विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - १ - टीम ऑफ चँपियन्स की चँपियन टीम?
विशेष
'We know the name son, take a bow son'
जगातील सगळ्यात जुन्या देशस्तरीय फुटबॉल नॉकआउट स्पर्धेत २००५ साली, या स्पर्धेतली सर्वात चुरशीची फायनल खेळताना नव्वदाव्या मिनटाला टीपीकल यॉर्कशायरी अॅसेंट मधे कॉमेंट्रेटर...स्पर्धा कोणती - FA cup...वेस्ट हॅम युनायटेड आणी लिव्हरपूल ह्यांच्यातली फायनल. आधी २-० नंतर ३-१ असे पाठीमागे असून दुसर्या हाफ मधे २ गोल, त्यातला एक ९०व्या मिनिटाचा २५ यार्डावरून पाईलड्रायवर गोल करून मॅच पेनल्टीमधे नेणारा कप्तान - स्टीवन जेर्राड. सध्याच्या इंग्लंड टीमचाही कप्तान आणी आधारस्तंभ.
फिफा वर्ल्डकप - पहिला अध्याय ! आपल्या डॉनरावांनी रचलाय. त्याच मालेतलं हे पुढचं पुष्प.
फुटबॉल, फुटबॉल म्हटलं की नजरेसमोर उभा राहतो इंग्लंड. MCC ह्या क्रिकेटच्या नियम बनवणार्या संस्थेप्रमाणेच जागतीक फुटबॉलचे ही नियम सर्वप्रथम इंग्लंडमधेच १८६३ मधे बनवले गेले. सांघीक फुटबॉल का इंग्लंडचा de facto राष्ट्रीय खेळ आहे. हा फुटबॉल फीवर इंग्लंड मधे प्लेगसारखा पसरलाय. इंग्लंड आणी इंग्लीश प्रिमीयर लीग समर्थक हुलीगन्स (कु)प्रसिद्ध आहेतच. चाळीस हजाराहून जास्त छोटे मोठे क्लब असलेल्या या आकाराने एव्ढ्याश्या देशाला फुटबॉल प्रेमात तोड नाही.
अशा या इंग्लंडचा फुटबॉल इतिहास बराच तगडा आहे. इग्लंडमधे जगातला सगळ्यात जुना फुटबॉल क्लब शेफिल्ड एफ सी आहे, सगळ्यात जुनी कार्यकारी समिती द फुटबॉल असोसिएशन , सगळ्यात जुनी राष्ट्रीय टीम, वर सांगितलेला द एफ ए कप यासोबतच द नॅशनल लीग (EPL) सुध्दा आहे. आज जगातल्या मोठ्या, अतिश्रिमंत आणी छाती ठोकून गर्व करण्यासारखा इतिहास असलेले क्लब आहेत. त्यांबद्दल नंतर कधीतरी.
वर्ल्डकपच्या इतिहासात हा देश एकदाच फायनल जिंकलाय. १९६६ साली. वेस्ट हॅम या लंडनस्थीत क्लबच्या बॉबी मूर या खेळाडूच्या नेतृत्वाखाली. या संघाचे कोच होते सर आल्फ रॅमसे. सर बॉबी चार्लटन आणी सर जिऑफ हर्स्ट सुद्धा या संघातलेच... फिफाच्या वेबसाईट वरील या दोन ओळी या संघाबद्दल. १९६६ नंतर हा संघ एकदाच उपांत्यफेरी पर्यंत पोहचू शकला १९९० मधे.
'The country that invented football, England, finally found a formula for success on the world stage. Alf Ramsey's 'Wingless wonders' overcame Final opponents West Germany thanks to Geoff Hurst's historic hat-trick, though the debate over whether his middle strike crossed the line continues to this day.'
सध्याच्या इंग्लंड संघाची रचाना बघून असे म्हटले जात आहे की सध्याची टीम ही गेल्या दोन दशकातील इंग्लंडची सर्वोत्कॄष्ट टीम आहे. तर मंडळी घेऊया या संघाचा आढावा.
या विश्वचषकात इंग्लंड आहे ग्रुप सी मधे. या ग्रुप मधे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत अमेरीका, अल्जेरीया आणी स्लोवेनीया.या ग्रुप मधून पुढे जाउन चषकासाठी चॅलेंज करण्याचे सर्वात प्रबळ दावेदार आहे इंग्लंड. अल्जेरीया आणी स्लोवेनीया च्या मानाने अमेरिका हा इंग्लंडाचा तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे. गेल्या कन्फेडरेशन कप मधे त्यांनी स्पेनला हारवून फायनलमधे मारलेली मुसंडी जोरदार होती. इग्लंड सध्या फिफा रँकिंग्समधे आठव्या स्थानावर आहे तर अमेरीका चौदाव्या , अल्जेरीया तिसाव्या आणी स्लोवेनीया पंचविसाव्या. अमेरीकेने उत्तर, मध्य आणी कॅरिबियन अमेरिकेत झालेल्या पात्रता स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवून विश्वचषकात प्रवेश केलाय. दुसर्या बाजूला अल्जेरीया चोवीस वर्षानंतर विश्वचषकाला पात्र ठरलाय. रशियन पात्रता गटातून रशिया, झेक, पोलंड अशा बलाढ्य ग्रुप मधे असतानाही पात्र होण्याची किमया केलीय स्लोवेनीयाने.
