✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डंकर्क

प
पुष्करिणी यांनी
Sun, 06/06/2010 - 03:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47683 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

डॉ. दाढे

Pain
Tue, 06/08/2010 - 23:14 नवीन
तुम्ही आपले फालतु भारतीय नेते कशाला मधे आणताय ? तुलना ब्रिटीश आणि जर्मन लोकांची चालू आहे. मी शेवटी अवांतरमधे जे लिहिला आहे ते खोडता आले, किंवा अधिक माहिती देता आली तर पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

उणीपुरी नाहीत तर जगाच्या इतिहासातली सर्वात भीषण ८ वर्षे!

डॉ.प्रसाद दाढे
Wed, 06/09/2010 - 00:05 नवीन
अवांतरः वरती लिहिलेल्या सगळ्या देशांमधे, खंडांमधे सत्ता मिळवण्यासाठी आणि स्वार्थासाठी ब्रिटनने गुलामगिरीत ढकललेली , शेकडो वर्षे छळलेली, संपुर्ण संस्कृती नष्ट करून देशोधडीला लावलेली, ठार मारलेली निरपराध माणसे आणि उण्यापुर्‍या ८ वर्षात (१९३६-१९४४) जर्मनीने मारलेले ज्यु यात जास्त संख्या कोणाची ? जड पारडे कोणाचे? खरे हैवान कोण ? भारताचे उदाहरणच घ्या ना! ब्रिटिशांनी भारतातल्या कुठल्याही अमुक एका जातीवर आणि तेही इतके भयानक अत्याचार केलेले नाहीत. तेच नाझी जर्मनीने पोलंड, झेको आणि हॉलंडसारख्या देशांत अक्षरशः धुमाकुळ घातला. ओल्हेनडॉर्फ, हायड्रिक, रुडॉल्फ ह्यॉस यासारख्या एसएस अधिकार्‍यांनी स्लाव्ह वंशी, ज्यू, जिप्सींची लहान बाळे- वृद्धांसह कत्तली केल्या हे भयाण सत्य हिटलरच्या पराक्रमावर फिरलेला मोठा शेणगोळाच आहे. तुम्हांला ब्रिटिश आणि जर्मनांची तुलना करायची आहे ना, मग आपल्या स्वातंत्र्य लढ्याचेच उदाहरण घ्या. ब्रिटिश अंकित भारतात पारतंत्र्याविरूद्ध अनेक आंदोलने चालू होती. कुणी अहिंसेने तर कुणी हिंसेने इंग्रजांना विरोध करत होते. पण त्याविरोधात जर्मनांच्या तुलनेत इंग्रज सरकार सहिष्णू वर्तणूक दाखवित होते. रीतसर अटक आणि खटला भरून शिक्षा होत होत्या. तर कधी काँग्रेस नेत्यांना सरकार चालविण्याची संधीही मिळत होती. अनेक न्यायाधीश, नोकरशहा, वकील एतद्देशीय होते. त्याचवेळीस जर्मनीने मात्र अश्याप्रकारची वागणूक पोलिशांना वा स्लाव्ह लोकांना दिल्याचा उल्लेखही कुठे आढळत नाही. उलट जनावरापेक्षाही हीन दर्जाची वागणूक त्यांना दिली गेली. कुणी बंड वा जर्मन अधिकार्‍याची हत्या केली तर नाझी कामालीच्या क्रौर्याने ते बंड चिरडीत असत. प्राग शहरात सत्तावीस मे१९४२ ला झालेल्या हायड्रिकच्या खुनानंतर नाझींनी लिडिसे गावातल्या सर्व पुरूषांच्या कत्तली करून गावच्या गाव भस्मसात केले होते. तेच ब्रिटिशांनी रॅन्डचा वध चाफेकरांनी केला म्हणून सगळे पुणे जाळले नाही. परदेशी विरोधक सोडा हो पण स्वदेशी, अस्सल जर्मन विरोधकांशी व एकेकाळच्या सहकार्‍यांशी हिटलर कसा वागला हे आपणांस ठाऊक नाही का? 'नाईट ऑफ लॉन्ग नाईव्ह्ज' ह्या नावाने इतिहासात कुख्यात असलेल्या तीस जून १९३४ च्या हत्त्याकांडाची माहिती तुम्हांला असेलच. ब्रिटिश नालायक होतेच पण जर्मनांपेक्षा बरेच बरे होते हे लक्षात घेतले पाहिजे. याविषयावर आणखीही बरेच लिहिता येईल पण विस्तारभयापोटी व वेळेअभावी थांबायला लागते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

डॉ. दाढे

Pain
Wed, 06/09/2010 - 01:46 नवीन
तुम्ही नमूद केलेले भारतीय लोक (जर्मनीतील ज्यू लोकांप्रमाणे) ब्रिटनमधे राहात नव्हते आणि त्यांचा मूळ ब्रिटीश जनतेला काहीही उपद्रव होत नव्हता..उलट फायदाच होत होता. तसेच तुम्ही जर्मनीच्या सर्व घटना आणि ब्रिटनची एकच घेउन पक्षपात करत आहात. मी एकूण संख्या/हानी याच्या बेरजेबद्दल बोलत आहे (summation sign). तसे पाहिल्यास ब्रिटीश जर्मनीच्या कितीतरी पट वाइट ठरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

तुलना?

मैत्र
Wed, 06/09/2010 - 13:32 नवीन
सर्वच आक्रमक -- ब्रिटीश, हिटलर, पोर्तुगीज, स्पॅनिश, जपानी हे स्थानिकांशी क्रूरपणे वागले आहेत. त्यात वरखाली काय करायचं. फक्त ब्रिटीश हे थोडे फार बरे कारण त्यांना वसाहती करायच्या होत्या. शेवटी त्यांचा व्यापार आणि फायदा त्यांना महत्त्वाचा वाटला आणि जगभर साम्राज्य प्रस्थापित करणं. तसा पहायला गेला तर संपूर्ण मध्ययुगीन इतिहास हा क्रूर घटनांनी भरलेला रक्तरंजित आहे. खुद्द टॉवर ऑफ लंडन मध्ये किती राजे राण्यांचा शिरच्छेद केला गेला याची मोठी यादी आहे. जे स्कॉटलंड आज ब्रिटनचा भाग आहे त्याची राणी मेरी आणि विलियम वॉलेसला इंग्लिश लोकांनी केवळ क्रूरपणे मारले. अमेरिकेतल्या स्थानिकांना आणि काळ्या लोकांना, गुलामांना ज्या सहजतेने मारून टाकायचे त्याला सुमार नव्हता. फक्त तो गोर्‍यांच्या हद्दीत आला, त्याने रागाने पाहिले असे गुन्हे ठार मारायला पुरेसे होते. पोर्तुगीज आक्रमकांनी ब्राझील आणि त्याच्या आजू बाजूची संस्कृती / मनुष्य संख्या जवळ जवळ संपुष्टात आणली. पण तरीही ते सर्वथा वाईट होते असे नाही. त्यांनी आपल्या फायद्यासाठी वसाहतींचा विकासही केला. जमवून घेणार्‍यांशी ते काही प्रमाणात सभ्यपणे वागले. जर्मन मात्र प्रत्येकच इतर वंशीयांशी भयाण पद्धतीने वागले. ऑशवित्झ च्या कँप मध्ये केलेले वैद्यकीय प्रयोग हे होलोकास्ट पेक्षाही भयानक होते. तुलना काय करायची - दगड आणि विटेची ? जर्मन समेशन थोडं कमी पडलं कारण ते जिंकले नाहीत आणि त्यांनी जगावर राज्य केलं नाही. तसं झालं असतं तर काही वंश नामशेष झाले असते कदाचित. डंकर्क च्या घटनेत असंख्य सामान्य लोकांनी छोट्या बोटींच्या अनेक फेर्‍या करून सैनिकांना परत आणलं आणि यातले बरेच लोक शेवटी जर्मन वायुहल्ल्यत बाँब किंवा गोळ्यांना बळी पडले. इतके लाख सैनिक परत आणले हा तर सत्य इतिहास आहे आणि असामान्य आहे हे तर नाकारता येणार नाही. पुष्करिणी उत्तम लेख -- ६ - ६ - १९४४ -- डी डे बद्दल ही लिहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

