Skip to main content

माझं (कोकणातील) घर आणि परिसर :)

लेखक अस्मी यांनी सोमवार, 14/06/2010 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
हे फोटोज आहेत माझ्या घराच्याइथले आणि माझ्या गावातले - मालघरमधले :) म्हणजेच कोकणातले.. चिपळूणपासून १३ km वर असलेलं माझं हे छोटंसं गाव चिपळूणहून गुहागरला जायच्या रस्त्यावर आहे. ही आमची नदी...तांबी नदी आणि धरण :) बागेत खूप फुलपाखरे असतात. चिपळूणमधील एक पक्षीनिरीक्षकांनी इथल्या फोटोंच प्रदर्शनही भरवलं होतं :) कांचन लालबूंद जास्वंद :) हा आमच्या घरचा अननस..अस्सा गोड असतो म्हणून सांगू... :) कापा फणस :) बांधकाम चालू असलेलं गावातील राममंदिर पेरणी / लावणीच्या प्रतीक्षेत असलेली भाताची शेतं तांबी नदी...रामपूर डोंगराचा परिसर - अस्मिता

वाचने 9419
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

सुंदर सुंदर! चिपळूणपासून १३ किमी म्हणजे मार्गताम्हनेच्या बरंच अलिकडे झालं ना..?

In reply to by मेघवेडा

बरोबर...रामपूरच्या अलीकडे ए तुला मार्गताम्हने महितिये? *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* - अस्मिता

धुंद करणारा परिसर आहे. :) अननस (झाडाला लागलेल) पहिल्यांदाच पाहिल.

मी हि अननस झाडाला लागलेला पहिल्यांचाच पहिला ! गाव मस्त आहे!

मस्त आहे हो गांव नि परिसर दोन्हीही!!! मी पण झाडाला लागलेलं अननस पहिल्यांदाच पाहिलं!!! :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

अननस (झाडाला लागलेल) पहिल्यांदाच पाहिल.
मी याचसाठी हा फोटो काढला होता...माझ्या मैत्रिणींना पण तेच बघायचं होतं. हा अननस तयार होऊन कापल्यानंतर जे वरचं वाड (म्हणजे ती उभी पानं) आहे ते परत लावलं ना की नवीन झाड तयार होतं :) *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* - अस्मिता

खूप वर्षांनी अननस झाडाला लागलेला पुन्हा पाहिला! (आधी मला वाटते गोव्याला पाहिले होते.) (खुद के साथ बाता: रंगा, "अननस सोलण्याची कला" असा एखादा लेख टाकावा का? :?) चतुरंग

मधुमती तै, तुमी गाववाल्या निगालात वो! म्या कडवईचा बर्र का.. चिपलून वरून ३५ कि.मी. एन.एच. १७ वर 'तुरळ' गावच्या फाट्यावरून फकस्त २.५ कि.मी आत.. छान फ्वोटो तै.. निसर्ग बगूनश्यान डोले भरून पावले बर्र का.. एकदम गावाला गेल्यागत वाटलं!! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/

In reply to by पाषाणभेद

बाकी झाडावरचा फणस बर्‍याचदा बघीतलेला आहे.
झाडावरचा फणस पाहीला आहे??आणी तो पण ब-याचदा?? फारच दांडगा अनुभव आहे हो तुमचा!! अजुन असेच काय काय पाहील आहे ते लिहा.......जस झाडावर पिकलेला आंबा वगैरे. 8} लेखासंबंधीत : मी चिपळुण पासुन ५-७ कीमीवर असलेल्या टेरवचा,पण आमच्या इथे नदी नावाच काही नाही.
आणि धरण
हे पाहण्यासाठी दुर्बिण वापरण अपेक्षित आहे का? नाही,फोटोत कुठे दीसत नाहे म्हणुन विचारल. शेवटुन दुसरा फोटो सर्वात छान!

साला, कोकणात कुठंही आडवाटेनं शिरावं आणि क्लिकक्लिकाट करावा..डोळे गारगार करणारे फोटो यायलाच पाहिजेत असा नियमच दिसतोय निसर्गाचा! मस्तच फोटो! आणी गावही बहुतेक एकदम निवांत आणि शांत असणार! निसर्गच सांगतोय फोटोमधुन.

मस्त फोटो.. अवांतर : मी चिपळूणच्या ईशान्येला साधारण चार पाचशे किलोमीटरवर राहतो आणि झाडाला लागलेली जास्वन्दी फार दिवसांनी पहायला मिळाली आज :)

In reply to by भडकमकर मास्तर

:D :D :D :D :D झाड नाही,रोपट वाटत ते, चुकी काढायची म्हटली तर ती कशातुन पण निघते बरोबर? - भंडग(सांगलीची)कर मास्तर

फोटु छान. :)
मी चिपळूणच्या ईशान्येला साधारण चार पाचशे किलोमीटरवर राहतो आणि झाडाला लागलेली जास्वन्दी फार दिवसांनी पहायला मिळाली आज.
>>>>>> गुर्जी लै भारी टोला. =)) =)) अवांतर : झाडाला अननस न पाहणारे येडे कधी मिपा णि घर सोडुन गेलेले दिसत नाहीत. :D =))

In reply to by रेवती

कोकणरेल्वेमुळे कोणता फरक पडलाय? पूर्वीसारखं एष्टी थांबवून रानात जावं लागत नाय... आता कोकणरेल्वेच्या डब्यातच बाथरूम असतेय!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) लय डांबीस हाव बा तुम्ही!!
पूर्वीसारखं एष्टी थांबवून रानात जावं लागत नाय... आता कोकणरेल्वेच्या डब्यातच बाथरूम असतेय!!
हे गाडीत बसताना,वेळ आली तर 'जायची' सोय आहे ना हेच् बघतात पहील्,म्हणून ह्यांना फक्त एकच बदल आठवला....... लय भारी प्रतिसाद पि.डा.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!