसरी पिंग थेट माझ्या तोंडावर ... माझा रंग आधीच उजळ , त्यात ही मिस्रीची पिंक !! मी रागावलो. ओरडलो, " कोण रांडीचा थुंकला रे .. भाडखाव ... समोर ये ... " कोणीच आलं नाही. एक हात बाहेर निघाला .. होय तोच तो .. "माडीवरचा तो हात " किती गुबगुबीत गोरापान हात होता तो .. मी एका इस्त्रीला शिवी दिल्याचं पाहुन मी खजिल झालो . माझं इतरवेळचं स्त्रीदाक्षिण्य जागं झालं ... मी म्हंटलं , क्षमा करा मला वाटलं कोणी बाप्या आहे , वरुन हातानेच "इट्स ओक्के" ,पाठोपाठ "खुलाश्याबद्दल धन्यवाद" चा इशारा आला आणि मनात म्हंटलं "विषय संपला".
दुसर्या दिवशी माझ्या डोक्यावर केळाची सालपटं पडली. पण मी चुकांची पुणरावृत्ती करत नाही. मी म्हणालो , "जरा उशिरा टाकल्याबद्दल धन्यवाद, कारण सालं थोडी आधी टाकली असती तर मला त्यावरुन घसरुन पडावं लागलं असतं .. त्यातुन मी कुल्लेदार, होणारा त्राहिमाम टळला", माडीवरच्या त्या हाताने मला " ओक्के , पुढे चला " चा इषारा दिला आणि मी चालु पडलो. आठवडाभर रोज माझ्या डोक्यावर कधी षिळं वरण पडे ,कधी कोरडा कोरडा भात , तर कधी भाजिपाल्याचा कचरा पडे... पण मी संयम सोडला नाही .. एक दिवस मी गल्ल्यावर गात बसलो होतो. तोच त्या माडीवरचा हरकाम्या आला. अगदीच शेंबडा ,किळसवाणा ,खाकी चड्डी करडी होईपर्यंत मळली होती , तिथल्या बायकांचे पिवळे-शिवळे डागाळलेले,इस्सट वासाची (ही अशी विषेशणं लावली की लेख कसा दर्जेदार / अभ्यासपुर्ण होतो , नै का ? ) कपडे धुणारा , पाठीला चोळायचा "निम्मा रोज" साबण नियमीत घेउन जाणारा , तो इल्ल्यास . इल्ल्यास आला आणि म्हणाला , "टार्या साब , आप को माडी पे बुलाया है .. " हे वाक्य ऐकताच मला झटका बसला ... इतके दिवस डोक्याची कचराकुंडी केल्याचं चिज झालं , मी गल्ला लॉक करुन इल्ल्यासच्या बोटाला पकडुन निघालो .. नंतर मी हाताचा वास घेतला ... तर माझ्या पांढरपेश्या नाकाला तो सहन झाला नाही , उमदळलंच मला. माडीवर गेलो ... आज प्रथमच माडीवरच्या हाताबरोबर बाकीची व्यक्ति पहायला भेटणार होती. तिचं रुप पाहुन भले भले हिरवे देठ पिवळे फट्ट होत असतील ह्याची जाणीव झाली. पण मी तिचं ते रुप पाहुन देठ आणि पानच काय ? खोडासकट पिवळा पडलो होतो. ती गच्चीवरंच भांडी घासायचं काम करे, ते गुबगुबीत दिषनार्या हातांना चिटकलेलं ते हत्तीचं रुप पाहुन मी कलंडायचाच बाकी होतो. तिनं तोंडात मिस्रीचा बकना भरला होता , आणि मिंटामिंटाला व्हेल माशासारखं मान वळवुन रोडवर पिंका टाकनं चालु होतं , मग एकेक खरगट्याचं भांडंही ती तिकडेच रिकामी करत होती. ३०अंशाच्या कोनात पुढे आलेले ते दात , कोणी तिच्या तोंडावर फाईट मारली तर त्या फाईट चे तुकडे तुकडे करण्यास सक्षम होती. आधी ती इल्ल्यास कडे पाहाते आहे असा माझा कयास होता पण तो साफ खोटा ठरला, ती माझ्याकडे पाहात होती. जर्राशी हेकणी असल्यानं तिचं सौंदर्य किती वाढलं होतं.. तिने माझी क्षमा मागितली. आणि माझे डोळे पाणावले.
हे व्यक्तीमत्व कोण हे सांगायची कदाचीत गरज भासणार नाही, तरी देखील समजले नसेल तर, फोरासरोडवरील माडीवरचा तो हात , म्हणजेच मोषणी (अंमळ लुज होती म्हणुन तिला "लुज मोषणी" देखील म्हणत)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आयचा
धन्यवाद!
मण्सुर
प्रकाशित
धन्यवाद!
तो
टारझन,
+१
माडीवरचा
मस्त
>> त्यातुन
धन्यु
बसवला फिगोत!!!
टार्याचा लेख,
) ) ) ) ) ) ) ) ) )
लेखकांस
ह्यॅ:!!!!
:)
मोषणीच नाव
टार्यांन
+ १.५
टार्या
खी: खी: खी:
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
लेख न
जबरा रे
जबरा
कहर आहेस
टार्या,
लेख वाचुन
बाप् रे..............
स्त्री संत टारनाथ बाबा की जय
सगळ्या
खॅ खॅ खॅ
विडंबन
परप्रकाशित
वरचे
सहमत
काय रे