मैत्र

Pain
गुरुवार, 06/10/2010 - 01:13 नवीन
थोडस ? काही पट कमी आहे. इतके लाख सैनिक परत आणले हा तर सत्य इतिहास आहे आणि असामान्य आहे हे तर नाकारता येणार नाही. Try to look at the big picture. वास्तविक ते स्वतः ला समजायला हवे, किमान कोणीतरी सांगितल्यावर तरी कळायला हवे. आपलेच दळण दळायचे असले तर आनंद आहे. D-Day ची माहिती हवी असल्यास Saving Private Ryan चा पहिला अर्धा तास बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

Pain

मैत्र
गुरुवार, 06/10/2010 - 10:16 नवीन
वास्तविक ते स्वतः ला समजायला हवे, किमान कोणीतरी सांगितल्यावर तरी कळायला हवे. आपलेच दळण दळायचे असले तर आनंद आहे. -- तुमच्याकडून थोड्या चांगल्या शब्दांची अपेक्षा आहे. आपणही आपलेच दळण दळता आहात. मत वेगळं आहे म्हणून कोणीतरी सांगितल्यावर समजायला हवे असेल तर इतर चार पाच लोकांनी तुमच्यापेक्षा वेगळे मत प्रदर्शित केले आहे एवढ्या कारणावरून तुम्ही आपलं मत का नाही बदलत ? इतिहास जेते लिहितात हे खरेच. तेव्हा तो ब्रिटिश बाजूने लिहिला गेला. त्यामूळे ब्रिटीश ते चांगले आणी जर्मन ते वाईट असे नाही हे मान्य. पण ब्रिटीश हे जर्मन आक्रमकांपेक्षा प्रचंड वाईट, क्रूर, वंशवादी इ. म्हणणे हेही टोकाचे. म्हणून म्हटलं की दगड आणि विट -- थोडे मऊ आणी कठीण... डोक्यात घातले की लागायचेच.. माझं तर हेही मत आहे की अमेरिकेत झालेला जीनोसाईड्स हे खरे तर ब्रिटीशांनीच केले. कारण बहुसंख्य अमेरिकन आणि सत्ताधारी अमेरिकन - ज्यांनी स्टेट्स वसवली ते ब्रिटीशच होते... म्हणून जर्मनी - हिटलर - गेस्टापो यांचं क्रौर्य कमी होत नाही. Saving Private Ryan च्या सुरुवातीचे नॉर्मंडी लॅंडीग सिनेमा भारतात रिलीज झाला तेव्हाच पाहिले आहे. D-Day -- 6-6-1944 असे एक फोटोंनी भरलेले पुस्तक मिळाले होते काही वर्षांपूर्वी... पुष्करिणी काही लिहित आहेत तेव्हा त्यांना अजून एक घटना सजेस्ट केली (मराठी ?).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

जर्मनी ने जे काही क्रोर्य दाखवले ते

वेताळ
गुरुवार, 06/10/2010 - 11:04 नवीन
ते जवळ जवळ हिटलर सत्तेत असे पर्यतच होते.त्या आधी किंवा नंतर जर्मनी ने सार्वत्रिक मनुष्यहत्या खुप कमी प्रमाणात केल्या होत्या. हे ब्रिटन बाबत लागु होत नाही.त्याचा जवळ जवळ सर्व इतिहास खुन करणे ,सार्वत्रिक दरोडे घालणे ह्यातच गेला आहे. वर उल्लेखलेले दर्यावर्दी हे दुर देश शोधण्यासाठी फक्त गलबते घेवुन बाहेर पडले हा दावा हास्यास्पद आहे.त्याच्या सर्व सागरी मोहिमा फक्त दुर देश शोधुन त्यातील संपत्ती लुटुन आपल्या राणीचा झगा भरण्यासाठीच आखल्या गेल्या होत्या.युरोपात हा ट्रेण्ड ब्रिटिशानी सुरु केला. अशिया हा सांपत्तिक दृष्ट्या पुढारलेला भाग लुटण्यात ब्रिटिशाचा मोठा हात आहे.अफ्रिका सारखा निसर्गाने समृध्द भाग देखिल त्यानीच बरबाद केला.इतर देशाच्या साधनसंपत्तीची वाट ह्याच लोकानी लावली.भारतातील तर अमर्याद संपत्ती ब्रिटिशानी लुटुन नेली.भारतातील स्वयंपुर्ण खेड्याची वाताहात ह्यानीच केली. कित्येक देशाना त्यानी १०० वर्षे मागे नेले. तसेच त्यानी आपल्या सर्व वसाहती मध्ये आपल्याला सोयिस्कर अशीच शिक्षणपध्दती लागु केली.त्यात जे विचारवंत तयार झाले त्याना ब्रिटिश हे सज्जन व शुर हेच शिकवले गेले. बाकी देश त्यात जर्मनी,रशिया,फ्रान्स,इटली इत्यादी देश म्हणजे खलनायक हे ठसवले गेले. हेच आपण आता पहात आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

मैत्र

Pain
गुरुवार, 06/10/2010 - 20:23 नवीन
तुमचे बरोबर आहे. पण आता संपादनाची सुविधा नाहीये. आणि लोक माझा मुद्दाच लक्षात घेत नाहियेत. सगळे जण जर्मन कसे क्रूर होते त्याचे वर्णन करत आहेत जणु काही मी त्यांना सज्जन, पापभीरू म्हणतोय. वैतागलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

तुम्ही जर्मनांचे पक्षपाती आहात काय?