या विश्वचषकाच्या इंग्लंड संघात तेवीस खेळाडू आहेत. या तेवीस जणांमधले वेन रूनी, स्टीवन जेर्राड, जॉन टेरी, फ्रँक लँपार्ड, जो कोल, अॅश्ले कोल तसेच गॅरेथ बेरी हे खेळाडू संघासाठी फार महत्वाचे आहेत.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| वेन रूनी | स्टीवन जेर्राड | जॉन टेरी | फ्रँक लँपार्ड | जो कोल | अॅश्ले कोल | गॅरेथ बेरी |
![]() |
अशा या हरहुन्नरी संघाचे कोच आहेत फॅबियो कॅपेल्लो. कॅपेल्लो यांनी इटलीमधे क्लब स्तरावर ए सी मिलान्,युवेंटस, आणी ए एस रोमा या संघांसोबत तब्बल ७ वेळा इटालीयन लीग Serie A जिंकलेली आहे. मिलानसोबत चँपियन्स लीग तसेच रीयल माद्रीद सोबत दोन वेळा स्पॅनिश La Liga जिंकलेली आहे. EURO २००८ मधे पात्र होऊ न शकलेल्या इंग्लंड संघाला सध्याच्या नव्या उंचीवर घेउन जाण्यात कॅपेल्लोंच्या विनिंग मेंटॅलीटीचा मोठा सहभाग आहे आणी ही गोष्ट खेळाडूंनीही मान्य केली आहे. कॅपेल्लो इटालियन असले तरी त्यांचा फुटबॉल डिफेंसीव्ह नाही.(इटालियन फुटबॉल हा खूपच डिफेंसीव्ह असतो.) तो क्रिएटीव्ह आहे. |
थोडक्यात सांगायचं तर, प्लेयर्स टू वॉच : स्टीवन जेर्रार्ड, फ्रॅ़क लँपार्ड, वेन रूनी
सध्याची ही टीम सेमीफायनल पर्यंत मजल मारेल असा माझा अंदाज आहे. फायनल ला पोहोचेल न पोहोचेल हे त्यांच्या नशीब आणी खेळावर अवलंबून.. :)
फुटबॉल असेल आणी वॅग्स नसतील असं होणार नाही. वॅग्स म्हणजे वाईव्ह्स अँड गर्लफ्रेंडस. या इंग्लंड संघातील काही प्रसिद्ध वॅग्स जोड्या.
जॉन टेरी - टोनी टेरी , जो कोल - कार्ली झुकर , स्टीवन जेर्राड - अॅलेक्स करन , अॅरॉन लेनन - माँटॅना मॅनींग ,
फ्रँक लँपार्ड - ख्रीस्टीन ब्लेकली , पिटर क्राउच - अॅबी क्लँसी , वेन रूनी - कोलीन रूनी
सरतेशेवटी या संघास लिव्हरपूलच्या गाण्याप्रमाणे एकच गोष्ट म्हणेन 'you will never walk alone'
वाचने
10241
वाचनखूण
प्रतिक्रिया
33








मस्त!
पण
In reply to पण by शुचि
नाही
इंग्लंड विश्वचषकाचे प्रबळ दावेदार?
In reply to इंग्लंड विश्वचषकाचे प्रबळ दावेदार? by बाळकराम
तुमच्या मताचा आदर आहे.
In reply to तुमच्या मताचा आदर आहे. by प्रभो
>>विश्वचषका
वाचतोय.
मस्त ...
In reply to मस्त ... by छोटा डॉन
सविस्तर प्रतिसाद
In reply to सविस्तर प्रतिसाद by प्रभो
मी सुद्धा!
In reply to मस्त ... by छोटा डॉन
बाजार उठला ...
In reply to बाजार उठला ... by छोटा डॉन
छान
In reply to बाजार उठला ... by छोटा डॉन
सहमत रे डॉन्या
वाचतोय
In reply to वाचतोय by मदनबाण
एक धागा
In reply to एक धागा by बिपिन कार्यकर्ते
+१
सध्या
मस्त रे
उत्तम लेख
जबरा रे
इंग्लंड ची
इंग्लड चा संघ देखिल दुसर्या फेरीत पोहचला.
इंग्लड
चला जर्मनी
दोन्ही
In reply to दोन्ही by गणपा
छ्या, इंग्लंड काय टिम आहे ?
In reply to छ्या, इंग्लंड काय टिम आहे ? by छोटा डॉन
जसे
In reply to जसे by Nile
आमचे बी!!
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
कुठे आहेत
खेळातलं
In reply to खेळातलं by शिल्पा ब
अहो असं
In reply to खेळातलं by शिल्पा ब
आधीच आहेत