डॉ.प्रसाद दाढे
Wed, 06/09/2010 - 20:36 नवीन
मी कुठलाही पक्षपात करीत नसून एकंदरीत सूरावरून तुम्हाला हिटलर व गेस्टापोच्या क्रौर्याबद्दल चकार शब्दही काढावासा वाटत नाही हे स्पष्ट होत आहे. ह्यावरून पेनमहाशय जर्मनीचा (उगाचच) कैवार घेत असल्याचे निदान भासत तरी आहे. तुमच्याकडे ब्रिटिशांनी अंकित केलेल्या देशांतील हत्त्येचा आकडा व त्याचा विश्वासार्ह स्त्रोत असेल तर सादर करा. मला इंग्रजांचा पुळका नाही पण जर तुम्ही जर्मनांशी तुलना करत असाल तर क्रौर्याच्या मानाने ब्रिटिश बरे इतकेच माझे म्हणणे आहे. इंग्रजांनीही कृष्ण-कृत्ये केलेली आहेतच पण जेव्हढा द्वेष आणि त्वेष नाझींना ज्यू व इतर तथाकथित निम्नवंशियांबद्दल होता व त्या द्वेषाचे रूपांतर योजनाबद्ध कत्तलींमध्ये जसे केले गेले तसे तर ब्रिटिशांनी केलेले दिसत नाही. तुम्हांला ठाऊक असेल तर सादर करा, आम्हांलाही माहिती मिळेल. ब्रिटिशांच्या राज्यात टिळक-गांधी जिवंत तरी राहू शकले, हिटलरच्या राज्यात जन्मसिद्ध हक्कबिक्क मागणार्‍यांना त्वरित फायरिंग स्क्वॉडपुढे उभे केले असते. कुठलाही विजेता देश वा आक्रमक जितांशी कश्यापद्धतीने वर्तणूक करतो ह्यावरून त्यांच्या सुसंस्कृतपणाचे व मानसिकतेचे मूल्यमापन केले जाते. तुम्हांला भारतियांचे उदाहरण नको असले तरी ब्रिटिशांची भारतीयांप्रती वर्तणूक आणि जर्मनांची पोलिशांप्रती वर्तणूक यांची तुलना केल्यास ब्रिटिशच बरे ठरतात. दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्रिटिशांकडे संसदीय लोकशाही होती तर हिटलरची एकाधिकारशाही होती. त्यामुळेच इंग्रजांची गुलामी ही नाझी गुलामगिरीपेक्षा सुसह्य होती. तुम्ही नमूद केलेले भारतीय लोक (जर्मनीतील ज्यू लोकांप्रमाणे) ब्रिटनमधे राहात नव्हते आणि त्यांचा मूळ ब्रिटीश जनतेला काहीही उपद्रव होत नव्हता..उलट फायदाच होत होता. तुम्हांला वरील विधानातून निश्चित काय सांगायचे आहे? जर्मनीतले ज्यूंनी व त्यातही तान्ह्या बाळांनी हिटलरचे असे काय घोडे मारले होते वा उपद्रव होता ज्यासाठी त्यांची इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आली? ह्यासगळ्या होलोकॉस्टवर तुमचे काय समर्थन आहे? जे ज्यू जर्मनीत व युरोपातल्या देशांमध्ये पिढ्यानपिढ्या वास्तव्य करून होते, ज्यात अनेक बुद्धिमान शास्त्रज्ञांचा (आईनस्टाईन) समावेश होता, अश्या एका समाजाचाच पूर्णपणे नि:पात करण्याचा विडा उचललेल्या हिटलरला विकृत हैवान का नाही म्हणायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

तुम्ही अनेक मुद्द्यांची सरमिसळ करत आहात

Pain
गुरुवार, 06/10/2010 - 01:12 नवीन
मी कुठलाही पक्षपात करीत नसून एकंदरीत सूरावरून तुम्हाला हिटलर व गेस्टापोच्या क्रौर्याबद्दल चकार शब्दही काढावासा वाटत नाही हे स्पष्ट होत आहे. ह्यावरून पेनमहाशय जर्मनीचा (उगाचच) कैवार घेत असल्याचे निदान भासत तरी आहे. तुमच्याकडे ब्रिटिशांनी अंकित केलेल्या देशांतील हत्त्येचा आकडा व त्याचा विश्वासार्ह स्त्रोत असेल तर सादर करा. चकार शब्द ? मी संपुर्ण ८ वर्षे मोजलेली आहेत. मी केलेल्या प्रत्येक तुलनेत त्याचा उल्लेख आहे. खरे आरोप करता आले तर पहा. नाझी लोकानी केलेले अत्याचार हे अगदी अलीकडील असल्याने त्याची साद्यंत माहिती मिळते. ब्रिटीशांची कारकीर्द २००-२५० वर्षापुर्वीच सुरु झाल्याने विस्त्रुत माहिती माझ्याकडे नाही. पण उदाहरणादाखल- त्यांनी सुरु केलेला गुलामांचा व्यापार ( मिसळपाववरच काहि महिन्यांपुर्वी १ लेख आणि फोटो आले होते) त्याचे परिणाम अमेरिकेतील वंशभेद आणि यादवी . मला इंग्रजांचा पुळका नाही पण जर तुम्ही जर्मनांशी तुलना करत असाल तर क्रौर्याच्या मानाने ब्रिटिश बरे इतकेच माझे म्हणणे आहे. इंग्रजांनीही कृष्ण-कृत्ये केलेली आहेतच पण जेव्हढा द्वेष आणि त्वेष नाझींना ज्यू व इतर तथाकथित निम्नवंशियांबद्दल होता व त्या द्वेषाचे रूपांतर योजनाबद्ध कत्तलींमध्ये जसे केले गेले तसे तर ब्रिटिशांनी केलेले दिसत नाही. ब्रिटीशांच्या अमलाखालील अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, भारत, चीन आणि आग्नेय आशिया यांचा निव्वळ भौगोलिक विस्तार, लोकसंख्या आणि सारासार विवेक एवढेच पुरेसे आहे. एका माणसाला क्रौर्याने मारणे < १०० माणसांना पिढीजात गुलामगिरीत ढकलणे ब्रिटिशांच्या राज्यात टिळक-गांधी जिवंत तरी राहू शकले, हिटलरच्या राज्यात जन्मसिद्ध हक्कबिक्क मागणार्‍यांना त्वरित फायरिंग स्क्वॉडपुढे उभे केले असते. जे जितके त्रासदायक ठरले त्यांना त्या प्रमाणात शिक्षा दिल्या- क्रांतिकारकांना फासावर लटकविले, टिळक-सावरकरांना काळे पाणी (आणि गांधी ? असो. तो वेगळा मुद्दा आहे) तुम्हांला भारतियांचे उदाहरण नको असले तरी ब्रिटिशांची भारतीयांप्रती वर्तणूक आणि जर्मनांची पोलिशांप्रती वर्तणूक यांची तुलना केल्यास ब्रिटिशच बरे ठरतात. तुम्ही नमूद केलेले भारतीय लोक (जर्मनीतील ज्यू लोकांप्रमाणे) ब्रिटनमधे राहात नव्हते आणि त्यांचा मूळ ब्रिटीश जनतेला काहीही उपद्रव होत नव्हता..उलट फायदाच होत होता. तुम्हांला वरील विधानातून निश्चित काय सांगायचे आहे? ज्यू आणि जर्मन लोकांमधे तणाव होता. तरिहीहोलोकास्ट, बालहत्या वाईटच. समर्थन कोण करेल ? पण ब्रिटीश-->भारतीय आणि जर्मन्-->ज्यू ही तुलनाच चुकिची आहे. ब्रिटीश -->स्कॉट्लंड-वॉलेस ही तुलना योग्य आहे. आणि तान्ही बाळे जालियनवाला बागेतही मेली. जे ज्यू जर्मनीत व युरोपातल्या देशांमध्ये पिढ्यानपिढ्या वास्तव्य करून होते, ज्यात अनेक बुद्धिमान शास्त्रज्ञांचा (आईनस्टाईन) समावेश होता, अश्या एका समाजाचाच पूर्णपणे नि:पात करण्याचा विडा मग पिढ्यानपिढ्या आफ्रिकेत वास्तव्य करून असणार्‍यांना गुलाम म्हणुन विकले ही समाजसेवा का हो ? कुठलाही विजेता देश वा आक्रमक जितांशी कश्यापद्धतीने वर्तणूक करतो ह्यावरून त्यांच्या सुसंस्कृतपणाचे व मानसिकतेचे मूल्यमापन केले जाते सुसंस्कृत लोक आपणहून कोणावर हल्लाच करणार नाहीत. त्यामुळे तो मुद्दा बाद. इथे दोघही क्रूर होते. आता प्रश्न एकूण संख्येचा / आकाराचा आहे ज्यात ब्रिटीश जर्मनांच्या काही पट जास्त आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

मी

पुष्करिणी
Wed, 06/09/2010 - 21:02 नवीन
मी मध्यंतरी पोलंडमधल्या काँसंट्रेशन कॅंप ची टूर केली होती, नंतर निदान २ दिवस तरी झोप लागत नाही.. क्रूरपणाचा कळस म्हणजे काय ते कळत.... एकतर त्यांना जर्मनी ( आणि इतर जिंकलेले देश ) सोडताना अस सांगितल की तुम्हांला वेगळा भाग देतोय आता तिकडे रहा ...त्यामुळे बेवारशी पडलेलं सामान पहाताना बर्‍याच संसारोपयोगी वस्तू दिसतात.. तिकडे मानवी केसांचे ( प्रेतावरील ) गालीचे आहेत, प्रेतांच्या दातात सोनं-चांदी भरलेल असेल तर ते उपटून गोळा करून जर्मनीला पाठवल जायच.. ३-४ महिने अत्याचार करून मारल्यावर जर काही थोडी चरबी प्रेतावर उरली असेलच तर ती साबण तयार करण्याकरता कापून वेगळी करायचे... अजारी लहान मुलांना आयांनाच इंजेक्शन देउन मारायला लावायचे ... कधीकधी प्रेतांबरोबर जिवंत ज्यूं ना पण जाळायचे..असं बरच. आणि हे अखंड चालू होतं ४-५ वर्ष.. मूर्तिमंत क्रूरता इतकच म्हणावस वाटत (मी ती टूर विसरायचा फार प्रयत्न करतेय) पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

पुष्करिणी

Pain
गुरुवार, 06/10/2010 - 01:27 नवीन
तुम्ही संगितलेले ह्रुदयद्रावक आहेच. जर्मन लोक सज्जन अस मी अजिबात म्हणत नाहिये. पण ब्रिटीश त्यांच्या पुढे होते हे बर्‍याच लोकांना माहीत नसते. मिपावर काहि महिन्यांपुर्वी आलेला लेख पहा: आफ्रिकेतील गुलामांच्या व्यापारात वापरलेल्या कोठीस एकाने भेट देउन फोटो व वर्णन दिले होते. अधिक माहितीसाठी अंकल टॉमची केबिन, एक होता कार्व्हर वगैरे वाचा. आफ्रिकन लोक आपल्या देशात सुखाने जगत होते. त्यांना गुलाम बनवून व्यापार केल्याने काळे-गोरे भेद, यादवी वगैरे सर्व गोष्टी सुरु झाल्या. ज्यूंना वेगळा देश मिळाला, सापडलेल्या जर्मन अधिकार्‍यांवर खटले भरून शिक्षा झाल्या पण हे तर अजुन चालुच आहे अणि ज्यांच्यामुळे झाला त्या ब्रिटीश नामानिराळे राहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

मी

पुष्करिणी
गुरुवार, 06/10/2010 - 13:06 नवीन
मी ब्रिटीशांना व्यापारी वृत्तीचे म्हणते.... त्यांनी कायम त्यांचा फायदा पाहिला, दुसरं काही नाही. आणि या साठी त्यांनी साम -दाम्-दंड्-भेद या सगळ्या नीती वापरल्या. ते संत महात्मे नव्हतेच. भारत, आफ्रिका इथे तरी त्यांना पाय रोवू देण्यास स्थानिक लोकांनी कळ्त नकळ्त खूप मद्त केली. त्यामुळे नंतरच्या गुलामगिरीचं पूर्ण खापर त्यांच्यावर फोडता येत नाही. हिटलरचं उद्दीष्ट जर्मन वंशाच्या लोकांना एकत्र आणणे आणि न आवडणार्‍या / पट्णार्‍यांचा समूळ नायनाट करणे?? वर एका प्रतिसादात वेताळ यांनी म्हटल आहे की मित्रराष्ट्रंची जीत झाली म्हणून आपल्या नशिबी नेहरू आले पंतप्रधान म्हणून... काही व्यक्तिंना नेहरू न आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे निर्णय्क्षमतेचा अभाव ( माझा नेहरूंवर फार अभ्यास नाही )...मग इथे चर्चिल या गुणासाठी तरी आवडला पाहिजे :) पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

पुष्करिणी

Pain
Fri, 06/11/2010 - 00:13 नवीन
मी ब्रिटीशांना व्यापारी वृत्तीचे म्हणते.... त्यांनी कायम त्यांचा फायदा पाहिला, दुसरं काही नाही. आणि या साठी त्यांनी साम -दाम्-दंड्-भेद या सगळ्या नीती वापरल्या. हिटलरचं उद्दीष्ट जर्मन वंशाच्या लोकांना एकत्र आणणे आणि न आवडणार्‍या / पट्णार्‍यांचा समूळ नायनाट करणे?? उद्दिष्ट काहीही असो,त्याची परिणती स्थानिक लोकांच्या मृत्यू, गुलामगिरी आणि हालअपेष्टा यातच झाली ना. आणि ब्रिटीशांमुळे होरपळलेल्या लोकांची संख्या जर्मनीपेक्षा काही पटीने जास्त आहे. त्यांना पाय रोवू देण्यास स्थानिक लोकांनी कळ्त नकळ्त खूप मद्त केली. त्यामुळे नंतरच्या गुलामगिरीचं पूर्ण खापर त्यांच्यावर फोडता येत नाही. स्थानिकांनी आपपल्या चुकिची शिक्षा दसपटीने भोगली, अजुनही भोगत आहेत. पण मुद्द तो नाहीये. ब्रिटीशांनीच सार्‍या जगाला गुलामगिरीत ढकलले, मग ते त्यासाठी दोषी. जर्मनांनी ज्यू लोकांचे शिरकाण केले, त्याबद्दल ते दोषी. मग इथे चर्चिल या गुणासाठी तरी आवडला पाहिजे चर्चिलमुळेच ब्रिटन तगले. आणि विरोधाभास असा की त्या पुढच्या निवडणुकीत जनतेने त्याला पाडले. ( भारतासाठी हे चांगलेच कारण तो स्वातंत्र्य द्यावे या मताचा नव्हता.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

ब्रिटीशां

पुष्करिणी
Fri, 06/11/2010 - 12:39 नवीन
ब्रिटीशांनीच सार्‍या जगाला गुलामगिरीत ढकलले, मग ते त्यासाठी दोषी. जर्मनांनी ज्यू लोकांचे शिरकाण केले, त्याबद्दल ते दोषी. अगदी ११० % बरोबर... पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

कुणी

II विकास II
Fri, 06/11/2010 - 11:12 नवीन
हा प्रतिसाद श्री प्रसाद यांना कुणी अहिंसेने तर कुणी हिंसेने इंग्रजांना विरोध करत होते. पण त्याविरोधात जर्मनांच्या तुलनेत इंग्रज सरकार सहिष्णू वर्तणूक दाखवित होते. रीतसर अटक आणि खटला भरून शिक्षा होत होत्या. == हे विधान फार फार तर अहिंसक मार्गाने विरोध करणार्‍यांच्या बाबतीत थोडेफार बरोबर धरता येईल. हिंसा वापरणार्‍याची उदाहरणे बटुकेश्वर दत्त, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद म्हणुन घेता येतील. १८५७ - पहीले स्वातंत्र्ययुध्द - सावकरांनी ह्या पुस्तकात इंग्रजांनी कशी सुड म्हणुन गावे च्या गावे जाळुन टाकली ह्याचे पुरावे दिले आहेत. लाला लजपतराय यांना मारलेल्या जिव्हारी लाठ्या ह्याचे विस्मरण झाले आहे असे वाटते. गांधी प्रणीत मोर्चावर सुध्दा लाठीमार झाल्याची उदाहरणे आहेत. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

आवडला

प्रियाली
Tue, 06/08/2010 - 21:20 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

डॉ.

पुष्करिणी
Tue, 06/08/2010 - 21:28 नवीन
डॉ. दाढ्यांच्या प्रतिसादात खरं तर सगळे मुद्दे आले आहेतच... कुठेही वसाहत वसवण्यासाठी स्थानिक लोकांची गरज लागतेच, भले गुलाम म्हणून का होइना. हिटलरच्या बाबतीत ही गोष्ट वंशाभिमानामुळं अवघड होती. ब्रिटीश इथे आले तेंव्हा देशातील संस्थानिकांच्या आपापसातील हेव्यादाव्यांमुळे इस्ट इंडिया कंपनीच फावल आणि त्यांनी हातची संधी सोडली नाही. हे राष्ट्र्हिताच्या दृष्टीन योग्य पाउल आहे...आपल्यालाही नाही का वाटत १९६५ मध्ये जर लाहोरपर्यंत आपल्या फौजा गेल्या होत्या तर रिकाम्या हाती का आल्या, किंवा नेहरूंनी काश्मिर प्रश्न युनोत का नेला म्हणून? बाकीच्या वसाहतींच्या तुलनेत ब्रिटीशांच्या धर्म आणि राजकारणात बरीच तफावत होती... हेच आपण स्पॅनिश , पोर्तुगिज, ड्च यांच्याबद्द्ल नाही म्हणू शकत. त्यांनी लुटालूट केली या बद्द्ल दुमत नाही आणि रागही आहे, पण त्याच्बरोबर जे काही चांगले गुण आहेत ते मान्य करावेच लागतात. राष्ट्र्भक्ती, अचूकता, प्लॅनिंग, कष्टाळू वृत्ती , ध्येयवाद ह्या सगळ्या गोष्टी जर्मनीकडे ब्रिटीश लोकांपक्षा १० पट अधिक होत्या...पण त्याचा कसा अतिरेक झाला हे माहित्च आहे. आंदमान बेटांवर सुभाष बाबूंनी जपान्यांच्या मदतीनं १९४५ सालीच तिरंगा फडकावला . तिकडे स्थानिक लोकांवर आणि स्वातंत्र्य चळ्वळीतल्या लोकांवर जपान्यांनी बरेच अत्याचार केले, लोकांच यामुळे अझाद हिंद सेनेबद्द्लच मत बरच वाइट झालं होत. अर्थात सुभाषबाबूंना या बद्द्ल काही माहिती नव्हती असं म्हणतात. पुष्करिणी
  • Log in or register to post comments

सहमत

विकास
Tue, 06/08/2010 - 22:08 नवीन
डॉ. दाढे, चतुरंग आणि पुष्करिणीच्या वरील प्रतिसादाशी सहमत. सर्वप्रथम कोणिही परकीय राज्यकर्ता हा चांगला नसतो कारण ते शेवटी पारतंत्र्यच आहे. पण असे घडण्यासारखे जेंव्हा स्वकीय वागतात ते त्याहूनही वाईट असे वाटते... जालीयनवाला बागेत जे काही ब्रिटीशांनी केले ते अक्षम्य होते पण ते सार्वत्रिक घडले नाही जे ज्यू आणि जिप्सींच्या बाबतीत हिटलरने केले. हेच आपण स्पॅनिश , पोर्तुगिज, ड्च यांच्याबद्द्ल नाही म्हणू शकत. ह्याच संदर्भात लिहीणार होतो तेंव्हा हा प्रतिसाद दिसला. दक्षिण अमेरिका, मेक्सिको वगैरे देशात जे या लोकांनी सांस्कृतीक नुकसान करून वाताहात केली तशी ब्रिटीशांनी भारतात तरी केली नाही. बाकी सत्ताधीश ब्रिटीशांबद्दल भरपूर वाईट बोलता येईलच पण ते या संदर्भात नाही. तिकडे स्थानिक लोकांवर आणि स्वातंत्र्य चळ्वळीतल्या लोकांवर जपान्यांनी बरेच अत्याचार केले, लोकांच यामुळे अझाद हिंद सेनेबद्द्लच मत बरच वाइट झालं होत. अर्थात सुभाषबाबूंना या बद्द्ल काही माहिती नव्हती असं म्हणतात. हे मी प्रथमच ऐकले. अधिक माहीती असल्यास समजून घेयला आवडेल. मात्र नात्झी जर्मन भारतात आले नाहीत ते बरे झाले. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

>>हे मी

II विकास II
Tue, 06/08/2010 - 22:23 नवीन
>>हे मी प्रथमच ऐकले. अधिक माहीती असल्यास समजून घेयला आवडेल. मात्र नात्झी जर्मन भारतात आले नाहीत ते बरे झाले. हे मी पण प्रथमच ऐकतो आहे. नेताजी बोस ह्यांनी म्यानमारमधील स्थानिक जनता आणि युध्दकैदी यातुन सैन्य तयार केले होते. सैन्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी सुवर्णतुला केल्याचा धडा शाळेत असताना होता. तो एक दंतकथा नसेल असेल वाटते. >>मात्र नात्झी जर्मन भारतात आले नाहीत ते बरे झाले. अगदी अगदी. जर जर्मेनी युध्द जिंकली असती तर किती राष्ट्रे पारतंत्र राहीली असती, देवालाच माहीती. आपण असे आंतरजालावर चर्चा करत असतो का, हाही एक प्रश्न आहे. दुसर्‍या महायुध्दाचा भारताला फायदा हा झाला की, जर्मनीने इंग्लंड पेकाट मोडल्याने आपल्याने स्वातंत्र मिळण्यास खुप मदत झाली. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

II विकास II

Pain
Tue, 06/08/2010 - 23:32 नवीन
अगदी अगदी. जर जर्मेनी युध्द जिंकली असती तर किती राष्ट्रे पारतंत्र राहीली असती, देवालाच माहीती. आपण असे आंतरजालावर चर्चा करत असतो का, हाही एक प्रश्न आहे. नंतरचे शीतयुद्ध तिरंगी झाले असते. आणि ती राष्ट्रे मुळात स्वतंत्र कुठे होती ? मुघलकालीन भारताप्रमाणे एका बादशहाचा अंमल संपून दुसर्‍याचा झाला असता एवढेच. पण मुद्दा तो नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II

पुष्करिणी

Pain
Tue, 06/08/2010 - 23:37 नवीन
आंदमान बेटांवर सुभाष बाबूंनी जपान्यांच्या मदतीनं १९४५ सालीच तिरंगा फडकावला . तिकडे स्थानिक लोकांवर आणि स्वातंत्र्य चळ्वळीतल्या लोकांवर जपान्यांनी बरेच अत्याचार केले, लोकांच यामुळे अझाद हिंद सेनेबद्द्लच मत बरच वाइट झालं होत. अर्थात सुभाषबाबूंना या बद्द्ल काही माहिती नव्हती असं म्हणतात. ही माहिती कुठे मिळाली ? जपान्यांनी चीनच्या जिंकलेल्या भागावर अनन्वित अत्याचार केले, भारताच्या नाही. त्यांचे इतके सैनिक पोचलेच नव्हते. त्यांनी विमानहल्ला, ब्रिटीश फौजेतले भारतीय कैदी सोडणे, प्रशिक्षण, साधनसामुग्री याप्रकारे मदत केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

उत्तम लेख

चित्रा
Wed, 06/09/2010 - 03:44 नवीन
पुष्करिणी, लेख उत्तम आणि अभ्यासपूर्ण झाला आहे. डंकर्कबद्दल मला विशेष काहीच माहिती नव्हती. असेच अजून अनेक लेख येत राहू देत.. मिपावर स्वागत आहे.
  • Log in or register to post comments

वाचलेल्या

पुष्करिणी
Wed, 06/09/2010 - 13:08 नवीन
वाचलेल्या एका पुस्तकाच नाव आत्ता आठवतय The Japanese in the Nicobars , लेखक सिमरन सिंग ( बहुतेक ) . पुष्करिणी
  • Log in or register to post comments

धन्यवाद

विकास
Wed, 06/09/2010 - 16:35 नवीन
पुस्तकाचे नाव दिल्यामुळे गुगलल्यावर विकीचा हा एक प्राथमिक दुवा मिळाला, ज्यात ही माहीती आहे. अजूनही खाली असतील पण ते बघत बसलो नाही. मात्र हा सगळा प्रकार कधी वाचनात न आल्याने नक्कीच माहितीपूर्ण आहे. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

माहितीपूर

स्वाती२
Wed, 06/09/2010 - 16:10 नवीन
माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

अटोनमेंट

चिंतातुर जंतू
गुरुवार, 06/10/2010 - 00:37 नवीन
यावरून इअन मक्यूअनच्या 'अटोनमेंट' या कादंबरीची आठवण आली. यात काही कळीचे प्रसंग डंकर्कच्या पार्श्वभूमीवर फ्रान्स व लंडनमध्ये घडतात. डंकर्कमुळे ब्रिटिशांचे धैर्य वाढले असेलही कदाचित, पण पुस्तकातली परतणार्‍या सैनिकांची वर्णनं हृदयद्रावक आहेत. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments

उत्तम ले़ख

दिपक
गुरुवार, 06/10/2010 - 10:42 नवीन
बरीच माहिती मिळाली. दुसर्‍या महायुद्धाबद्दल नेहमीच आकर्षण राहिले आहे. मध्यंतरी त्याविषयावरील मिळेल ते चित्रपट शोधुन धडाधड पाहिले होते. दहा भागांची ’बॅण्ड ऑफ द ब्रदर’ ही अप्रतिम मालिकाही पाहीली. ह्या विषयावर तसेच त्याच काळात झालेल्या ’कॅटीन मानवसंहा्रा’बद्दल अजुन माहिती मिळाली तर वाचण्यास आवडेल. ह्या लेखासाठी आणि प्रतिसादातील माहितीसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments

कातीन हत्याकांड

चिंतातुर जंतू
गुरुवार, 06/10/2010 - 12:13 नवीन
तसेच त्याच काळात झालेल्या ’कॅटीन मानवसंहा्रा’बद्दल अजुन माहिती मिळाली तर वाचण्यास आवडेल.
आंद्रे वायदा या विख्यात पोलिश दिग्दर्शकाचा यावर आधारित चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता, तो जरूर पाहावा. पोलंडच्या अभिज्ञ वर्गाची एक सबंध पिढी यात मारली गेली. हत्याकांड जिथे घडले तिथे श्रध्दांजली वाहायला जाणारे पोलंडचे राष्ट्रप्रमुख, सेनाप्रमुख, राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष वगैरे नुकतेच विमान अपघातात मरण पावले, हा आणखी एक विलक्षण हृदयद्रावक योगायोग! - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

लिहिणार

पुष्करिणी
गुरुवार, 06/10/2010 - 13:10 नवीन
लिहिणार आहे यावर थोड्या दिवसांत.. पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

चर्चिल आणि हिटलर....!!

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 06/10/2010 - 23:35 नवीन
(सातत्याने प्रवासात असल्याने या अतिशय अभ्यासपूर्ण ध्याग्यावर इच्छा असूनही सविस्तर प्रतिक्रिया देऊ शकलो नव्हतो, ती आता देत आहे.) सुरुवातीसच हे स्पष्ट करणे गरजेचे आहे कि श्री. पेन, श्री वेताळ आणि त्याच बरोबर श्री. विकास यांच्या लेखन पद्धतीने कित्येकांच्या मनात असा संभ्रम निर्माण झाला की ही मंडळी "हिटलरधार्जीणी" आहेत की काय? मात्र असे मला तरी कुठेही जाणवले नाही, कारण यांनी कुठेही हिटलरला सौम्य रंगाच्या ब्रशात रंगविलेले नाही. हिटलर क्रूरकर्माच होता हे निर्विवाद सत्य आहे, पण म्हणून "विन्स्टन चर्चिल" म्हणजे कुणी पंख छाटलेला देवदूत होता असे समजणे फार भाबडेपणाचे होईल. हिटलर फावड्याला फावडेच म्हणत होता, तर चर्चिल त्याला कृषिकर्मातले अवजार, इतकाच फरक. मात्र दोघेही त्याचा वापर एकाच कारणासाठी करत होते. एकाला झाकावा अन दुसर्‍याला काढावा अशीच दोघांची लायकी. ...आणि आपण "जर्मनी पेक्षा इंग्लंडचे गुलाम झालो हे चांगले झाले" हे म्हणण्यात आपण काय मिळवितो? शेवटी नशिबात गुलामच होणे होते या देशाच्या तर मग ते अहिरावणाचे झालो काय वा महिरावणाचे, दोघेही आम्हाला आपल्या पायाखालीच दाबणार ना? इंग्लंडच्या अगोदर आम्ही मोगलांचे गुलाम होतो, आता उद्या कुणी त्यावर धागा काढला तर असे म्हटले तर चालेल का की, 'बरे झाले आपण चेंगीज खानपेक्षा बाबरचे गुलाम झालो." गुलामी मनोवृत्तीला कुणीही जेता खतपाणीच घालत असतो...आणि शेळीमेंढ्यासारख्या जनतेला धरून आपली होतील ती कामे करून घेणे हाच उद्देश त्याच्याकडे असतो. हिटलरने ज्यूंचा संहार केला तसाच आपलाही केला असता असा एक मुद्दा चर्चेत दिसून येतो. होय ती शक्यता नाकारता येत नाही, पण असेही आहे की कुणी सांगावे त्यातून इथे त्या काळात असे नेते निर्माण झाले असते की ज्यांनी त्या नरसंहाराला तोंड देण्यासाठी या प्रचंड देशातील शक्तीला एकत्रित आणण्यासाठी विविध प्रयत्न केले असते. अर्थात ही जर-तर ची भाषा झाली, त्यामुळे प्रत्यक्षात काय स्थिती होती ते पाहणे क्रमप्राप्त आहे. युरोपचा इतिहास साक्षीदार आहे की फासिझमच्या आणि नाझी तत्वज्ञानाच्या वाढीला इंग्लंड आणि फ्रांस या "लोकशाहीवादी" राष्ट्रांनीच फार मोठे खतपाणी दिलेले आहे. हिटलर आणि मुसोलिनी यांच्या सुरुवातीच्या आक्रमक आणि अत्याचारी राजकारणाकडे दीर्घकाळ डोळेझाक करण्याचे धोरण इंग्लंड, फ्रांस आणि अमेरिकेने स्वीकारलेले होते. तो भस्मासुर जगाचा ग्रास करील एवढे अक्राळविक्राळ रूप धारण करून उभा राहिला त्यामुळे त्या पापाची जबाबदारी इंग्लंड, फ्रांस आणि अमेरिकेने स्वीकारणे भाग होते. याचा दुसरा अर्थ असा की जे रोज लोकशाहीच्या नावाने जप करतात ते लोकशाहीवादी असतीलच असे नाही. हिटलर आणि मुसोलिनी दोघेही कम्युनिस्ट विरोधात होते, त्यामुळे युरोप मधून क्म्युनिस्टांचे उच्चाटन झाले तर इंग्लंड आणि फ्रांसला आनंदाच्या उकळ्याच फुटणार होत्या ना, त्यामुळे मुसोलिनीने अ‍ॅबिसिनियावर केलेले आक्रमण आणि हिटलरने र्‍हाईनलँडमध्ये घुसविलेल्या सेना इंग्लंड आणि फ्रांसने मिळून रोखण्याचे प्रयत्न केले असते तर सुरुवातीलाच हिटलरच्या महत्वाकांक्षेला लगाम बसला असता (हे वाक्य खुद्द चर्चिलचे आहे, माझे नव्हे...). मात्र हां... इथे हेच चर्चिल महाराज हे त्यावेळी तसे का घडले नाही याचे उत्तर मात्र देत नाही, त्याला कारण असे की युरोपात वाढत्या कम्युनिझमचा नायनाट करण्यासाठी नाझीचा उदय आणि फासिझामचा फैलाव हे हत्यार चांगले आहे असे ह्या आपले साम्राज्य जतन करण्याची इच्छा असणार्‍या चर्चिलसारख्या लोकशाहीवाद्यांना वाटत होते. एक असूर दुसर्‍या असुराचा नाश करत आहे हे यांना टेम्स नदीकाठी मासेमारी करत पाहायला त्यावेळी आवडलेच होते. चर्चील सारख्या धूर्त लोकांच्या पुतना मावशी-प्रेमाचे गोडवे गाण्यापूर्वी हेही लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे की हिटलरनेसुद्धा जर्मनीत निवडणुका लढविल्या होत्या त्यादेखील संसदीय लोकशाहीने जनतेचे प्रश्न सोडविण्यात दाखविलेले अपयश याच मुद्द्यावर. पहिल्या महायुद्धात झालेली आपल्या देशाची मानहानी आणि त्यात ज्यु जमातीविषयी त्याच्या मनात खदखदणारा संताप या दोन बाबी त्याची पाठराखण करणार्‍यांना पुरेशा होत्या. दुसरा मुद्दा आहे तो ब्रिटिशांनी भारतात खूप सुधारणा केल्या ! म्हणजे काय केले? गोर्‍या साहेबासाठी आणि त्याच्या इंग्लंडमधील पिलावळीसाठी "हिंदुस्तान" ही बारमाही दुभती गाय होती आणि या गायीला हिरवागार चारा २४ तास दिला तरच ती दुध देणार हे त्याच्या धंदेवाईक प्रवृत्तीला नक्कीच माहित होते, म्हणून त्याने आमच्यातीलच गोपालक हाती धरून गाय कायम गुबगुबीत कशी राहील हे पाहिले. ज्यावेळी गायीने दावे सोडून माळावर जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आमच्याच लोकाकडून तिला चाबकाचे फटकारे कसे मारले जातील हेही पाहिलं. एका विशिष्ट मुद्यावर इथल्या त्यावेळेच्या ३०-४० कोटी लोखाना खुष ठेवायचे... तो मुद्दा म्हणजे 'राणी' ने १८५७ च्या उठावानंतर दिलेले वचन की, हिंदुस्थानातील प्रजेच्या "धार्मिक" बाबीत कंपनी सरकार ढवळाढवळ करणार नाही. झाले, मग या गुलामांना तर दुसरे काय पाहिजे होते? अशी दोन तीन सुवासाची पाने आमच्या तोंडाला पुसली म्हणजे आम्ही मोकळे झालो "भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधामान्य सार्वभौम भूवर !" असे जर होते तर चर्चिलच काय मग हिटलर जरी इथे आला असता तर काय फरक पडला असता? डॉ. प्रसाद दाढे यांच्यासाठी. ~~~~ मी आपले अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचले व ते निश्चितच विचारपूर्वक आणि प्रभावशाली आहेत यात संदेह नाही. तरीही त्यातील पुढची एक बाब म्हणजे "डंकर्क" या विषयावर आपण चर्चा करत असताना ज्यावेळी नेत्यांच्या मनोवृत्तीचा प्रश्न आला त्यावेळी कशाला आपल्या देशाच्या चालू तारखेच्या "महान नेत्यांना" या चर्चेत आणला? अहो सर, काय लायकी आहे या क्षुद्र आणि रक्तपिपासू लोकांची की ज्यांची नावे आपल्यासारख्या एका अभ्यासू वृत्तीच्या व्यक्तीने इथे टाईपला घ्यावी? मरू दे त्यांना त्यांच्या कर्माने !! आणि तुमच्याकडे आणि माझ्याकडे, किंवा इथे प्रतिसाद दिलेल्या सर्वश्री पेन, विकास, वेताळ, पुष्कीरिणी आदींच्याकडे असा काय प्रमेय आहे की, सध्याच्या या "गार्बेज"ला जनतेने काढून टाकल्यावर नव्याने येणारे नंदनवनातील संत्री असतील, जी खाताच सारा भारत समाधानाचा ढेकर देईल? बिलकुल आशा बाळगू नका आपल्या मतदाराकडून. ह्या नेत्यांना पक्के ठाऊक आहे की किती नोटा टाकल्या तर कसे मतदार पाळीत उभे राहतात. ४० आणि ५० टक्के मतदानावर इथले सरकार राज्य करते आणि त्यावेळी कितीजण खंत बाळगतात की आपण मतदान केले नाही याची? आणि जे करतात त्यांच्या सारासार बुद्धीबद्दल तर काय बोलायचे. मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीतून "गोविंदा" सारखा एक उल्लू नट श्री. राम नाईक सारख्या अभ्यासू संसदपटूला पराभूत करून निवडून येतो तेव्हा आपल्यासारख्या वैचारिक लोकांची वाचाच बसते ना? काय तो धर्मेंद्र, काय तो विनोद खन्ना, काय ती "तुलसी", अन काय तो "रावण" !!! हे जर खासदार आपले आजचे तर मग उद्या जॉनी लिवर आणि हिमेश रेशमिया तुम्हाला संसद भवनात वावरताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

इन्द्र्राज पवार

Pain
Fri, 06/11/2010 - 00:42 नवीन
मला ख्.व. ची सुविधा उपलब्ध नसल्याने इथेच प्रतिसाद देत आहे. आपल्या व्यस्त जीवनक्रमातून वेळ काढुन सविस्तर लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही कोणीच उल्लेख न केलेले नवीन मुद्दे तुम्ही टेबलावर आणलेत. इतरांप्रमाणे मी हिटलर आणि त्याच्या क्रुरकर्मांची भलामण करतोय/ अनभिज्ञ आहे असा तुमचा गैरसमज झाला नाही हे पाहून बरे वाटले. बाकी इंग्लंडच्या गुलामगिरीची तरफदारी करण्यापर्यंत गेलेले लोक पाहून थक्क झालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

बहुदा

चिरोटा
Fri, 06/11/2010 - 11:37 नवीन
असे जर होते तर चर्चिलच काय अग हिटलर जरी इथे आला असता तर काय फरक पडला असता?
हिटलर काय्/चर्चिल काय दुसर्‍या देशांवर आपला हक्क आहे असे म्हणणारे साम्राज्यवादी होते.ब्रिटिशांनी भारताला लुटले हे खरे पण त्यांच्या साम्राज्यवादी धोरणांत माणसांना सरळ ठार मारणे,माणसे नाहिशी करणे,concentration camp वगैरे प्रकार नव्हते.थोडक्यात ब्रिटिशांचा सुसंस्कृत साम्राज्यवादाचा मुखवटा होता. क्रांतिकारक असोत वा टिळक्,गांधी ,बोस असोत, त्यांच्यावर खटले ब्रिटिश सरकारने रीतसरच त्यांच्या कायद्यानुसार भरले(त्यांना खटला लढण्याचे स्वातंत्र्यही दिले) आणि मगच निकाल दिला्. हिटलर/जर्मनीने भारतावर राज्य केले असते तर खरोखर असे झाले असते का हा प्रश्न निश्चित उभा राहतो. P = NP
  • Log in or register to post comments

सुसंस्कृत साम्राज्यवाद...???

इन्द्र्राज पवार
Fri, 06/11/2010 - 15:28 नवीन
"...थोडक्यात ब्रिटिशांचा सुसंस्कृत साम्राज्यवादाचा मुखवटा होता...." श्री.भेंडीबाजार.... मला प्रामाणिकपणे वाटत आहे की इथे आपली थोडी गल्लत होत आहे. लक्षात घ्या ~~ हिटलर सत्तेवर आला तो जर्मनीला पूर्ववैभव देण्याच्या घोषणेवर आणि त्याच्या व समर्थकांच्या नजरेत होते "त्याच" देशाचे ज्यू नागरिक, ज्यांच्यामुळे पहिल्या महायुध्दात आपला मानहानीकारक पराभव झाला असे त्यांचे मत होते. त्यामुळे सत्तेवर आल्यावर त्यांचे शिरकाण करणार ही त्याची घोषणा होती. युरोपमध्ये "आर्यन रेस"चे वर्चस्व व कम्युनिझमचा नाश हे त्याचे स्वप्न. दुसरीकडे ब्रिटाशांची साम्राज्यशाही "सूर्य मावळणार नाही" या तत्वावर चालली होती आणि महत्वाचे म्हणजे त्यांची पहिली नजर ही "व्यापार्‍या" ची असल्याने आपल्याला अंकीत असलेल्या राष्ट्रातून जितकी लूट नेता येते तिला प्राधान्य द्यायचे असे असल्याने हिटलर स्टाईल 'कॉन्सन्ट्रेशन कॅम्प" आदी संकल्पना ते या खंडप्राय देशात लागू करूच शकत नव्हते. हिटलरच्या वेळी एकसंध जर्मनीची लोकसंख्या होती केवळ ७ कोटी व तीमध्ये ज्यू सह अन्य धर्मीय होते दीड कोटीच्या आसपास. याच काळात भारताची महाप्रचंड लोकसंख्या होती तब्बल ४० कोटी. विचार करा...चर्चिल सोडाच, पण हिटलर तरी या देशात तसल्या कॅम्पची शक्यता विचारात घेऊ शकला असता का? चर्चिलला तर हिंदुस्थानाला इंग्लंडची टांकसाळ समजायचा. ब्रिटीश संसदेत ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य देण्याचा विषय आला, त्यावेळी तो ताडकन उदगारला होता : "ब्रिटिश साम्राज्याचे दिवाळे पुकारावयाला काही मी ब्रिटनचा पंतप्रधान झालो नाही !" ~~ याचाच अर्थ इंग्लंड कायम आमच्याकडे "सोन्याची अंडी देणारी कोंबडी" याच नजरेने पाहत असे, त्यामुळे कशाला असल्या लुटारूंची तरफदारी करायची की त्यांनी इथल्या जनतेला कायद्याने वागवले म्हणून. वागवले असेल तर निव्वळ त्यांच्या पोळीवर इथल्या भटटीतील तूप अनायासे पडत होते म्हणून. अहो, इतकी लोभी जात आहे ब्रिटिशाची की आज इथून जावून ६०-६५ वर्षे झाली तरी सरकारी पातळीवरून मागणी करूनही (मजूर असो वा हुजूर पक्ष) तिथले सरकार भारताला "कोहीनूर हिरा" अन् "शिवाजीची भवानी तलवार" द्यायला तयार नाही, कारण ते त्याला आपली "लूट" समजतात... हा त्यांचा सुसंस्कृतपणाचा मुखवटा ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

"बॅटल ऑफ ब्रिटन"

सुधीर काळे
Fri, 06/11/2010 - 12:37 नवीन
पुष्करिणीताई, मी बर्‍याच वर्षांपूर्वी दुसर्‍या महायुद्धावर बरेच वाचले होते, पण आता स्मरणशक्ती दगा देईल अशी भीती वाटते. माझ्या आठवणीप्रमाणे "बॅटल ऑफ ब्रिटन" हे नांव हिटलरने जो इंग्लंडवर बाँबवर्षाव केला (July 10, and lasting until early August 1940) त्या अटीतटीच्या युद्धाला दिलेले होते. त्याच्याशी डंकर्कचा संबंध फक्त डंकर्कनंतर कांहीं महिन्यात ते सुरू झाले इतकाच असावा! http://info-poland.buffalo.edu/britain/airbattle.html या दुव्यावर माहिती आहे. "Winds of War" व "War and Remembrance" ही दुसर्‍या महायुद्धावर हर्मन वूक याने लिहिलेली पुस्तकें वाचल्याखेरीज दुसर्‍या महायुद्धाबद्दलचे वाचन अपुरेच राहील असे मला वाटते. "Winds of War" हे युरोपमधील युद्धाबद्दल असून "War and Remembrance" हे पॅसिफिक भागातील युद्धाबद्दल आहे. हे सगळे लिहायचे कारण कीं त्यात दिलेली एक 'थेअरी' फार पटण्यासारखी आहे. वूक म्हणतात कीं जपानने 'पर्ल हार्बर'वर हल्ला करण्याऐवजी जर व्लाडिवोस्टॉकवर हल्ला केला असता तर रशियाला आपली फौज जर्मन सैन्यापुढून काढून व्लाडिवोस्टॉककडे न्यायला लागली असती व जर्मन सैन्यावरचा भार हलका झाला असता. शिवाय 'पर्ल हार्बर'वर हल्ला केला नसता तर अमेरिकेलाही युद्धात पडायला सबब मिळाली नसती. या दोन गोष्टींमुळे दुसर्‍या महायुद्धात जर्मनीचा पराजय झाला! ज्यांना दुसर्‍या महायुद्धावरील वाचनात रस आहे त्यांनी ही दोन पुस्तके जरूर वाचावीत. ------------------------ सुधीर काळे 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/36uoebc (प्रकरण सातवे)
  • Log in or register to post comments

खुपच

जागु
Fri, 06/11/2010 - 13:02 नवीन
खुपच चांगला लेख आहे.
  • Log in or register to post comments

हिटलर, भारत व इंग्लंड

चिंतातुर जंतू
Fri, 06/11/2010 - 17:43 नवीन
या धाग्यावरील काही मुद्दे अचानक गार्डिअन या ब्रिटिश वर्तमानपत्रात एका लेखात दिसले. हिटलरमुळे भारताचा कसा फायदा झाला, हे दर्शवणारा एक चित्रपट भारतात बनतो आहे. त्या निमित्त्ताने लेखकाने ब्रिटिश सत्ता, हिटलर आणि त्याचे भारताविषयीचे विचार याविषयी काही म्हटले आहे. उदा:
  • गांधी आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांना गोळ्या घाला, असा सल्ला हिटलरने ब्रिटिशांना दिला होता.
  • 'आम्ही जर भारताचे राज्यकर्ते बनलो, तर लवकरच भारतीयांना आधीचे ब्रिटिश राज्य बरे वाटू लागेल', अशी धमकीही हिटलरने दिली होती.
- चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments

मस्त लेख....

मुक्त विहारि
Sat, 05/23/2015 - 20:02 नवीन
ह्या घटनेवर आधारीत एक उत्तम सिनेमा पण निघाला होता.... लिंक देत आहे, गरजूंनी लाभ घ्यावा.... https://www.youtube.com/watch?v=BJGxT0HsO8A
  • Log in or register to post comments

मिपा क्लासिक -७

मारवा
Mon, 11/02/2015 - 06:07 नवीन
मिपा क्लासिक -७
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Mon, 11/02/2015 - 20:09 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

उत्तम लेख. कालच डंकर्क

पद्मावति
Sat, 07/22/2017 - 22:48 नवीन
उत्तम लेख. कालच डंकर्क चित्रपट रीलीज झालाय. बघणार नक्कीच.
  • Log in or register to post comments

मुळ लेख छानच

रघुनाथ.केरकर
Mon, 07/31/2017 - 18:20 नवीन
पण चर्चेतुन सुधधा बरीच माहीती मिळाली. सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments

आवडला लेख

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/04/2021 - 02:25 नवीन
आवडला लेख
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा